जगातील सात आश्चर्य मराठीत | 7 Wonders Of the World in Marathi

आपली पृथ्वी ही इतकी मोठी आहे, ज्याचा आपण विचार देखील करू शकत नाही, तसेच पृथ्वीवर अनेक अशा आश्चर्यात टाकणाऱ्या गोष्टी आहे त्यातील काहींचा शोध लागला आणि काहींचा अजून लागायचा आहे. अनेकदा आपल्यासमोर देखील अशा काही गोष्टी येतात ज्यांच्यावर लक्ष ठेवणे आपल्याला शक्य होत नाही. बऱ्याचदा तुमच्या मनात देखील एक प्रश्न भांबावत असेल, तो म्हणजे पृथ्वी बनवणाऱ्याने ह्याचा विचार देखील कसा केला असेल?

आज आपल्या संपूर्ण पृथ्वीवर एकूण १९५ देश आहेत आणि प्रत्येक देश कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. १९५ देश असूनही केवळ ७ आचार्य जनक गोष्टी अथवा स्थान पृथ्वीवर उपलब्ध आहे आणि हे एकुलते एक आहे म्हणजे ह्यसारखे तुम्हाला संपूर्ण जगात शोधून देखील सापडणार नाही. अशा ह्या जगातील सात आश्चर्यांबद्दल आपण इथे अगदी विस्तारित पणे माहिती घेणार आहोत,


जगातील सात आश्चर्य मराठीत [7 Wonders Of the World in Marathi]

1. ताज महाल [Taj Mahal]

ताज महाल हे भारतातील उत्तर प्रदेश मधील आग्रा ह्या शहरात यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. ताज महाल ला जगातील सात आश्चर्यांपैकी एक होण्याचा मन मिळाला आहे. ताजमहाल म्हणजे सफेद रंगाची उत्कृष्ट आणि कला कृती असलेली इमारत होय. हि इमारत मोघल बादशाह शहाजहान ह्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ (१६३२ ते १६५३ दरम्यान) बांधली होती. मुमताज ही शहाजहान ला त्याच्या इतर पत्नींपेक्षा प्रिय होती. आपल्या १४ व्या पुत्राला जन्म देताना तिने देहत्यागला आणि तिच्या आठवणीत ताजमहाल उभे राहिले.

ह्या इमारतीच्या बांधकामाला पूर्ण होण्यास एकूण २१  वर्षांचा कालावधी लागला.  ताज महाल चे काम करण्यासाठी एकूण २०,००० कामगार खर्ची पडले होते. असे म्हटले जात कि, हे काम बादशाहच्या आदेशानुसार उस्ताद अहमद लाहुरी ह्या इसमाच्या अध्यक्षते खाली पूर्णत्वास गेले.

ताजमहाल हे दिसण्यात जितके सुंदर आहे तितकाच त्याचा इतिहास हा थरारक आहे. ताजमहाल पूर्ण झाल्यानंतर ह्यसारखी दुसरी इमारत तयार होऊ नये, म्हणून ताजमहाल बांधणाऱ्या २०,००० मजुरांचे हात कलम करण्यात आले होते.

2. चिचेन इत्सा [Chichen Itza]

हि एक पिरॅमिट प्रमाणे दिसणारी आकृती आहे. ह्याची निर्मिती हि दगडापासून केली असून, ह्यावर विविध प्रकारच्या संस्कृतिक कलाकृती आपल्याला पहायला मिळतात. ह्याचे वास्तव्य स्थान हे मेक्सिको मध्ये आहे.

चिचेन इत्सा च्या निर्मितीची अचूक तारीख कोणालाही ज्ञात नसून इ.स. ४०० मध्ये ह्याची निर्मिती झाली असावी असा अंदाज शास्त्रज्ञानी लावला आहे.

जेव्हा चिचेन इत्सा चे उत्खनन चालू होते त्यादरम्यान ह्यामध्ये अनेक पौराणिक मुर्त्या, अमूल्य दागिने आणि इतर काही महत्व पूर्ण गोष्टी प्राप्त झाल्या, ज्यामुळे ह्याबद्दल माहिती जाणून घेणे अधिक सुलभ झाले.

3. क्रिस्तो रेदेंतोर [Christ The Redeemer]

क्रिस्तो रेदेंतोर म्हणजे ब्राजील ह्या देशातील रिओ दे जाणेइरो ह्या शहरातील येसू ख्रिस्ताची मूर्ती अथवा पुतळा. हा पुतळा जगातील सात आश्चर्त्यांपैकी एक आहे. येसू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू ज्यांचे अस्तित्व  हे इ.स. ४ च्या दरम्यान होते. संपूर्ण जगाला सत्याच्या मार्गाने चालण्याची शिकवण देण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची देखील पर्वा केली नव्हती.

येसू ख्रिस्तांचा हा पुतळा अगदी डोंगर माथ्यावर वसलेला असून ह्याची उंची जवळपास ४० मीटर आणि रुंदी ३० मीटर इतकी आहे. ह्या मूर्तीची स्थापना १९२३ ते १९३१ ह्या दरम्यान झाली होती. येसू ख्रिस्ताच्या ह्या पुतळ्याला ख्रिस्ती धर्माचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

4. कलोसियम [Colosseum]

रोमन संस्कृती हि जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे. रोमन संस्कृती मध्ये तयार केलेले कलोसियम थेटर हे जगातील आणखी एक आश्चर्य आहे. ह्याची निर्मिती हि सुमारे इ.स. ७० च्या दरम्यान व्हेस्पासियन राज्याच्या काळात झाली.

भव्य इमारत आणि पुरातन काळातील सांस्कृतिक नक्षीकाम हे ह्या थेटर चे वैशिष्ठ्य आहे. एकाच वेळेस ५०,००० लोक ह्या थेटर मध्ये अगदी आरामशीर सामावू शकतात हे ह्या थेटर चे आणखी एक वैशिष्टय आहे.

कालांतराने आणि अनेक नैसर्गिक आपतींमुळे, ह्या थेटर ची झालेली जिझ आपण अगदी सहज पाहू शकतो.

5. चीनची भिंत [Great Wall Of China]

चीन हा देखील जगातील प्राचीन देश म्हणून ओळखला जातो. चीन हा मार्शलआर्टस साठी प्रसिद्ध आहे, त्याहून अधिक प्रसिद्ध आहोत तो चीनच्या भिंतीसाठी. चीन मध्ये तयार केलेली भिंत हि जगातील सर्वाधिक लांब मानवनिर्मित भिंत असल्याचा अनुमान लावण्यात आला आहे.

सतत च्या होणाऱ्या परकीय आक्रमणांमुळे हि भिंत उभारतण्यात आली होती, ज्याचे अनेक भाग आहे. हि भिंत माती, दगड आणि विटांपासून तयार केली असून ह्याची लांबी हे सुमारे ६,४५० इतकी आहे.

ह्या भिंतीचे आणखी एक आश्चर्य म्हणजे हि भिंत चंद्रावरून देखील पाहता येते असे अनेकांचे म्हणणे आहे.  चीन च्या ह्या भिंतीला थे ग्रेट वॉल ऑफ चीन ह्या नावाने ओळखले जाते.

6. माक्सू पिक्त्सू [Machu Picchu]

पेरू पर्यटकांसाठी नेहमीच एक आकर्षण केंद्र बनत आले आहे. पेरू ह्या देशाला ओळख मिळाली ती त्याला प्राप्त झालेल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे. उंच डोंगर रांगा, हिरवा निसर्ग आणि अनेक नद्यांचा उगम अशी पेरू ची रचना मानली जाते. ह्याच पेरू मधील माक्सू पिक्त्सू हे जागतिक स्तरावरील सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट आहे.

माक्सू पिक्त्सू हे मुळात पेरू देशातील इंका ह्या साम्राज्यात वसले आहे. हा मुळात एक डोंगराळ भाग असून हे समुद्र सपाटी पासून जवळ पास ८००० फूट उंचीवर स्थिर आहे.

7. पेट्रा [Petra]

पेट्रा एक प्राचीन कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असून आशियातील जॉर्डन ह्या देशात वसलेले आहे. ह्याची निर्मितीची अचूक तारीख कुणालाही माहित नसून, हि कलाकृती इ.स. ३१२ च्या दरम्यान असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.

पेट्रा तयार करण्यासाठी कोणत्याही वीट, माती किंवा दगडांचा वापर केला नसून डोंगर कोरून हे तयार करण्यात आले आहे, तसेच ह्याची रचना हि एखाद्या महालप्रमाणे आहे, जे आज जॉर्डन देशाचे आकर्षण केंद्र बनले आहे. दरवर्षी लाखो लोक पेट्रा ला भेट देतात.

ह्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे १८ व्य शतकापर्यंत पेट्रा बद्दल लोकांना माहित नव्हते, अनेक संशोधकांच्या शोधादरम्यान हे जगासमोर आल्याची माहिती मिळाली आहे.

तर हेच होते जगातील सात आश्चर्य ज्यांबद्दल आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला.

अधिक लेख :

1. जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे ?

२. जगातील सर्वात लहान देश कोणता ?

३. जगातील सर्वात श्रीमंत देश

Leave a Comment