संविधान म्हणजे काय व संविधानाचे महत्व कोणते ?

वर्तमान काळात प्रत्येक देशाकडे स्वतःचे स्वतंत्र असे संविधान आहे, ज्याद्वारे देशाचा कारभार चालवला जातो. प्रत्येक देशाच्या संविधानाची काही न काही विशेषतः आहे.

देशासाठी सर्वात महत्वाचा मानला जाणारा घटक संविधान, याची नेमकी व्याख्या काय व न केवळ व्याख्या तर संविधाना संबंधित विविध माहितीचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत,


संविधान म्हणजे काय ?

संविधान म्हणजे देशाचा कारभार चालविण्यासाठी तयार केलेला नियमांचा संच होय, ज्याद्वारे देशातील कायदे, नियम, मूलभूत अधिकार, हक्क आणि कर्तव्य दर्शविले जातात. संविधान म्हणजे अनुशासन ग्रंथ ज्याच्या सहाय्याने देशाचा संपूर्ण कारभार चालतो.

संविधान देशाच्या मूलभूत तत्वांचे वर्णन करतो, तसेच देशातील सरकारची रचना, प्रक्रिया, नागरिकांचे मूलभूत अधिकार परिभाषित करतो.

राष्ट्र निर्मिती अथवा आंतराष्ट्रीय स्तरावर मोठे बदल घडून आल्यावर, संविधान निर्मिती अथवा दुरुस्ती करण्यात येते, म्हणजे संविधानात ठराविक बदल साधले जातात. जसे कि १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यांनतर भारताने स्वतंत्र संविधानाची निर्मिती केली.


संविधानाचे कार्य

 • संविधान राजनैतिक समूहाच्या सीमा घोषित अथवा परिभाषित करते, या सीमा प्रशासकीय अथवा वैयक्तिक असू शकतात.
 • संविधान मूलभूत नियमांचा संच प्रदान करते, ज्यामुळे समाजातील विविध जाती जमातीतील लोकांमध्ये समन्वय साधले जाऊ शकते.
 • संविधानाद्वारे देशात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांसाठी विविध सजा अधोरेखित केल्या गेल्या आहेत.
 • विधानसभा, मंत्री मंडळ, लोकसभा यांची संरचना संविधानाद्वारे दर्शवली जाते.
 • देशातील विविध प्रशासकीय विभागातील जे अधिकारी आहेत, त्यांना व नागरिकांना त्यांचे अधिकार संविधान प्रदान करते.
 • संविधान देशातील प्रशासनाला समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी न्याय, स्वतंत्र आणि अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करते.
 • देशाचा राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील व्यवहार योग्यरित्या कसा चालवावा, याचे मार्गदर्शन करते.
 • देशातील नागरिकांचे स्वतंत्र जपण्यास मदत करते.
 • चांगला समाज घडविण्यास एक योग्य संविधान कारणीभूत ठरते.
 • देशाची आंतराष्ट्रीय स्तरावर एक आकर्षक छबी तयार करते.
 • संविधान न केवळ भारतीय नागरिक तर, विदेशी नागरिकांसाठी देखील अधिकार व नियम प्रदान करते.

संविधानाचे महत्व

संविधान हे विविध राजकीय आणि सामाजिक नियमाचा संच आहे, जो राज्यातील अथवा देशातील विविध बाबींना वाद-विवादाशिवाय पूर्ण करण्यास महत्वाचे ठरते.

कोणत्याही देशासाठी संविधान हा एक महत्वाचा घटक असतो, जो सांस्कृतिक आणि अधिकृत पैलू प्रदान करतो, सोबतच देशातील जे काही सरकारी अथवा प्रशासकीय विभाग असतात, त्यांना शासन करण्यास मदत करतो. राष्ट्रीय अथवा राज्य स्तरावर स्थिरता निर्माण करण्यासाठी न्यायपालिका, कार्यपालिका आणि कायदेमंडळ हे महत्वाचे ठरतात, ज्याची स्थपणा संविधानाद्वारे करण्यात आली आहे.

देशातील विविध प्रशासकीय विभाग ज्यांना देशाचे अवयव असे म्हटले जाते, त्या प्रशासकीय विभागांना ठराविक अधिकार प्रदान करून देश आणि प्रशासन यांच्यादरम्यान नियमन करण्यास संविधान महत्वाचे ठरते.

देशात लागू केलेले सर्व नियम आणि कायदे संविधानाने प्रदान केलेले असतात, त्यामुळे संविधानाचा आदर करणे आणि संविधानाने प्रदान केलेल्या नियम आणि कायद्यांचे पालन करणे, गरजेचे असते, असे न केल्यास देशाची अधोगती होऊ शकते, त्यामुळे देश टिकून ठेवायचा असेल तर, त्यासाठी संविधान महत्वाचे आहे.

संविधानाने न केवळ देशाच्या प्रशासनाला, तर देशातील जनतेला देखील विविध अधिकार बहाल केले आहेत, ज्याच्या आधारे जनता आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावू शकते, सोबतच स्वतःच्या न्याय हक्कासाठी देखील लढू शकते.

संविधान हा देशाचा कणा आहे. जो पर्यंत त्याचे पालन होईल, तो पर्यंत देश विकासाची पाऊले चालेल.


भारतीय संविधानाचा इतिहास

भारताचे स्वतंत्र संविधान निर्मित होण्यापूर्वी भारतात ब्रिटिश शासनाच्या नियमांचे अमल होत होते. १९४६ मध्ये ब्रिटिशांनी भारतातील उग्र आणि अनावर परिस्थितीचा आढावा घेत भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला आणि एक कॅबिनेट मिशन भारतात पाठविण्यात आले.

स्वातंत्र्यानंतर भारताचे देखील स्वतंत्र असे संविधान असावे, यासाठी ब्रिटिश भारत आणि भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधी यांच्या दरम्यान चर्चा व्हावी, याकरिता एक परिषद भरविण्यात आली, ज्याला संविधान सभा असे नाव देण्यात आले.

या परिषदेत एकूण ३८९ सभासद उपस्थित  होते, ज्यातील ९३ हे भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधी, ४ मुख्य आयुक्त क्षेत्राचे प्रतिनिधी तर, उर्वरित २९२ हे ब्रिटिश अधिकारी होते. या सभेत भारताकडे भारताचे स्वतंत्र संविधान असावे, असा ठराव मंजूर झाला.

संविधान सभेतील संविधान निर्मितीच्या निर्णयानंतर २९ ऑगस्ट १९४७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये कन्हैय्यालाल मुंशी, गोपाळ स्वामी, डी. पी. खेतान, माधवराव, सैय्यद सादुल्ला, भीमराव रामजी आंबेडकर या सदस्यांचा समावेश होता.

मसुदा समितीच्या निर्मितीनंतर समितीद्वारे २ वर्ष ११ महिने १८ दिवस या कालावधीत संविधान तयार केले गेले, ज्यामध्ये ३९५ लेख आणि १० परिशिष्ठाचा समावेश होता.

२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये तयार केलेल्या संविधानाला २६ जानेवारी १९४९ मध्ये देशात लागू करण्यात आले, सोबतच या दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित करण्यात आला.

संविधान अमलात आणल्यापासून १०४ वेळा घटना दुरुस्थी करण्यात आली आहे, ज्यातील शेवटची घटना दुरुस्थी ही २६ जानेवारी २०२० मध्ये केली गेली होती.


भारतीय सुविधांसंबंधित तथ्य

 • भारतीय संविधानात नमूद तरतुदी, अमेरिक, इंग्लंड, फ्रान्स सारख्या विविध देशातील संविधानांमधून घेण्यात आल्या आहेत.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान निर्मितीसाठी ६० पेक्षा अधिक विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास केला होता.
 • भारतीय संविधानाची प्रत ही संगणकीय प्रिंट नव्हती तर, ते हस्तलिखित होते, जे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्याद्वारे लिहिले गेले होते.
 • भारतीय संविधानाच्या पहिल्या अथवा खऱ्या प्रतमधील प्रत्येक पान सजविण्याचे काम पश्चिम बंगालमधील शांतीनिकेतन येथे राम मनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस यांच्याद्वारे पार पाडले गेले आहे.
 • भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे, ज्यात १.४६  लाख इतक्या शब्दांचा समावेश आहे.
 • भारतीय संविधान लिहिण्यासाठी २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवस इतका कालावधी लागला होता.
 • भारत स्वतंत्र झाल्यांनतर, जेव्हा भारतात संविधान लागू केले गेले तेव्हा, तेव्हा प्रथम भारतीय महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला होता.
 • भारताच्या पहिल्या मुख्य संविधानाची खरी प्रत ही आजही संसद भवनाच्या ग्रंथालयात जपून ठेवली आहे.
 • आता पर्यंत भारतीय संविधानात १०४ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत, शेवटची दुरुस्थी ही २०१९ साली डिसेंबर महिन्यात करण्यात आली होती.
 • भारतीय संविधानातील प्रस्तावना ही अमेरिकेच्या संविधानाशी प्रेरित आहे.
 • भारतीय संविधानावर स्वाक्षरी करणारे पहिले व्यक्ती, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते.

FAQ

1. भारतीय संविधान कोणी तयार केले ?

उत्तर : डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या मसुदा समितीद्वारे भारतीय संविधान तयार करण्यात आले होते.

2. भारतीय संविधानात किती अधिनियम आहेत ?

उत्तर : भारतीय संविधानात एकूण १,२४८ अधिनियम अथवा कायदे आहेत.

3. भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर : भीमराव रामजी आंबेडकर (डॉ.बाबासाहेब आंबेडकर) याना भारतीय संविधानाचे जनक असे म्हटले जाते.

4. भारतीय संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला ?

उत्तर : भारतीय संविधान तयार करण्यासाठी २ वर्ष, ११ महिने, ११ दिवस इतका कालावधी लागला.

5. भारतीय संविधान किती पानांचे आहे ?

उत्तर : भारतीय संविधान एकूण ४१६ पानांचे आहे.

6. भारतीय संविधान केव्हा स्वीकृत करण्यात आले ?

उत्तर : २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारत सरकार द्वारे मसुदा समितीने तयार केलेल्या संविधानाला स्वीकार करण्यात आले.

7. संविधान दिन का साजरा केला जातो ?

उत्तर : २६ जानेवारी १९५० मध्ये भारतात संविधान अमलात आणले गेले, भारतीय जनतेत संविधानाविषयी आदर आणि जागरूकता टिकून राहावी यासाठी २६ जानेवारी हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित करण्यात आला.

8. भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती खर्च उद्भवला ? 

उत्तर : भारतीय संविधान तयार करण्यासाठी ६.३ कोटी रुपये इतका खर्च उद्भवला.

Leave a Comment