UPI चा फुल फॉर्म काय ? | UPI Full Form in Marathi

भारत हा एक विकसनशील देश आहे. भारताला विकसित बनविण्यासाठी भारत सरकारद्वारे विविध उपाय योजनांची अमल बजावणी केली जात आहे. यातीलच एक योजना म्हणजे Digital India होय. या योजने अंतर्गत भारताला आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीला इंटरनेट आणि इंटरनेटद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवांसोबत एकरूप करण्याचे कार्य पार पाडले जात आहे. सरकार आपल्या सर्व योजना ऑनलाईन घेऊन जात आहे, ज्याने देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ घेता यावा आणि भ्रष्टचार देखील कमी व्हावा.

योजनांसोबतच सरकार कॅशलेस अर्थव्यवस्थेवर देखील जोर देत आहे, ज्यामुळे सरकार जनतेला अधिकाधिक ऑनलाईन पेमेंट करण्यास प्रोत्साहित करत आहे. कॅशलेस अर्थव्यवस्था ही संकल्पना देखील Digital India अंतर्गतच येते, यामुळे पैशांच्या देवाणघेवाणीत पारदर्शिकता राहेल, काळा पैसे कमी होईल आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेत आणखी सुधारणा होईल.

कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी भारत सरकारने अनेक ऑनलाईन पेमेंट प्रणाली प्रसारित केल्या आहेत. यातीलच एक पेमेंट प्रणाली म्हणजे UPI होय, ज्या संबंधित विविध माहितीचा आढावा आपण या लेखात घेणार  आहोत,


UPI म्हणजे काय ?

UPI ही मुळात एक तात्काळ पेमेंट प्रणाली आहे (Real-Time Payment System), ज्याची सुरुवात नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने (NPCI) केली. या प्रणालीचा उपयोग करून आपण तात्काळ स्वरूपात पैशांची देवाण-घेवाण अगदी सहज रित्या पार पाडू शकतो. UPI द्वारे आपण जेव्हा एखादे पेमेंट स्वीकारतो अथवा पाठवतो, तेव्हा पैसे तात्काळ स्वरूपात आपल्या बँक खात्यातून वजा होऊ, समोरील व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केले जातात.

UPI द्वारे आपण केवळ पैशांची देवाणघेवाणाच करू शकत नाही तर, तिकीट बुक करणे, रिचार्ज करणे, टॅक्सी भाडे भरणे अशी कामे देखील पार पाडू शकतो.संपूर्ण भारतात UPI द्वारे, जी काही पैशांची देवाण-घेवाण होते, त्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नियंत्रण असते.

वर्तमान काळात UPI ही सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी पेमेंट प्रणाली आहे. एक रिपोर्टनुसार २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत UPI द्वारे दरमाह ४५२ कोटी रुपये इतक्या मूल्याचे ट्रान्सक्शन होत आहे.

UPI वापरण्यास सोप्पे असल्यामुळे, UPI वापरकर्त्यांची संख्या देखील कालांतराने वाढताना दिसत आहे. आज न केवळ बँक, तर अनेक त्रितिय पक्ष (Third Party) पेमेंट प्रणाली देखील उपलब्ध आहेत, जे UPI द्वारे पैशांची देवाणघेवाण केल्यास युजर ला विविध बक्षिसे देतात, ज्यामुळे UPI ची लोकप्रियता वेगाने वाढत आहे.

वर्तमान काळात Google Pay, Phone Pe हे काही प्रसिद्ध पेमेंट अँप्स आहेत.


UPI Full Form in Marathi

U – Unified
P – Payments
I – Interface

Unified Payments Interface” हा UPI चा फुल फॉर्म असून, याचा मराठी अर्थ “एकत्रित पेमेंट अंतरफलक” असा होतो.


UPI चा वापर कसा करावा ?

UPI चा यशस्वी रित्या वापर करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्रथम एक अप्लिकेशन डाउनलोड करणे गरजेचे असते, येथे देखील आपल्याला दोन पर्याय उपलब्ध असतात, पहिला पर्याय म्हणजे बँकिंग अँप जे बँकेद्वारे आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात, आणि दुसरे म्हणजे त्रितिय पक्ष पेमेंट अँप (Third Party Payment App) जसे कि Google Pay, Phone Pe, Paytm आणि अधिक.

इथे बँकिंग अँपच्या तुलनेत त्रितिय पक्ष पेमेंट अँप हे अधिक युजर फ्रेंडली आणि सुलभ मानले जातात, ज्यामुळे अधिक तर लोक बँकिंग अँपच्या ऐवजी त्रितिय पक्ष पेमेंट अँपला प्राधान्य देताना दिसत आहे.

बँकिंग अँप इन्स्टॉल केल्यावर, बँकेद्वारे प्रदान केलेल्या “आयडी” आणि “पासवर्ड” चा उपयोग करून आपल्याला लॉगिन करायचे असते, लॉग इन केल्यावर आपण आपल्या बँक खात्यात प्रवेश मिळवतो, त्यानंतर आपण आपला UPI आयडी तयार करून UPI प्रणालीच आस्वाद घेऊ शकतो.

जर आपण त्रितिय पक्ष अँप इन्स्टॉल केले असेल तर, प्रथम आपल्याला आपल्या मोबाईल क्रमांकांनीशी Sign In करावे लागते. Sign In केल्यावर पेमेंट पर्यायात जाऊन बँक माहिती जमा करावी लागते, त्यानंतर UPI आयडी तयार करून, आपण UPI प्रणाली वापरू शकतो.


UPI द्वारे पैसे कसे पाठवावे ?

वापरकर्ता UPI वापर करून साधारणतः दोन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करू शकतो. upi द्वारे पैसे पाठविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन पद्धती कोणत्या या संबंधित सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. UPI id द्वारे पैसे पाठविणे

UPI प्रणालीद्वारे पैशांची देवाण-घेवाण पार पाडण्यासाठी प्रथम आपल्याला स्वतःची एक आयडी तयार करावी लागते, या आयडीला UPI I’D असे म्हटले जाते. ही आयडी म्हणजे UPI प्रणाली मधील आपली एक ओळख असते, असे आपण म्हणू शकतो.

“xxxxxxxxx@Bankname” ही UPI I’D ची एक सर्वसाधारण अशी रचना आहे. इथे “x” च्या ऐवजी आपले नाव अथवा आपला मोबाईल क्रमांक असू शकतो, व Bankname च्या जागी आपण ज्या बँकेनीशी आपण UPI आयडी तयार करत आहोत, त्या बँकेचे लघु स्वरूपात नाव असते, उदा. “marathiword१२३@sbi”

UPI I’D आपल्या बँक खात्यासोबत आणि मोबाईल क्रमांकासोबत लिंक असते, म्हणून जेव्हा आपण UPI द्वारे पैशांची देवाण-घेवाण करतो, तेव्हा आपल्या मोबाईल क्रमांकावर आपल्याला बँकेसंबधित संदेश प्राप्त होतात.

पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी आपल्याला आपली अथवा समोरील व्यक्तीची UPI I’D माहित असणे फार गरजेचे असते, त्याशिवाय पैशांची देवाण-घेणव पूर्ण होऊ शकत नाही, तसेच अनेकदा UPI I’D टाईप करताना, काही चुका आपल्याकडून होतात, ज्या लगेच लक्षात येत नाहीत, अशा वेळेस ट्रांसकशन कॅन्सल होते, अथवा पूर्णत्वास जात नाही, याची सूचना देखील पेमेंट अँपद्वारे आपल्याला दिली जाते.

2. बारकोड द्वारे पैसे पाठविणे

बारकोडचा उपयोग करून UPI पेमेंट करणे ही अगदी सुलभ अशी पद्धत आहे, जी सर्वाधिक प्रमाणात वापरली जाते. यामध्ये साधारणतः एक बारकोड असतो, जो समोरील व्यक्तीच्या अथवा आपल्या UPI I’D सोबत लिंक असतो.

वर्तमान काळात प्रत्येक पेमेंट अँप ने बारकोड स्कॅनिंगचा पर्याय आपल्या ग्राहकांच्या सोयीकरिता उपलब्ध करून दिला आहे. आपण बारकोड स्कॅन केल्यावर आपल्याला समोरील व्यक्तीची UPI I’D, नाव, त्याने सेट केलेला डीपी अथवा फोटो निदर्शनास येतो, सोबतच किती पैसे पाठवायचे आहे हा पर्याय देखील आपल्या समोर येतो, ज्याने आपण अगदी सहज पैशांची देवाण-घेवाण करू शकतो.

बारकोड पद्धतीचा वापर अधिकतर व्यवसायिकांद्वारे केला जातो, जसे कि डेरी, किराणा दुकान, मेडिकल आणि अधिक.


UPI चे वैशिष्ठ्य

1. बक्षिसे

वर्तमान काळात बाजारात अनेक UPI प्रणालीवर आधारित पेमेंट अँप उपलब्ध आहेत, ज्यांना आपण बँकिंग अँप असे म्हणतो. जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी पेमेंट अँप कंपनीनंमध्ये आज स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी आणि जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पेमेंट अँप कंपनी, ग्राहकांना कॅशबॅक आणि विविध प्रकारचे बक्षिसे देतात. कॅशबॅकमध्ये ग्राहकाला पेमेंट रकमेच्या ठराविक रक्कम परत दिली जाते, तर बक्षिसांमध्ये विविध कंपनीची फ्री मेंबरशिप, डिस्काउंट कुपन या सर्वांचा समावेश असतो. कंपनीअंतर्गत चालू असलेल्या स्पर्धेमुळे नकळत ग्राहकाला फायदा होतो सोबतच UPI चे प्रमोशन देखील होते.

2. गोपिनीयता

UPI आणि UPI प्रमाणेच इतर पेमेंट प्रमाणालीची सुरुवात होण्याआधी निधी हस्तांतरिक करण्याकरिता साधारणतः बँक खात्याचा तपशील दयावा लागत होता, ज्यामध्ये बँक खाते क्रमांक, IFSC कोड, खातेदाराचे पूर्ण नाव इत्यादी माहितीचा समावेश होता, परंतु UPI प्रणालीद्वारे निधी हस्तांतरित करण्यासाठी इत्यादी माहिती देण्याची काहीही गरज राहिली नाही. जेव्हा आपण UPI साठी रजिस्टर करतो, तेव्हा UPI द्वारे आपल्याला एक UPI ID दिली जाते. ही UPI ID आपल्या बँक खात्यासोबत लिंक असते, त्यामुळे निधी हस्तांतराच्या वेळी आपल्याला बँक खाते क्रमांक व त्यासंबधीत इतर माहिती शेअर करावी लागत नाही, आणि यामुळे माहितीची गोपिनीयता टिकून राहते.

3. मोफत निधी हस्तांतरण

NEFT, RTGS, IMPS या काही बँकेच्या मुख्य पेमेंट प्रणाली आहेत, ज्याचा उपयोग अनेक वर्षांपासून होत आहे, परंतु या प्रणालीचा वापर करून निधी हस्तांतरित करण्यासाठी आपल्याला ठराविक शुल्क द्यावे लागते, आणि हे शुल्क आपण किती निधी हस्तांतरिक करत आहोत, यावर अवलंबून असते. म्हणजे जितका जास्त निधी तितके जास्त शुल्क आपल्याकडून आकारले जाते.

UPI ही एक मोफत निधी हस्तांतरित प्रणाली आहे, जी निधी हस्तांतराचे एकही रुपये शुल्क आपल्याकडून आकारत नाही. तसेच दर दिवशी आपण UPI द्वारे २ लाख रुपयांपर्यंतचे निधी हस्तांतरित करू शकतो.

4. सुरक्षित निधी हस्तांतरन

वर्तमान काळात वाढत्या ऑनलाईन फ्रॉडमुळे, अधिकतर लोक ऑनलाईन पेमेंट पद्धतीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. हा फ्रॉड अधिकतर जेव्हा आपण आपली डेबिट अथवा क्रेडिट कार्ड संबंधित माहिती , CVV नंबर, बँक खाते नंबर यांसारखी माहिती शेअर करतो, त्यामुळे घडतात.

UPI मध्ये महाग आणि सुरक्षित प्रणालीचा वापर होत असल्यामुळे, सोबतच पेमेंट करताना कोणत्याही प्रकारचा बँक डेटा शेअर न करावा लागत असल्यामुळे, UPI एक सुरक्षित निधी हस्तांतरित पद्धत मानली जाते.

5. तात्काळ पैशांची देवाण-घेवाण

UPI प्रणाली ही IMPS (Immediate Payment Service) प्रणाली वर आधारित आहे, जी २४x७ कार्यरत असते. या व्यतिरिक्त बँक सुट्टीच्या कालावधीत किंवा ऑफिस टाइम नंतर देखील आपण याचा वापर अगदी सहजरित्या करू शकतो. वेळेचे निर्बध नसल्यासोबतच ही एक तात्काळ निधी हस्तांतरित पद्धत आहे. UPI द्वारे पैसे ट्रान्सफर होण्यासाठी अगदी काही मिनिटांचा अवधी लागतो.

6. UPI ला सपोर्ट करणाऱ्या बँक

 • स्टेट बँक ऑफ इंडिया
 • आयसीआयसीआय (ICICI) बँक
 • एचडीएफसी (HDFC) बँक
 • बँक ऑफ महाराष्ट्र
 • युनाइटेड बँक ऑफ इंडिया
 • फेडरल बँक
 • येस बँक
 • कर्नाटक बँक
 • बँक ऑफ बरोदा
 • युको बँक
 • साऊथ इंडियन बँक

UPI चे फायदे

 • आपण UPI प्रणालीचा वापर करून २४x७ व ३६५ दिवस तात्काळ पैशांची देवाणघेवाण करू शकतो.एका UPI अँपद्वारे आपण एकापेक्षा अधिक बँक खाते हाताळू शकतो.
 • अगदी काही क्लिक निशी पेमेंट प्रक्रिया पूर्ण होते.
 • QR Code स्कॅन करून देखील आपण UPI पेमेंट पूर्ण करू शकतो.
 • सुट्ट्या पैशांची चिंता राहिली नाही
 • UPI संबधीत कोणत्याही शंका अथवा तक्रार, आपण घरबसल्या मोबाईल अँपद्वारे नोंदवू शकतो व त्याचे निवारण जाणून घेऊ शकतो.

FAQ

1. UPI द्वारे कमीत कमी किती रुपये ट्रान्सफर करता येतात ?

उत्तर : UPI द्वारे आपण कमीत कमी १ रुपयाचे देखील ट्रान्सक्शन करता येते.

2. UPI पिन म्हणजे काय ?

उत्तर : UPI पिन म्हणजे एक प्रकारचा पासवर्ड असतो, जसा आपण आपल्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डसाठी निश्चित करतो अगदी तसेच. UPI द्वारे ट्रान्सक्शन पूर्ण करण्याच्या शेवटच्या टप्प्यात ट्रान्सक्शनला परवानगी देण्यासाठी अथवा ट्रान्सक्शन पूर्ण करण्यासाठी UPI पिन ची गरज भासते. UPI Pin शिवाय ट्रान्सक्शन पूर्ण होऊ शकत नाही.

3. UPI द्वारे किती शुल्क आकारले जाते ?

उत्तर : UPI द्वारे निधी हस्तांतरित करण्यासाठी एकही रुपया शुल्क म्हणून आकारला जात नाही.

4. भारतात UPI ची सुरुवात केव्हा झाली ?

उत्तर : ११ एप्रिल २०१६ रोजी भारतात UPI ची सुरुवात झाली.

5. UPI प्रणालीचा शोध कोणी लावला ?

उत्तर : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation Of India OR NPCI ) द्वारे UPI च शोध लावला गेला.

6. UPI ची दैनंदिन मर्यादा किती ?

उत्तर : दर दिवशी आपण UPI द्वारे, जास्तीत जास्त २ लाख रुपयांची देवाण-घेवाण करता येते.

7. UPI चा वापर कोणकोणत्या देशांमध्ये केला जातो ?

उत्तर : भारत वगळता भूतान, नेपाळ, मलेशिया, सिंगापूर, संयुक्त अरब या देशांमध्ये UPI पेमेंट प्रणालीचा उपयोग केला जातो.

8. भारतात UPI पेमेंट पार पाडण्यासाठी सर्वाधीक कोणत्या अँपचा उपयोग केला जातो ?

उत्तर : वर्तमान काळात भारतात Google pay आणि Phone Pe हे दोन अँप UPI Payment साठी सर्वाधिक वापरले जातात.

अधिक लेख –

1. NACH चा फुल फॉर्म काय ?

2. IMPS चा फुल फॉर्म काय ?

3. RTGS चा फुल फॉर्म काय ?

4. NEFT चा फुल फॉर्म काय ?

Leave a Comment