व्हाट्सअप माहिती मराठी | WhatsApp Information in Marathi

WhatsApp हे एक सुप्रसिद्ध मेसेजिंग ॲप आहे, ज्याद्वारे आपण घरबसल्या लोकांना जलद आणि मोफत रित्या मेसेज पाठवू शकतो. आज जगातील एकूण ७ अब्ज लोकसंख्येपैकी २ अब्ज लोकसंख्या व्हॉट्सॲप चा उपयोग करत आहे, या अरूनच आपल्याला whatsapp ची लोकप्रियता समजून येते.

अशा या सुप्रसिद्ध प्लॅटफॉर्म संबंधित विविध माहितीचा आढावा आपण या लेखाद्वारे घेणार आहोत,


व्हाट्सअप म्हणजे काय ?

व्हाट्सअप एक तात्काळ संदेश (Instant Messaging) वहन करणारे अँप्लिकेशन आहे, ज्याद्वारे वापरकर्ता टेक्स्ट (Text) मेसेज करणे, फोटो (Image), विडिओ (Video) , लोकेशन (Location), कागदपत्र (Documents) शेअर करणे अशी विविध कामे करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हाट्सअप अगदी मोफत आहे. व्हाट्सअँप अँप्लिकेशनचा ऍक्सेस मिळविण्यासाठी युजरकडे केवळ स्वतःचे व्हाट्सअप खाते आणि इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे असते.

whatsapp information in marathi

वर्तमान काळात व्हाट्सअप १८० पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे आणि २ अब्जपेक्षा अधिकचा व्हाट्सअपचा युजरबेस आहे. या व्यतिरिक्त व्हाट्सअपमध्ये “End-To-End Encryption” या प्रणालीचा उपयोग केला गेला असल्यामुळे व्हाट्सअप हा सुरक्षित मेसेजिंग मंच मानला जाते. व्हाट्सअपद्वारे युजरला डेटा सुरक्षिततेची संपूर्ण हामी दिली जाते.


व्हाट्सअप वेब म्हणजे काय ?

व्हाट्सअप वेब (Whatsapp Web) ही व्हाट्सअपची संगणकीय आवृत्ती आहे. व्हाट्सअप वेबमुळे व्हाट्सअपचा आढावा डेस्कटॉप (Desktop) आणि लॅपटॉपसारख्या (Laptop) उपकरणांमध्ये घेणे शक्य झाले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हाट्सअँप वेब वापरण्यासाठी युजरला कोणत्याही प्रकारचे अधिकचे अप्लिकेशन डाउनलोड करावे लागत नाही, तर ब्राऊसरच्या माध्यमातून वेबसाईटद्वारे देखील युजर व्हाट्सअप वेबचा आढावा घेऊ शकतो.

व्हाट्सअप वेब हे फिचर व्हाट्सअप कंपनीने २१ जानेवारी २०१५ मध्ये Android, BlackBerry आणि Windows च्या युजरसाठी लॉन्च केले होते, परंतु कालांतराने कंपनीने ते IOS आणि Nokia युजरसाठी देखील उपलब्ध केले.


व्हाट्सअप चे प्रकार

अधिकृत व्हाट्सअप वगळता व्हाट्सअप चे इतरही विविध प्रकार अस्तित्वात आहे, जे विविध फीचर्समुळे लोकप्रिय आहे. व्हाट्सअपचे हे प्रकार कोणते  आहेत, याचा आढाव आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

 • जीबी व्हाट्सअँप (GB WhatsApp)
 • ओजी व्हाट्सअप (OG WhastApp)
 • यो व्हाट्सअँप (YO WhastApp)
 • व्हाट्सअप इंडिगो (WhatsApp Indigo)
 • जीबी व्हाट्सअप (GB WhatsApp)

1. जीबी व्हाट्सअप

GB Whatsapp हे कमी फाईल साईज सह कमी RAM आणि CPU असलेल्या Android स्मार्टफोनमध्ये सुरळीत चालण्यास सक्षम आहे. व्हाट्सअपच्या या Version मध्ये Official Theme चा उपयोग केला गेला असून युजरला अधिक Customization चे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या व्यतिरिक्त जे फिचर उपयोगी नाहीत, त्यांचा समावेश GB Whatsapp मध्ये केला गेला नाही.

2. ओजी व्हाट्सअप (OG WhastApp)

OG Whatsapp मध्ये जास्तीत जास्त थिमचा ऍक्सेस युजरला देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याव्यतिरिक युजर OG Whatsapp चा उपयोग करून स्टेटसमध्ये नियमित Font पेक्षा अधिक Fonts चा उपयोग करू शकतो. OG Whatsapp मध्ये एक असे फिचर आहे, जे युजरला अधीक आकर्षित करते, ते म्हणजे यामध्ये युजर मोठमोठ्या साईजच्या Video, Photo, Documents ची देवाण घेवाण अगदी सहज करू शकतो.

3. यो व्हाट्सअँप (YO WhastApp)

YO Whatsapp युजरला कोणत्याही तृतीयक App Lock अप्लिकेशनचा उपयोग न करता व्हाट्सअँपला सुरक्षित करण्याची अनुमती देतो. या व्यतिरिक युजर ठराविक संपर्कांसाठी स्वतःचा Last Seen Hide करू शकतो. YO Whatsapp द्वारे युजर ती सर्व कामे करू शकतो, जी Official Whatsapp द्वारे करता येत नाहीत.

4. व्हाट्सअप इंडिगो (WhatsApp Indigo)

फाईलची ओरिजिनल साईज न गमावता फाईलची देवाणघेवाण करता येते, हे Whatsapp Indigo चे मुख्य वैशिष्ठ्य आहे, या अगदी उलट official व्हाट्सअपवरद्वारे आपण जेव्हाही एखादी फाईल सेंड करतो, तेव्हा फाईलची मूळ साईज गमावली जाते. आपल्या संपर्कांपासून Blue Tick लपवणे, ३०० जणांचा व्हाट्सअँप ग्रुप तयार करणे, संपर्कातील इतर व्यक्तींच्या स्टेटसची प्रतिलिपी तयार करणे अशी विविध कामे आपण Whatsapp Indigo द्वारे कृतीत आणू शकतो.


वैशिष्ठ्य

1. टेक्स्ट मेसेज

युजर अगदी सोप्या आणि सुलभ पद्धतीने व्हाट्सअपद्वारे टेक्स्ट मेसेजची देवाणघेवाण करू शकतो, यासाठी युजरला कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. व्हाट्सअप प्रणाली मेसेज पाठविण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करते, त्यामुळे व्हाटसअप वापरताना मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त व्हाटसअप प्रणाली युजरला Instant Messaging ची देखील सुविधा प्रदान करते. या सुविधेअंतर्गत युजर ने पाठवलेला मेसेज तात्काळ डिलिवर केला जातो.

2. व्हाट्सअप ग्रुप

एकाच वेळी एकापेक्षा अधिक लोकांशी संवाद सांधण्याची कृतीला समूह संवाद असे म्हणतात. व्हाट्सअपमध्ये आपण Group ची निर्मिती करू शकतो, ज्यामध्ये एकाच वेळी २५६ लोक सहभाग घेऊ शकतात. ग्रुप मधील सदस्यांसोबत आपण फोटो, विडिओ देखील शेअर करू शकतो.

3. समूह कॉल

व्हाट्सअपमध्ये युजर समूहाने मेसेज करण्यासोबतच विडिओ कॉल (Video Call) आणि व्हॉइस कॉल (Voice Call) चा देखील आस्वाद घेऊ शकतो. व्हाट्सअपच्या व्हॉइस कॉल (Video Call) सुविधेद्वारे एकाच वेळी ३२ तर विडिओ कॉलद्वारे एकाच वेळी ८ जण एकमेकांसोबत कनेक्ट होऊ शकतात. व्हॉइस कॉल आणि विडिओ कॉलमध्ये व्हाट्सअप न केवळ समूह कॉलिंगचा पर्याय देतो तर सोबतच उत्तम व्हॉइस आणि विडिओ Quality देखील प्रदान करतो.

4. संगणकीय उपयोग

२०१५ पूर्वी व्हाट्सअपचा उपयोग केवळ मोबाईलसारख्या उपकरणांमध्ये केला जात होता. २१ जानेवारी २०१५ मध्ये व्हाट्सअप ने त्याचा “Whats App Web” हा फिचर लॉन्च केला. या फिचरच्या मदतीने युजर न केवळ मोबाईल तर संगणकामध्ये देखील व्हाटसअँपचा आस्वाद घेऊ शकत होता. Whatsapp Web चा आस्वाद युजर वेबसाईटच्या आधारे घेऊ शकतो, यासाठी कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त अँप डाउनलोड करण्याची गरज भासत नाही.

5. End To End Encryption प्रणाली

वाढत्या इंटरनेटच्या वापरणामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. सायबर गुन्हेगारी पासून स्वतःच्या युजरला वाचविण्यासाठी आणि त्यांचा अमूल्य डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्हाट्सअप प्रणालीमध्ये “End To End Encryption” या प्रणालीचा उपयोग केला गेला आहे. जेव्हा दोन व्हाट्सअप युजर एकमेकांसोबत संवाद साधतात, तेव्हा त्यांच्या दरम्यनचा संवाद तृतीयक व्यक्तीद्वारे वाचला जाऊ नये, म्हणून End To End Encryption प्रणाली महत्वाची ठरते.

6. मीडिया शेअरिंग

व्हाट्सअप चॅट दरम्यान युजर टेक्स्ट मेसेज सोबतच फोटो, विडिओ आणि कोणत्याही फॉरमॅटमधील डोकमेंट्स ची देवाणघेवाण करू शकतो, जसे कि .HTM, .DOT, .XLS, .PPT आणि अधिक.

7. व्हॉइस मेसेज (Voice Message)

२०१८ च्या एक रिपोर्टनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ७४.४ % टक्के लोकसंख्या ही साक्षर, तर उर्वरित अशिक्षित आहे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही. असाक्षरतेची समस्या केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे. ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही, अशा लोकांना देखील व्हाट्सअपकडे आकर्षित करण्यासाठी व्हाट्सअप ने व्हॉइस मेसेज (Voice Message) हे फिचर लॉन्च केले. या फिचरद्वारे युजर केवळ बोलून समोरील व्यक्तीला व्हाट्सअप मेसेज पाठवू शकतो.

8. पैशांचा व्यवहार

साल २०२० मध्ये व्हाट्सअप ने UPI पेमेंट चे फिचर प्रकाशित केले. या फिचरद्वारे युजर आपल्या व्हाट्सअप कॉन्टॅक्टमधील कोणत्याही व्यक्तीसोबत अगदी सहज पैशांची देवाणघेवाण करू शकतो. या फिचरचा लाभ घेण्यासाठी युजरकडे केवळ स्वतःची UPI आयडी असणे गरजेचं आहे.


व्हाट्सअप चा शोध कोणी लावला ?

व्हाट्सअपचा शोध Brian Acton आणि Jan Koum यांनी साल २००९ मध्ये लावला. २४ फेब्रुवारी २००९ मध्ये व्हाट्सअपला अमेरिकेतील कैलिफोर्निया येथे Incorporate करण्यात आले. व्हाट्सअपचा शोध लावल्या पूर्वी Brian Acton आणि Jan Koum हे याहू (Yahoo) या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये प्रोग्रामर म्हणून कार्य पार पाडत होते.

सप्टेंबर २००७ मध्ये Brian Acton आणि Jam Koum हे दोघेही yahoo मधून बाहेर पडले, यानंतर दोघांनीही फेसबुक कंपनीमध्ये नोकरी करीत आवेदन केले, परंतु त्यांना तेथून निराशा मिळाली. २००९ मध्ये Brian Acton आणि Jam Koum यांनी प्रथम व्हाट्सअपला जगासमोर आणले, कालांतराने व्हाट्सअपमध्ये काही बदल करून जून २००९ मध्ये व्हाट्सअपला पुन्हा प्रकाशित करण्यात आले. अवघ्या काही महिन्यांमध्येच व्हाट्सअप युजरची संख्या लाखांच्या घरात पोहोचली होती.

व्हाट्सअप पूर्वी मोफत नव्हते, तर व्हाट्सअप वापरण्याकरिता युजरला काही रुपये शुल्क दरवर्षी द्यावे लागत होते. २०१६ मध्ये ते प्रत्येकासाठी मोफत करण्यात आले. व्हाट्सअप सुविधा मोफत झाल्याने व्हाट्सअपच्या युजरची संख्या ही करोडोंच्या घरात पोहोचली आणि अशा प्रकारे व्हाट्सअप हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून जगासमोर आले.


व्हाट्सअप खाते कसे सुरु करावे ?

व्हाट्सअप खाते सुरु करण्यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करावा :-

 1. प्रथम Play Store अथवा App Store वरून व्हाट्सअप App डाउनलोड करून ओपन करावे.
 2. फोन नंबर प्रविष्ठ करावा.
 3. टेक्स्ट मेसेजद्वारे OTP पाठवला जाईल, तो प्रविष्ट करून Continue करावे.
 4. User Name सेट करावे.
 5. Profile Picture सेट करावा.

अशा प्रकारे आपले व्हाट्सअप खरे सुरु होईल.


तथ्य (Facts)

 • संपूर्ण जगात व्हाट्सअपचे २ अब्जपेक्षा देखील अधिक युजर्स आहेत.
 • व्हाट्सअप हा मंच फेसबुक कंपनीच्या मालकीचा आहे.
 • इस्राईल देशातील एकूण मोबाईलपैकी ९२ % मोबाईलमध्ये व्हाट्सअप Install आहे.
 • व्हाट्सअपवर दर दिवशी ३४० दशलक्ष मिनिटे इतक्या कालावधीचा विडिओ कॉल युजर्सद्वारे केला जातो.
 • २०१६ पूर्वी व्हाट्सअपच्या वार्षिक Subscription साठी १$ इतके शुल्क आकारले जात होते, २०१६ पासून व्हाट्सअप सर्वांसाठी मोफत करण्यात आले.
 •  व्हाट्सअपचा उपयोग Ipod आणि Ipad सारख्या उपकरणांमध्ये केला जाऊ शकत नाही.
 • व्हाट्सअप हे Android Device द्वारे सर्वाधिक प्रमाणात डाउनलोड झालेले जगातील तिसरे Application आहे. फेसबुक (Facebook) आणि युट्युब (Youtube) हे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक डाउनलोड झालेले Applications आहेत.
 • व्हाट्सअपद्वारे पैशांची देवाणघेवाण देखील केली जाऊ शकते.
 • व्हाट्सअप जगातील एकूण १२ देशांमध्ये बॅन करण्यात आले आहे.
 • व्हाट्सअपवर दर मिनिटांना २९ दशलक्ष पेक्षा अधिक मेसेजची देवाणघेवाण केली जाते.

FAQ

1. व्हाट्सअपचे संस्थापक कोण ?

उत्तर : Brian Acton आणि Jan Koum हे व्हाट्सअप चे संस्थापक आहेत.

2. फेसबुक ने व्हाट्सअपला किती रुपयांमध्ये विकत घेतले ?

उत्तर : फेसबुक कंपनीने फेब्रुवारी २०१४ मध्ये १६०० करोड रुपयांमध्ये व्हाट्सअपला विकत घेतले.

3. व्हाटसअपचा शोध कोणत्या वर्षी लागला ?

उत्तर : साल २००९ मध्ये व्हाट्सअपचा शोध लागला.

4. व्हाट्सअप चे मुख्य कार्यालय कोठे आहे. 

उत्तर : अमेरिकेतील मेनलो पार्क कैलिफोर्निया येथे व्हाट्सअपचे मुख्य कार्यालय आहे.

5. व्हाट्सअपचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत ?  

उत्तर : “Will Cathcart” हे व्हाट्सअपचे वर्तमानकालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

अधिक लेख –

1. Social Media म्हणजे काय ?

2. युट्युब चा शोध कोणी लावला ?

3. फेसबुकचा शोध कोणी लावला ?

4. इंस्टाग्राम म्हणजे काय व ते कसे वापरावे ?

Leave a Comment