URL म्हणजे काय व ते कसे कार्य करते ?

URL हा इंटरनेट च्या जगातील एक महत्वाचा घटक आहे. URL ला लिंक म्हणून देखील संबोधले जाते. बऱ्याच इंटरनेट वापरकर्त्यांना URL या संकल्पने संबधी काहीच कल्पना नाही, किंवा त्याबद्दल ऐकून तर आहेत परंतु माहिती नाही. म्हणून या लेखात आपण URL संबंधित विविध माहितीचा आढावा अगदी सोप्या शब्दांत घेणार आहोत,


URL म्हणजे काय ?

URL म्हणजे वर्ल्ड वाईड वेब (WWW) वर उपलब्ध संसाधनांचा पत्ता होय. URL इंटरनेटवरील संसाधनांना दर्शविण्याचे कार्य करते. इंटरनेटवरील कोणत्याही Text, Photo आणि Video स्वरूपी संसाधनांना हाताळण्यासाठी आपल्याला त्या संसाधनाचा पत्ता म्हणजेच URL माहित असणे गरजेचे असते. URL हाताळण्यासाठी विविध प्रकारचे Protocols म्हणजेच नियम संच तयार करण्यात आले आहेत.

जर आपल्याला मराठी वर्ड या वेबसाईटला भेट द्यायची असेल, तर आपण वेब ब्राऊसर वर Www.MarathiWord.Com हा URL टाईप करतो, त्यानंतर आपल्याला वेबसाईटवर Redirect केले जाते. URL हे युजरला ऑनलाईन रित्या ठराविक संसाधनांवर पोहोचविण्याचे कार्य करतात असे आपण म्हणू शकतो.

जेव्हा आपण Google, Bing अथवा इतर कोणत्याही सर्च इंजिन साईटवर एखादी क्वेरी सर्च करतो, तेव्हा आपल्याला एकापेक्षा अधिक वेबसाईटसचे URL दिसून येतात, हे URL विविध वेबसाईटमधील विविध वेब पेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी हायपरलिंक (Hyperlinks) असतात.


URL Full Form In Marathi

U – Uniform
R – Resource
L – Locator
 
URL चा इंग्रजीतील फुल फॉर्म “Uniform Resource Locator” असा असून, याचा मराठी अर्थ “एकसमान संसाधन शोधक” असा होतो.

URL चे भाग

एक URL हा विविध भागांमध्ये विभागला गेला असतो. हे भाग नेमके कोणते याबद्दल माहिती आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

प्रोटोकॉल – http (Hyper text transfer protocol), https (Hyper text transfer protocol secure) हे काही प्रोटोकॉलस आहेत, ज्यांचा उपयोग URL द्वारे संसाधनांना हाताळण्यासाठी केला जातो. प्रोटोकॉल म्हणजे काही ठराविक नियमांचा संच असतो, जो इंटरनेटवरील संसाधन विशेष प्रक्रियेनुसार हाताळण्यासाठी तयार केला गेला असतो.

WWW – www म्हणजे वर्ड वाईड वेब होय. Www हे इंटरनेटवरील सर्व संसाधनांना एकमेकांसोबत जोडण्याचे कार्य पार पाडते, त्यामुळेच Domain Name ची सुरुवात ही Www पासूनच केली जाते.

डोमेन नेम – डोमेन नेम हा URL मधील एक महत्वपूर्ण भाग असतो. डोमेन नेमवरूनच एखाद्या URL ला एक वेगळेपणा प्राप्त होतो. डोमेन नेम म्हणजे एखाद्या वेबसाईट चे नाव होय, उदा. MarathiWord.com. URL मधील डोमेन नेम हे DNS (Domain Name Server) सोबत जोडलेले असते.

पोर्ट – पोर्टचा उपयोग URL द्वारे ठराविक सर्वर सोबत जोडण्याच्या प्रक्रियेला दर्शविण्यासाठी केला जातो. पोर्ट हे URL मध्ये दृश्यमान नसतात, परंतु तरीही ते URL मधील एक महत्त्वाचा भाग असतात. URL मधील HTTP आणि HTTPS द्वारे ८० आणि ४४३ या पोर्टचा उपयोग केला जातो.

पाथ – पाथ म्हणजे URL ची एक अशी रचना जी आपल्याला ठराविक वेबपेज पर्यंत पोहोचवते.


संरचना

http or https://www.DomainName.com/Path हे URL चे एक सर्वसाधारण रूप आहे. कोणत्याही URL मध्ये HTTP किंवा HTTPS या प्रोटोकॉलचा उपयोग केला जातो, हे प्रोटोकॉलस URL द्वारे वेबपेजमध्ये ऍक्सेस मिळविण्यासाठी गरजेचे असतात.

HTTPS हे HTTP चे एक Advance Version आहे, असे आपण म्हणून शकतो, जे HTTP पेक्षा अधिक सुरक्षित आणि वेगवान मानले जाते.

प्रोटोकॉल नंतर URL मध्ये Www चा उपयोग केला जातो. Www म्हणजे वर्ड वाईड वेब होय. Www द्वारे आपण इंटरनेटवरील कोणतेही URL हाताळण्यास सक्षम होतो. Www ला w3 किंवा web असे देखील म्हटले जाते.

Www नंतर URL मध्ये Domain Name म्हणजेच वेबसाईटच्या नावाचा उल्लेख केला जातो. Domain Name मुळेच URL ला एक गंतव्यस्थान (Destination) मिळते. वर्ल्ड वाईड वेबवरील नेमक्या कोणत्या वेबपेजचा युजरला आढावा घ्यायचा आहे, हे डोमेन नेममुळेच लक्षात येते. डोमेन नेम हे साधारणतः DNS सोबत कनेक्ट असतात. हे DNS सर्वर ठराविक IP Address द्वारे डोमेनची ओळख पटवतात.

डोमेन नेम नंतर URL मध्ये वेब पेजची पाथ असते, ज्याच्या आधारे युजर हा ठराविक वेब पेज वर लँड होतो.

या व्यतिरिक्त अनेकदा आपल्याला URL मध्ये तारीख, महिना अथवा वर्ष लिहिलेले दिसून येते, जे त्या ठराविक वेब पेज च्या निर्मितीचा कालावधी दर्शवत असतात.


इतिहास

साल १९९४ मध्ये संगणक शास्त्रज्ञ टीम बर्नर्स-ली यांनी URL चा शोध लावला होता. टीम बर्नर्स-ली यांना www (World Wide Web) चे संशोधक म्हणून देखील ओळखले जाते. जेव्हा बर्नर्स-ली हे IETF (Internet Engineering Task Force) मध्ये कार्यरत होते, तेव्हा त्यांनी ही कामगिरी बजावली होती.

बर्नर्स-ली यांनी प्रथम html चा उपयोग करून वर्ल्ड वाइड वेब वर वेब पेज तयार केले. html ही एक प्रोग्रामिंग भाषा आहे, ज्याच्या निर्मितीचे श्रेय देखील बर्नर्स-ली यांना दिले जाते. हे वेब पेजेस बर्नर्स-ली यांनी हायपरलिंकच्या सहाय्याने एकमेकांसोबत जोडले.

http://info.CERN.ch हा बर्नर्स-ली यांच्याद्वारे तयार केलेला जगातील पहिला URL आहे, जो आजही अस्तित्वात आहे.


URL कसे कार्य करते ?

URL ची संरचना ही काही अशा प्रकारे आहे, जी युजर ला अगदी सहज रित्या लक्षात राहते, परंतु संगणक प्रणालीची URL लक्षात ठेवण्याची आणि ती हाताळण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. संगणक प्रणाली एखाद्या वेब पेजला अथवा वेबसाईटला ओळखण्यासाठी IP Address चा आधार घेते.

IP म्हणजेच Internet Protocol होय. IP ऍड्रेस हा मुळात एक अंकांचा संच असतो, जो काहीसा 12.123.244.11 या स्वरूपात असतो.

संगणक प्रणाली बायनरी भाषा समजते, ज्यामुळे संगणक प्रणालीला URL संबधित माहिती मिळावी याकरिता Internet Protocol ची सहाय्यता घेतली जाते.

URL मधील जो महत्वाचा भाग म्हणजेच डोमेन नेम असतो तो Domain Name Server सोबत कनेक्ट असतो. जेव्हा युजर वेब ब्राऊसारद्वारे एखाद्या URL अथवा डोमेन बद्दल सर्च करतो, तेव्हा प्रथम DNS द्वारे युजर ने टाईप केलेला URL हे IP ऍड्रेस मध्ये Convert केला जातो व नंतर युजरला परिणाम दर्शविला जातो.


महत्त्व

युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर (URL) हा एक वेब पत्ता आहे जो इंटरनेटवरील संसाधनाचे स्थान निर्दिष्ट करण्यासाठी वापरला जातो. आम्ही वेबवर माहिती कशी ऍक्सेस आणि शेअर करतो यात URL महत्त्वाची भूमिका बजावतात. URL महत्वाच्या का आहेत याची काही प्रमुख कारणे येथे आहेत:

1. वेब संसाधनांमध्ये प्रवेश

वेबसाइट, वेब पृष्ठे, दस्तऐवज, प्रतिमा, व्हिडिओ आणि इतर ऑनलाइन संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी URL आवश्यक आहेत. ते इंटरनेटच्या विशाल विस्तारातून विशिष्ट सामग्री शोधण्याचा आणि पुनर्प्राप्त करण्याचा एक प्रमाणित मार्ग प्रदान करतात.

2. नेव्हिगेशन आणि लिंकिंग

URL वापरकर्त्यांना भिन्न वेब पृष्ठे आणि वेबसाइट दरम्यान नेव्हिगेट करण्यास सक्षम करतात. वेब सामग्रीमधील हायपरलिंक्समध्ये URL असतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना या लिंक्सवर क्लिक करून एका पृष्‍ठावरून दुसर्‍या पृष्‍ठावर सहज जाता येते.

3. माहिती शेअर करणे

URL मुळे इंटरनेटवर सामग्री शेअर करणे शक्य होते. URL सामायिक करून, तुम्ही इतरांना विशिष्ट वेबपृष्ठ, दस्तऐवज किंवा संसाधनाकडे निर्देशित करू शकता, सुलभ संप्रेषण आणि सहयोग सुलभ करते.

4. स्त्रोत उद्धृत करणे

शैक्षणिक, व्यावसायिक आणि पत्रकारितेच्या कामातील स्रोत उद्धृत करण्यासाठी URL महत्त्वाच्या आहेत. उद्धरणामध्ये स्त्रोताची URL समाविष्ट केल्याने वाचकांना माहिती सत्यापित करण्याची आणि मूळ सामग्रीमध्ये प्रवेश करण्याची अनुमती मिळते.

5. बुकमार्क आणि आवडी

URL वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या वेबसाइट किंवा वेब पृष्ठे त्यांच्या ब्राउझरच्या बुकमार्क्स किंवा आवडींमध्ये जतन करण्यास सक्षम करतात. यामुळे संपूर्ण वेब पत्ता लक्षात न ठेवता विशिष्ट वेबसाइट्सना पुन्हा भेट देणे सोयीचे होते.

6. ऑनलाइन विपणन आणि ब्रँडिंग

ऑनलाइन मार्केटिंग आणि ब्रँडिंगमध्ये URL महत्त्वाची भूमिका बजावतात. कंपन्या त्यांची ऑनलाइन उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी आणि ग्राहकांना शोधणे सोपे करण्यासाठी त्यांच्या वेबसाइटसाठी अर्थपूर्ण आणि संस्मरणीय URL निवडतात.

7. ई-कॉमर्स आणि ऑनलाइन व्यवहार

URL चा वापर ई-कॉमर्समध्ये ग्राहकांना उत्पादन पृष्ठे, शॉपिंग कार्ट आणि चेकआउट प्रक्रियेकडे निर्देशित करण्यासाठी केला जातो. ते सुनिश्चित करतात की ग्राहक सुरक्षितपणे प्रवेश करू शकतात आणि ऑनलाइन व्यवहार पूर्ण करू शकतात.

8. शोध इंजिन अनुक्रमणिका

वेब पृष्ठे अनुक्रमित करण्यासाठी आणि वर्गीकरण करण्यासाठी शोध इंजिन URL वापरतात. अचूकपणे संरचित URL वेब पृष्ठाच्या सामग्रीबद्दल मौल्यवान माहिती प्रदान करू शकते, शोध इंजिनांना रँक करण्यात आणि वापरकर्त्यांना संबंधित परिणाम प्रदर्शित करण्यात मदत करते.

9. सुरक्षा आणि प्रमाणीकरण

प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे वेबसाइट्सच्या सुरक्षित भागात प्रवेश करण्यासाठी URL चा वापर केला जाऊ शकतो. वेबसाइट्समध्ये सहसा लॉग इन करण्यासाठी, पासवर्ड रीसेट करण्यासाठी आणि खाजगी वापरकर्ता प्रोफाइलमध्ये प्रवेश करण्यासाठी अद्वितीय URL समाविष्ट असतात.

10. डेटा पुनर्प्राप्ती आणि API

वेब ऍप्लिकेशन्स आणि API (ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) मध्ये URL चा वापर सर्व्हरकडून डेटाची विनंती आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी केला जातो. API डेटाचा प्रकार आणि केल्या जाणार्‍या क्रिया निर्दिष्ट करण्यासाठी बर्‍याचदा URL वापरतात.

11. ट्रॅकिंग आणि विश्लेषण

URL मध्ये असे मापदंड असू शकतात जे वापरकर्ता परस्परसंवाद, संदर्भ आणि इतर विश्लेषण डेटा ट्रॅक करण्यात मदत करतात. वापरकर्ता वर्तन समजून घेण्यासाठी आणि वेबसाइट कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

12. स्थान-आधारित सेवा

URLs भौगोलिक निर्देशांक आणि स्थान माहिती समाविष्ट करू शकतात, वापरकर्त्यांना नकाशे, दिशानिर्देश आणि स्थान-आधारित सेवांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देतात.

सारांश, URL हे इंटरनेटचे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, जे आम्हाला ऑनलाइन संसाधनांमध्ये प्रवेश करण्यास, सामायिक करण्यास आणि संवाद साधण्यास सक्षम करतात. ते डिजिटल युगात नेव्हिगेशन, संप्रेषण, सहयोग आणि माहिती पुनर्प्राप्ती सुलभ करतात.


FAQ

1. URL म्हणजे काय ?

उत्तर : URL म्हणजे World Wide Web वरील संसाधनांचा पत्ता होय, जो युजरला World Wide Web वर उपलब्ध संसाधनांचा आढावा घेण्यास मदत करते.

2. URL चा शोध कोणी लावला ?

उत्तर : टीम बर्नर्स ली यांनी साल १९९४ मध्ये URL चा शोध लावला.

3. जगातील पहिले URL कोणते ?

उत्तर : http://info.CERN.ch हे जगातील पहिले URL आहे, जे टीम बर्नर्स ली यांनी तयार केले होते.

4. वेब ब्राऊसर मध्ये URL कोठे निदर्शनास येते ?

उत्तर : वेब ब्राऊसरमध्ये आपण URL चा आढावा “Address Bar” मधून घेऊ शकतो.

5. URL चे प्रकार किती व कोणते ? 

उत्तर : URL चे Absolute URL आणि Relative URL हे दोन मुख्य प्रकार मानले जातात.

6. URL मध्ये कोणत्या चिन्हांचा उपयोग करता येतो ?

उत्तर : URL मध्ये <Space> वगळता अंक आणि “!“, “$“, ““, “_“, “+“, ‘, “(“, “)” “,” या चिन्हांचा उपयोग केला जातो.

अधिक लेख –

1. एचटीटीपी म्हणजे काय ?

2. Www ची सुरुवात कधी झाली ?

3. वेबसाईट म्हणजे काय ?

4. सॉफ्टवेअर म्हणजे काय ?

Leave a Comment