विजेचा शोध कोणी लावला ?

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. दर दिवशी नवनवीन यंत्रे तयार केली जात आहे, जी हळू हळू आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहे जसे कि संगणक, मोबाइल फोन, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि अधिक.

विजेचा शोध कोणी लावला

ह्या सर्व तंत्रज्ञानाचा आणि यंत्राचा एक मुख्य पाया आहे तो म्हणजे वीज अथवा विद्युत. कधी विचार केला आहे का कि जर वीजच अस्तित्वात नसती तर हे यंत्र कसे चालले असते आणि चालले असते तरी त्यासाठी किती पैसे खर्च करावा लागला असते?

असा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक मूलभूत भाग म्हणजे वीज ज्याची आपण ह्या लेखात माहिती पाहणार आहोत, जसे कि वीज म्हणजे काय, विजेचा इतिहास, विजेचा शोध कोणी लावला, भारतात विद्युत सेवा केव्हा पासून सुरु करण्यात आली आणि अधिक.


वीज म्हणजे काय ?

वीज हि एक प्रकारची ऊर्जाच आहे. जगातील प्रत्येक गोष्ट ही अणूंपासून तयार झाली आहे, ह्या अणूंचे एक केंद्र बिंदू असते, ज्याला न्यूक्लीयस ह्या नावाने ओळखले जाते.

न्यूक्लीयस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन चे लहान लहान कण अथवा पार्टिकल्स असतात, त्यातील प्रोटॉन मध्ये साकारात्मनक (Positive +) पार्टिकल्स असतात तर, प्रोटॉन च्या अगदी विरुद्ध न्यूट्रॉन मध्ये नकारात्मक (Negative -) पार्टिकल्स असतात.

अणूंचे केंद्र म्हणजेच न्यूक्लीयस हे इलेक्ट्रॉन च्या अवती भवती वेढा घालून असते. मुख्यतः इलेक्ट्रॉन हा नकारात्मक (Negative -) पार्टिकल्स चा प्रवाह आहे.

इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लीयस मधील प्रोटॉन ह्यांच्या पार्टिकल्स ची संख्या आणि ऊर्जा ही एकसमान असते, परंतु जेव्हा अणूंच्या बाहेरील दबावामुळे जेव्हा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन ह्याचे संतुलन बिघडते तेव्हा विजेची निर्मिती होते.


विजेच्या शोधाचा इतिहास

अनेक भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये आणि कथांमध्ये आपल्याला न केवळ विजेचा उल्लेख आढळतो तर मानव निर्मित विजेचा उल्लेख आढळून येतो ह्या वरून असे दिसून येते कि पौराणिक भारत हा आजच्या भारतापेक्षा खूप पटीने प्रगत होता. परंतु इथे आपण आधुनिक काळात तयार करण्यात आलेल्या विजेबद्दल चा इतिहास खालील प्रमाणे पाहणार आहोत :

साल ६०० : इ.स ६०० च्या दरम्यान मी Miletus ने विजेवर निरीक्षण करून त्याबाबत काही माहितीचा संग्रह तयार केला होता, ज्यामध्ये काही असे लिहिले होते की, घर्षण केल्याने काही विशिष्ट वस्तूंना चुंबकीय ऊर्जा प्राप्त होते आणि हे भाकीत केल्याच्या काही वर्षां नंतर आधुनिक काळातील शास्त्रज्ञांनी वीज आणि चुंबक यातील संबंध सिद्ध करून दाखवला.

साल १६०० : अनेक परीक्षण आणि अभ्यासाचा आधार घेऊन १६०० च्या दरम्यान इंग्लंड मधील शास्त्रज्ञ विल्यम गिल्बर्ट यांनी De Magnete नावाचे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये त्यांनी चुंबकत्व आणि वीज ( ऊर्जा ) ह्याचा विशेष उल्लेख करून असे लिहिले होते कि, एखाद्या पदार्थाला घर्षणामुळे लाभलेल्या चुंबकीय ऊर्जेतून चुंबकत्व वेगळे करता येते, या पुस्तकात त्यांनी वस्तूंना आकर्षित करणाऱ्या गुणधर्माला दर्शविण्यासाठी ” Electricus ” ह्या लॅटिन भाषेतील शब्दाचा वापर केला होता आणि पुढे जाऊन याच शब्दापासून Electric आणि Electricity ह्या शब्दांची उत्पत्ती झाली.

साल १६०० ते १८०० : इ.स १६०० ते १८०० च्या दरम्यान ऑटो ग्येरिक , स्टीफन ग्रे अशा अनेक संशोधकांनी १७०० ते १८०० च्या आधी च्या काळात विद्युत क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली, यानंतर काळ आलं तो म्हणजे १८०० चा.  ज्या नंतर Benjamin franklin नावाच्या शास्त्रज्ञांने एक प्रयोग केला, या प्रयोगासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी फ्रान्क्लीन यांनी स्वतःची संपत्ती विकली. हा प्रयोग सादर करण्यासाठी त्यांनी एका पतंगाचा सहारा घेतला, पतंगाच्या तारेला त्यांनी एका धातूची चावी जोडली आणि चक्रीवादळ दरम्यान ही पतंग आकाशात उडविण्यात आली, त्यावेळी पतंगील जोडण्यात आलेल्या चावी मधून ठिणग्या निर्माण होऊ लागले, ज्यातून एक प्रकाशाची निर्मिती होत होती, या प्रयोगातून फ्रेंक्लिन यांनी सिद्ध केले की, निसर्गातील प्रकाश हा देखील एक प्रकारच्या ऊर्जेचे रूप आहे, तसेच सकारात्मक आणि नकारात्मक प्रॉपर्टी असलेली ऊर्जा साठविण्यासाठी लेड अंजार हे यंत्र योग्य नाही असे देखील फ्रान्क्लीन यांनी सांगितले होते

साल १८०० : १८०० च्या दरम्यान अलेस्सांद्रो नावाच्या संशोधकानी झिंक आणि कॉपर पासून एक यंत्र तयार केले जे विद्युत निर्मिती करत होते, त्यामुळे विजेच्या शोधाची दिशाच बदलली. तसेच अलेस्सांद्रो हे जगातील पहिले शास्त्रज्ञा होते ज्यांनी प्रथम माननिर्मित वीज तयार केली होती.

साल १८२१ ते २८ : १८२१ च्या दरम्यान मायकल फॅरेडेस या शास्त्रज्ञाने एक विद्युत मोटर तयार केली ज्यामुळे विद्युत शोधला आणखी नवीन चालना मिळाली. साल १८२७ मध्ये जॉर्ज नावाच्या संशोधकानी गणिताची सहाय्यता घेऊन इलेक्ट्रिक सर्किटचे विश्लेषण केले.

साल १८३० ते ३१ : १८६१ च्या दरम्यान अथक प्रयत्न आणि विविध प्रयोगातून मॅक्स ह्या शास्त्रज्ञाने वीज आणि चुंबकत्व हे एकमेकांशी जोडले गेले आहेत असे भाकीत केले.

साल १९०५ ते ०६ : फोटोईलेक्ट्रिक चा वापर सोलर पॅनल मध्ये आढळणाऱ्या फोटोसेल्स मध्ये देखील केला जाऊ शकतो, ज्याने वीज निर्मिती होऊ शकते, असा शोध १९०५ मध्ये जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी लावला आणि अशा अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आज आपण केवळ काही बटनांचा वापर करून वीज घरात वापरू शकत आहोत.


महत्त्व

आधुनिक समाजात विजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, विज आपल्या दैनंदिन जीवनातील जवळजवळ प्रत्येक पैलूमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्याचे महत्त्व विविध क्षेत्रात पाहिले जाऊ शकते आणि त्याचा तांत्रिक प्रगती आणि सामाजिक विकासावर खोलवर परिणाम झाला आहे.

1. घरे आणि पायाभूत सुविधांना उर्जा देणे

वीज हा निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक पायाभूत सुविधांचा कणा आहे. हे प्रकाश, गरम करणे, थंड करणे, स्वयंपाक करणे आणि उपकरणे आणि यंत्रसामग्री चालविण्यासाठी ऊर्जा प्रदान करते. विजेशिवाय, आधुनिक राहणीमान पूर्णपणे भिन्न आणि कमी सोयीस्कर असेल.

2. आर्थिक विकास

आर्थिक वाढीसाठी विश्वासार्ह वीज उपलब्ध होणे ही मूलभूत गरज आहे. उद्योग उत्पादने तयार करण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी विजेवर अवलंबून असतात, रोजगार निर्मिती आणि आर्थिक समृद्धीमध्ये योगदान देतात.

3. आरोग्यसेवा

वैद्यकीय उपकरणे, रुग्णालये आणि आरोग्य सुविधांच्या कामकाजासाठी वीज आवश्यक आहे. व्हेंटिलेटरसारख्या जीवरक्षक मशीनपासून ते मूलभूत वैद्यकीय उपकरणांपर्यंत, आरोग्य सेवा क्षेत्र रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी विजेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.

4. दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान

डिजिटल युग मोठ्या प्रमाणात विजेवर अवलंबून आहे. दळणवळण प्रणाली, इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर, संगणक, स्मार्टफोन आणि डेटा सेंटर हे सर्व वीजेद्वारे समर्थित आहेत, ज्यामुळे माहितीची जलद देवाणघेवाण शक्य होते आणि जागतिक कनेक्टिव्हिटी सुलभ होते.

5. शिक्षण

वीज वर्गखोल्या, संगणक, प्रोजेक्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक शिक्षण साधनांना उर्जा देऊन शैक्षणिक संस्थांना समर्थन देते. हे शिकण्याचा अनुभव वाढवते आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेली अफाट शैक्षणिक संसाधने उघडते.

6. वाहतूक

जगाने कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा आणि टिकाऊ वाहतुकीच्या पर्यायांकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे इलेक्ट्रिक वाहने (EVs) अधिक महत्त्वाची होत आहेत. वीज इलेक्ट्रिक ट्रेन, ट्राम आणि सार्वजनिक वाहतुकीच्या इतर प्रकारांना देखील सामर्थ्य देते.

7. करमणूक आणि करमणूक

वीज टेलिव्हिजन, गेमिंग, सिनेमा आणि संगीतासह विविध प्रकारचे मनोरंजन सक्षम करते. हे मनोरंजन पार्क, क्रीडा स्टेडियम आणि मनोरंजन सुविधा देखील सामर्थ्य देते.

8. शेती

आधुनिक शेती सिंचन प्रणाली, यंत्रसामग्री आणि साठवण सुविधांसाठी विजेवर अवलंबून असते. यामुळे कार्यक्षमता वाढते आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढते.

9. संशोधन आणि नवकल्पना

वैज्ञानिक संशोधन आणि विकास मोठ्या प्रमाणावर वीज ते विद्युत प्रयोगशाळा, प्रायोगिक उपकरणे आणि डेटा विश्लेषण साधनांवर अवलंबून असतात. विजेच्या उपलब्धतेमुळे विविध वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगती लक्षणीयरीत्या वेगवान आहे.

10. पर्यावरणीय फायदे

जरी वीज निर्मितीच्या पद्धती पर्यावरणावर परिणाम करू शकतात, सौर, पवन आणि जलविद्युत यांसारखे अक्षय ऊर्जा स्त्रोत स्वच्छ पर्याय देतात जे ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यास आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करतात.

विजेने आपण जगण्याच्या, कार्य करण्याच्या आणि जगाशी संवाद साधण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. हा आधुनिक सभ्यतेचा अविभाज्य भाग बनला आहे, विविध क्षेत्रांमध्ये प्रगती, सुविधा आणि कार्यक्षमतेत चालना. विश्वासार्ह आणि शाश्वत विजेचा सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करणे हे मानवतेच्या निरंतर विकासासाठी आणि कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण ध्येय आहे. 


विजेचा शोध कोणी लावला ?

इटालियन भौतिक शास्त्रज्ञ Alessandro Volta ह्यांना अनेक प्रयोगांदरम्यान अशी रासायनिक प्रक्रिया ज्ञात झाली, ज्या द्वारे ऊर्जा म्हणजेच वीज निर्मिती होऊ शकत होती आणि ह्याच रासायनिक प्रक्रियांचा सहारा घेऊन Alessandro Volta ह्यांनी १७९९ मध्ये वीज निर्मित करणारी एक बॅटरी तयार केली ज्यामध्ये झिंक आणि कॉपर चा वापर केला गेला होता, ज्यामुळे मानवनिर्मित वीज तयार करणारे अलेस्सांद्रो वोल्टा हे जगातील पहिले शास्त्रज्ञ ठरले, त्यांची हि कामगिरी लक्षात घेता, त्यांच्या नावावरून विजेला volt नावाचे युनिट देण्यात आहे.

Alessandro Volta ह्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १७४५ च्या दरम्यान इटली मधील Duchy of Milan ह्या राज्यातील como ह्या शहरात झाला होता. त्यांनी त्यांचे शिक्षण रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र ह्या विषयांमधून पूर्ण केले होते. Volta ह्यांनी न केवळ विद्युत निर्मिती बॅटरी चा शोध लावला, तर मिथेन , voltage आणि व्होल्टमीटर ह्यांचा देखील शोध लावला आणि ह्या साठी अलेस्सांद्रो ह्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते, जसे कि Copley Medal, Legion Of Honor आणि Order Of The Iron Cron.


वीज कशी तयार करतात ?

तंत्रज्ञानामुळे हल्ली वीज निर्मिती साठी विविध पद्धती अवलंबल्या जात आहेत, त्यातीलच वीजनिर्मितीच्या दोन पद्धती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

1. कोळश्यापासून वीज निर्मिती

प्रथम खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळश्यांचा साठा काढला जातो. कोळश्याला अगदी बारीक पावडर चे रूप दिले जाते. यंत्रांद्वारे ह्या पावडर ला उच्च तापमानावर जाळले जाते. ह्यातून निर्माण होणारे वायू आणि उष्णता हि पाण्याचे वाफेत रूपांतर करते आणि तयार झालेली वाफ टर्बाईन नावाच्या यंत्रातून पास होते, ज्यामध्ये अनेक ब्लेड लावलेले असतात.

ह्या टरबाइन च्या शेवटच्या टोकाला एक जेनेरेटोर लावलेले असते, जे त्यात बसवलेल्या कॉइल ला अगदी वेगाने फिरवते आणि ह्यातून वीजनिर्मिती होते, ह्या निर्माण झालेल्या विजेचे उच्च वोल्टेज तयार केले जाते आणि नंतर हीच वीज घराघरात तारांच्या माध्यमातून पोहोचवली जाते.

2. हवेपासून वीज निर्मिती

आपण अनेकदा डोंगराळ इलाख्यात जातो, तेव्हा तिथे आपल्याला मोठं मोठे पंखे फिरताना दिसतात, ज्यांना आपण पवन चक्की असे म्हणतो. अनेक लोकांच्या मनात हा विचार नक्की येत असेल कि ह्या द्वारे वीज कशी बनवली जात असेल, तर ह्याचे स्पष्टीकरण आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत:

पावन चक्कीला मोठमोठे पंखे बसवलेले असतात जे शाफ्ट शी जोडलेले असते आणि हे शाफ्ट जेनेरेटोर शी जोडलेले असते. वेगाने वारा आल्यावर पावन चक्कीचे पंखे फिरू लागतात ज्यामुळे शाफ्ट ला जोडलेल्या जेनेरेटोर च्या कॉईल देखील वेगानं फिरतात ज्यामुळे वीज निर्मिती होते.


भारतात विद्युतसेवा केव्हा सुरु करण्यात आली ?

भारतात विद्युत सेवा हि ब्रिटिश हुकूमती च्या दरम्यान सुरु करण्यात आली होती, वीज निर्मितीच्या शोधाच्या तब्बल ८० वर्षानंतर म्हणजेच १८७९ च्या दरम्यान.

प्रथम विद्युत सेवा सुरु होणारे कोलकत्ता हे भारतातील पहिले शहर होते, कारण ह्या शहरात लोकसंख्या अधिक होती, तसेच हे इंग्रजांचे मुख्य केंद्र म्हणून देखील ओळखले जात होते.

कोलकत्ता ह्या शहरात विद्युत सेवा सुरु केल्याच्या २६ वर्षांनंतर म्हणजेच १९०५ च्या दरम्यान मुंबई मध्ये एक मोठे विदुत निर्मिती प्लांट तयार करण्यात आले आणि अशा प्रकारे भारतात विद्यत सेवेचा आरंभ झाला होता.


आपण काय शिकलो ?

  • पहिली मानवनिर्मित वीज तयार करण्याचे श्रेय Alessandro Volta ह्यांना जाते.
  • भारतात १८७८ मध्ये विद्युत सेवा सुरु करण्यात आली होते.
    वीज म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे.
  • वीज हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक मूलभूत घटक बनला आहे.
  • Electricus ह्या शब्दापासून Electric आणि Electricity ह्या दोन शब्दांची उत्पत्ती झाली आहे.

अधिक लेख :

1. तार यंत्राचा शोध कधी लागला ?

2. ट्रांजिस्टर चा शोध कधी लागला ?

3. कागदाचा शोध कोणी लावला ?

4. पावरलूम चा शोध कोणी लावला ?

Leave a Comment