तार यंत्राचा शोध कधी लागला ?

संवाद हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. दैनंदिन जीवनात आपण विविध लोकांसोबत विविध पद्धतीने संवाद साधत असतो.

वर्तमान काळात संवाद साधण्याची परिभाषा ही पूर्णतः बदलली आहे. आज संवाद साधण्यासाठी मोबाईल, सोशल मीडिया, असे अनेक साधने देखील उपलब्ध आहे, परंतु पूर्वी अशी साधने उपलब्ध नव्हती.

जवळील व्यक्ती सोबत तर आपण अगदी सहज संवाद साधू शकत होतो, परंतु दूर अंतरावरील व्यक्ती सोबत संवाद साधण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती आणि ज्या ही सुविधा उपलब्ध होत्या, त्या फार वेळ घेण्या होत्या.

दूर वरील लोकांसोबत संवाद साधण्यासाठी आणि लोकांमधील अंतर कमी करण्यासाठी तार यंत्र तयार करण्यात आले.

ह्या लेखात आपण तार यंत्राविषयी विविध माहितीचा आढावा घेणार आहोत,


तार यंत्र म्हणजे काय ?

तार यंत्राला इंग्रजीत टेलिग्राफ (Telegraph) असे म्हटले जाते. तार यंत्र अथवा टेलिग्राफ हे मुळात एक संप्रेषण यंत्र आहे, जे विद्युत ऊर्जेचा वापर करून, सांकेतिक चीन्हांमध्ये संदेशाची देवाणघेवाण करण्याचे कार्य पार पाडते. टेलिग्राफ अथवा तार यंत्र हे मानवी जीवनातील पहिले दूर संदेश वहनाचे साधन होते.

वर्तमान काळात टेलिग्राफचा उपयोग जवळ जवळ सर्व आधुनिक संप्रेषण यंत्रांमध्ये केला जात आहे, म्हणूनच टेलिग्राफला संप्रेषण प्रणालीचा पाया देखील म्हटले जाते.

टेलिग्राफ (Telegraph) ह्या शब्दासंबंधित सविस्तर माहिती पाहता, ह्यातील टेली (Tele) हा एक ग्रीक संस्कृतीमधील शब्द आहे, ज्याचा अर्थ “अंतर”, असा होतो, व ग्राफ (Graph) हा शब्द Graphien ह्या शब्दावरून घेतला गेला आहे, ज्याचा अर्थ “लिहिणे” अथवा लिखित असा होतो.


इतिहास

जगात तार यंत्राची निर्मिती होण्यापूर्वी लोक संदेश दूर अंतरावर पोहोचविण्याकरिता आगीचा धूर, स्मशाल, मोठ-मोठ्या ड्रमचा आवाज अशा विविध पद्धतीचा वापर करत होते. ह्या पद्धतींचा वापर करत असताना लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे तसेच ज्यामुळे ज्या व्यक्तीला संदेश पाठवायचा आहे, त्या व्यक्तीपर्यंत संदेश पोहोचेलच ह्याची ग्वाही देता येत नव्हती.

या नंतर १९७० च्या दरम्यान सेमाफोर ह्या संप्रेषण पद्धतीचा शोध लागला, ह्या पद्धतीमध्ये ध्वजांचा उपयोग करून संकेत समोरील व्यक्तीला दर्शविता येत होते. जर ध्वजधारी व्यक्ती दूर अंतरावर असेल तर त्याला पाहणायसाठी साधारणतः दुर्बिणीचा उपयोग केला जात होता. ह्या संप्रेषण पद्धतीत देखील अनेक त्रुटी होत्या.

विद्युत बॅटरी आणि चुंबकीय सुई ह्यांच्या शोधानंतर विद्युत तरंगांद्वारे संवाद साधण्याची नवीन संकल्पना उदयास आली, जी इतर सर्व संप्रेषण पद्धतींपेक्षा सुलभ होती. ह्या संकल्पनेला अनुसरून, चांगला संप्रेषण मार्ग शोधण्यासाठी अनेक संशोधकांनी विविध प्रयोगांचा प्रारंभ केला.

१८३० मध्ये Sir Willian Cooke आणि Wheatstone ह्या दोन संशोधकांनी टेलिग्राफची एक डिजाईन तयार केली, ह्या डिजाईननुसार यंत्रात पाच चुंबकीय सुयांचा उल्लेख केला होता.

या नंतर साल १८३० मध्ये Samuel Finley Breese Morse ह्यांनी Leonard Gale आणि Alfred Vail ह्यांच्या सोबत मिळून जगातील पहिले टेलिग्राफ तयार केले, ज्यामध्ये सिंगल सर्किटचा वापर केला गेला होता.

संप्रेषण अधिक सुलभ बनविण्यासाठी १८३० मध्येच मोर्स आणि वेल ह्या दोघांनी मिळून मोर्स कोड विकसित केला. ह्या मोर्स कोडमध्ये अक्षर आणि संख्यांची जागा ही डॅश-लाईन (-) आणि डॉट (.) ह्या दोन चिन्हांनी घेतली.

तार यंत्र वहन करून आणलेला संदेश डॅश (-) आणि डॉट (.) चिन्हाचा उपयोग करून कागदावर लिखित स्वरूपात पुरवत होते, यंत्राद्वारे संदेश चिन्ह स्वरूपात कागदावर रेखाटल्यानंतर, त्या चिन्हांना अक्षरांमध्ये परिवर्तित करावे लागत होते.

निर्मिती नंतर, ह्या यंत्रात अनेक बदल करण्यात आले व २४ मे १८४४ मध्ये तर यंत्राचा उपयोग करून प्रथम संदेश पाठविण्यात आला, हा संदेश काहीसा “What hath God wrought!” असा होता.

निर्मितीच्या अगदी काही कालावधीतच तार यंत्राने खूप प्रसिद्धी प्राप्त केली आणि अशा प्रकारे संप्रेषण क्षेत्रात एक मोठी क्रांती घडून आली.


मोर्स कोड (Morse Code)

पूर्वी तार यंत्र कोणत्या अक्षारांसाठी कोणत्या सांकेतिक चिन्हांचा वापर करत होते, ह्या संबधित माहिती आपण खालील तक्त्यात घेणार आहोत

इंग्रजी अक्षरे Morse Code
A .
B . . .
C ..
D . .
E .
F . . .
G – – .
H . . . . 
I . . 
J . – – –
K . 
L . . .
M  – –
N . 
O – – –
P . – – .
Q – – .
R ..
S . . .
T
U . .
V . . .
W . – –
X . .
Y . – –
Z – – . .
अंक Morse Code
. – – – –
. . – – –
. . . – –
. . . .
. . . . .
. . . .
– – . . .
– – – . .
– – – – .
१० – – – – –

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तार यंत्र कसे कार्य करते ?

तारांचा उपयोग करून तयार केलेल्या सर्किट मधून विद्युत ऊर्जा संचारीत करून साधारणतः टेलिग्राफ अथवा तार यंत्र हे कार्य करत असते. ह्या यंत्रात ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे दोन्ही उपकरण असतात. इथे ट्रान्सिस्टर हेच तार यंत्र असते.

ट्रान्समीटर आणि रिसिव्हर ही दोन्ही उपकरणे तारांच्या सहाय्याने एकमेकांसोबत जोडली गेलेली असतात.

तारा एक ठराविक मालिकेत व्यवस्थापित असून, तारांपासून एक सर्किट तयार केले जाते. विद्युत बॅटरीच्या सहाय्याने विद्युत प्रवाह तारांना पुरविला जातो. तार यंत्रावर एक नॉब बसविलेले असते, जे एखाद्या स्विच प्रमाणे काम करते.

जेव्हा स्विच अथवा नॉब खालच्या बाजूला ढकलले जाते, तेव्हा यंत्राला होणार विद्युत प्रवाह खंडित होतो, ह्या उलट जेव्हा स्विच वरील दिशेला ढकलला जातो, तेव्हा विद्युत बॅटरीद्वारे पुरविला जाणारा विद्युत प्रवाह तार यंत्र सुरु करतो, ज्याने उपकरणातील तारांचे सर्किट कार्यरत होते.

तार यंत्रात रिसिव्हर हे आर्मेचर सोबत जोडलेले असते. रिसिव्हर मध्ये विद्युत चुंबकीय बल असल्याकारणाने जेव्हा रिसिव्हरला विद्युत पुरवठा प्राप्त होतो, तेव्हा इंक-रोलर सोबत जोडलेले आर्मेचर हलू लागते व इंक रोलर द्वारे कागदावर ट्रान्समीटर मार्फत प्राप्त झालेली चिन्हे कागदावर रेखाटली जातात, नंतर तार यंत्राद्वारे रेखाटलेल्या चिन्हांचे रूपांतर इंग्रजी भाषेत केले जाते.

अशा प्रकारे तार यंत्र कार्य करते.


तार यंत्राचा शोध कधी लागला ?

१८३७ साली तार यंत्राचा शोध लागला. हा शोध Samuel Finley Breese Morse नामक संशोधकाद्वारे लावण्यात आला. १८३७ मध्ये तार यंत्राचा शोध लावल्यानंतर १८४० पर्यंत Samuel Morse ह्यांनी तार यंत्रावर कार्य करून ते अधिक विकसित केले, ज्यामुळे दूर अंतरावरील व्यक्ती सोबत संवाद साधण्याची पद्धतच बदलली.

Samuel हे एक संशोधक असल्याबरोबरच एक कुशल चित्रकार देखील आहेत. तार यंत्राव्यतिरिक्त Samuel ह्यांनी mores code नामक सांकेतिक चिन्हाचा देखील शोध लावला आहे. हा कोड तार यंत्राला वेगवान रित्या व कुशलता पूर्वक कार्य पार पडण्यास मदत करतो.


FAQ

1. तार यंत्राचा शोध कोणत्या वर्षी लागला ?

उत्तर : इ.स. १८३० मध्ये सॅम्युएल मोर्स ह्यांच्याद्वारे तार यंत्राचा शोध लावण्यात आला.

2. तार यंत्र म्हणेज काय ?

उत्तर : तार यंत्र हे दूर अंतरावरून संवाद साधण्यासाठी तयार केलेले एक उपकरण आहे.

3. भारतात तार यंत्र सेवा केव्हा सुरु करण्यात आली ?

उत्तर : १ नोव्हेंबर १८५१ मध्ये भारतातील कोलकत्ता आणि डायमंड हार्बर येथे तार यंत्र (टेलिग्राफ) सेवा सुरु केली गेली.

4. तार यंत्रणेचा वापर करून पाठविलेला पहिला संदेश कोणता ?

उत्तर : २४ मे १८४४ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन मधून बाल्टिमोर येथे तार यंत्राच  उपयोग करून “What hath God wrought?” हा पहिला मेसेज पाठविण्यात आला.

अधिक लेख –

1. वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला ?

2. एक्स-रे चा शोध कोणी लावला ?

3. मायक्रोचीप चा शोध कधी लागला ?

4. पावरलूम चा शोध कोणी लावला ?

Leave a Comment