युट्युब चा शोध कोणी लावला ?

आज इंटरनेट वर अनेक Social Media प्लॅटफॉर्मस कार्यरत आहेत, जे कोणत्या न कोणत्या खुबीमुळे ओळखले जातात. असेच एक सुप्रसिद्ध social Media प्लॅटफॉर्म म्हणजे युट्युब होय, ज्याची सुरुवात २००५ च्या दरम्यान झाली होती.

ह्या लेखात आपण युट्युब संबंधित विविध प्रकारच्या माहितीचा आढावा घेणार आहोत,


युट्युब म्हणजे नेमके काय ?

युट्युब हे एक जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि विडिओ शेअरींग साईट आहे, ज्याची सुरुवात २००५ दरम्यान झाली होती. युट्युब हे व्हिडिओ स्वरूपात कन्टेन्ट बनविण्याचा एक मोठा स्रोत आहे. गूगल नंतर युट्युब हि सर्वाधिक पाहिली जाणारी सोशल मीडिया साईट आहे.

एका जागतिक रिपोर्टनुसार दर माह १०० करोड पेक्षा अधिक लोक युट्युब ह्या सोशल मीडिया साईटला भेट देतात.

स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने युट्युब वर विडिओ पाहणाऱ्या प्रेक्षकांची आणि व्हिडिओ निर्मित क्रिएटरसची संख्या अगदी झपाट्याने वाढताना दिसत आहे, ह्याची कल्पना आपण ह्या गोष्टी वरून करू शकतो, कि दर दिवशी युट्युब वर प्रेक्षांकांद्वारे जवळ जवळ १०० करोड तास इतक्या कालावधीचे विडिओ पाहिले जातात.

अगदी काही महिन्यांपूर्वीच युट्युब ने “YouTube Shorts” नावाचा एक नवीन प्रोग्रॅम सुरु केला, ज्याला युट्युब वापरकर्त्यांकडून खूप प्रतिसाद मिळत आहे.

युट्युबमुळे केवळ मनोरंजनच होते असे नाही तर, युट्युब वर विडिओ बनवून लाखो लोक घरबसल्या पैसे देखील कमवत आहेत, जे युट्युबच्या वाढत्या प्रसिद्धीचे मुख्य कारण मानले जाते.

युट्युब हे advertising करून स्वतःचे अधिकतर उत्पन्न निर्माण करते. २०२१ मध्ये युट्युब ने केवळ विडिओ दरम्यान जाहिराती दाखवून २,८०० करोड रुपयांची कमाई केली, ह्यावरूनच आपण युट्युबच्या विस्तारित रूपाचा अंदाज लावू शकतो.


युट्युब चा इतिहास

२००५ दरम्यान jawed Karim, Steve Chen आणि Chad Hurley ह्या तीन मित्रांनी मिळून युट्युब ची निर्मिती केली. २००५ पूर्वी कोणत्याही प्रकारचे Video Sharing प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हते, ज्यामुळे युट्युबला अगदी कमी वेळात अधिक प्रसिद्धी मिळाली.

२००५ ते २००६ ह्या दरम्यान युट्युब कंपनीने ११.५ करोड Sequoia Capital आणि ८० लाख Artis Capital Management अशा एकूण ११ करोड ८५ लाख रुपयांची रक्कम गुंतवणूकदारानाकडून उभी केली आणि युट्युब चे पहले मुख्यालय कॅलिफोर्निया येथे स्थित केले.

१४ फेब्रुवारी २००५ मध्ये YouTube कंपनी सुरु करण्यात आली, आणि कंपनी सुरु झाल्याच्या २ महिन्यानंतर म्हणजेच २३ एप्रिल २००५ रोजी युट्युबवर जगातील पहिला व्हिडीओ अपलोड करण्यात आला, ज्याचे शीर्षक काहीसे “Me At The Zoo” असे होते.

युट्युबवर पहिला व्हिडीओ अपलोड करणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः युट्युब कंपनीचे Co-Founder जावेद करीम आहेत.

कंपनी लाँच झाल्याच्या अवघ्या १० महिन्यांमध्येच युट्युब वर दर दिवशी ८ लाख view येण्यास सुरुवात झाली.

सुरुवातीच्या काळात YouTube केळव १०० MB इतक्या आकाराची म्हणजेच जवळ जवळ ३० सेकंदांपेक्षा कमी कालावधीचा विडिओ अपलोड करता येत होता.

९ ऑक्टोबर २००६ हा तो काळ होता, ज्या दरम्यान जगातील सर्वात मोठी कंपनी, मानल्या जाणाऱ्या गुगल ने युट्युब कंपनीला १०६ करोड रुपयांमध्ये विकत घेतले.

युट्युब कंपनीला गुगल ने विकत घेतल्यापासून, युट्युब कंपनीच्या प्रचितीत कमालीची वाढ पाहायला मिळाली. २०१० येता येता युट्युब कंपनीने ४३% मार्केट व्यापले, ह्याच वर्षी म्हणजेच २०१० दरम्यान Google ने युट्युबच्या इंटरफेस मध्ये अनेक बदल घडवून आणले, ज्याने वापरकर्त्यास युट्युब वापरणे अधिक सुलभ आणि सोपे झाले.

३ मार्च २०१० मध्ये युट्युबचा नवीन लोगो तयार केला गेला हा तोच लोगो आहे, जो वर्तमान काळात वापरला जात आहे.

२०१६ मध्ये भारतात इंटरनेट स्वस्त झाल्यामुळे युट्युब वापरकर्त्यांच्या संख्येत अविश्वसनीय वाढ पाहायला मिळाली आहे.


युट्युब चा शोध कोणी लावला ?

Jawed Kareem, Steve Chen आणि Chad Hurley ह्या साल २००५ दरम्यान युट्युब चा शोध लावला. युट्युब हे जगातील पहीले आणि वर्तमान काळातील सर्वात मोठे विडिओ स्वरूपात साहित्य पुरविणारे Social Media प्लॅटफॉर्म आहे.


युट्युब चॅनेल कसे सुरु करावे ?

युट्युब चॅनेल तयार करण्यासाठी आपल्याकडे Gmail Account अथवा Google Account असणे गरजेचे आहे.

१). प्रथम तुमच्या मोबाइल अथवा संगणकामधील इंटरनेट Browser चालू करून, www.YouTube.com  ह्या सांकेतिकस्थळाला भेट द्या. जर तुम्ही मोबाईल मध्ये ह्या स्टेप्स follow करत असाल तर, Browser मध्ये Desktop Site Mode enable करा.

YouTube ची Official Site सुरु होताच उजव्या बाजूला, वरील भागात Sign In नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा व तुमच्या Google Account सहित Sign In करा, जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक Google Account असतील, तर तुम्हाला कोणत्या Google Account अंतर्गत युट्युब चॅनेल सुरु करायचे आहे, त्या खात्याची निवड करा, आणि जर तुमच्याकडे Google Account देखील नाही, तर Create Account पर्यायावर क्लिक करून गूगल चे नवीन खाते तयार करा.

२). Sign In केल्यानंतर, पुन्हा उजव्या बाजूला वरच्या भागात User Icon दिसेल, त्यावर क्लिक करा. Icon वर क्लिक करताच, अनेक पर्याय समोर येतील, त्यातील Setting पर्यायावर क्लिक करा.

आता एक नवीन page उघडेल, जेथे आपल्याला Create a New Channel पर्याय दिसून येईल, त्या पर्यायावर क्लिक करून, तुम्हाला हवे ते युट्युब चॅनेल चे नाव प्रविष्ट करा आणि नंतर Create पर्यायावर क्लिक करा.

३). पुन्हा YouTube च्या मुख्य website ला भेट द्या. उजव्या बाजूतील User Icon वर क्लिक करून Your Channel पर्यायावर क्लिक करा. इथे उजव्या बाजूला वरच्या भागातील Customize Channel पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल, इथे Basic Info पर्यायावर क्लिक करून तुमच्या युट्युब चॅनेल संबंधित माहिती प्रविष्ठ करा.

४). Basic Info नंतर Branding पर्यायावर क्लिक करा, इथे तुम्हाला तुमच्या YouTube चॅनेलचा Branding Logo आणि Banner Image अपलोड करायचे आहे, जे तुमच्या युट्युब चॅनेल चे मुख्य आकर्षण ठरेल, आणि अशा प्रकारे आपले युट्युब चॅनेल तयार होईल.

५). YouTube विडिओ बनविण्यासाठी Create अथवा तयार केलेले विडिओ अपलोड करण्यासाठी Upload Video पर्यायावर क्लिक करा.


युट्युब द्वारे पैसे कसे कमवावे ?

असे नाही कि, युट्युब द्वारे केवळ मनोरंजनच होते, तर आज असंख्य लोक घरबसल्या युट्युबद्वारे लाखो रुपये देखील कमवत आहेत.

जसेकी आपण जाणतोच, युट्युब कंपनी हि वर्तमान काळात गूगल कंपनीच्या मालकीची आहे. गूगल आपल्या Adsense नामक सर्व्हिसद्वारे युट्युब विडिओ वर स्पॉन्सर जाहिराती दाखवतो, आणि जाहिरातीतुन निर्माण होणाऱ्या उत्पन्नातून काही टक्के भाग युट्युब विडिओ क्रिएटरला देतो, आणि अशा प्रक्रारे युट्युब विडिओ क्रिएटर पैसे कमावतो.

Creator ला मिळणारे पैसे हे पूर्णतः त्याने तयार केलेल्या विडिओवर किती views आहे आहे, ह्यावर अवलंबून असते, कारण जितके जास्त views येतील, तितक्या जास्त जाहिराती Adsense द्वारे विडिओ दरम्यान दाखवल्या जातील, ज्याने जाहिरातींवर जास्त क्लिक येतील आणि Creator ची जास्त कमाई होईल.

युट्युब चॅनेल सुरु केल्यावर, creator ला Adsense साठी apply करावे लागते, apply केल्यानंतर creator ला युट्युब च्या काही अटी पूर्ण कराव्या लागतात, ज्याने Creator च्या विडिओ वर जाहिराती दिसण्यास सुरुवात होईल.

Adsense कडून देखील Payment घेण्यापूर्वी Adsense च्या काही अटींना सामोरे जावे लागते जसे कि Identity Verification आणि Address Verification , म्हणजे Adsense पोस्टाद्वारे Account Owner ला सहा अंकी पिन पाठवून प्रथम creator चे Address Verification करून घेणे, सोबतच खातेदाराला त्याचे ओळखपत्र म्हणून काही कागदपत्र, Adsense कडे जमा करावे लागतात, ज्याने Account फेक नसून ते खरे आहे अशी खात्री पटते.

खात्री पूर्ण झाल्यांनतर creator ला स्वतःचे बँक खाते Adsense सोबत जोडावे लागते, ज्याने पैसे डायरेक्ट Creator च्या खात्यात येतात. सर्वात शेवटची गूगल ऍडसेन्सची अट म्हणजे जो पर्यंत आपल्या Adsense खात्यात १००$ किंवा त्यापेक्षा अधिक पैसे जमा होत नाहीत, तो पर्यंत गूगल Adsense द्वारे creator च्या खात्यात पैसे पाठवले जात नाहीत.

अशा प्रकारे एक युट्युब विडिओ creator घरबसल्या युट्युब द्वारे पैसे कमवत असतो.


युट्युब व्हिडिओ एडिटिंगसाठी सॉफ्टवेअर

1. संगणकीय सॉफ्टवेअर

  • Shotcut
  • VideoPad
  • VSDC free video editor
  • LightWorks
  • Blender

2. मोबाईल सॉफ्टवेअर

  • Power Director
  • Kine Master Pro Video Editor
  • Vlogit
  • Video Show
  • Adobe Premiere Clip

वैशिष्ट्ये

YouTube, एक व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्म  असून त्याच्या लोकप्रियतेमध्ये आणि विशिष्टतेमध्ये योगदान देणारी वैशिष्ट्ये विस्तृत आहेत. YouTube ची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

1. वापरकर्त्याने व्युत्पन्न केलेली सामग्री

YouTube वापरकर्त्यांना विविध विषयांवर त्यांचे व्हिडिओ तयार करण्यास, अपलोड करण्यास आणि सामायिक करण्यास अनुमती देते, ज्यामुळे ते सामग्री वापर आणि निर्मिती दोन्हीसाठी एक व्यासपीठ बनते.

2. विविध सामग्री

प्लॅटफॉर्म शैक्षणिक व्हिडिओ, मनोरंजन, ट्यूटोरियल, संगीत व्हिडिओ, व्लॉग, पुनरावलोकने, बातम्या आणि बरेच काही यासह विविध प्रकारच्या सामग्रीचे आयोजन करते.

3. जागतिक पोहोच

YouTube चे जागतिक प्रेक्षक आहेत, ज्यामुळे सामग्री निर्मात्यांना जगभरातील दर्शकांपर्यंत पोहोचता येते. इंटरनेट अॅक्सेस असलेल्या जवळपास कोणत्याही डिव्हाइसवरून व्हिडिओमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

4. कमाई

YouTube एक भागीदार कार्यक्रम ऑफर करतो जो पात्र निर्मात्यांना इतर वैशिष्ट्यांसह जाहिराती, चॅनल सदस्यत्वे, सुपर चॅट आणि व्यापारी मालाच्या शेल्फद्वारे त्यांच्या सामग्रीची कमाई करू देतो.

5. सदस्यता आणि सूचना

वापरकर्ते नवीन अपलोडबद्दल सूचना प्राप्त करण्यासाठी चॅनेलची सदस्यता घेऊ शकतात, त्यांना त्यांच्या आवडत्या सामग्री निर्मात्यांना फॉलो करण्यास आणि अपडेट राहण्यास सक्षम करते.

6. टिप्पण्या आणि परस्परसंवाद

YouTube दर्शकांना टिप्पण्या, लाइक्स, शेअर्स आणि चर्चांद्वारे निर्मात्यांशी गुंतण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते, ज्यामुळे समुदायाची भावना वाढीस लागते.

7. शोध 

प्लॅटफॉर्मचे शोध आणि शिफारस अल्गोरिदम वापरकर्त्यांना त्यांच्या स्वारस्यांवर आणि पाहण्याच्या इतिहासावर आधारित नवीन सामग्री शोधण्यात मदत करतात. यामुळे “YouTubers” आणि विविध विशिष्ट सामग्री समुदायांचा उदय झाला आहे.

8. थेट प्रवाह

निर्माते रिअल-टाइममध्ये व्हिडिओ थेट प्रवाहित करू शकतात, जो प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा, कार्यक्रम होस्ट करण्याचा आणि सामग्री त्वरित सामायिक करण्याचा एक लोकप्रिय मार्ग बनला आहे.

9. YouTube Premium

ही सदस्यता सेवा जाहिरातमुक्त पाहणे, पार्श्वभूमी प्ले करणे, ऑफलाइन डाउनलोड करणे आणि YouTube Originals मध्ये प्रवेश प्रदान करते—YouTube द्वारे निर्मित अनन्य सामग्री.

10. विश्लेषण आणि अंतर्दृष्टी

निर्मात्यांना तपशीलवार विश्लेषणांमध्ये प्रवेश असतो जे त्यांच्या प्रेक्षक लोकसंख्याशास्त्र, दर्शक प्रतिबद्धता, पाहण्याचा वेळ आणि बरेच काही याबद्दल माहिती देतात. हे त्यांना त्यांची सामग्री तयार करण्यात आणि त्यांच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्यात मदत करते.

11. कॉपीराइट आणि सामग्री आयडी

YouTube कॉपीराइट केलेली सामग्री ओळखण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी सामग्री आयडी सारखी स्वयंचलित साधने वापरते, हे सुनिश्चित करण्यासाठी की निर्माते आणि कॉपीराइट धारकांना योग्यरित्या भरपाई किंवा पोच दिली जाते.

12. समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आणि नियंत्रण

YouTube कडे मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी वापरकर्त्यांनी सामग्री निर्मिती आणि सामायिकरणाच्या बाबतीत पाळली पाहिजेत. सामग्री स्वीकार्य मर्यादेत राहते याची खात्री करण्यासाठी प्लॅटफॉर्म स्वयंचलित आणि मॅन्युअल नियंत्रण देखील वापरते.

13. आव्हाने आणि ट्रेंड

YouTube अनेकदा आव्हाने, ट्रेंड आणि व्हायरल सामग्रीचा उदय पाहतो जो प्लॅटफॉर्मवर पसरतो आणि त्याच्या गतिमान आणि उत्क्रांत स्वरूपाला हातभार लावतो.

14. शैक्षणिक संसाधन

YouTube शैक्षणिक सामग्रीसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करते, लोकांना नवीन कौशल्ये शिकण्यास, ट्यूटोरियलमध्ये प्रवेश करण्यास आणि विषयांच्या विस्तृत श्रेणीचे अन्वेषण करण्यास सक्षम करते.


FAQ

1. युट्युब ची सुरुवात कधी झाली ?

उत्तर : १४ फेब्रुवारी २००५ रोजी युट्युब ची  सुरुवात झाली.

2. युट्युब या माध्यमावर पहिला व्हिडिओ कधी तयार झाला ?

उत्तर : २३ एप्रिल २००५ मध्ये युट्युब चे Co-Founder जावेद करीम, ह्यांनी युट्युबवर १९ सेकंदाचा जगातील पहिला विडिओ अपलोड केला.

3. युट्युब कंपनी कोणत्या देशातील आहे ?

उत्तर : युट्युब कंपनी ही अमेरिका ह्या देशातील आहे.

4. युट्युबचा मुख्य उद्देश काय ?

उत्तर : लोकांना अधिकाधिक विडिओ स्वरूपात साहित्य उपलब्ध करून देणे, हा युट्युब चा मुख्य उद्देश मानला जातो.

5. संपूर्ण जगात सर्वाधिक subscriber असलेले युट्युब चॅनेल कोणते ?

उत्तर : भारतातील T-Series हे जगातील सर्वाधिक Subscribers असलेले चॅनेल आहे.

अधिक लेख –

1. Social Media म्हणजे काय ?

2. इंस्टाग्राम म्हणजे काय व ते कसे वापरावे ?

3. व्हाट्सअप माहिती मराठी

4. फेसबुकचा शोध कोणी लावला ?

Leave a Comment