Hosting किंवा Web Hosting म्हणजे काय ? | Web Hosting Meaning in Marathi

आज आपण पाहतो की, इंटरनेटवर हजारो-लाखो वेबसाईट आहेत, ज्या विविध हेतूने तयार केल्या गेल्या आहेत, त्यातील अनेक वेबसाईट सेवा पुरवतात, तर अनेक वेबसाईट माहिती आणि मार्गदर्शन देतात.

इंटरनेटवरील विविध वेबसाईट पाहून आपल्याकडे देखील किमान एक तरी वेबसाईट असावी, असे अनेकांना नक्कीच वाटत असेल, अनेक लोक तर वेबसाईट कशी बनवायची हे शिकत देखील असतील, परंतु केवळ वेबसाईट तयार केल्याने काम भागत नाही, तर त्यासाठी विविध गोष्टींची देखील माहिती असणे गरजेचे आहे, कारण अर्धवट माहिती घेऊन तुम्ही कोणतेच काम पूर्ण करू शकत नाही.

वेबसाईट तयार झाल्यावर ती इंटरनेटवर कशी आणायची हा प्रश्न नक्कीच प्रत्येक व्यक्ती समोर उभा राहतो, यासाठी आपल्याला होस्टिंग किंवा वेब होस्टिंग ची गरज भासते. अनेक लोकांना वेब होस्टिंग बद्दल नक्कीच माहीत असेल, परंतु दुसऱ्या बाजूला वेब होस्टिंग हा शब्दच अनेकांना नवीन असेल, हा शब्द तुमच्या परिचयाचा करण्यासाठी आपण या लेखात वेब होस्टिंग किंवा होस्टिंग विविध प्रकारची माहिती पाहणार आहोत, जसे की वेबसाइट म्हणजे काय, त्याचे प्रकार होस्टिंग कसे कार्य पार पडते आणि अधिक.


Web Hosting म्हणजे काय ? (Web Hosting Meaning In Marathi)

होस्टिंग किंवा वेब होस्टिंग ही एक अशी सेवा आहे, जी एखाद्या वेबसाइटला किंवा वेबसाइटद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवांना इंटरनेटवर घेऊन जातो आणि प्रसारित करण्यात मदत करते, ज्यामुळे जगातील कोणताही व्यक्ती इंटरनेटचा वापर करून तुमच्या वेबसाईटला पाहू शकतो आणि त्या द्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवांचा देखील आस्वाद घेऊन शकतो. 

होस्टिंग सेवा पुरविणे हा एक खूप मोठा व्यवसाय बनला आहे, जो एखाद्या वेबसाईट ला इंटरनेट वर पाहण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा आणि विविध सेवांचा पुरवठा करते. 

होस्टिंग सेवा पुरविणाऱ्या कंपनीला होस्ट किंवा होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हायडर (Hosting Service Provider) ह्या नावाने ओळखले जाते. होस्टिंग सेवा पुरविणारे होस्ट मुळात वेबसाईटला एका सर्व्हर मध्ये स्टोर करतात, ह्या सर्व्हर मध्ये वेबसाइट कार्यरत असते, तसेच ह्या सर्वर मध्ये वेबसाईट चे फाइल्स म्हणजेच लेख, चित्र, विडिओ हे साठवून ठेवले जातात, हे सर्व्हर प्रत्येक क्षणी इंटरनेट सोबत जोडलेले असतात. 

जेव्हा एखादा इंटरनेट वापरकर्ता तुमच्या वेबसाईटशी निवडीत इंटरनेट वर सर्च करतो किंवा तुमच्या वेबसाईट चे नाव सर्च करतो, तेव्हा हे सर्वर त्या वापरकर्त्याला तुमच्या वेबसाईट च्या सर्व्हर सोबत जोडतात आणि अशा प्रकारे तुमची वेबसाईट लोकांच्या निदर्शनास येण्यास सुरुवात होते.   


होस्टिंग चे प्रकार 

1. शेअर होस्टिंग (Shared Hosting)

शेअर होस्टिंग हा वेब होस्टिंगचाच एक प्रसिद्ध प्रकार आहे. ह्या होस्टिंग च्या प्रकारात एकाच सर्व्हर मध्ये एक पेक्षा अधिक वेबसाईट कार्यरत असतात. शेअर होस्टिंग मध्ये एकाच सर्व्हर वर कार्यरत असणाऱ्या वेबसाइट्स ची संख्या हजारांच्या पटीत देखील असू शकते. 

एकच सर्व्हर अनेक वेबसाईट मध्ये विभागला गेल्यामुळे ते कमी खर्चिक असते, कारण खर्च हा प्रत्येक वेबसाईट मालकांमध्ये विभागाला गेला असतो. प्रत्येक वापरकर्त्यास सर्व्हरचा काही स्टोरेज मिळतो, ज्यामध्ये ते त्यांच्या वेबसाइट चे फाइल्स होस्ट करू शकतात, हे स्टोरेज मर्यादित असते, जर तुम्हाला स्टोरेज वाढवून पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. 

शेअर होस्टिंग मध्ये वेबसाईटचा मालक डाटाबेस ऍक्सेस, मंथली व्हिसिटर, डिस्क स्पेस अशा अनेक feature चा लाभ घेऊन शकतो. 

2. क्लाऊड होस्टिंग (Cloud Hosting)

क्लाऊड होस्टिंग मध्ये एकाच वेबसाइटसाठी अनेक सर्व्हर चा वापर केला जातो. अनेकदा काही कारणास्तव वेब सर्व्हर योग्य रित्या कार्य करत नाहीत, ज्यामुळे आपली वेबसाइट योग्य रित्या चालत नाही, परंतु क्लाऊड होस्टिंग मध्ये समजा जर एक सर्व्हर प्रतिसाथ देत नसेल, तर त्याजागी दुसऱ्या सर्व्हर सोबत वेबसाईट युसरला जोडले जाते, ह्यामुळे वेबसाइट लोड होण्याच्या वेळेवर परिणाम होत नाही आणि वेबसाइट वेगाने कार्य करते. 

क्लाऊड होस्टिंग मध्ये वापरले गेलेले सर्व सर्व्हर एकमेकांची जोडलेले असतात, त्यामुळे वेबसाईट कार्यात गडबड जाणवत नाही. 

क्लाऊड होस्टिंग मध्ये एक ठराविक सर्व्हर नसल्यामुळे आपल्या सर्व्हर ऐवजी “क्लाऊड क्लस्टर” चा एक भाग मिळतो, ज्यावर आपली वेबसाईट होस्ट होते. 

क्लाऊड होस्टिंगमुळे आपल्याला अनेक फायदे होत असतात, जसे कि वेबसाईटचा काम करण्याचा वेग वाढतो, सर्व्हर जरी वेगवेगळे असले तर IP ऍड्रेस ठराविकच असतो, आपल्या वेबसाईटच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते. 

क्लाऊड होस्टिंग हा वेब होस्टिंग चा एक खर्चिक प्रकार आहे. ज्याचे फायदे तर खूप आहेत पण पैसे देखील तितकेच मोजावे लागतात. 

3. VPS (virtual Private Server)

VPS होस्टिंग हि काहीशी शेअर होस्टिंग प्रमाणे असते, फक्त ह्यात थोडा फरक आपल्याला दिसून येईल. जेव्हा आपण VPS ची निवड करतो, तेव्हा आपली वेबसाईट ही एका सर्व्हरवर होस्ट केली जाते, ज्यामध्ये आधीपासूनच अनेक वेबसाईट होस्ट केलेल्या असतात. ह्या सर्व्हर चे आभासी तुकडे केले जातात. ज्याप्रमाणे आपण हार्ड डिस्क मधील स्टोरेज चे संगणकामध्ये विविध भागात तुकडे करतो. 

तुमच्या वेबसाईटला ह्याच सर्व्हरच्या Virtual भागांपैके एक भाग दिला जातो, ज्यामध्ये तुम्हाला एक वेगळी ओपेरेटिंग सिस्टिम, स्टोरेज, bandwidth अशा वैयक्तिक सेवा दिल्या जातात. 

हे काहीसे एखाद्या बिल्डिंग मधील रूम प्रमाणे आहे, ज्या प्रमाणे एक मोठ्या बिल्डिंगला अनेक लहान लहान रूम्स मध्ये विभागून त्यातील प्रत्येक रूमला पाणी, लाईट अशा वैयक्तिक सेवा दिल्या जातात, ह्यामध्ये आपण बिल्डिंग तर विभागतो, परंतु सेवा वयक्तिकच असतात त्यांचे विभाजन होत नाही आणि केले देखील जात नाही.  

4. डेडिकेटेड होस्टिंग (Dedicated Hosting)

डेडिकेटेड होस्टिंग ही सर्वाधिक वेगवान आणि खर्चिक असते, ह्यामध्ये संपूर्ण एक सर्व्हर केवळ एकच वेबसाईट साठी राखीव ठेवला जातो. ह्या सर्वरला एकच वेबसाईट सांभाळायची असते, त्यामुळे सर्व्हर च्या कामात अचूकता, वेग आणि चांगला परफॉर्मन्स दिसून येतो, ज्यामुळे आपली वेबसाईट अधिक युजर friendly बनते. 

डेडिकेटेड सर्व्हरमुळे bandwidth, storage, अशा अनेक गोष्टींची चिंता वेबसाईट च्या मालकाला करावी लागत नाही. ज्यांच्या वेबसाईट खूप लोकप्रिय आहेत आणि दररोज लाखो लोक जर तुमच्या वेबसाईटला भेट देत असतील, तर तुमच्यासाठी dedicated server Hosting एक उत्तम पर्याय ठरू शकतो.


Hosting कसे कार्य करते ?

वेबसाईट मध्ये दोन मुख्य गोष्टींचे सर्वाधिक महत्व असते, त्यातील पहिली गोष्ट म्हणजे डोमेन म्हणजेच तुमच्या वेबसाईट चे नाव आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची वेब होस्टिंग.

जेव्हाही तुम्ही होस्टिंग खरेदी करता, खरेदी केल्यानंतर तुम्हाला ती होस्टिंग तुमच्या डोमेन नेम सोबत जोडावी लागते. ह्या दोन्ही गोष्टी IP Address द्वारे एकमेकांशी जोडले जातात.

जेव्हाही एखादा युजर तुमच्या वेबसाईट चे नाव ब्राऊझर वर सर्च करतो, तेव्हा युजर च्या ब्राऊझर द्वारे एक रिक्वेस्ट DNS ला पाठवली जाते, dns द्वारे आयपी ऍड्रेस च्या आधारे रिक्वेस्ट वेबसाइट सर्व्हर ला पाठवली जाते, सर्व्हर द्वारे वेबसाईट च्या file access करून वेबसाईट वर युजर च्या गरजे नुसार दाखवले जातात.

अशा प्रकारे एखाद्या वेबसाईट चे सर्व्हर सामान्यतः कार्य पार पाडते.


महत्त्व

डिजिटल जगामध्ये होस्टिंग महत्त्वपूर्ण भूमिका बजावते कारण हा पाया आहे ज्यावर वेबसाइट्स, ऍप्लिकेशन्स आणि ऑनलाइन सेवा तयार केल्या जातात आणि इंटरनेटवरील वापरकर्त्यांसाठी प्रवेशयोग्य बनवल्या जातात. होस्टिंगचे महत्त्व खालील मुद्द्यांमध्ये सारांशित केले जाऊ शकते:

1. वेबसाइट प्रवेशयोग्यता

होस्टिंग हे सुनिश्चित करते की तुमची वेबसाइट किंवा अनुप्रयोग वापरकर्त्यांसाठी 24/7 उपलब्ध आणि प्रवेशयोग्य आहे. एक विश्वासार्ह होस्टिंग सेवा कमीतकमी डाउनटाइम सुनिश्चित करते, वापरकर्त्यांना जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तुमची सामग्री ऍक्सेस करण्याची परवानगी देते.

2. कार्यप्रदर्शन आणि गती

होस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या वेबसाइटच्या लोडिंग गती आणि कार्यप्रदर्शनावर परिणाम करते. चांगली-ऑप्टिमाइझ केलेली आणि जलद होस्टिंग सेवा सकारात्मक वापरकर्त्याच्या अनुभवात योगदान देते, कारण अभ्यागत लोड होण्यासाठी खूप वेळ घेणार्‍या वेबसाइट सोडतात.

3. सुरक्षा

होस्टिंग प्रदाते मालवेअर, DDoS हल्ले आणि अनधिकृत प्रवेश यासारख्या संभाव्य धोक्यांपासून आपल्या वेबसाइटचे संरक्षण करण्यासाठी विविध सुरक्षा उपाय ऑफर करतात. तुमचा डेटा आणि तुमच्या अभ्यागतांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित होस्टिंग वातावरण आवश्यक आहे.

4. स्केलेबिलिटी

तुमची वेबसाइट किंवा अॅप्लिकेशन जसजसे वाढत जाईल, तसतसे तुम्हाला वाढलेली रहदारी आणि संसाधनांची मागणी हाताळावी लागेल. एक चांगली होस्टिंग सेवा स्केलेबिलिटी पर्याय ऑफर करते, ज्यामुळे तुम्हाला संसाधने श्रेणीसुधारित करता येतात आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय वाढ सामावून घेता येते.

5. डेटा बॅकअप आणि पुनर्प्राप्ती

होस्टिंग प्रदाते सहसा नियमित डेटा बॅकअप आणि पुनर्प्राप्ती उपाय प्रदान करतात. हे सुनिश्चित करते की डेटा गमावल्यास किंवा तांत्रिक समस्या असल्यास, आपण आपली वेबसाइट पूर्वीच्या स्थितीत पुनर्संचयित करू शकता.

6. SEO Ranking

शोध इंजिने शोध परिणामांची रँकिंग करताना वेबसाइटची कार्यक्षमता आणि लोडिंग गती लक्षात घेतात. विश्वसनीय होस्टिंग तुमच्या SEO प्रयत्नांवर सकारात्मक परिणाम करू शकते आणि शोध इंजिन परिणामांमध्ये तुमच्या वेबसाइटची दृश्यमानता सुधारू शकते.

7. ग्राहकांचा विश्वास आणि विश्वासार्हता

एक स्थिर आणि सुरक्षित होस्टिंग सेवा तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि विश्वासार्हता यावर सकारात्मक परिणाम करते. वापरकर्त्यांना त्वरीत लोड होणार्‍या आणि सातत्याने प्रवेश करण्यायोग्य वेबसाइटवर विश्वास ठेवण्याची अधिक शक्यता असते.

8. समर्थन आणि तांत्रिक कौशल्य

होस्टिंग प्रदाते विशेषत: तांत्रिक समर्थन देतात, जे तुम्हाला समस्या येतात किंवा सर्व्हर-संबंधित कार्यांसाठी सहाय्याची आवश्यकता असते तेव्हा अमूल्य असू शकते.

9. ई-कॉमर्स आणि ऑनलाइन व्यवसाय

ऑनलाइन काम करणाऱ्या व्यवसायांसाठी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म चालविण्यासाठी, सुरक्षितपणे व्यवहार हाताळण्यासाठी आणि ग्राहक डेटा व्यवस्थापित करण्यासाठी होस्टिंग महत्त्वपूर्ण आहे.

10. किंमत-प्रभावीता

होस्टिंग सेवा वापरणे हे तुमच्या सर्व्हरची पायाभूत सुविधा राखण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा, विशेषतः लहान वेबसाइट्स आणि व्यवसायांसाठी अधिक किफायतशीर असते.

शेवटी, होस्टिंग हा ऑनलाइन जगाचा एक मूलभूत पैलू आहे, जो वेबसाइट कार्यप्रदर्शन, सुरक्षितता आणि एकूण वापरकर्ता अनुभव प्रभावित करतो. तुमची ऑनलाइन उपस्थिती स्थिर, सुरक्षित आणि तुमच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असल्याची खात्री करण्यासाठी विश्वसनीय होस्टिंग प्रदाता निवडणे अत्यावश्यक आहे.


होस्टिंग सेवा पुरवणाऱ्या 3 उत्तम कंपनी 

होस्टिंग पुरविणाऱ्या अनेक कंपन्या आज बाजारात उपलब्ध आहेत, ज्यातील तुम्ही तुमच्या सोयी निशी होस्टिंग निवडू शकता. अनेक गोष्टींचा विचार करता आम्ही आमच्या मते कोणत्या कंपनी उत्तम आहेत, ह्याची एक यादी तयार केली गेली आहे, ह्या यादीत एकूण तीन कंपन्यांचे नाव सामील आहे, ही यादी तयार करताना, अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला आहे, जसे कि होस्टिंग आपल्या खिशाला परवडणारी आहे का, होस्टिंग मध्ये कोणकोणत्या सेवा कंपनी द्वारे प्रदान केल्या जातात, कंपनीचा भूतकाळ कसा होता आणि अधिक. 

Note:- वरील दिलेल्या यादीतीलच एका कंपनी ची तुम्ही होस्टिंग विकत घ्या, असे आमचे म्हणणे नाही, केवळ आमच्या दृष्टीकोनातून ह्या होस्टिंग कंपनी उत्तम आहे, जर तुम्हाला वरील दिलेल्या होस्टिंग कंपनीची माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही कंपनी च्या वेबसाईटला भेट देऊन माहिती गोळा करुणच तुम्हाला ती घ्यायची आहे का ते ठरवू शकता. कोणती होस्टिंग घ्यायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल. 


होस्टिंग विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ?

होस्टिंग विकत घेताना अनेक लोक फक्त किंमतींचीच पडताळणी करतात आणि नंतरच होस्टिंग विकत घेतात, परंतु होस्टिंग विकत घेण्याची ही निव्वळ चुकीची पद्धत आहे, कारण कोणत्या किमतीत आपल्याला कंपनी द्वारे कोणत्या सेवा दिल्या हातात हे जाणून घेणे देखील फार महत्वाचे असते, जर तुम्ही पहिल्यांदाच होस्टिंग विकत घेत आहात, तर तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे, ह्याची माहिती खालील प्रमाणे, 
 

1. Uptime

UPtime म्हणजे तुमची वेबसाईट किती क्षणासाठी ऑनलाइन आहे. ज्याही कंपनी मध्ये आपण होस्टिंग विकत घेतो त्या कंपनी मध्ये कधी न कधी technical प्रॉब्लेम होतोच, ज्यामुळे अनेकदा आपली वेबसाईट डाउन होते, म्हणजेच काहीच रिस्पॉन्स देत नाही किंवा चालूच होत नाही, त्यामुळे होस्टिंग निवडताना जी कंपनी तुम्ही निवडचाल तिचा भूतकाळ कसा आहे, म्हणजे ह्या आधी कधी त्या कंपनीच्या सेवेत काही अडथळा आला आहे का हे पाहून होस्टिंग निवडा. तसे पाहायला गेलो तर आज प्रत्येक होस्टिंग कंपनी हि ९९.९९% uptime देण्याचा दावा करते. 

2. Storage

तुम्ही जेव्हा एखादी होस्टिंग खरेदी करता तेव्हा त्यातील एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्टोरेज. स्टोरेज म्हणजे जागा, ज्यासाठी तुम्ही पैसे देत आहेत. जितकं जास्त स्टोरेज असेल तितक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही तुमच्या वेबसाईटशी निवडीत फाइल्स म्हणजेच चित्र, व्हिडिओ, ऑडिओ, लेख सर्व्हर वर साठवू शकता.  

3. Customer Care Service

कस्टमर केअर सेवा ही प्रत्येक कंपनी द्वारे पुरवली जाते, परंतु ही सेवा प्रत्येक कंपनीची सारखी नसून काही कंपनी त्यांच्या सेवा तर देतात, परंतु ग्राहकाच्या प्रश्नांचे निरसरण करत नाही, ज्या मुळे ग्राहकाला भविष्यात अनेक संकटाना सामोरे जावे लागते, म्हणून कोणतीही होस्टिंग घेताना त्या कंपनी च्या कस्टमर केअर सेवेचा अंदाज घ्या किंवा जो व्यक्ती त्यांच्या सेवा उपभोगत असेल त्या व्यक्तीचा अनुभव विचारा. 

4. Bandwith

Bandwith म्हणजे एका सेकेंडत तुमचे सर्व्हर किती डेटा वर स्वतःचा ताबा म्हणजेच ऍक्सेस मिळवू शकतो. साधारणतः हे GB आणि MB ह्या युनिट मध्ये मोजले जाते. 

समजा, जर तुम्ही निवडलेल्या होस्टिंग कंपनीच्या सर्व्हर च्या डेटा ऍक्सेस क्षमते पेक्षा अधिक व्हिसिटर जर तुमच्या वेबसाईट वर एकाच वेळी आले, तर तुमची वेबसाईट हळू होऊ शकते किंवा बंदच होते, हे आपल्याला सरकारी वेबसाईट वर अनेकदा अनुभवायला मिळते, जसे कि १० वी किंवा १२ वी चानिकाल पाहताना, त्यामुळे असा सर्व्हर निवड ज्याची bandwidth अनलिमिटेड असेल. 

5. User Capacity

युसर कॅपॅसिटी हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. होस्टिंग विकत घेताना कंपनी द्वारे आपल्याला सांगितले जाते कि, तुम्ही जो प्लॅन घेत आहात, त्यामध्ये महिन्याला किती व्हिसिटर्स तुमच्या वेबसाईटला व्हिसिट करू शकतात, तुम्ही निवडलेल्या प्लॅन ची युसर क्षमता जितकी जास्त असेल, तितके तुमच्यासाठी सुलभ ठरते, कारण जर कंपनीने दिलेल्या युसर संख्येच्या मर्यादेपेक्षा जास्त व्हिसिटर्स तुमच्या वेबसाईटवर आले, तर तुमची वेबसाईट डाउन होऊ शकते, डाउन होणे म्हणजे काम करणे बंद करू शकते, त्यामुळे असा होस्टिंग प्लॅन निवड ज्यामध्ये अनंत / अनलिमिटेड व्हिसिटर्स तुमच्या वेबसाईट ला visit करू शकतात, हे थोडे खर्चिक ठरू शकते, परंतु महत्वाचे देखील आहे. 

6. SSL Certificate

SSL चा फुल फॉर्म Secure Socket Layer असा असून वेबसाईट च्या सुरक्षिततेसाठी हे फार महत्वाचे आहे. SSL सर्टिफिकेट मुळे तुमच्या वेबसाईटला एक सुरक्षित कवच लाभते, ज्यामुळे तुमची वेबसाईट कोणीही hack करू शकत नाही, तसेच त्याला काही नुकसान देखील पोहचू शकत नाही.  SSL सर्टिफिकेट हे अनेक होस्टिंग कंपनी होस्टिंग सोबतच मोफत देतात, परंतु ज्या कंपनी हे मोफत देत नसून ह्यावर आणखी पैसे लादत असेल तर शक्यतो अशी होस्टिंग कंपनी टाळा, कारण जी गोष्ट मोफत भेटत असेल त्यासाठी विनाकारण पैसे चुकीचे आहे. 


आपण काय शिकलो?

  • वेबसाईटला इंटरनेट वर प्रसारित करण्याच्या पद्धतीला आपण होस्टिंग म्हणू शकतो. 
  • होस्टिंग सेवा पुरविणाऱ्या कंपनीला होस्ट किंवा होस्टिंग सर्विस प्रोव्हाडर असे म्हटले जाते. 
  • होस्टिंग चे अनेक प्रकार आहेत, परंतु share hosting, vps hosting, dedicated hosting आणि cloud hosting हे सर्वाधिक वापरले जाणारे होस्टिंग चे प्रकार आहेत. 
  • अनेक request एकाच वेळेस विविध ठिकाणी पाठवून वेब होस्टिंग कार्य पार पडते. 
  • होस्टिंग विकत घेताना uptime, ssl certificat, user capacity, bandwith, customer care service आणि storage अशा काही महत्व पूर्ण घटकांचा विचार करूनच वेबसाईटसाठी होस्टिंग विकत घेतली पाहिजे. 

अधिक लेख :

1. Encryption म्हणजे काय ?

2. URL म्हणजे काय व ते कसे कार्य करते ?

3. वेबसाईट म्हणजे काय ?

4. एचटीटीपी म्हणजे काय ?

Leave a Comment