सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

आकाशातील सूर्य, चंद्र, तारे हे नेहमीच आपल्यासाठी एक आकर्षणाचा विषय राहिला आहे. आपण जितका विचार करत असतो, त्यापेक्षाही कितीतरी पट अधिक हे अंतराळ पसरले आहे. हे अवकाश अथवा अंतराळ केवळ पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे ह्यापूर्तीच मर्यादित नसून, यामध्ये हजारो विविध प्रकारचे ग्रह आहेत आणि पृथ्वी हा त्यातीलच एक भाग किंवा घटक आहे.

या लेखात आपण आपल्या सूर्यमालेतील ग्रहांबाबत विविध माहिती पाहणार आहोत, जसे की सूर्यमाला म्हणजे काय सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?


सूर्यमाला म्हणजे काय ?

सूर्यमाला म्हणजे सूर्याकडे असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या आधारावर तयार झालेली प्रणाली, ज्यामध्ये अनेक ग्रह प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहांच्या एकूण संख्येपैकी ८ हे मुख्य ग्रह आहेत, तर उर्वरित लघु ग्रह आहेत. सूर्यमालेत आढळणारे सर्व ग्रह हे नैसर्गिक ग्रह म्हणून देखील ओळखले जातात, ह्या ग्रहांना इंग्रजीत Natural Satellite असेही म्हंटले जाते.

सूर्यमालेची निर्मिती ही 4.6 अब्ज वर्षांपूर्वी गुरुत्वाकर्षणामुळे दोन महाकाय ढगांच्या धडके दरम्यान झाली असावी, असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला आहे. सूर्यमालेतील अधिक तर वस्तुमान हे सूर्याचे असून, उर्वरित वस्तुमानापैकी अधिक तर वस्तुमान हे गुरु या ग्रहाचे आहे.

सूर्यमालेत ग्रहांसोबतच अनेक लहान लहान घटकांचा देखील समावेश आहे, जसे की लघुग्रहांचा पट्टा हा मंगळग्रह आणि शुक्र ग्रह यांच्या कक्षेत आढळतो, यात मुख्यतः दगड आणि लोह यांपासून तयार झालेले पदार्थ किंवा वस्तू असतात.

सौर हवा म्हणजे सूर्या मधून बाहेर पडणारे ऊर्जेचे कण एकत्र येऊन बुडबुद्यांचा अकर घेऊन एक क्षेत्र तयार करतात, ज्याला Heliosphere म्हणून ओळखले जाते.


सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत आणि कोणते ?

सूर्यमालेत एकूण ८ ग्रह आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून ही त्या ग्रहांची नावे आहेत.

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता

1. बुध

बुध ग्रह हा सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ८७ दिवसांचा कालावधी लागतो. अगदी शुक्र ह्या ग्रहाप्रमाणेच बुध ग्रह देखिल पृथ्वीच्या कक्षेत सूर्याभोवती परिक्रमा करतो.

अवकाश दुर्बीणच्या सहाय्याने जर बुध ग्रहाचे निरीक्षण केल्यास बुध आणि सूर्य यातील अंतर हे २८° अंश इतके आढळते.

बुध सूर्याच्या सर्वात जवळ असल्यामुळे दोन ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणीच आपण या ग्रहाला पाहू शकतो, त्यातील पहिले ठिकाण आणि वेळ म्हणजे सूर्योदयाच्या आधी पूर्व क्षितिजावर आणि दुसरे म्हणजे सूर्यास्तानंतर पश्‍चिम क्षितिजावर. या दोन्ही वेळी बुध हा ग्रह अगदी लुकलुकणाऱ्या एखाद्या ताऱ्याप्रमाणे भासतो. बुध ग्रहाचे वजन 3.3011×1023 kg  इतके आहे.

2. शुक्र

शुक्र हा सूर्यापासून दुसऱ्या स्थानावर स्तिथ असलेला ग्रह आहे. पृथ्वीवरून पाहता चंद्रा नंतर सर्वात जास्त चमकणारा ग्रह अशी शुक्राची ओळख आहे. शुक्र हा ग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थित असल्यामुळे तो सूर्यापासून दूर जात नाही.

सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी शुक्राला 224 दिवसांचा कालावधी लागतो. शुक्र स्वतःची एक फेरी पूर्ण करण्यासाठी इतर ग्रहांपेक्षा जास्त वेळ घेतो. शुक्राला 4.6023×108 km2 इतका पृष्ठभाग असून  याची घनता

 • 9.2843×1011 km3   इतकी आहे. शुक्र या ग्रहावर 92 टक्के कार्बन-डाय ऑक्‍साईड ( (CO2) आढळते. पृथ्वीवरील समुद्र पातळीवर जितका वातावरणाचा दाब आढळतो, त्याच्या 92 पट अधिक दाब शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावर आहे.

बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा असला तरी शुक्र ग्रहाचा पृष्ठभाग हा सर्वात उष्ण आहे, शुक्र ग्रहावरील जमिनीचे सरासरी तापमान हे 7,37,000 इतके आहे.

3. पृथ्वी

पृथ्वी हा सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. पृथ्वी ग्रह सुर्यमालेतील एकमेव असा ग्रह आहे, ज्यावर जीवसृष्टी आढळते. पृथ्वीच्या एकूण पृष्ठभाग पैकी 29.2% टक्के पृष्ठभाग जमिनीने तर 70.8% टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापला आहे.

पृथ्वीवरील बहुतेक प्रदेश हे बर्फाच्छादित आहेत. पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह देखील आहे, ज्याला आपण चंद्र असे म्हणतो. पृथ्वीची त्रिज्या 6,371 km इतकी असून पृथ्वीचे एकूण वजन हे 5.97237×1024 kg इतके आहे.

पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी एकूण चोवीस तासांचा कालावधी लागतो, तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी लागतो, व पृथ्वीच्या वातावरणात अधिक तर नायट्रोजन आणि ऑक्सिजन या वायूचे प्रमाण अधिक आढळते.

पृथ्वीवर आढळणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बळावर सूर्यमालेत अनेक क्रिया ठरतात आणि घडतात देखील. सूर्यमालेतील सर्वात खडकाळ ग्रहांमध्ये पृथ्वी हा सर्वात मोठा खडकाळ ग्रह आहे.

4. मंगळ

मंगळ ग्रह सूर्यमालेत चौथ्या क्रमांकावर आहे. सूर्यमालेतील लहान ग्रहांच्या यादीत मंगळ ग्रहाचा समावेश होतो.

उत्तरार्धात मंगळ ग्रहावर Iron Oxide अधिक असल्यामुळे हा ग्रह आपल्याला लाल रंगाचा दिसतो. मंगळ ग्रहावर वातावरणाचा प्रभाव फारच कमी असतो. मंगळ ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 779 इतके दिवस लागतात.

मंगळ ग्रहाचा प्रदक्षिणा घालण्याचा वेग 24.007 km/s इतका आहे. ह्याचे एकूण वजन 6.4171×1023 kgइतके आहे. इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ ग्रहावर सर्वात मोठे पर्वत आणि ज्वालामुखी आहेत.

Mariner 4 हे जगातील पहिले स्पेसक्राफ्ट होते, जे मंगळावर पोचले होते, हे स्पेसक्राफ्ट NASA द्वारे 28 नोव्हेंबर 1967 दरम्यान मंगळ ग्रहावर सोडण्यात आले होते. मंगळ ग्रहावर सजीव सृष्टी तपासण्याच्या अनेक मोहिमा वैज्ञानिकांनद्वारे आजही पार पाडल्या जात आहेत.

5. गुरु

गुरु हा ग्रह सूर्यापासून पाचव्या क्रमांकावर आहे. ह्या ग्रहाला गॅस निर्मित ग्रह म्हणून देखील ओळखली जाते. सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या तुलनेत गुरु या ग्रहाचे वस्तुमान अडीच पटीने जास्त आहे.

चंद्र आणि शुक्र या ग्रहांनंतर गुरु सूर्यमालेतील तिसरा सर्वात तेजस्वी ग्रह मानला जातो. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी शुक्राला 4332 दिवस म्हणजे अकरा वर्षांचा कालावधी लागतो. गुरु ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा 13.071 km/सेकंद या वेगाने पूर्ण करतो.

गुरू ग्रह हायड्रोजन वायू पासून बनलेला आहे, असा तर्क शास्त्रज्ञांनी अनेक वर्षांपासून लावला आहे. ह्याचे एकूण क्षेत्रफळ 6.1419×1010 kmइतके आहे. Pioneer 10 हे नासा द्वारे पाठवलेले पहिले स्पेसक्राफ्ट होते, जे गुरु ग्रहावर पोचले होते.

6. शनि

शनि हा सूर्यापासून सहाव्या क्रमांकाचा ग्रह असून शनीला देखील गॅस निर्मित ग्रह म्हणून ओळखली जाते. सूर्यमालेतील मोठ्या ग्रहांमध्ये शनीचा समावेश होतो. या ग्रहाची त्रिज्या पृथ्वीच्या सरासरी त्रिज्येपेक्षा साडेनऊ पट जास्त आहे.

सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पार पाडण्यासाठी शनी ग्रहाला 29.4571 वर्षांचा कालावधी लागतो. शनीचे वजन 5.6834×1026 kg म्हणजेच पृथ्वी पेक्षा 95 पट अधिक आहे. शनीचा भूभाग लोहा, निकेल आणि खडकांपासून बनलेले असल्याचे सांगीतले जाते.

शनिग्रहाभोवती एक रिंग आहे, जी बर्फांच्या कणांपासून तयार झाली आहे. या सफेद रिंगमुळेच पृथ्वीवरून पाहिल्यावर शनी ग्रह अधिक आकर्षित दिसतो. अनेकदा शनि ग्रहावर वारे वाहत असतात, या वाऱ्यांचा वेग 1800 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो.

7. युरेनस

युरेनस हा सूर्यापासून सातव्या क्रमांकावर वर असलेला ग्रह आहे. युरेनस हा सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाचा जास्त त्रिज्या असलेल्या आणि चौथ्या क्रमांकाचा सर्वात जास्त वस्तुमान असलेला ग्रह आहे. युरेनस ग्रहावर आढळणारे वातावरण काहीसे शनि आणि गुरू या ग्रहांवर आढळणाऱ्या वातावरणा प्रमाणे आहे.

सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रहांपैकी एक आहे. या ग्रहाचे तापमान -224 अंश यादरम्यान असते. या ग्रहाच्या आतील भाग खडक आणि बर्फानी बनलेला आहे. युरेनस ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 मध्ये लागला होता. युरेनस भोवती देखील गोलाकार रिंग असते. युरेनसचे दक्षिण, पूर्व आणि उत्तर ध्रुव हे इतर ग्रहांच्या विषुववृत्ताच्या ठिकाणी आहे. 1986 मध्ये Voyager 2 या स्पेसक्राफ्ट द्वारे युरेनसचे फोटो पृथ्वीवर पाठवण्यात आले होते.

8. नेपच्यून

नेपच्युन हा सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह आहे. हा सूर्यमालेतील चौथा सर्वात जास्त व्यास असलेला ग्रह आहे. नेपच्यून चे वस्तुमान पृथ्वीपेक्षा 17 पटीने अधिक आहे.

सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी नेपच्यूनला 164 वर्ष म्हणजेच 60,182 दिवसांचा कालावधी लागतो. याचे वजन 1.02413×1026 kg इतकी आहे, जे पृथ्वीच्या वजनापेक्षा 17 पट जास्त आहे.

नेपच्यून हा सूर्यमालेतील एक असा ग्रह आहे, जो डोळ्यांनी सहजासहजी पाहता येत नाही, गणिताचा आधार घेऊन आणि अगदी सूक्ष्म निरीक्षणातून या ग्रहा बद्दल माहिती मिळाली आहे.


सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

गुरु हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असून सूर्यापासून पाचव्या क्रमांकावर या ग्रहाचे वास्तव्य आहे.

 • सूर्याभोवती प्रदक्षिणा: 11 वर्ष
 • स्वतःभोवती प्रदक्षिणा: 398 दिवस
 • त्रिज्या: 70,911 किलोमीटर
 • क्षेत्रफळ6.1419×1010 km2
 • वजन:  1.8982×1027 kg
 • घनफळ1.4313×1015 km3

सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?

बुध हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे आणि सूर्यापासून सर्वात जवळ देखील स्थित आहे

 • सूर्याभोवती एक प्रदक्षिणा:  87 दिवस
 • स्वतःभोवती एक प्रदक्षिणा:  115.88 दिवस
 • त्रिज्या:  2,439.7±1.0 km
 • क्षेत्रफळ7.48×107 km2
 • वजन3.3011×1023 kg
 • घनफळ 6.083×1010 km


आपण काय शिकलो ?

 • सूर्यमालेत ८ मुख्य ग्रह आहेत.
 • सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे.
 • सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध आहे.
 • सूर्यमालेतील ग्रहांचे अनुक्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून असे आहे.

Leave a Comment