नाटक ही संकल्पना अगदी लहानपणापासूनच आपल्या परिचयाची आहे. नाटक म्हटले की विविध प्रकारची वेशभूषा, आकर्षक संवाद, मनोरंजक किस्से या गोष्टी आपल्या मनात घर करतात.

नाटक पाहणे जितके मनोरंजक वाटते, नाटक निर्मिती मागचा प्रवास तितकाच कठीण असतो. नाटक निर्मिती दरम्यान असंख्य गोष्टींची काळजी घेतली जाते, तसेच प्रेक्षकांना अधिकाधिक आकर्षित कसे करता येईल, यासाठी मशागत करावी लागते.

या लेखात आपण नाटक या विषयावर अगदी सविस्तर माहितीचा आढावा घेणार आहोत,


नाटक म्हणजे काय ?

नाटक हा एक वाङ्मय प्रकार आहे, जो दृश्य स्वरूपात अनुभव देत असतो. नाटकात निवेदन वगळता संवाद, अभिनय आणि अभिनयाद्वारे साकार होणाऱ्या घटना असतात. नाटक मुळात एक साक्षात गोचर अनुभव देणारा असतो.

जी व्यक्ती नाटकाचे सादरीकरण करते, तिला नट असे म्हटले जाते. नट हा शब्द प्राकृत भाषेतील आहे. नर्त हा या शब्दाचा तो अपभ्रंश आहे. नर्तक म्हणजे नाचणारी व्यक्ति.

संविधानकता, प्रकाशयोजना, संगीत, पात्रांचा हस्तक्षेप, संवाद, वातावरण निर्मिती सर्व घटक नाटक निर्मितीसाठी महत्वपूर्ण ठरतात.

इंग्रजीत नाटकाला “ड्रामा (DRAMA)” असे म्हटले जाते. ड्रामा या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती “Dran” या ग्रीक शब्दापासून झाल्याचे सांगितले जाते. “Dran” या ग्रीक शब्दाचा मराठी अर्थ कृती असा होतो.

नाटकाचा प्रयोग एकाच वेळी अनेक लोक पाहत असतात, ज्यांना “प्रेक्षक” असे म्हणतात. प्रेक्षक वर्गात विविध वयोगटातील रसिक असतात. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांचा देखील या वर्गात समावेश होतो. प्रेक्षक वर्गाला आकर्षित करण्यासाठी नाटकात मनोरंजक किस्से सामील केले जातात.

अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, नाटक म्हणजे शब्दांपासून तयार होणारी संहिता आणि या संहितेचे सादरीकरण म्हणजे नाटक होय. हे सादरीकरण नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय, इत्यादी घटकांच्या मदतीने करता येते. पण या सर्व घटकांची सुप्त शक्ती शब्दांनी तयार झालेल्या संहितेत असावी लागते.


नाटकाचे प्रकार

शोकात्मिकासुखात्मिकाक्षोभप्रधान नाट्य आणि प्रहसन नाट्य हे नाटकाचे चार मुख्य प्रकार मानले जातात. या सर्व नाट्य प्रकारांचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

शोकात्मिका – ज्या नाट्य प्रकारात शोक किंवा दुःख प्रधान असेल, अशा नाट्य प्रकाराला शोकात्मिका नाट्य अथवा शोकनाट्य असे म्हणतात.

सुखात्मिका – ज्या नाट्य प्रकारात आनंद दर्शविला जातो, त्याला सुखात्मिक नाट्य असे म्हटले जाते.

क्षोभप्रधान नाट्य – ज्या नाटकात सुख आणि दुःख अशा दोन्ही भावना दर्शविल्या जातात, त्या नाट्य प्रकाराला क्षोभप्रधान नाट्य असे म्हणतात.

प्रहसन – मनोरंजक अथवा विनोदी नाट्य प्रकाराला प्रहसन नाट्य प्रकार असे म्हटले जाते.


मराठी नाटकांची पार्श्वभूमी

आधुनिक मराठी नाटकांची सुरुवात विष्णुदास भावे यांच्यापासून झाल्याचे सांगितले जात, परंतु आजही यावर ठाम असे विधान नाही.

विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली येथे पटवर्धन दरबारात “संगीत स्वयंवर” या नाटकाचा खेळ सादर केला होता. खेळ म्हणजे मुळात कोकण आणि कर्नाटकात प्रसिद्ध “दशावतारी” आणि “यक्षगान” या खेळांचे संस्कारित रूप होय.

आधुनिक मराठी नाटकाचा विकास इंग्रजी नाटकाच्या अनुकरणातून झाला असल्याची मान्यता आहे.

या व्यक्तिरिक्त तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयात सुमारे ३५ नाट्य संहिता उपलब्ध आहेत. या संहितांचा कालखंड सुमारे १६८२ ते १८३३ या कालावधी दरम्यानचा आहे.

३५ नाट्यसंहितांपैकी “लक्ष्मी नारायण कल्याण” नाट्यसंहिता आजही मुद्रित स्वरूपात आहेत. हे नाटक नृत्य प्रधान आहे. भारदस्त भाषा, वेधक संवाद आणि कल्पनारम्य कथानक हे “लक्ष्मी नारायण कल्याण” या नाटकाचे वैशिष्ठ्य आहे.

महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या लोककलांपैकी “तमाशा” हा मराठी नाटकाच्या स्वरूपाशी बरेच साम्य असलेला लोककला प्रकार आहे. “तमाशा” या लोककला प्रकाराला जवळजवळ ५०० ते ७०० वर्षांचा इतिहास आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, परंतु अद्यापही याचे पुरावे काही आढळून आले नाहीत.


नाटकाची रचना

विषयसूत्रसंविधानकपात्रचित्रणसंवादरंगसूचना आणि वातावरण निर्मिती हे नाटकाचे प्रमुख घटक आहेत. सादरीकरणाची सर्व सुप्त शक्ती या सहा घटकांमध्ये दडलेली आहे. या सहा घटकांचा थोडक्यात आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहात,

1. विषयसूत्र

विषयसूत्र या शब्दासाठी मध्यवर्ती सूत्र हा पर्यायी शब्द वापरला जातो. विषयसूत्र म्हणजेच मध्यवर्ती संघर्ष होय. संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, नाट्य लेखकाला एखादा विषय ज्या हेतूने मांडायचा असतो, तो हेतू म्हणजे विषयसूत्र होय.

2. संविधानक

कथानकातील सुसंगत मांडणी म्हणजेच संविधानक होय. नाटकातील संविधानक हे नाटकातील पात्रांचे बोलणे, वागणे, वेशभूषा यातून दिसून येते. थोडक्यात सांगायचे झाले तर, नाटकातील सुसूत्रता म्हणजेच संविधानक होय, असे आपण म्हणू शकतो.

3. पात्रचित्रण

नाटक पौराणिक असो किंवा ऐतिहासिक, नाटकातून वर्तमानातल्या मानवी जीवनाचे दर्शन घडविण्याचा जितका प्रयत्न केला जातो, तितके पात्रचित्रणाला महत्व प्राप्त होते. “सौभद्र” आणि “शारदा” या दोन नाटकांमुळे १९८० पासून मराठी नाटकात पात्रचित्रणाला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे.

4. संवाद

संवाद हे नाटकाचे शरीर असते, त्यामुळे कोणत्याही नाटकातील संवाद अचूक असल्याशिवाय नाटकाला पूर्ण स्वरूप प्राप्त होत नाही. या व्यतिरिक्त प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी देखील संवादच कारणीभूत ठरतो.


रंगसूचना व वातावरण निर्मिती

रंगसूचना व वातावरण निर्मिती हे दोन्ही संहितानिष्ठ घटक लेखक आणि दिग्दर्शक यांना जोडणारे दुवे आहेत. या दोन घटकांमुळे नाट्य संकेत निर्माण होतात. रंगसूचना आणि वातावरण निर्मिती, यामुळे नाटकात प्राण फुकले जातात.


नाटकाच्या कथानकाला सहाय्यभूत ठरेल अशी रंगमंचावरील वातावरण निर्मिती म्हणजे काय ?

वातावरण निर्मिती हा संहितानिष्ठ घटक लेखक आणि दिग्दर्शक यांना जोडणारी दुवा आहे. वातावरण निर्मिती म्हणजे नाटकादरम्यान केल्या जाणाऱ्या काही अशा कृती, ज्यामुळे समोरील नाटक नसून खरोखर घटना घडत आहे, असा आभास प्रेक्षकाला होतो.

नाटकादरम्यान वातावरण निर्मिती करण्यासाठी अनेक घटकांचा आधार घ्यावा लागतो, जसे कि रंगसूचना, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि अधिक. अनेकदा नाटकात क्षणभराची शांतता, ही सुद्धा वातावरण निर्मितीसाठी अत्यंत पोषक ठरू शकते.


FAQ

1. पहिले स्वतंत्र मराठी नाटक कोणते ?

उत्तर : “थोरले माधवराव पेशवे” हे मराठीतले पहिले नाटक आहे, जे विनायक जनार्दन कीर्तने यांनी साल १८६१ मध्ये लिहिले होते.

2. आधुनिक मराठी नाटकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

उत्तर : “विष्णुदास भावे” यांना आधुनिक मराठी नाटकाचे जनक म्हणून ओळखले जाते.

3. “नटसम्राट” या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण ?

उत्तर : “विष्णू वामन शिरवाडकर” उर्फ “कुसुमाग्रज” हे नटसम्राट नाटकाचे लेखक आहेत.

4. पहिले मराठी भाषांतरित नाटक कोणते ?

उत्तर : “प्रबोधचंद्रोदय” हे पहिले भाषांतरित मराठी नाटक होते, जे साल १८५१ मध्ये संस्कृत भाषेतून मराठी परावर्तित करण्यात आले होते.

Leave a Comment