जगातील सर्वात लहान देश कोणता ?

संपूर्ण पृथ्वीवर एकूण १९५ देश आहेत, जे विविध कारणांमुळे जगप्रसिद्ध आहेत, त्यातील काही नव्याने अस्तित्वात आले आहेत तर काही हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहेत, ह्याचा अंदाज आपल्याला त्या देशाच्या संस्कृतीमधून येतोच, जसे की आपला भारत देश.

दर दिवशी होणाऱ्या उत्खननातून काही अशा गोष्टी आपल्या समोर येतात, यावरून आपल्याला समजते की भारत हा या पृथ्वीवर अगदी हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. नवे देश म्हणजे नुकतेच स्वातंत्र्य झालेत किंवा एका देशाचे विभाजन होऊन दोन नवीन स्वतंत्र देश उदयास आलेत.

१९५ देशाच्या यादीत जगातील सर्वात लहान देश कोणता ? असा प्रश्न तर नक्कीच तुमच्या मनात कधीही न कधी आला असेलच, हा प्रश्न केवळ सामान्य ज्ञानाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, तर MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षांमध्ये देखील अनेकदा असे प्रश्न विचारले गेले आहेत, म्हणूनच या लेखात आपण जगातील सर्वात लहान देशाबद्दल माहिती पाहणार आहोत.


जगातील सर्वात लहान देश कोणता ?

जगातील सर्वात लहान देशाचा किताब व्हॅटिकन सिटी कडे आहे. व्हॅटिकन सिटी इटली मधील रोम शहरात वसले असून, हे केवळ 109 एकरात पसरले आहे, जे मुंबईपेक्षा देखील खूप लहान आहे. या देशाची स्थापना ११ फेब्रुवारी १९२९ मध्ये झाली असून, येथील लोकसंख्या १००० पेक्षा देखील कमी आहे. २०१९ मध्ये या देशाला एकूण १०० वर्षे पूर्ण झाली.


इतिहास

व्हॅटिकन सिटी ची निर्मिती होण्याआधीपासून वेटिकन हे नाव अस्तित्वात होते, रूम शहराच्या काही अंतरावर tiber नदीच्या पश्चिमेस एक दलदलीचा भाग होता, ज्याला व्हॅटिकन ह्या नावाने ओळखले जात होते, हा भाग मुळात Janiculum व्हॅटिकन टेकडी आणि Monte Mario टेकडी यादरम्यान अस्तित्वात होते.

रोमन साम्राज्या दरम्यान व्हॅटिकन मध्ये मोठ्या इमारतींचे बांधकाम पार पडले, ज्यामुळे वेटिकन सिटी चे सौंदर्य आणखी वाढले, याच दरम्यान अग्रीपिना यांनी वेटिकन मधील मोठ्या भूभागात बाग तयार केली, काही कालावधीनंतर ॲग्रीपिना यांचा मुलगा सम्राट कॅलिगुला ह्यांनी सर्कस उभारले ज्याला निरोचे सर्कस या नावाने ओळखले जाऊ लागले.

ज्या कॅथलिक चर्चसाठी व्हॅटिकन सिटी प्रसिद्ध आहे, ह्या चर्च च्या निर्मितीची सुरुवात ही चौथ्या शतकात सेंट पीटर यांच्या कबर वर बॅसिलिका नामक इमारत निर्मितीपासून झाल्यामुळे या शहराला एक तीर्थक्षेत्राचे रूप धारण झाले,  १३७७ नंतर या शहरांमध्ये अपोस्तोलिक पॅलेस आणि बॅसिलिका अशा प्रसिद्ध क्षेत्रांची निर्मिती झाल्यामुळे या शहरात याची लोकप्रियता अधिक वाढली.

इ.स  ३१३ मध्ये मिलान नावाच्या राजाच्या आदेशावरून ह्या क्षेत्रात ईसाई धर्म ग्रहणा नंतर सम्राट Constantine यांनी ३२४ मध्ये सेंट पीटरच्या कबर वर बेसिलीला बांधण्यास सुरुवात केली, बेसिलीलाम्हणजे ईसाई लोकांसाठी एक आध्यात्मिक केंद्र होते, लोक इथे आकर्षित होत गेले, ज्यामुळे आजूबाजूच्या क्षेत्रात विकास घडून आला आणि व्हॅटिकन मध्ये व्यापाराची भरभराट झाली.

८४६ च्या काळात समुद्री डाकूंच्या हल्ल्यानंतर पोप लिओ चौथा याने बेसिलिका आणि अवतीभोवतीच्या इतर क्षेत्रांच्या सुरक्षिततेसाठी भिंती उभारण्याचा आदेश दिला, यानंतर जवळजवळ ३९ फूट उंचीच्या भिंती उभारण्यात आल्या, आज ह्याच भिंती वेटिकन क्षेत्र आणि बोगा नावाच्या जिल्ह्यासाठी सौरक्षण देणारी वास्तू आहे.

१४५० च्या दरम्यान Nicholas v circa यांनी apostolic Palac उभारण्यास सुरुवात केली, हेच पॅलेस पुढे जाऊन त्यांचा कायमचा पत्ता ठरला नंतर ह्याच पॅलेस चे रूपांतर एका लायब्ररी मध्ये झाले.

१५०३ च्या दरम्यान राज्य कारभार सम्राट julius च्या हातात येताच शहरात अनेक बदल घडून आल्याचे सांगितले जाते, ज्युलियस शासन काळा दरम्यान बेसिलीला नष्ट करून त्या जागी भव्य वास्तू उभारण्याचे आदेश निघाले, ज्याला Bramante नाव देण्याचे ठरले.

१५१३ मध्ये Julia’s च्या मृत्यूनंतर हा प्रोजेक्ट पुढे चालवावा की नाही, यावरून देखील अनेक वाद निर्माण झाले पण शेवटी १६२६ मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि अशाप्रकारे ४५२ फूट उंच आणि ५.७ एकर क्षेत्रात पसरलेले जगातील सर्वात मोठे चर्च उभारण्यात आले.

पुढे लेटरन पॅक्टस सोबत करार होईपर्यंत म्हणजेच १९२९ पर्यंत चर्च आणि धर्मनिरपेक्ष सरकार यांच्यात ६० वर्षे संघर्ष चालू होता, फेब्रुवारी १९२९ मध्ये लेटरन सोबत करार होऊन सरकारमधील वाद मिटला आणि अशाप्रकारे जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी हा देश उदयास आला.


व्हॅटिकन सिटी मधील 5 पर्यटन स्थळे

व्हॅटिकन सिटी हा देश आकाराने जरी लहान असला तरी, ह्या देशात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना दरवर्षी हजारो लोक भेट देतात. येथे असलेल्या पर्यटन स्थळांपैकी अधिक तर पौराणिक आहेत, जी रोमन संस्कृती दर्शवितात. अशाच व्हॅटिकन सिटी मधील ५ प्रसिद्ध पर्यटन स्थळांची नावे आणि थोडक्यात माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. पीटर्स बॅसिलिका

पीटर बेसिलिकाला न्यू सेंट पीटर बॅसिलिका ह्या नावाने देखील ओळखले जाते. हे मुळात के चर्च असून जगातील सर्वात मोठे चर्च अशी पीटर बॅसिलिकाची ख्याती आहे. सम्राट पोप जुलियस दुसरा ह्याने १५०६ मध्ये ह्या चर्च चे काम सुरु केले होते आणि हे चर्च १६१५ मध्ये, म्हणजेच तब्बल १०९ वर्षांनंतर बनून तयार झाले.

बेसिलिका चर्च तयार करण्याची कल्पना पहिल्यांदा पोप निकोलस पाचवा ह्याने मांडली होती आणि काम देखील सुरु केले होते, परंतु त्याच्या मृत्यु नंतर कामाला देखील स्थगिती मिळाली.

भव्य उंच आणि नक्षीदार इमारत हे पीटर बॅसिलिका चे वैशिष्ठ्य आहे. ही इमारत लांबीला २२० मीटर, उंचीला १३६.६ मीटर आणि रुंदीला १५० मीटर इतकी असून हे ख्रिश्चन अनुयायांचे एक धार्मिक स्थान आहे.

2. व्हॅटिकन गार्डन

व्हॅटिकन सिटी मधील ह्या गार्डन ला देशाच्याच नावाने म्हणजे व्हॅटिकन गार्डन ह्या नावाने ओळखले जाते. हे गार्डन २३ हेक्टर इतक्या भूभागात पसरले असेल ह्या गार्डन द्वारे व्हॅटिकन सिटी ह्या देशाचा अर्धा भूभाग व्यापला आहे. हे गार्डन समुद्र सपाटी पासून ६० मीटर म्हणजेच १९७ फूट इतक्या उंचीवर स्तिथ आहे. ह्या गार्डन च्या परिसरात देखील आपल्याला विविध पौराणिक इमारती पाहायला मिळतात तसेच ह्या गार्डन मध्ये एक रेडिओ स्टेशन आणि गव्हर्नर चे पॅलेस देखील स्तिथ आहे.

२०१४ च्या दरम्यान येथील सरकार ने व्हॅटिकन गार्डन सर्वसामान्य लोकांसाठी सुरु करण्यात आले.

3. व्हॅटिकन लायब्ररी

व्हॅटिकन लायब्ररी चे मूळ नाव व्हॅटिकन अपोस्तोलीक लायब्ररी असे आहे, ह्याची स्थापन इ.स. १४७५ च्या दरम्यान झाली होती. इथे पौराणिक ग्रंथांचा खूप मोठा साठा आहे आणि १ करोड पेक्षा अधिक पुस्तके देखील आहे.

ह्या लायब्ररी मध्ये इतिहास, कायदे, विज्ञान आणि धर्मशास्त्र ह्या संबंधित पुस्तके आपल्याला पाहायला मिळतात. व्हॅटिकन लायब्ररी तयार करण्याची संकल्पना रोम मधील सम्राट पोप निकोलस ह्यांनी इतर क्षेत्रातील विद्वानांना आकर्षित करण्यासाठी मांडली होती, पंरतु त्यांच्या कार्यकाळात हे काम काही पूर्ण झाले नाही, परंतु त्यांचे हे स्वप्न त्यांचे उत्तराधिकारी सम्राट पोप सिक्स्टस ह्यांनी १४७१ ते १४८४ च्या दरम्यान म्हणजेच त्यांच्या कार्यकाळात पूर्ण केले.

4. इजिप्शिअन संग्रहालय

व्हॅटिकन सिटी मध्ये स्तिथ असलेले हे संग्रहालय सार्वजनिक कलाकृती आणि विविध पौराणिक मूर्त्या ह्याचे मुख्य केंद्र मानले जाते. हे संग्रहालय इतके मोठे आहे कि, त्यामध्ये ६०० पेक्षा अधिक लोक विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. ह्या संग्रहालयाची निर्मिती हि १६ व्या शतकाच्या सुरुवातीस झाली होती, ज्याची निर्मिती सम्राट पोप जुलियस ह्यांच्या द्वारे केली गेली होती. ह्या संग्रहालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात जास्त लोकांद्वारे पाहिल्या जाणाऱ्या संग्रहालयाच्या यादीत ह्या संग्रहालयाचे चौथे स्थान आहे.

5. कॉलोसीअम

कोलोसियम हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक असून हे जगातील सर्वात मोठे थेटर आहे, ज्यामध्ये एकसाथ ५०,००० लोक आरामशीर सामावू शकतात, ह्या थेटर च्या निर्मितीची सुरुवात हि इ.स ७ मधेच सम्राट व्हेस्पसियन ह्यांच्या निदर्शना खाली पार पडली, ह्याचे खरे नाव प्लॅवियन अँफिथिएटर असे असून, ह्याला रोमन कॉलिसिअम ह्या नावाने देखील ओळखले जाते. दुसऱ्या विश्व युद्धादरम्यान परकीय आक्रमणामुळे ह्या थिएटर चे बरेच नुकसार झाल्याचे आपल्याला दिसून येते.


भूभाग

आकाराने हा देश सर्वात लहान असल्यामुळे या देशाच्या वाट्याला देखील खूपच कमी भूभाग आला असून हा देश केवळ १०९ एकरात पसरला आहे, ह्या देशात शहरी भाग अधिक असल्यामुळे इथे शेती केली जात नाही.

या देशातील अधिक तर भागात मोठ्या इमारती आणि उर्वरित भागात गार्डन आहेत. व्हॅटिकन सिटी चा भूगोल हा खूपच साधारण असून हा देश समुद्रसपाटीपासून केवळ ७५ मीटर उंचीवर आहे. नैसर्गिक आपत्ती मध्ये केवळ भूकंप सोडता इतर कोणत्याही आपत्तींचा धोका या देशाला नाही.


आपण काय शिकलो ?

  • व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे.
  • हा देश १०९ एकर इतक्या क्षेत्रफळात पसरला आहे.
  • Peter’s Basilica, Vatican Garden, Vatican Library, Egyptian Museum, Colosseum हि व्हॅटिकन मधील काही प्रसिद्ध पर्यटन ठिकाणे आहेत.
  • व्हॅटिकन हे नाव रोमन शहराजवळील tiber नदीच्या पश्चिमेस असलेल्या ददली भूभागावरून ठेवल्याचे सांगितले जाते.
  • ह्या देशाची लोकसंख्या १००० पेक्षा देखील कमी आहे.

अधिक लेख :

1. जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे ?

2. जगातील सात आश्चर्य मराठीत | 7 Wonders Of the World in Marathi

3. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

Leave a Comment