Vibe म्हणजे काय व Vibe चे प्रकार कोणते ? | Vibes Meaning in Marathi

Vibes हा दैनंदिन जीवनात सतत वापरला जाणारा एक इंग्रजी शब्द आहे. Vibes मुळात अनेक वचनी शब्द असून ह्या शब्दाचे एक वचन Vibe असे आहे. एका शब्दात Vibes चा अर्थ सांगायचा झाला तर, तो स्पंदने असा होतो, परंतु यावरून आपल्याला Vibes ह्या शब्दाचा वापर अथवा वापरण्याचे ध्येय लक्षात येत नाही.

या लेखात आपण Vibes बद्दल विविध प्रकारची माहिती पाहणार आहोत, जसे की Vibes म्हणजे काय? (Vibes Meaning in Marathi), Vibes चे विविध प्रकार, महत्त्व, फायदे आणि अधिक.


Vibes म्हणजे काय ? – Vibes Meaning in Marathi

कोणत्याही व्यक्तीमध्ये दुःख, भीती, राग, किळस, चिंता आनंद, आश्चर्य, कंटाळवाणेपणा, समाधान, दरारा आणि कौतुक अशा काही भावना असतात. या भावना साधारणतः विचार, व्हिडिओ, वाचन आणि एखाद्या घडलेल्या घटनेमुळे निर्माण होतात. या भावणांनुसार व्यक्तीच्या शरीरात आणि अवतीभोवती स्पंदने किंवा ऊर्जा निर्माण होत असते, ह्यालाच आपण इंग्रजीत Vibes असे म्हणतो.

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, Vibes म्हणजे भावनात्मक ऊर्जा जी एखाद्या व्यक्तीच्या वर्तमान काळातील भावनांनुसार व्यक्तीच्या अवतीभवती तयार होतात. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने ही भावनात्मक ऊर्जा pass होत असते. Vibes हे साधारणतः एखाद्या घडलेल्या घटनेमुळे, विचारांमुळे, इतर व्यक्ती सोबत बोलल्यामुळे व विविध परिस्थितीनुसार तयार होत असतात.

उदा. अजय आणि विजय दोन मित्र असतात. अजयच्या बाबांचे प्रमोशन झाले, त्यामुळे अजय आणि त्याच्या घरातील सर्व कुटुंबीय आनंदात असतात. अजय आनंदी असल्यामुळे त्याच्या अवतीभवती सकारात्मक ऊर्जा किंवा Vibes तयार झाले. या दरम्यान अजय आणि विजय एकमेकांना भेटले आणि अजयने ही सर्व बातमी विजयला सांगितली, हे ऐकून विजय देखील आनंदी झाला, अशा प्रकारे अजयचे Vibes विजयला Pass झाले.


Vibes चे विविध प्रकार

Vibes हे साधारणतः Positive आणि Negative अशा दोन प्रकारांमध्ये विभागले गेले आहे. या दोन प्रकारच्या Vibes मध्ये ही आणखी Vibes चा समावेश होतो. इथे आपण Positive आणि Negative Vibes बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत,

1. सकारात्मक स्पंदने (Positive Vibes)

Positive Vibes म्हणजे अशी स्पंदने किंवा ऊर्जा ज्यामधून शरीराला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होतो. या Positive Vibes चा आपल्या दैनंदिन जीवनात फार प्रभाव पडत असतो. Positive Vibes मध्ये इतर विविध प्रकारच्या Vibes चा समावेश आहे,  त्या Vibes ची माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

Morning Vibes :- कामाच्या तणावामुळे व सवयीमुळे लोक रात्री उशिरा झोपतात, त्यामुळे सकाळी उशिरा उठणे होते. उशिरा उठण्या दरम्यान वातावरण गोंधळाचे असते. म्हणजे गाड्यांचा आवाज, लोकांची गर्दी, दूषित वातावरण इत्यादी.

Morning Vibes म्हणजे पहाटेच्या दरम्यान ची ऊर्जा. पक्षांचा किलबिलाट, शांत आणि थंड वातावरण, ज्यामुळे आपल्याला Positive Vibes मिळतात आणि आपला संपूर्ण दिवस अगदी प्रसन्नता पूर्वक जातो.

Festive Vibes :- भारतात विविध जाती-धर्माचे लोक राहत असल्यामुळे येथे विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. ह्या सणांची वारंवारता इतकी आहे, की दर महिन्यात कोणता न कोणता सण साजरा केला जातो. सण समारंभा दरम्यान सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात, त्यामुळे वातावरणात सकारात्मक नांदते, ज्याला आपण Festive Vibes असे म्हणतो.

2. नकारात्मक स्पंदने (Negative Vibes)

Negative Vibes म्हणजे नकारात्मक ऊर्जा. जेव्हा एखादी दुःखद घटना घडते साधारणतः तेव्हा नकारात्मक स्पंदनांची निर्मिती होत असते. या Vibes चा आपल्या जीवनावर अयोग्य असा परिणाम होत असतो.


स्पंदने (Vibes) मेंदूला कसे व का जाणवतात ?

Neuroscientist हे आपल्या मेंदूचे एक प्रकारचे कौशल्य असते, जे साधारणतः प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. या कौशल्या द्वारे आपल्या मेंदूला विविध भावनांच्या स्पंदणांबद्दल माहिती मिळते. हे एखाद्या ठराविक कक्षेतील अथवा स्थिती मधील भावना स्पंदनाद्वारे ओळखणे ही प्रत्येक व्यक्तीसाठी एक सामान्य बाब आहे. स्पंदनातून भावना ओळखत असताना, यादरम्यान तुमचा काय दृष्टिकोन आहे किंवा तुमच्या मनात कोणती भावना आहे, या गोष्टीने काहीही फरक पडत नाही.

अनेकदा आपल्याला असे जाणवते की, ठराविक क्षेत्र आपल्यासाठी योग्य नाही किंवा ठराविक क्षेत्र आनंदीमय आहे, हे साधारणतः आपल्याला त्या क्षेत्रात उपस्थित असलेल्या लोकांचे हावभाव आणि बोलण्याची पद्धत यावरून समजत असते.

हावभाव आणि बोलण्याचा उद्देश ओळखणे हे कौशल्य प्रत्येक व्यक्तीला अवगत असते, फक्त गरज असते ती योग्य निरीक्षण करण्याची.

काही अभ्यासातून अभ्यासकांना, आपल्याला चांगले किंवा वाईट Vibes का व कसे जाणवतात याचे उत्तर मिळाले आहे.

संशोधकांनुसार जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या वर्तमान ठिकाणी त्याचे अश्रू व घाम सोडतो, दुसऱ्या व्यक्तीला त्याच ठिकाणाहून Chemo signals मिळत असतात. हे काहीसे प्राण्यांच्या कृतीप्रमाणे आहे, जसे की कुत्रा त्याचे क्षेत्र दर्शविण्यासाठी ठिक-ठिकाणी मलमूत्र सोडत असतो, यावरून दुसरा कुत्रा जर त्या क्षेत्रात गेला, तर त्याला वासावरून समजते की हे क्षेत्र आधीच इतर कुत्र्यांनी व्यापली आहे, या सिग्नलला आपण Chemo Signals असे म्हणतो.

मानव हा एक सामाजिक प्राणी आहे, ज्यामुळे भावना आणि चेहर्‍यावरील हावभाव ओळखणे ही कला मानवाला अवगत आहे. ही कला केवळ आधुनिक जगातील मानवाला अवगत आहे, असे नाही तर अश्मयुगातील मानवाला देखील ही कला अवगत होती.

पूर्वी मानव भटकंती करत होता, त्यामुळे तेव्हा त्याचा ठराविक असा निवारा नव्हता. जेव्हा एखादा मांसाहारी प्राणी मानवाचा शिकार करण्यासाठी घात लावून बसायचा आणि ही खबर कळपातल्या एका व्यक्तीला समजायची, तेव्हा कळपातील इतर सदस्य त्या व्यक्तीचे हावभाव जाणून स्वतःच्या संरक्षणासाठी भाले व इतर हत्यारे घेऊन सज्ज राहत होती.

आता इथे प्रश्न असा उभा राहतो की, भीतीदायक परिस्थितीत लोकांच्या चेहर्‍याचे हावभाव नक्की कसे असतील, तर जेव्हा एखादी व्यक्ती घाबरली असते, तेव्हा त्याचा श्वासोच्छवास नेहमीपेक्षा जास्त असतो, धोक्याचे निरीक्षण करण्याकरिता डोळ्यांची हालचाल वेगवान होते आणि व्यक्तीला काही प्रमाणात घाम देखील येत असतो.

आपल्या भुवया खाली घेणे, नाक सुरकुतने आणि डोळे काही प्रमाणात लहान करणे ह्या चेहऱ्याच्या हावभाव वरून आपल्याला अन्नाची अवस्था कशी आहे, याचा अंदाज येतो. एखाद्या पदार्थाचा वास घेतल्यावर जर आपल्या चेहऱ्याचा भाव वरील अवस्थेत येत असेल याचा अर्थ अन्न योग्य नाही किंवा खराब आहे.

प्रतिकूल परिस्थितीत न संवाद साधता समोरील व्यक्ती पर्यंत संदेश पोचवण्याचा “Emotional Signal” हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Netherlands मधील जास्फर HBD ग्रुप व त्यांचे सहकारी अनेक वर्ष झाले निरीक्षण करत आहेत की, Chemo signals कशा प्रकारे व कोणत्या पद्धतीने कार्य करतात. हे जाणून घेण्यासाठी त्यांनी 2012 मध्ये एक प्रयोग देखील पार पडला.

ह्या प्रयोगामध्ये काही पुरुषांना टी-शर्ट घालण्यात आले. प्रत्येक व्यक्तीला भीतीदायक, आनंदी भाव असलेले व्हिडिओ दाखवले. व्हिडिओ दाखवल्यानंतर पुरुषांना दिलेले टी-शर्ट परत घेऊन ते स्त्रियांना घालण्यात आले व त्यांना त्यांच्या भावना विचारण्यात आल्या. आश्चर्याची बाब तर अशी की भीतीदायक व्हिडिओ दाखवले, त्या पुरुषांचे टी-शर्ट ज्या स्त्रियांना घालण्यात आले, त्या स्त्रियांनी त्यांची भावना देखील भीतीदायक सांगितली, यावरून अभ्यासकांच्या असे लक्षात आले की, आपल्या मेंदूला Chemo signals केवळ चेहऱ्यावरील हावभाव पाहून किंवा बोलण्यातून समजत नाही, तर सोबतच वासावरून देखील समजतात.

केवळ भीती व आनंदाचे chemo signals नव्हे, तर सर्व प्रकारच्या भावनांचे सिग्नल्स आपल्याला अशा प्रकारे समजू शकतात, हे त्या प्रयोगातून सिद्ध झाले होते. म्हणजे दर वेळेस कपडे बदलण्याची आवश्यकता नाही, तर घाम आणि अश्रू ह्यावरून देखील भावनांची माहिती मिळू शकते.

Chemo signals आपल्याला कशा प्रकारे जाणवतात, हे तर शास्त्रज्ञानी शोधून काढले, परंतु हे सिग्नल कसे व किती वेळ मेंदू सोबत कार्यरत असतात, याची माहिती अद्याप अभ्यासकांना ज्ञात नाही.


सकारात्मक Vibes चे महत्त्व

आजचेे हे धावपळीचे जीवन, ज्यात प्रत्येक व्यक्ती तणावात जगत आहे. या तणावामुळे लोकांची विचारधारा नकारात्मक आणि हिंसक होऊ लागली आहे. संपूर्ण दिवसभरात एकही घटना वाईट घडली की, लोक संपूर्ण दिवस नकारात्मकतेत घालवता, त्यामुळे केवळ आपले शारीरिक स्वास्थ्य केवळ कमकुवत होत नाही तर, सोबतच मानसिक संतुलन बिघडण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे आपल्या अवतीभवती सकारात्मक Vibes चे वास्थव्य असणे फार महत्वाचे आहे. सकारात्मक Vibes केवळ तणाव दूर करत नाहीत, तर व्यक्तीला आनंदी आणि अधिक Creative देखील बनवतात.


स्वतःभोवती पॉझिटिव Vibes वाढवण्याचे उपाय –

जसे की आपण जाणले, Positive Vibes आपल्यासाठी किती महत्वाचे असतात. या पॉझिटिव Vibes चे वास्तव्य आपल्या अवती भोवती सतत असावा, यासाठी आपण खालील प्रमाणे काही उपाय पाहणार आहोत,

1. आपण जी ऊर्जा अथवा स्पंदने उत्सर्जित करत असतो, या ऊर्जेचे निरीक्षण करणे फार गरजेचे आहे. कारण आपल्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जेचा घेरा हा सकारात्मक उर्जेच्या घेऱ्यापेक्षा जास्त असतो, त्यातून योग्य Energy आत्मसात करणे, थोडे आव्हानात्मक असते त्यामुळे उर्जेवर निरीक्षण असणे गरजेचे आहे.

2. विचार करण्याची दिशा बदलली पाहिजे, कारण लोकांची विचारधारा ही नकारात्मक झाली आहे. जर त्यांच्यासोबत नऊ सकारात्मक आणि एक नकारात्मक गोष्ट घडली, तरी लोक नकारात्मक गोष्टीचा विचार अधिक करतात, हीच विचार करण्याची पद्धत बदलता आली पाहिजे.

3. जीवनात घडलेल्या आनंदी क्षणाचा किंवा मजेदार किस्से यांचा संग्रह तुमच्या आठवणीत ठेवा व त्यांचे स्मरण करत रहा.

4. सतत चेहऱ्यावर नाजूक असे हास्य ठेवा, हास्य एक असा घटक आहे, जो स्वतः बरोबरच समोरील व्यक्तीला देखील त्याचे दुःख विसरण्यास प्रवृत्त करतो, ज्यामुळे सकारात्मक Vibes आपल्या अवतीभवती निर्माण होतात.

5. सद्भावनेने वागा कोणाचीही ईर्षा करू नका, यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमच्यासोबत इतरांनाही Positive Vibes मिळतील.

Leave a Comment