तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध | tantradnyanachi kimaya marathi nibandh

आजचे २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते, याचे मुख्य कारण म्हणजे मानवी दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप. आज आपण अगदी लहानात लहान कामासाठी तंत्रज्ञान वापरतो, त्यामुळे आपल्याला बरेच चे फायदे होत असतात.

गेल्या १०० वर्षांमध्ये जितका मानवी विकास झाला नाही, तितका विकास केवळ मागील १० वर्षांमध्ये झाला, ह्या दहा वर्षांमध्ये तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनाची संपूर्ण कायापालट झाली, अशा ह्या तंत्रज्ञानावर आपण तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध पाहणार आहोत.

तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध :-

तंत्रज्ञान हा शब्द जितका आज सर्वसामान्यपणे वापरला जातो, तितका पूर्वी वापरला जात नव्हता. हा इंग्रजीमध्ये क्वचितच वापरला जाणारा शब्द होता, जो उपयुक्त कला आणि तांत्रिक शिक्षण दर्शवण्यासाठी वापरला जात होता, परंतु आज तंत्रज्ञान हा शब्द प्रत्येक व्यक्तीच्या ओठांवर आढळून येतो.

तंत्रज्ञान म्हणजे कामे सोपी करण्यासाठी मशीन तंत्र साधने आणि विविध स्त्रोतांचा उपयोग होय, ह्या व्याख्याला अधिक सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर मानवी कामे अधिक सुलभ होण्यासाठी केला जाणारा विविध यंत्रांचा उपयोग. तंत्रज्ञानामुळे आपली कामे सोपी झाली, ज्यामुळे कामाचा वेग वाढला आणि आपल्यासाठी विकासाची दारे उघडी झाली.

आज जवळ जवळ सर्वच क्षेत्रात सर्वाधिक वापरण्यात येणारे तंत्रज्ञान म्हणजे संगणक.  जर आपण निरीक्षण केले तर आपल्याला दिसून येईल की, आपल्या दैनंदिन जीवनातील ८० % टक्के पेक्षा अधिक काम संगणकामुळे पार पडते, जसे की संपर्क साधने व्यावसायिक कामे करणे, पत्र पाठवणे संशोधनासाठी माहिती गोळा करणे आणि अधिक.

या यंत्रांचा वापर आपण केवळ कामे सुलभ करण्यासाठी करत नाही, तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या देशाच्या सुरकशा हेतूने देखील संगणकाचा उपयोग केला जातो.

विविध यंत्रांचा शोध तर पृथ्वीवर अगदी कित्येक वर्षांपासून लागत आला आहे, परंतु आपल्या आयुष्यात म्हणजेच मानवी आयुष्यात विकासाला तेव्हा पासूनवेग मिळाला, जेव्हापासून संगणकाचा शोध लागला. संगणकाच्या शोधामुळे तंत्रज्ञानाच्या जगात क्रांती घडून आली आणि याचे मुख्य कारण ठरले, महान वैज्ञानिक चार्ल्स बॅबेज.

चार्ल्स बॅबेज हे मुळात एक गणित तज्ञ होते आणि गणिती संकल्पनेच्या आधारावर त्यांनी १८३३ ते १८७१ च्या दरम्यान संगणकाचा शोध लावला, परंतु चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाचा शोध लावण्याआधी संगणकाचा शोध लागला होता, परंतु चार्ल्स बॅबेज यांनी प्रोग्रामस च्या आधारे काम करणारा जगातील पहिला आधुनिक संगणक तयार केला, ज्यामुळे त्यांना आधुनिक संगणकाचे जनक असे देखील म्हटले जाते.

२१ व्या शतकापासून आतापर्यंत संगणकावर आधारित अनेक शोध लागले, जसे की मोबाईल, वाहने, विमान आणि अधिक. गाडी आणि विमान यांचे मूळ संगणकाला यासाठी मानले जाते, कारण आजकालच्या गाड्या आणि विमान ह्यातील तंत्रज्ञान संगणकावर आधारित आहे, जसे की ऑटोपायलट, म्हणजे चालक नसताना देखील संगणक प्रणालीच्या आधारावर गाडी चालू किंवा विमान चालू शकते.

आज सर्वजण तंत्रज्ञानाच्या मागे यासाठी लागलो आहेत, कारण जितके ऍडव्हान्स तंत्रज्ञान तितकाच देश विकसित मानला जातो, आज भारतात देखील विविध प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, परंतु ते इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याने भारताला विकसित देश मानले जात नाही.

तंत्रज्ञानामुळे जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात मोठे बदल अगदी वेगाने घडत आहेत, जेथे पूर्वी दहा माणसे काम करत होती, तेथे आज केवळ एक यंत्र काम करत आहे, यामुळे वेळ पैसा ह्यांची बचत होत आहे, परंतु यामुळे अनेक लोकांचा रोजगार देखील जात आहे, यावरून आपल्याला असे समजते की, तंत्रज्ञानाचा फायदा तर आहे, पण सोबत नुकसान देखील आहे.

विश्व युद्ध पहिले, विश्व युद्ध दुसरे, याबद्दल तुम्ही कधी ना कधी ऐकले असेलच व त्याबाबत शाळेत शिकला देखील असाल, कारण विश्व युद्ध हा जगातील सर्वात असा भयानक काळ होता, ज्यामध्ये अनेक देश नष्ट झाले, तर लाखो लोकांनी आपले जीव सोडले, हे युद्ध मोठमोठी शास्त्रे आणि फौजेच्या बळावर लढली गेली होती, परंतु आजचा काळ पूर्णता विपरीत आहे, कारण आज युद्धशास्त्राच्या नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या बळावर युद्धे लढली जात आहेत.

तंत्रज्ञानाद्वारे लढले जाणाऱ्या युद्धात एक देश तंत्रज्ञानाचा वापर करून दुसऱ्या देशाची महत्त्वाची माहिती गोळा करतो किंवा चोरतो आणि त्याच माहितीच्या जोरावर विरोधी देशाचा पराभव देखील करतो, कारण माहितीमुळे आपल्याला विरोधकांची भविष्यकालीन चाल समजते आणि यासाठी मुळात संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, यावरून आपल्याला समजते की, देशाच्या संरक्षणार्थ देखील तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

हिरोशिमा आणि नागासाकी या हल्ल्याबद्दल तर संपूर्ण जगाला माहित आहे, हा हल्ला अमेरिकेने ६ ते ९ ऑगस्ट १९४५ च्या दरम्यान केला होता. या हल्ल्यात जपानचे हिरोशिमा आणि नागासाकी दोन्ही शहरे उद्ध्वस्त झाली होती, सोबतच लाखो लोक अपंग झाले, तर लाखो लोक मृत्यूमुखी पडले, ह्यानंतर जेव्हा विश्व युद्ध संपले, तेव्हा जपानने अधिक जोर तंत्रज्ञानावर दिला, ज्यामुळे आज जपान जगातील विकसित देशांच्या यादीत येतो हे सर्व तंत्रज्ञानाच्या सहाय्यामुळे घडून आले आहे.


तंत्रज्ञानाचे फायदे

1. औद्योगिक क्षेत्रात विकास

औद्योगिक म्हणजेच उद्योग क्षेत्र किंवा व्यावसायिक क्षेत्र. तंत्रज्ञानामुळे सर्वात फायदेशीर बदल जर कोणत्या क्षेत्राला झाला असेल, तर ते औद्योगिक क्षेत्र आहे, असे नाही की तंत्रज्ञानामुळे केवळ मोठमोठ्या कारखान्यांना फायदा झाला, तर अगदी लहानात लहान उद्योग देखील सुलभ, कमी, खर्चिक आणि फायदेशीर झाले, कारण तेथून मानव बल निघून तेथे यांत्रिक बल स्थिरावले.

उदाहरणार्थ, एक कापड कारखाना आहे, ज्यामध्ये एकूण पन्नास लोक काम करतात. कापड बनविण्यासाठी पूर्वी कारखान्यात हातमाग होते, ज्याद्वारे कापड तयार केले जात होते, तसेच एक हात माग हाताळण्यासाठी एका व्यक्तीची गरज भासत होती, तंत्रज्ञानामुळे विकासदरम्यान कारखान्यात तीन कापड निर्मिती यंत्र आणले गेले.  हे यंत्र एका तासात १०० मीटर कापड बनविण्यास सज्ज होते. पूर्वी मानवीबल असताना हेच १०० मीटर कापड बनवण्यासाठी ५० कामगारांना दोन तास लागत होते, यंत्र आल्यामुळे कामाचा वेग दुप्पट झाला. कामगारांना जो पगार द्यावा लागत होता, त्याचे पैसे वाचले आणि नफ्यात देखील वाढ झाली, असाच बदला उद्योगक्षेत्रातील प्रत्येक व्यवसायात झाला.

2. कृषी क्षेत्रात विकास

शेती व्यवसाय हा कोणत्याही देशासाठी सर्वाधिक महत्त्वाचा व्यवसाय असतो. कोणत्याही पिकाची शेती करण्यासाठी साधारण ६ ते १२ महिन्यांचा कालावधी लागतो, यादरम्यान पेरणी करणे नांगरणी करणे, खत फवारणी, यासाठी बरच खर्च खर्च होतो, शिवाय नांगरणी करताना बैलांची गरज भासते, ज्यांच्या चाऱ्याचा खर्च आणि इतके करून देखील पाऊस पडेलच असेही नाही, त्यामुळे पीक येईल की नाही याची शक्यता देखील ५०% – ५०% टक्के असते, हे सर्व घडते ते नैसर्गिक पद्धतीने शेती करत असताना, परंतु तंत्रज्ञानामुळे हल्ली कृत्रिम शेतीला अधिक प्राधान्य दिले जात आहे, कारण यामध्ये ट्रॅक्‍टरचा वापर केला जातो, ज्यामुळे नांगरणी पेरणी कमी खर्चात होते, शिवाय बैलांच्या चाऱ्याचा देखील खर्च उद्भवत नाही, आता एवढे सगळे झाल्यानंतर प्रश्न येतो तो पावसाचा, परंतु आता त्याची देखील काही समस्या नाही, कारण तंत्रज्ञानामुळे कृत्रिम पाऊस पाडणे देखील शक्य झाले आहे,  ज्यामुळे पीक येईल ह्या खात्री निशी आपण शेती करू शकतो.

3. शैक्षणिक क्षेत्रात विकास

शिक्षण म्हणजे आपल्या जीवनाचा पाया होय, जर आजच्या युगात तुम्हाला स्वतःच्या बळावर काही करायचे असेल, तर शिक्षण घेणे फार गरजेचे आहे. भारतात शिक्षण बालवाडीपासून सुरू करण्याची पद्धत आहे.  सर्व विद्यार्थी एका वर्गात येथील आणि मग शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण देतील, हि पारंपरिक शैक्षणिक पद्धत आहे, परंतु आज विद्यार्थी वर्गात न जाता स्वतःच्याच सोयीनुसार आणि वेळेनुसार शिक्षण घेत आहे, याचे मूळ कारण म्हणजे तंत्रज्ञान. तंत्रज्ञानामुळे मोबाईलचा शोध लागला आणि मोबाईलमुळे संपूर्ण शिक्षण पद्धतीची कायापालट झाली, शिवाय मोबाईल च्या ग्राफिक फिचरमुळे आपण धडे न केवळ वाचू शकतो, तर ते गोष्टी रूपात पाहू देखील शकतो, त्यामुळे पाठांतर करण्याची गरज उरली नाही, कारण चित्रे पाहताच लगेच लक्षात राहतात

4. वाहतूक क्षेत्रात विकस

वाहतुकीसाठी पूर्वी मुख्यतः घोडागाडी किंवा बैलगाडी वापरली जात होती. प्रवासासाठी देखिल हेच साधन होते.  काही वर्षांनंतर म्हणजे १७ व्या शतकात सायकलचा शोध लागला, कालांतराने वाहतुकीचे साधन आणि पद्धत दोन्ही बदलली, यानंतर १८८५ मध्ये Daimler Reiteagen यांनी साध्या सायकलला मोटर जोडली आणि जगातील पहिली मोटर सायकल तयार केली, याच शोधाच्या आधारावरच पुढे चार चाकी मोटार वाहनांचा शोध लागला आणि अशाप्रकारे कालांतराने वाहतूक क्षेत्राची परिभाषा बदलली, नंतर याच वाहनातून सामानाचे देखील दळणवळण होऊ लागले. मोटर वाहन सोबत रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक उपलब्ध झाली आणि अशाप्रकारे तंत्रज्ञानाने संपूर्ण वाहतूक क्षेत्रच बदलून आणि व्यापून टाकले.

5. वैद्यकीय क्षेत्रात विकस

वैद्यकीय क्षेत्र हे प्रत्येक देशाची गरज आहे, अशा या महत्त्वाच्या क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाने पाऊल ठेवले हे क्षेत्र देखील व्यापण्यास सुरुवात केली, याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे लेझर ऑपरेशन. पूर्वी कोणतेही ऑपरेशन करण्यासाठी रुग्णाला भूल देऊन, बेशुद्ध करून लहान लहान साहित्यांनी चिरफाड करून ऑपरेशन केले जात होते, यात जरा जरी चूक झाली की रुग्णाचा मृत्यू किंवा एखादा अवयव निकामी होण्याची फार शक्यता असायची, परंतु तंत्रज्ञानामुळे अशा काही यंत्रांचा शोध लागला, ज्यांचा उपयोग करून लेझर ऑपरेशन होऊ लागले. लेझर ऑपरेशन म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या किरणांपासून शरीराला इजा न करता ऑपरेशन करणे, ह्यामुळे ऑपरेशन दरम्यान चुका कमी होऊ लागल्या, रुग्णाला होणारा त्रास कमी झाला आणि कमी खर्चात महागडे ऑपरेशन होऊ लागले.

तंत्रज्ञानामुळे आपला विकास दर झपाट्याने वाढतोय, जी तंत्रज्ञानाचीच किमया आहे, पण जर निरीक्षण केल्यास आपण जितके तंत्रज्ञांना सोबत जोडले जात आहोत, तितकेच निसर्गापासून आणि स्वतःपासून दूर जात आहोत,  ज्याप्रमाणे एखाद्या नाण्याच्या दोन बाजू असतात, अगदी त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या देखील वाईट आणि चांगले अशा दोन बाजू असतात, त्यातील चांगल्या बाजूचा तर आपल्याला निश्चितपणे हेवा आहेच, परंतु वाईट बाजूकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही.

Leave a Comment