टॅरो कार्ड माहिती मराठीत | Tarot Card Reading in Marathi

आपली संपूर्ण पृथ्वी ही विविध आश्चर्याने भरलेली आहे. संपूर्ण जगात अनेकदा आपल्याला अशा काही गोष्टी माहित पडतात की ज्यावर विश्वास ठेवणे अशक्य वाटते, तसेच अनेक अशा प्राचीन विद्या देखील असतात ज्या अशक्य गोष्टीला शक्य आणि शक्य गोष्टीला अशक्य बनवतात, अशीच एक विद्या अस्तित्वात आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ या विषयी माहिती मिळवू शकता किंवा एक प्रकारे तर्क लावू शकता.

या लेखात आपण टॅरो कार्ड विषयी विविध प्रकारची माहिती जाणून घेणार आहोत, जसे की टॅरो कार्ड कशाला म्हणतात, टॅरो कार्ड चा इतिहास, टॅरो कार्ड विषयी संदर्भ, टॅरो कार्ड रीडिंग इन मराठी आणि शेवटी टॅरो कार्ड खरे असते की खोटे ?

आपल्या समाजात आजही काही असे व्यक्ती वावरत असतात, जे टॅरो कार्ड सारख्या संकल्पनांवर विश्वास ठेवत असतात. या उलट असेही व्यक्ती असतात जे टॅरो कार्ड सारख्या संकल्पनांना जुमानत देखील नाही, आता हा सर्वस्वी आपला निर्णय असतो की टॅरो कार्ड सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही.


टॅरो कार्ड म्हणजे काय ?

टॅरो कार्ड म्हणजे 78 पत्त्यांचा एक समूह असतो, ज्याचे मुख्यतः दोन भागात विभाजन केले जाते. या दोन गटात 22 आणि 56 याप्रमाणे पत्त्यांचा समूह असतो. या पत्त्यांचा उपयोग अगदी अनेक वर्षांपासून भविष्यवाणी करण्यासाठी होत आला आहे. या प्रत्येक द्वारे आपण आपल्या कौटुंबिक जीवनाची, विवाहित जीवनाची, आपल्या जीवन-मरणाचे आणि अधिक विविध प्रकारची माहिती जाणून घेऊ शकतो.

Tarot Card Reading in Marathi

ज्या प्रमाणे भारतात ज्योतिष विद्येचा वापर करून आणि आपल्या हातावरील रेषा व आपली राशी जाणून घेऊन आपले भविष्य सांगतो, हे टॅरो कार्ड देखील अगदी काही प्रमाणात असेच आहे असे आपण म्हणू शकतो.

टॅरो कार्ड चा उपयोग करून आपण जगातील कोणत्याही व्यक्तीचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याबाबत माहिती प्राप्त करू शकतो.

या टॅरो कार्ड वर विशिष्ट कलाकृती आणि काही मजकूर असतात, ज्याबद्दल समजून घेण्यासाठी आपल्याला त्या पत्त्यांविषयी प्रथम अभ्यास करावा लागतो, जो व्यक्ती या पत्त्यांन वाचतो, त्या व्यक्तीला इंग्रजीत टॅरो कार्ड रीडर असे म्हणतात.

ज्या व्यक्तीला टॅरो कार्ड द्वारे स्वतःच्या भविष्याबद्दल जाणून घ्यायचे असते, त्या व्यक्तीला टॅरो कार्ड रीडर द्वारे प्रथम काही प्रश्न विचारले जातात आणि टॅरो कार्डच्या समूहातील काही पत्ते निवडण्यास सांगितले जातात आणि नंतर त्या निवडलेल्या पत्त्यावरून समोरील व्यक्तीच्या भविष्याबद्दल अथवा इतर कोणत्या काळाबद्दल माहिती सांगितली जाते.

आजचे युग हे तंत्रज्ञान, विज्ञान आणि विकासाचे युग आहे, ज्यामुळे अधिक तर लोक टॅरो कार्ड सारख्या गोष्टींना इतके महत्त्व देत नाहीत, परंतु ते म्हणतात ना की प्रत्येकजण एकाच विचारधारेचा नसतो, म्हणून आजही असे लोक अस्तित्वात आहे जे टॅरो कार्ड मुळे आपल्या जीवनात काही तरी मोठे परिवर्तन घडून येईल असा विचार करत असतात.


टॅरोट कार्डचा इतिहास

आज ज्याप्रमाणे पत्ते हे मनोरंजनाचे साधन आहे, अगदी टॅरो कार्ड देखील एक प्रकारचा बैठी खेळ होता. टॅरो कार्ड चा प्रथम उल्लेख आपल्याला पंधराव्या शतकात पाहायला मिळतो, हे कार्ड एका श्रीमंत घराण्यातील कुटुंबियांना विकले गेले होते. त्याकाळी तंत्रज्ञान इतके विकसित नसल्यामुळे प्रिंटिंग प्रेस सारख्या यंत्रांचे अस्तित्व नव्हते, त्यामुळे तेव्हा टॅरो कार्ड वर हाताने नक्षीकाम केले जात होते.

एक फ्रेंच व्यक्ती jean baptise यांनी सतराव्या शतकाच्या सुमारास एक पुस्तक प्रकाशित केले होते, ज्यात टॅरो कार्ड कसे वाचावे याचे मार्गदर्शन दिले होते, त्यामुळे सतराव्या शतकात टॅरो कार्ड चा उपयोग एखाद्या व्यक्तीचे भविष्य सांगण्यासाठी होऊ लागला. jean यांनी लिहिलेल्या पुस्तकात टॅरो कार्ड वरील चित्रांचा अर्थ सांगितला होता, सोबतच खगोलशास्त्राचा देखील पुस्तकात उल्लेख केला गेला होता.

टॅरो कार्ड विषयी लिहिलेल्या jean यांच्या पुस्तकात Etteilla नामक व्यक्तीने काही सुधारणा केली सोबत असतात अधिक माहितीचा समावेश करत १७९१ मध्ये पुन्हा त्या पुस्तकाची आवृत्ती प्रकाशित केली.

१९०९ च्या सुमारास पुन्हा या आवृत्तीमध्ये waite deck, Willian rider, आणि एक टॅरो कार्ड रीडर A.E. wait यांनी बदल करून मार्गदर्शन संपन्न अशी एक आवृत्ती प्रकाशित केली. या आवृत्तीमध्ये न केवळ पत्त्यांचा संपूर्ण अर्थ स्पष्ट केला गेला होता, तर अनेक कथांचा देखील समावेश केला होता, याच पुस्तकांच्या आधारावर आजही टॅरो कार्ड रीडिंग केली जाते.


टॅरो कार्डची वैशिष्ट्ये

टॅरो कार्ड 78 कार्डांचा एक संच आहे, ज्याचा वापर शतकानुशतके भविष्य सांगण्यासाठी, आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आणि आत्म-शोधासाठी केला जात आहे. टॅरो कार्ड संचातील प्रत्येक कार्डची स्वतःची विशिष्ट अशी वैशिष्ट्ये आहेत. या कार्ड चे दोन मुख्य गटांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते, जसे कि मेजर अर्काना आणि मायनर अर्काना. टॅरो कार्डची काही सामान्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

1. मुख्य अर्काना

टॅरो कारच्या संचात 22 कार्डे असतात आणि ते जीवनातील प्रमुख घटना, महत्त्वपूर्ण आर्किटेप आणि शक्तिशाली प्रभावांचे प्रतिनिधित्व करतात. ते सहसा सार्वत्रिक थीम आणि जीवन धडे चित्रित करतात.

2. मायनर अर्काना

मायनर अर्कानामध्ये ५६ कार्डे असतात आणि ती चार सूटमध्ये विभागली जाते, जसे कि, कांडी, कप, तलवारी आणि पेंटॅकल्स (किंवा नाणी). प्रत्येक सूट जीवनाच्या विविध पैलूंचे आणि आपल्यासमोर येणाऱ्या आव्हानांचे प्रतिनिधित्व करत असते.

3. आर्किटाइपल सिम्बोलिझम

टॅरो कार्ड्स प्रतीकात्मक प्रतिमांनी समृद्ध असतात आणि बहुतेकदा त्यामध्ये विदूषक, जादूगार, उच्च पुरोहित, सम्राट, सम्राज्ञी आणि बरेच काही यासारख्या पुरातन व्यक्तिरेखा असतात. ही चिन्हे मूलभूत मानवी अनुभव आणि गुण दर्शवतात.

4. अंतर्ज्ञान आणि व्याख्या

टॅरो कार्ड वाचन सहसा वाचकाच्या अंतर्ज्ञान आणि व्याख्या यावर अवलंबून असते. कार्ड्सचे स्वतःचे निश्चित अर्थ नसतात, परंतु विविध परिस्थिती आणि शक्यता समजून घेण्यासाठी ते एक रचना प्रदान करतात.

5. वैयक्तिक प्रतिबिंब

टॅरो कार्ड वैयक्तिक प्रतिबिंब आणि आत्मनिरीक्षणासाठी वापरले जाऊ शकतात. ते व्यक्तींना त्यांचे विचार, भावना आणि अवचेतन मन शोधण्यासाठी प्रोत्साहित करतात.

6. भविष्यकथा आणि मार्गदर्शन

टॅरो रीडिंगचा वापर भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्यातील अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी भविष्यकथनाचा एक प्रकार म्हणून केला जातो. ते मार्गदर्शन आणि आध्यात्मिक शहाणपण प्रदान करतात असे मानले जाते.

7. रिव्हर्सल्स

टॅरो कार्ड रिव्हर्समध्ये काढले जाऊ शकतात, जे त्यांचे अर्थ किंचित बदलू शकतात किंवा कार्डच्या सरळ व्याख्याशी संबंधित अडथळे, विलंब किंवा आव्हाने दर्शवू शकतात.

8. अष्टपैलुत्व

टॅरो कार्डचा उपयोग भविष्य सांगण्यापलीकडे विविध उद्देशांसाठी केला जाऊ शकतो, जसे की ध्यान, सर्जनशील प्रेरणा आणि आध्यात्मिक वाढ इत्यादी.

9. ज्योतिष आणि अंकशास्त्राशी संबंध

प्रत्येक टॅरो कार्ड ज्योतिषशास्त्रीय चिन्हे, ग्रह आणि अंकशास्त्र यांच्याशी संबंधित आहे, त्यांच्या व्याख्येमध्ये आणखी एक जटिलता जोडलेली असते.

10. शिकणे आणि सराव

टॅरो कार्ड वाचणे हे एक कौशल्य आहे, ज्यासाठी सराव आणि अनुभव आवश्यक आहे. बरेच वाचक कार्ड आणि त्यांच्या प्रतीकात्मकतेबद्दलची त्यांची समज वाढवण्यासाठी मार्गदर्शक पुस्तके किंवा संसाधने वापरतात.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की टॅरो कार्ड मौल्यवान अंतर्दृष्टी आणि मार्गदर्शन देऊ शकतात, परंतु ते पूर्ण खात्रीने भविष्याचा अंदाज लावण्यासाठी नाहीत. त्याऐवजी, ते आत्म-चिंतन, वैयक्तिक वाढ आणि परिस्थितीच्या सभोवतालची ऊर्जा शोधण्यासाठी एक साधन प्रदान करतात. टॅरो कार्ड्सचा अर्थ अभ्यासक आणि वाचकांमध्ये भिन्न असू शकतो, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी अनुभव अद्वितीय होतो.


Tarot Card Reading in Marathi

टॅरो कार्ड रीडर काही टॅरो पत्त्यांचा समूह तुमच्यासमोर ठेवतो आणि त्यातील तुम्हाला केवळ तीन पत्त्याची निवड करायची असते. निवडलेले हे तीन कार्डच तुमच्या भविष्य, भूत आणि वर्तमान काळाची माहिती दर्शवित असतात असे म्हटले जाते.

टॅरो कार्ड पाहून भविष्य सांगणे ही पद्धत केवळ वीदेशातच अवलंबतात असे नाही, तर भारतात देखील आज आपल्याला अनेक असे लोक आढळून येतील जे पैसे घेऊन टॅरो कार्ड द्वारे तुमचे भविष्य तुम्हाला सांगतील. आज इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट्स उपलब्ध आहेत जेथे टॅरो कार्ड द्वारे आपण आपले भविष्य जाणून घेऊ शकतो किंवा त्याबाबत कल्पना करू शकतो.

जसे की वरील प्रमाणे आपण जाणले की प्रथम आपल्याला 3 टॅरो कार्ड निवडावे लागतात, यावरून टॅरो कार्ड रीडर तुमची माहिती तुम्हाला सांगतो. टॅरो कार्ड रीडर द्वारे सांगितलेली माहिती ही तुमच्या जीवनाशी निगडितच असावी असे काही नाही, तर कार्ड रीडर द्वारे सांगितलेली माहिती ही बहुतेकदा तुमच्या जीवनाशी पूर्णता निगडित असते, तर अनेकदा त्या माहितीचा तुमच्या जीवनाशी दूर दूर पर्यंत काही संबंध नसतो.

टॅरो कार्ड रीडर द्वारे सांगितलेली माहिती अनेकदा आपल्या जीवनाशी कशी निगडित असते असा प्रश्न तर अनेकांच्या मनात नक्कीच येत असेल, तर त्या मागचे कारणही अगदी सोपे आहे, ते म्हणजे आपण जेव्हा तीन टॅरो कार्ड निवडतो, तेव्हा रीडर द्वारे कार्ड वाचण्याआधी आपल्याला काही प्रश्न विचारले जातात आणि नंतर कार्ड वाचून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांच्या निगडितच उत्तरे टॅरो कार्ड रीडर देण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात सांगायचे झाले तर काही अशा प्रकारे टॅरोट कार्ड रीडिंग केली जाते.


इंटरनेटचा वापर करून टॅरोट कार्ड द्वारे स्वतः बद्दल माहिती कशी जाणून घ्यावी ?

जर आपण कोणत्याही टॅरोट कार्ड रीडर कडे स्वतःच्या भविष्याची, भूतकाळाच्या आणि वर्तमान काळाची माहिती जाणून घेण्यासाठी गेलो की, तो काही प्रश्न प्रथम आपल्याला विचारतो, परंतु आपण आता ऑनलाईन पद्धतीने कार्ड निवडणार आहोत तिथे कोणी व्यक्तिगत कार्ड रीडर नसल्यामुळे आपल्याला प्रश्न विचारण्याचा काही भागच नाही. इथे आपल्याला फक्त तीन पत्ते निवडायचे आहेत आणि त्यानंतर टॅरो कार्ड वरील मजकूर वाचून जाणून घ्यायचे आहे, चला तर पाहू इंटरनेटचा वापर करून टॅरो कार्ड द्वारे स्वतः बद्दल माहिती कशी जाणून घ्यावी.

  1. प्रथम इथे दिलेल्या लिंक ला कॉपी करून तुमच्या मोबाईल अथवा संगणकाच्या कोणतेही ब्राऊजरच्या URL [ url:- https://www.astropanchang.in/hindi-tarot-card-reading ] सेक्शनमध्ये पेस्ट करून सर्च वर क्लिक करा.
  2. तुमच्या समोर एक नवीन वेबसाईट उघडेल तिथे तुम्हाला कार्ड चूने असे लिहिलेले दिसून येईल.
  3. या पत्त्यांच्या समूह पैकी कोणतेही तीन पत्त्याची निवड करा
  4. आता तुम्ही निवडलेल्या पत्त्यांवरचा मजकूर तुम्हाला दाखवला जाईल हा मजकूर तुमच्या जीवनाशी निगडित असेल की नाही हे पूर्णता तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून ते मजकूर वाचत आहात त्यावर हे अवलंबून असेल.

टॅरो कार्ड द्वारे केलेले भाकित खरे असते की खोटे ?

टॅरो कार्ड च्या आधारे भविष्य सांगण्याची पद्धती कोणत्या घटकांवर आधारित आहे, याबद्दल अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे टॅरो कार्ड द्वारे केलेले भाकीत पूर्णता बरोबर आहे किंवा पूर्णतः चुकीची आहे हे ठरवणे अयोग्य असेल. माणसाचे भविष्य हे त्याच्यावर अवलंबून असते.

अनेक हिंदू धर्मातील धार्मिक कथांमधून आपल्याला एक समान उल्लेख नक्कीच आढळून येतो की एखाद्या मनुष्याच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे त्या व्यक्तीने केलेले कर्म असतात, म्हणजे कर्म आपण आज करू किंवा करणार आहोत यावर आपले भविष्य काय असेल हे ठरते. कर्म न करता उज्वल भविष्याची आशा करणे हा निव्वळ मूर्खपणाच असेल, यावर एक प्रसिद्ध मराठी मन देखील आहे ती म्हणजे जे “पेराल तेच उगवेल”.

Note – या लेखाद्वारे टॅरो कार्ड भविष्यवाणी ला खोटे ठरवले जात नसून त्याबद्दल केवळ माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

Leave a Comment