USA चा फुल फॉर्म काय ? | USA Full Form in Marathi

USA उत्तर अमेरिकेत स्थित एक देश आहे, ज्यामध्ये ५० राज्य, एक संघराज्य जिल्हा, पाच असंघटित प्रदेश आणि ९ लहान बेटांचा समावेश होतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून USA हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. न्यूयॉर्क  देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.

USA मध्ये तीन स्वतंत्र सरकारी शाखा आहेत, ज्यामध्ये दोन सदनीय विधानमंडळ आहेत, जे जागतिक बँक, आंतराष्ट्रीय नाणेनिधी, यांसारख्या इतर आंतराष्ट्रीय स्तरावरील संस्थेचे सदस्य आहेत. या व्यतिरिक्त देश उच्च शिक्षण, उच्च जीवन दर्जा आणि मानवी हक्क या घटकांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.

usa full form in marathi

USA ची गणना जगातील विकसित देशांमध्ये केली जाते. देश जगातील सर्वात मोठा वस्तूंचा आयातदार आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. महासत्ता अशी USA ची जगात ख्याती आहे.


USA Full Form in Marathi

U – United
S – States Of
A – America

USA चा फुल फॉर्म “United Stages Of America” असा असून याचा मराठी अर्थ “संयुक्त राष्ट्र अमेरिका” असा होतो.


अर्थव्यवस्था

संयुक्त राष्ट्र अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली जाते. २०२१ मध्ये देशाची GDP २३,००० अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती, जी जगात सर्वाधिक मानली जाते. या व्यतिरिक्त अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत दरडोई उत्पन्नाचे स्रोत देखील अधिक आहेत.

स्थिर GDP वाढीचा दर, कमी बेरोजगारी, उच्च स्तरीय संशोधन आणि भांडवल गुंतवणूक हे देशाच्या GDP चे वैशिष्ठय आहे. बचत दर कमी असल्यामुळे देशात राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय गुंतवणूकदरांची संख्या अधिक आहे. अमेरिका हा एक असा देश आहे, ज्याच्या GDP मध्ये इतर देशांचा देखील सहभाग आहे.

अमेरिकेतील बांधकाम क्षेत्र हे जगातील दुसरे सर्वात मोठे बांधकाम क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अमेरिकेचे एक वैशिष्ठ्य असे की कमी लोकसंख्या असून देखील, या देशाचा जगाच्या GDP मध्ये एकूण एक चतुर्थांश इतका सहभाग आहे.

अमेरिकेव्दारे अधिक खर्च हा देशाच्या लष्करी विभागावर केला जातो, यामुळे अमेरिका लष्करी कामावर सर्वाधिक खर्च करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.

अमेरिकेचे चलन म्हणजेच अमेरिकी डॉलर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मौल्यवान चलन आहे. या व्यतिरिक्त जगात ज्याही मोठमोठ्या कंपन्या अथवा उद्योगपती आहेत, त्यामध्ये अधिकतर अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. देशाच्या करातील (Tax) अधिकतर हिस्सा याच मोठ्या उद्योगांद्वारे दिला जातो.


क्षेत्रफळ

संयुक्त राष्ट्र अमेरिका हा क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या अनुषंगाने जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. अमेरिकेचे एकूण क्षेत्रफळ ९.८३४ दशलक्ष किलोमीटर वर्ग इतके आहे. अमेरिकेच्या पूर्वेस अटलांटिक महासागर तर पश्चिमेस प्रशांत महासागराचे वास्तव्य आहे.

देशाच्या उत्तरेकडील सीमेवर कॅनडा आणि दक्षिणेकडील सीमेवर मेक्सिको आहे. या देशात ५० राज्यांव्यतिरिक्त एका जिल्ह्याचा देखील समावेश होतो. ज्याचे नाव कोलंबिया आहे.

युरोप संघाच्या तुलनेत अमेरिकेच्या पश्चिमेस दुप्पट आकाराच्या पर्वत रांगा आणि मध्यवर्ती मैदाने आहेत. डेथ वॅली हा देशातील सर्वात कमी उंचीचा भाग आहे, ज्याची उंची -२८२ फूट इतकी आहे. या व्यतिरिक्त डेनाली हे अमेरिकेतील सर्वात उंच शिखर आहे.


राज्य

अमेरिका हा देश ५० विविध राज्यांचा एक संघ आहे, याला संघ राज्य देखील म्हटले जाते. अमेरिकेतील ५० विविध राज्य कोणते व ते किती क्षेत्रफळात विस्तारले आहेत, याचा आढावा आपण खालील तख्त्याद्वारे घेणार आहोत,

राज्य क्षेत्रफळ
अल्बामा १,३५,७६७ km2
अलास्का १७,२३,३३७ km2
ऍरिझोना २,९५,२३४ km2
अर्कान्सास १,३७,७३२ km2
कॅलिफोर्निया ४,२३,९६७ km2
कोलोरॅडो २,६९,६०१ km2
कनेक्टिकट १४, ३५७ km2
डेलवेअर ६,४४६ km2
फ्लोरिडा १,७०,३१२ km2
जॉर्जिया १,५३,९१० km2
हवाई २८,३१३ km2
लदाहो २,१६,४४३ km2
लिनॉइस १,४९,९९५ km2
इंडियाना ९४,३२६ km2
लोवा १,४५,७४६ km2
कॅन्सस २,१३,१०० km2
केंटकी १,०४,६५६ km2
लौईसियाना १,३५,६५९ km2
माईन ९१,६३३ km2
मेरीलँड ३२,१३१ km2
मॅसाच्युसेट्स २७,३३६ km2
मिचिगन २,५०,४८७ km2
मिनेसोटा २,२५,१६३ km2
मिसिसिपी १,२५,४३८ km2
मिस्सौरी १,८०,५४० km2
मोंटाना ३,८०,८३१ km2
नेब्रास्का २,००,३३० km2
नेवाडा २,८६,३८० km2
न्यू हॅम्पशिर २४,२१४ km2
न्यू जर्सी २२,५९१ km2
न्यू मॅक्सिको ३,१४,९१७ km2
न्यू यॉर्क १,४१,२९७ km2
उत्तर कॅरोलिना १,३९,३९१ km2
उत्तर डकोटा १,८३,१०८ km2
ओहिओ १,१६,०९८ km2
ओक्लाहोमा १,८१,०३७ km2
ओरेगॉन २,५४,७९९ km2
पेन्सिल्वेनिया १,१९,२८० km2
ऱ्होड आइसलँड ४,००१ km2
दक्षिण कॅरोलिना ८२,९३३ km2
दक्षिण डकोटा १,९९,७२९ km2
टेनेसी १,०९,१५३ km2
टेक्सास ६,९५,६६२ km2
अल्टा २,१९,८८२ km2
वेरमॉण्ट २४,९०६ km2
विर्जिनिया १,१०,७८७ km2
वॉशिंग्टन १,८४,६६१ km2
पश्चिम विर्जिनिया ६२,७५६ km2
विस्कॉन्सिन १,६९,६३५ km2
वायोमिंग २,५३,३३५ km2

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तथ्य (Facts)

 • क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून अमेरिका हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.
 • ऑलम्पिक मध्ये सर्वाधिक पदके (Medal) प्राप्त करणाऱ्या अमेरिकी खेळाडूंची संख्या इतर देशातील खेळाडूंच्या तुलनेत अधिक आहे.
 • अमेरिका हा पृथ्वीवरील असा एकमेव देश आहे, जेथे ५ विविध प्रकारचे हवामान आढळते.
 • अमेरिका जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे, जेथे आंतराष्ट्रीय पर्यटक सर्वाधिक भेट देतात.
 • अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर जगतील सर्वात मोठे गोडे पाण्याचे तलाव आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ ८२,१०२ स्क्वेर किलोमीटर इतके आहे.
 • चंद्राच्या पृष्ठभागावर चालणार पहिला व्यक्ती हा अमेरिकी नागरिक होता.
 • अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या कार्यालयाची इमारत ही जगातील सर्वात मोठी इमारत मानली जाते, ज्याचे नाव पेंटागॉन असे आहे.
 • अमेरिकेची सिनेसृष्टी ज्याला “हॉलिवूड” असे म्हटले जाते, ही जगातील सर्वात मोठी सिनेसृष्टी मानली जाते.
 • अमेरिकेत पिज्जा हे खाद्य पदार्थ सर्वाधिक प्रमाणात खाल्ले जाते.
 • एका जागतिक रिपोर्टनुसार अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात संशोधन झाले आहे, उदा. बल्ब, संगणक, मोबाईल आणि अधिक.
 • अमेरिकेतील एकूण लोकसंख्या ही जागतिक लोकसंख्येच्या एकूण ५% टक्के पेक्षा कमी आहे.
 • गेल्या दहा वर्षांमध्ये अमेरिका हा जगातील सर्वात मोठा पेट्रोलियम उत्पादक देश ठरला आहे.
 • अमेरिकेचा वर्तमानकालीन देशाचा ध्वज हा एक शालेय विद्यार्थ्याने तयार केला होता.
 • अमेरिकेतील ५०% टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ही देशातील ९ राज्यांमध्ये वास्तव्य करते.
 • अमेरीका हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वन क्षेत्र असलेला देश आहे, जेथील एकूण वनक्षेत्र हे ३.१ दशलक्ष स्क्वेर मैल इतके आहे.
 • अमेरिकेतील एकूण लोकसंख्येपैकी ९०% लोकसंख्या ही इंटरनेटचा उपयोग जाणते.
 • जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी अमेरिकेत आहे, ज्याचे नाव “Rio Grande” असे आहे.
 • अमेरिकेची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

FAQ

1. अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती कोण ?

उत्तर : जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते, ज्यांचा कार्यकाळ १७८९ ते १७९७ इतका होता.

2. अमेरिकेला कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले ?

उत्तर : २ जुलै १७७६ साली अमेरिका हा स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात आले.

3. अमेरिकेची राजधानी कोणती ?

उत्तर : वॉशिंग्टन डी. सी. ही अमेरिकेची राजधानी आहे.

4. अमेरिका देशात एकूण किती राज्यांचा समावेश होतो ?

उत्तर : अमेरिकेत एकूण ५० राज्यांचा समावेश आहे.

5. अमेरिकेतील प्रमुख शहरे कोणती ?

उत्तर : न्यू यॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन डी. सी. आणि चिकॅगो ही अमेरिकेतील चार प्रमुख शहरे आहे.

6. अमेरिकेची एकूण लोकसंख्या किती ?

उत्तर : अमेरिकेची एकूण लोकसंख्या एकूण ३३२,९१५,०७३ इतकी आहे.

7. अमेरिकेचा शोध कोणी लावला ?

उत्तर : अमेरिकेच्या शोधाचे श्रेय हे ख्रिस्तोफर कोलंबस यांना दिले जाते, ज्यांनी साल १४९२ मध्ये अमेरिकेचा शोध लावला होता.

8. अमेरिकेत कोणते चलन वापरले जाते ?

उत्तर : “USD” अमेरिकी डॉलर “$” हे अमेरिकेचे चलन आहे. वर्तमान काळात एका अमेरिकी डॉलरची किंमत ७५ भारतीय रुपये इतकी आहे.

9. अमेरिकेचे वर्तमानकालीन राष्ट्रपती कोण ?

उत्तर : जो बायडेन हे अमेरिकेचे वर्तमानकालीन राष्ट्रपती आहे.

10. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

उत्तर : बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे.

अधिक लेख –

1. जगातील सर्वात श्रीमंत देश

2. जगातील सर्वात लहान देश कोणता ?

3. जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे ?

4. जगात किती देश आहेत आणि कोणते ?

Leave a Comment