माझी आई निबंध | Majhi Aai Nibandh

आई ह्या केवळ दोन अक्षरांचा शब्दांमध्ये जणू संपूर्ण विश्व दडलेले आहे. जे वाचायला सोप्पे पण खूप काही सांगून जाते. आई ह्या शब्दाचे विस्तारित रूप माझ्यामते आयुष्य देणारे ईश्वर असा असावा. प्रत्येकाकडे एक अमूल्य आणि अतुल्य गोष्ट असते, परंतु ज्याचा कोणालाच अंदाज नसतो ते म्हणजे आई. ह्याची कदर केवळ त्यालाच आहे ज्याच्याकडे आई नाही.

माझ्या आईचे शिक्षण हे फार नाही परंतु तरीही ती माझ्यासाठी कधी डॉक्टर होते, तर कधी शेफ आणि कधी कधी तर शिक्षक देखील होते.

अशा माझ्या साध्या आणि भोळ्या आईचा दिवस सर्वांच्या आधी अगदी सूर्याचा प्रकाश आभाळात येण्याआधी सुरू होतो आणि सर्वांचे रात्रीचे जेवण झाल्यावर आणि सर्व घरचे झोपल्यावरच तिचा दिवस संपतो.

माझ्या आईचा दिनक्रम कधीही ठरलेला नसतो, परंतु तरीही दिवस हा नियोजन बद्द असल्यासारखेच भासते, मग ते आम्हाला शाळेत सोडणे असो वा घरकामे करणे असो.

आई विषयी एक खूपच चांगली अशी म्हण आहे ती म्हणजे “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” .

आई आपल्या पिल्लांना नेहमीच काही तरी जास्त देण्याचा प्रयत्न करते आणि हे करता करता ती स्वतःचाच विचार करणे विसरून जाते म्हणूनच म्हणतात की आई कधीही सामान्य नसते.

आई म्हणजे ती असते जी आपल्याला बाळाला जन्म देताना असहाय्य वेदनांमध्ये देखील हसते का तर तिचे विश्व ह्या जगात प्रवेश करत आहे. आई म्हणजे एक प्रकारचे puzzle आहे जे सोडवणे अजूनपर्यंत कोणालाच जमले नाही, कारण जेव्हा आई आपल्याला वरडते तिच्या वरडण्यात देखील प्रेम असते हे आपण तिच्या शब्दांचे निरीक्षण केल्यावर लक्षात येते.

आई ची भूमिका हे श्री कृष्णाच्या सुवर्ण तुळेच्या कथेत असणाऱ्या तुळशीच्या पाना प्रमाणे आहे. जेव्हा श्री कृष्णा ची सुवर्ण तूळ होत होती, तेव्हा पारड्यातले धन हे वाढत होते परंतु श्री कृष्णा चा पारडा काही हलेना जेव्हा संपूर्ण धन संपले तेव्हा एक कल्पना करण्यात आली आणि कृष्णा च्या विरुद्ध पारड्यात तुळशीचे पान ठेवण्यात आले आणि शेवटी कृष्ण चा पारडा वरच्या दिशेला गेला आणि सुवर्ण तुळा पूर्ण झाली. ह्यावरून असे समजते की आई हे एक अमूल्य रत्न आहे.

मुलगा अथवा मुलगी किती मोठ्या पदी रुजू झाले अथवा किती मोठे ज्ञानी झाले असले तर त्याची किंवा तिची पहिली शाळा ही आईची ओंजळ आणि पहिला गुरू ही आईच असते.

जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत गेलो तेव्हा माझ्यापेक्षा जास्त अश्रू हे आईच्या डोळ्यात असायचे जितक्या वेदना आपल्याला आई पासून दूर होताना व्हायच्या त्यापेक्षा अधिक ती सहन करायची.

शाळेत जायचो तेव्हा माझे केवळ एकच काम असायचे ते म्हणजे झोपेतून उठून आई समोर उभे राहायचे आणि अगदी काही क्षणात मला अंघोळ घालून, कपडे घालून आणि पावडर लावून शाळेसाठी तयार करणारी आई ही आजही माझ्या लक्षात आहे. शाळेसाठी तयार झाली की, मग माझे डब्याचे चोचले सुरु व्हायचे मला हे नको ते नको आणि आई हसून तूला उद्या नक्की करून देईन म्हणायची, अशा प्रकारे आणि अगदी सहज समजणारे व्यक्तिमत्व मला आजही सापडले नाही.

आज मी विविध ठिकाणी फिरतो विविध पद्धतीचे जेवण खातो पण त्या जेवणात मला अजूनही आई ची सर कधीच आली नाही आणि कधी येणार देखील नाही.

आई म्हणजे न मागता मिळालेले वरदान आहे जे प्रत्येकाच्या नशिबी नसते आणि ज्याच्या नशिबी असते त्याला त्याची कदर कधीच नसते हे वेळोवेळी दिसून देखील आले आहे.

आई हा मुळात निबंध लिहिण्याचा विषय नसून ग्रंथ लिहिण्याचा विषय आहे तसेच स्वतः मध्ये हे एक खूप मोठे विश्व आहे. आई ही एकदाच मिळते त्यामुळे जोपर्यंत ती आहे तिला आनंदी ठेवा. कारण ज्याला आई कळली त्याला संपूर्ण विश्व समजले.

Leave a Comment