भारताचे संविधान कोणी लिहिले ? | Bhartache Savidhan Koni Lihile

भारतीय संविधान हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे, परंतु अनेक लोक संविधानाला नियम असलेले केवळ एक पुस्तक समजतात, परंतु असे नाही, सविधान म्हणजे 130 करोड लोकसंख्या असलेल्या देशाला अगदी सुरळीत चालवण्याचे साधन आहे.

सविधान हे देशाच्या सर्वोच्च स्थानी होते आणि असणार आहे. कालांतराने त्यात काही बदल करण्यात आले, परंतु तरीही त्याचे मोल काही कमी झाले नाही.

सविधान हे मुळात इंग्रजी भाषेत लिहिले असून त्याचे भाषांतर हिंदी ह्या भाषेत देखील करण्यात आले आहे आणि ते ग्राह्य देखील धरले जाते, कारण हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे.

ह्या लेखात आपण भारतीय संविधानासंबंधित विविध माहितीचा आढावा घेणार आहोत,


भारताचे संविधान कोणी लिहिले ?

भारताचे स्वतंत्र संविधान हवे, ह्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी १९४६ मध्ये एक सभा भरविण्यात आली. ह्या सभेत एकूण ३८९ लोक हजर होते, ज्यातील २९२ हे ब्रिटिश अधिकारी, ४ मुख्य आयुक्त क्षेत्राचे प्रतिनिधी आणि ९३ भारतातील विविध राज्याचे प्रतिनिधी होते.

ह्या सभेत संविधान तयार केले जावे, हा निर्णय घेण्यात आला आणि १९४६ मध्ये पहिल्यांदा दिल्ली येथे, संविधान सभा भरविण्यात आली. ह्या सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चीदानंद सिंह ह्यांची निवड करण्यात आली होती.

ह्या सभेनंतर संविधान निर्मिती संबंधीत अनेक वाद विवाद उदयास आले आणि शेवटी २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षते खाली एक मसुदा समिती तयार करण्यात आली आणि समितीला संविधान निर्मितीची जवाबदारी सोपविण्यात आली.

अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसात संविधान लिहिले.


भारताचे संविधान कधी लिहिले ?

भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षते खाली १९४७ मसुदा समितीद्वारे सुरु झाली आणि संविधान तयार करण्यासाठी समितीला एकूण २ वर्ष ११ महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला असून, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान पूर्णतः तयार करण्यात आले.


संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?

डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राजेंद्र प्रसाद ह्यांचा जन्म ३ डिसेंबर १८८४ साली सध्याच्या बिहार ह्या राज्यात झाला. राजेंद्र प्रसाद हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून अनेक स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी मोलाचा वाटा दिला होता.

राजेंद्र प्रसाद ह्यांना भारतरत्न हा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. देशासाठी आपल्या जीवाला कवडीमोल समजणाऱ्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद ह्यांचा मृत्यू २८ फेब्रयारी १९६३ मध्ये बिहार राज्यामधील पटणा ह्या जिल्ह्यात झाला.


मसुदा समिती मधील सदस्यांची नावे

मसुदा समितीची स्थापना २९ ऑगस्ट १९४७ मध्ये झाली असून, ह्यामध्ये एकूण सात सदस्यांचा समावेश होता, ज्यांची नावे खालीलप्रमाणे :

  1. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
  2. कन्हैय्यालाल मुंशी
  3. गोपाळ स्वामी अयंगार
  4. D.P. खेतान
  5. अल्लादि कृष्ण स्वामी अय्यर
  6. माधव राव
  7. सैय्यद मोहम्मद सादुल्ला

मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष असून ह्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे आहे. बाबासाहेब आंबेडकर हे समाज सुधारक असून दलितांना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचे काम त्यांनी केले, ज्या दरम्यान अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले आणि त्यांचे बाबासाहेब असे नामकरण झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये दलित समाजामध्ये झाला. आपल्या आणि आपल्या समाजासोबत होणारा भेदभाव रोखण्यासाठी त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला आणि आपल्या शिक्षणाच्या जोरावर जातीभेद नष्ट करून दलितांना त्यांचा अधिकार मिळून दिला, म्हणून संपूर्ण हिंदुस्तानात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नाव आदराने आणि स्वाभिमानाने घेतले जाते.


भारतीय संविधानात किती कलमे आहेत ?

भारतीय संविधानात एकूण ३९५ इतके कलम आहेत. ही कलमे संघराज्य व त्यांचे क्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार, राज्याचे मार्गदर्शक तत्व, केंद्र सरकार, राज्य सरकार, नगरपालिका, सहकारी संस्था, केंद्रशासित प्रदेश, पंचायत राज, महसूल, केंद्र , अनुसूचित जाती जमाती,  कार्यालयीन भाषा, न्यायाधिकरण, निवडणूक आयोग, आणीबाणी विषयक, संविधान दुरुस्थी, निरसन, अस्थायी तरतूद, ह्या भागांमध्ये विभागले गेले आहे. ह्या विभागाद्वारे प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींसाठी तुरतुद केली गेली आहे.


आपण काय शिकलो ?

  • भारताचे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षते खाली कार्य करणाऱ्या मसुदा समिती द्वारे तयार केले गेले.
  • संविधान संभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते.
    मसुदा समिती मध्ये एकूण ७ सदस्यांचा समावेश होता.
  • भारतीय संविधान मध्ये एकूण ३९५ इतक्या कलमांचा समावेश आहे.
  • भारतीय संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्णतः तयार करण्यात आले होते.
  • भारतीय संविधान १९५० मध्ये अमलात आणले

अधिक लेख :

1. संविधान म्हणजे काय ?

2. भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये

3. समान नागरी कायदा म्हणजे काय ?

4. न्यायालयाचे प्रकार व कार्य

1 thought on “भारताचे संविधान कोणी लिहिले ? | Bhartache Savidhan Koni Lihile”

  1. नमस्कार सर
    1646 हा काळ छञपती शिवाजी महाराज यांचा होता.. तेव्हा कुठे सभा भरवण्यात आली.. माहिती चुकीची दिलं सर

    Reply

Leave a Comment