विपणन म्हणजे काय व विपणनाचे फायदे कोणते ?

आजच्या या स्पर्धात्मक वातावरणात प्रत्येक व्यवसाय अथवा कंपनी टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व्यावसायिक क्षेत्रात आपली एक वेगळी आणि सकारात्मक अशी छबी तयार व्हावी यासाठी कंपन्या विपणानाची सहाय्यता घेत आहे.

हे विपणन म्हणजे काय, एखाद्या व्यवसायासाठी कसे प्रभावी ठरू शकते अशा विविध माहितीचा आढावा आपण या लेखाद्वारे घेणार आहोत,


विपणन म्हणजे काय ?

विपणनसाठी इंग्रजीत मार्केटिंग (Marketing) या शब्दाचा उपयोग केला जातो. मार्केटिंग अथवा विपणन म्हणजे कंपनीद्वारे त्यांच्या वस्तू आणि सेवांच्या विक्रीसाठी केलेला प्रचार होय. कंपनी स्वतःच्या वस्तू आणि सेवा यांची विक्री करण्यासाठी, ज्या काही क्रियापलांचा उपयोग करते, त्या सर्व क्रियापालांचा समावेश विपणनमध्ये होतो.
 

विपणनद्वारे कंपनी स्वतःच्या वस्तू व सेवा या ग्राहकापर्यंत पोहोचवते व सोबतच ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा देखील प्रयत्न करते.

व्यवसाय क्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे कंपनी स्वतः विपणन करत नाही तर कंपनी याकरिता नामांकित मार्केटिंग एजेंसीची (Marketing Agency) निवड करते. कंपनी एजेंसीकडे काम सोपविण्यापूर्वी एजेंसी चे ग्राहक, एजेंसीची भूतकाळातील कामे, एजेंसी चे मार्केट मधील स्थान अशा विविध माहितीचा आढावा घेते.


विपणन मिश्र म्हणजे काय ?

विपणन मिश्र म्हणजे उत्पादीत वस्तू व सेवांचा प्रचार आणि विक्री करण्यासाठी तयार करण्यात आलेली रणनीती होय. या रणनीतीत वस्तू व सेवांची योग्य स्थिती निश्चित करणे, योग्य ठिकाणी, योग्य किमतीत आणि योग्य वेळी त्याचा प्रसार करणे या बाबिनां विचारात घेतले जाते.

विपणन मिश्रमध्ये उत्पादन (Product), ठिकाण (Place), किंमत (Cost), आणि जाहिरात (Promotion) या चार घटकांचा आवर्जून विचार केला जातो. या चार घटकांना इंग्रजीत 4Ps असे म्हटले जाते.


विपणनाचे प्रकार

विपणन हे साधारणतः दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागले गेले आहे. विपणनाचे हे दोन मुख्य प्रकार कोणते याचा विस्तारित आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

1. ऑफलाईन विपणन (Offline Marketing)

ऑफलाईन पद्धतीने विपणन करणे ही विपणनाची एक पारंपारिक पद्धत आहे. ऑफलाईन विपणनामध्ये दूरदर्शन, पॅम्प्लेट वाटप, वृत्तपत्रात जाहिराती, रेडिओद्वारे जाहिरात करणे अशा ऑफलाईन माध्यमाद्वारे कंपनीचा प्रचार केला जातो. विपणनाची ही पद्धत या इंटरनेटच्या जगात देखील प्रभावशाली ठरते, कारण आजही लोक वृत्तपत्रे वाचतात, रेडिओ वरील कार्यक्रमाचा आस्वाद घेतात आणि दूरचित्रवाणी पाहतात.

ऑफलाईन विपणनाची सुरुवात ही वृत्तपत्रांच्या माध्यमातून झाली. १८ व्या शतकात जेव्हा वृत्तपत्राचे उत्पादन आणि लोकप्रियता वाढीस लागली, तेव्हा विविध व्यवसायिकदारांना ग्राहकापर्यंत पोहोचण्यचसाठी एक नवीन संधी दिसून आली आणि वृत्तपत्र हे व्यवसायिकांद्वारे विपणनासाठी उपयोगात आणले जाऊ लागले.

ऑफलाईन विपणनामुळे कंपनीला जेथे ग्राहक आहेत, त्या ठिकाणी पोहोचणे, लोकांमध्ये कंपनी विषयी जागरूकता आणणे, नवीन बाजारात पदार्पण करणे अधिक सुलभ होऊ लागले.

2. ई विपणन (E-Marketing)

ई विपणनाला “इलेक्ट्रॉनिक विपणन”, “इंटरनेट विपणन”, “डिजिटल विपणन” अथवा “ऑनलाईन विपणन” अशा विविध नावांनी ओळखले जाते. ऑनलाईन विपणन हे एकापेक्षा अधिक पद्धतीने केले जाऊ शकते. या पद्धती नेमक्या कोणत्या याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

सोशल मीडिया विपणन

वर्तमान काळात सोशल मीडिया हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे एक उत्तम साधन मानले जाते. जगातील एकूण लोकसंख्येयपैकी जवळजवळ ५८ % टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ही सोशल मीडियाचा वापर करते, यामध्ये अगदी तरुण पिढीपासून ते वृद्ध पिढी पर्यंत सर्वांचा समावेश आहे. फेसबुक (Facebook), युट्युब (Youtube), इंस्टाग्राम (Instagram) हे काही जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस आहेत, जेथे दर मिनिटाला लाखो-करोडो लोक ऍक्टिव्ह असतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपन्या जाहिराती प्रसारित करून कंपनीचे विपणन करतात. सोशल मीडिया विपणन (Social Media Marketing) करण्यासाठी येणार खर्च हा कल्पनेपेक्षा फार कमी असतो.

या व्यतिरिक्त कंपनी स्वतःचे सोशल मीडिया खाते सुरु करून, त्यावरील follower ची संख्या वाढवून देखील अगदी मोफत विपणन कंपनीला करता येते.

ई-मेल विपणन

ई-मेल विपणनामध्ये (E-Mail Marketing) कंपनी ई-मेलचा उपयोग करून ग्राहकांना कंपनीच्या वस्तू व सेवांसंबंधित विविध ऑफर विषयी ई-मेल पाठवते. ईमेल विपणन करण्यापूर्वी कंपनीला ग्राहकांच्या ई-मेल आयडीचा संच तयार करावा लागतो. ग्राहकांकडून त्यांची ई-मेल आयडी जाणून घेण्यासाठी कंपनी ग्राहकांना मोफत कुपन वाटप सारख्या मोहिमा राबवते, ज्या मोबदला ग्राहकाला ई-मेल आयडीद्वारे नोंदणी करावी लागते आणि नोंदणी मार्फत कंपनीला ग्राहकाचा ई-मेल आयडी प्राप्त होतो.

वेबसाईट विपणन

सर्च इंजिनवरील ज्या वेबसाइटवर दर दिवशी हजारो-लाखो व्हिसिटर (Visiters) येतात, अशा वेबसाईट मालकांना कंपनी पैसे देऊन त्यांच्या वेबसाईटवर ठराविक काळासाठी जाहिराती प्रदर्शित करते, या विपणन पद्धतीला वेबसाईट विपणन (Website Marketing) असे म्हटले जाते. कंपनी जाहिरातींसाठी अधिकतर News वेबसाईटसला प्राधान्य देते, कारण बातमी हा एक असा विषय आहे, ज्यावर लोक दर दिवशी लक्ष ठेऊन असतात.

अफिलिएट विपणन

अफिलिएट विपणनमध्ये (Affiliate Marketing) ग्राहक वगळता तृतीयक व्यक्ती कंपनीच्या वस्तू व सेवांचा प्रचार करून ते विकतो, या मोबदला कंपनी तृतीयक व्यक्तीला कमिशन देते. येथे कंपनीला स्वतःचा केवळ अफिलिएट मंच तयार करावा लागतो. विपणनाच्या या पद्धतीमुळे न केवळ कंपनीला नफा होतो, तर सोबतच रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतात.

प्रभावक विपणन

सोशल मीडिया प्रभावकाद्वारे विपणन (Influencer Marketing) करणे ही विपणनाची एक सुप्रसिद्ध पद्धत आहे. इथे कंपनी सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रियता आणि जास्त फॉलोवर असलेल्या व्यक्तीकडून स्वतःच्या वस्तू व सेवांची जाहिरात करून घेते. एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत अगदी जलद रित्या पोहोचण्याची ही एक प्रभावशाली पद्धत मानली जाते.


संकल्पना

आपली वस्तू अथवा सेवा विकण्यासाठी, लोकांपर्यंत माहिती अथवा विचार अथवा संदेश पोहोचविण्यासाठी जे माध्यम वापरले जाते, त्याला आपण “विपणन” असे म्हणू शकतो. केवळ वस्तू व सेवा विकण्यासाठी अथवा ग्राहकाला विकत घेण्यासाठी प्रवृत्त करणे याकरिता आज विपणन केले जात नाही, तर यापाठी एक व्यापक असा हिशेब असतो. म्हणूनच विपणनाला आज विशेष महत्व आले आहे.

अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, विपणन म्हणजे वस्तू अथवा सेवेच्या दर्जाची, उपयुक्ततेची आणि गुणवत्तेची माहिती देणारी एक प्रसिद्ध सुविधा आहे. विपणना दरम्यान ग्राहकाला जी माहिती दिली जाते ती विश्वसार्ह व बिनचूक असावी याला विशेष महत्व कंपनीकडून दिले जाते. चुकीचा संदेश पसरवणाऱ्या घटकांचा समावेश विपणनात केला जात नाही अथवा टाळला जातो.

फार मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीची भूमिका काही व्यावसायिक समूहांनी स्वीकारल्याने त्यानुसार विपणन निर्माण केले जात असल्याने सामाजिक संदेश अथवा विचार प्रगट होऊ लागला आहे.


विपणनाचे फायदे

विपणनामुळे एखाद्या व्यवसायाला कोणकोणते फायदे होतात, याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

1. वस्तू व सेवांच्या विक्रीत वाढ

विपणन हा ग्राहकांपर्यंत व्यवसायासंबधित माहिती पोहोचविण्याचा एक उत्तम मार्ग आहे. विपणनामुळे ग्राहकाला ठराविक कंपनीद्वारे पुरविल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांची अगदी सुसज्ज पद्धतीने माहिती मिळते, ज्यामुळे ग्राहक वस्तू व सेवांच्या खरेदीकडे वळतो आणि वस्तू व सेवांच्या विक्रीत वाढ होते. जेव्हा ग्राहकाला एखाद्या वस्तू अथवा सेवा संबंधित चांगली आणि स्पष्ट अशी माहिती मिळते, तेव्हा ग्राहकाला त्या वस्तू अथवा सेवेचा खरा उपयोग समजून येतो.

2. प्रतिष्ठा

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, जर एखाद्या व्यवसाय अथवा कंपनीला बाजारात टिकून राहायचे असेल, तर बाजारात कंपनीची एक सकारात्मक प्रतिष्ठा असणे फार गरजेचे असते. प्रतिष्ठेमुळे Brand ची निर्मिती होते. प्रतिष्ठा निर्मितीसाठी विपणन एक महत्वपूर्ण भूमिका बजावते.

आज ग्राहक कोणतीही वस्तू अथवा सेवांचा लाभ घेण्यापूर्वी प्रथम त्यासंबंधित माहितीचा जाणून घेतो.  व्यवसायाचे पारदर्शक असे विपणन प्रसारित केल्याने ग्राहकांमध्ये कंपनी अथवा व्यवसायासंबधित एक सकारात्मक छबी निर्माण होते आणि हीच छबी व्यवसाय विस्तारासाठी कारणीभूत ठरते.

बाजारात जे काही मोठे व्यवसाय असतात, ते स्वतःची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी ग्राहकांसंबंधित विविध धोरणांची अंमलबजावणी करत असतात, यासाठी त्यांचा बराचसा निधी राखीव असतो परंतु लहान व्यवसायांच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास त्यांना स्वतःची प्रतिष्ठा निर्माण करायची असेल तर विपणन वगळता इतर पर्याय नाही.

3. ग्राहकांची ओळख पटणे

उत्तम विपणन नियोजन हे व्यवसायाला त्याच्या ग्राहक वर्गाला ओळखण्याची व त्यांच्या संबंधित माहिती प्राप्त करण्याची संधी मिळते, ज्याने व्यवसायिकदार त्यांच्या ग्राहक वर्गात वाढ करू शकतो. एकदा का ग्राहकाची ओळख पटली, की त्यांच्या मागणीचा आढावा घेता येतो व मागणी नुसार उत्पादन घेता येते.

4. विश्वास प्राप्त करणे

कोणत्याही व्यवसाय अथवा विपणनाचा मुख्य हेतू हा ग्राहकांचा विश्वास प्राप्त करणे हा असतो. उत्तम परीचे विपणन धोरण हे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यास मदत करते. विश्वासा व्यतिरिक्त या स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहणे, कोणत्याही व्यवसायासाठी एक आव्हानात्मक गोष्ट आहे. ग्राहकांचा विश्वास मिळवणे हा विपणनाचा एक उत्तम फायदा आहे.

5. बाजार अभ्यास

विपणनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे बाजारपेठ. कारण विपणन करणे एखाद्या व्यवसायासाठी जितके महत्वाचे आहे, तितकेच महत्वाचे विपणन योग्य बाजारात करणे महत्वाचे असते. केवळ ग्राहकांना ओळखणे पुरेसे नसते, तर स्वतःची बाजारपेठ देखील ओळखावी लागते, जेणे करून आपल्या वस्तू व सेवांना बाजारात मागणी मिळेल आणि व्यवसाय जास्तीत जास्त मूल्य प्राप्त करू शकेल.

व्यवसाय करताना आपल्या व्यवसायासाठी अनुकूल अशी बाजारपेठ, ग्राहक, मागणी अशा विविध गोष्टींसंबंधित जितकी माहिती असेल, तितक्या जास्त फायदेशीर संधी व्यवसायासाठी निर्माण होतात. बाजारपेठ अभ्यासामुळे आपल्याला राज्यस्तरीय बाजारपेठ, राष्ट्रीय बाजार पेठ आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धकांची जाणीव होते.


तोटे

विपणनामुळे व्यावसायिकदारांना होणारे तोटे खालीलप्रमाणे,

1. अयशस्वी धोरण

विपणनाच्या आधारे आखल्या जाणाऱ्या प्रत्येक मोहीमा यशस्वी ठरतीलच असे नाही. अनेकदा चुकीच्या धोरणांमुळे विपणन अयशस्वी तर ठरतेच, पण सोबतच विपणनासाठी केलेला खर्च तोट्यात परावर्तित होतो.

2. विद्यमान ग्राहकांकडे दुर्लक्ष

कोणताही व्यवसाय अथवा कंपनी नेमही नवीन ग्राहकांच्या शोधात असते, यासाठी कंपनी व्यवसायात नवनवीन धोरणांची अंमलबजावणी करते, ज्यामुळे जे व्यवसायातील विद्यमान म्हणजे जुने ग्राहक आहेत, त्यांच्या मागणीकडे नकळत दुर्लक्ष होते, परिणामी विद्यमान ग्राहक आणि कंपनी यातील अंतर वाढत जाते.

3. उत्पादनाच्या मूल्यात घसरण

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या वस्तू व सेवांचे दर हे ठराविक कालावधीसाठी कमी करतात व या कमी केलेल्या वस्तूंच्या किमती विपणनाचा एक आकर्षक भाग बनवतात. हे धोरण नक्कीच नेहमी व्यावसायिकदारांना फायदेशीर ठरते, परंतु मर्यादित कालावधीपेक्षा अधिक काळ जेव्हा हे धोरण विपणनाद्वारे चालवले जाते, तेव्हा वस्तूच्या किमतीत घसरण होण्याची दाट शक्यता निर्माण होते, कारण ग्राहक ठराविक मूल्यापेक्षा अधिक मूल्य त्या वस्तुंना देण्यास नाकारतो.


FAQ

1. विपणनाचा मुख्य हेतू कोणता ?

उत्तर : स्वतःच्या वस्तू व सेवा घराघरात पोहोचवणे हा विपणनाचा मुख्य हेतू आहे.

2. 2020 मध्ये भारतीय कंपन्यांनी विपणनासाठी किती पैसे खर्च केले होते ?

उत्तर : साल २०२० मध्ये भारतीय कंपन्यांनी विपणनाची एकूण ५४,१०० करोड रुपये खर्च केले होते.

3. विपणनाचे दोन मुख्य प्रकार कोणते ?

उत्तर : ऑफलाईन विपणन आणि ऑनलाईन विपणन हे विपणनाचे दोन मुख्य प्रकार आहेत.

4. विपणनाचे जनक असे कोणास म्हटले जाते ?

उत्तर : फिलिप कोटलर याना विपणनाचे जनक असे म्हटले जाते.

अधिक लेख –

1. परिसंस्था म्हणजे काय व परिसंस्थेतील घटक कोणते ?

2. व्यवसाय म्हणजे काय व व्यवसायाचे प्रकार कोणते ?

3. जागतिकीकरण म्हणजे काय ?

4. इंटरनेट म्हणजे काय व इंटरनेटचे फायदे कोणते ?

Leave a Comment