जगातील सर्वात श्रीमंत देश | Jagatil Sarvat Shrimant Desh

संपूर्ण पृथ्वीवर पाणी ७१% टक्के आणि २९% इतकी जमीन आहे. ह्या २९% भूभागावर एकूण १९५ इतके देश अस्तित्वात आहेत, त्यातील काही देश हे नवीन, तर काही जुने देश आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत देश

नवीन देश म्हणजे एका देशाचे विभाजन होऊन त्याचे दोन नवीन देश तयार होणे. प्रत्येक देशाची संस्कृती, लोकांचे राहणीमान आणि इतर गोष्टींमध्ये खूप वैशिष्ट्य आढळून येते.

ह्या १९५ देशांमध्ये अनेक देश हे खूपच गरीब तर अनेक देश खूपच श्रीमंत देश आहेत. ह्या लेखात आपण अशाच ०७ जगातील सर्वात श्रीमंत देशांची नावे आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

1. अमेरिका

अमेरिकेचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत आणि बलाढ्य देशांच्या यादीत आहे. संपूर्ण जगात अमेरिका हा क्रमांक एक चा श्रीमंत देश असून, ह्या देशाचे वार्षिक उत्पन्न हे १०,५९,९९० अरब डॉलर इतके आहे.

२०१९ च्या रिपोर्ट नुसार केवळ ऐकल्या अमेरिकेची GDP [ Gross Domestic Product ] ही २१. ४३ लाख करोड $ इतकी आहे. ह्याचे कारण आपण सर्व जाणतोच, ते म्हणजे अमेरिकेकडे गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट ह्यासारख्या जगप्रसिद्ध मोठ्या प्रमाणत टॅक्स भरणाऱ्या कंपन्या आहेत.

2. चीन

चीन हा जगातील सर्वात मोठा माल निर्यात करणार देश आहे, ह्याचे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानातील विकास. चीन ची भिंत हि जगातील सात आश्चर्यां पैकी एक आहे.

चीन चे निर्यातीकरण हेच चीनच्या उत्पन्नाचा प्रमुख मार्ग आहे, जो चीनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत देश बनवतो.

दर वर्षी चीन केवळ माल निर्यात करून २ ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त कमावते. चीन ची GDP १६.६४ ट्रिलियन USD डॉलर इतकी असून, चीन चे उत्पन्न ८१ ट्रिलियन USD डॉलर पेक्षा अधिक आहे.

3. जपान

विकसित देश म्हणून संपूर्ण जगात जपान ह्या देशाची ख्याती आहे. जपान ला मुळात तेथील तंत्रज्ञान विकासामुळे ओळखले जाते.

अगदी कमी वेळात स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा मान देखील जपान ला मिळाला आहे. ५,०४८,६९० दशलक्ष (Million) डॉलर इतकी जपान ची GDP गणली गेली आहे.

4. जर्मनी

जर्मनी हा देश युरोपच्या मध्य भागी स्तिथ असून, युरोप खंडातील रशिया ह्या देशांनंतर दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय देश म्हणून जर्मनी ह्या देशाची ओळख आहे.

जर्मनी ची लोकसंख्या हि ८३ दशलक्ष पेक्षा जास्त गणली असून येथील सुंदरता हि नेहमीच पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

२०१९ मध्ये प्रसारित झालेल्या जागतिक रिपोर्ट नुसार जर्मनीची GDP ३.८४६ ट्रिलियन डॉलर इतकी गणली असून जगातील चौथ्या नंबर चा श्रीमंत देश म्हणून जर्मनीची ओळख बनली आहे.

5. भारत

भारत हा एक विकसनशील देश असून जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताज महाल हे भारताच्या राजधानीमध्ये म्हणजेच दिल्ली मधील आग्रा शहरात आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात वाढणाऱ्या औद्योगिक विकासामुळे भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे.

भारताचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे संपूर्ण जगात भारत हा एकुलता एक देश आहे, जेथे सर्वाधिक तरुण पिढी आहे. भारताचे वार्षिक उत्पन्न १५.५ ट्रिलियन पेक्षा जास्त असून २ लाख अब्ज ( Trillion ) पेक्षा जास्त भारताची GDP आहे.

6. युनाइटेड किंग्डम

United Kingdom ला ब्रिटन म्हणून देखील ओळखले जात असून, जगप्रसिद्ध लंडन शहर हे ह्याच देशात स्थित  आहे. टॉवर ऑफ लंडन, रोमन बाथस हे काही जगप्रसिद्ध ठिकाणे युनाइटेड किंग्डम येथे आहेत.

युनाइटेड किंग्डम येथील लोकसंख्या ही ६.६ कोटी इतकी आहे. UK चे वार्षिक उत्पन्न हे £10.0 trillion इतके गणले गेले आहे. ह्या देशाची GDP 2.83 लाख करोड डॉलर इतकी असून जगातील ६ व्या क्रमांकाचा श्रीमंत देश होण्याचा मन UK ने पटकावला आहे.

7. फ्रान्स

जगप्रसिद्ध पॅरिस शहर हे फ्रान्स ह्या देशात स्तिथ आहे. ह्या देशाची लोकसंख्या ही ६७ दशलक्ष इतकी आहे. वाढता व्यापारा हा ह्या देशातील GDP सुधारण्याचे कारण सांगितले गेले असून, ह्या देशाची GDP २.७२ (२०१९) लक्ष करोड डॉलर इतकी आहे, ज्यामुळे हा देश जगातील सातव्या क्रमांकाचा श्रीमंत देश बनला आहे.

8. इटली

इटली ची अर्थव्यवस्था ही युरोपीय संघातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून, जागतिक दृष्टया इटलीची अर्थव्यवस्था आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

इटली हा युरोपियन संघाचा एक सदस्य असून, १० व्या क्रमांकाचा जगातील सर्वाधिक निर्यात करणारा देश आहे. एका जागतिक रिपोर्ट नुसार इटली ने २०१९ मध्ये ६३,२०० करोड इतक्या रकमेचा माल निर्यात केला.

इटली ह्या देशाचा अधिक तर व्यापार हा युरोपिअन संघातील देशांसोबत पार पडतो. २०२० नुसार इटली ची GDP ही १.८९ लाख करोड रुपये इतकी होती, ज्यात कालांतराने वाढ होताना दिसत आहे.

9. ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया हा एक विकसित देश आहे. एक जागतिक रिपोर्ट नुसार ऑस्ट्रेलिया हा जागतिक GDP मध्ये योगदान देणारा १३ व्या क्रमांकाचा मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश आहे.

GDP सोबतच हा जागतिक पातळीवर २५ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार तर,२० व्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. २०१७ नुसार ऑस्ट्रेलियाने अखंडित वाढत्या GDP सहित जागतिक पातळीवर अगदी मोलाचे योगदान दिले आहे.

जून २०२१ नुसार ऑस्ट्रेलिया देशाची GDP ही १,९८,००० करोड इतकी होती. ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेत देशातील सेवा क्षेत्राचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. ऑस्ट्रेलिया हा देश जगात १० व्या क्रमांकाचा नैसर्गिक संसाधनांनी संपन्न असा सर्वात मोठा देश आहे.

ऑस्ट्रेलिया मध्ये आढळणाऱ्या संसाधनाचे मूल्य २०१९ नुसार १९,९०,००० करोड इतके होते.

10. रशिया

रशिया हा GDP नुसार जगातील ११ व्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत देश आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेत नैसर्गिक गॅस, खनिज तेल व सोबतच इतरही संसाधनांचा मोलाचा वाटा आहे. रशिया हा युरोपीय संघातील ५ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.

देशाची अधिक तर कमाई ही नैसर्गिक संसाधनाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. २०२० मध्ये रशियाच्या GDP चे मूल्य १.४८ लाख करोड रुपये इतके होते.

Leave a Comment