SRPF ची स्थापना कधी झाली ?

महाराष्ट्र राज्य हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक असून, भारताचे मुख्य द्वार म्हणून ओळखले जाणारे Gate Of India देखील महाराष्ट्रातच आहे. न केवळ आर्थिक तर, ऐतिहासिक दृष्ठीकोनातून देखील महाराष्ट्र हा भारताचा एक भाग आहे.

महाराष्ट्राची लौकिकता टिकून ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्य आणखी सुरक्षित बनविण्याच्या दृष्टीकोनातून, राज्य सरकारद्वारे महाराष्ट्रात विविध सौरक्षण विभाग तयार करण्यात आले आहेत, जसे कि SID (State Intelligence Department), MSCID (Maharashtra State Criminal Investigation Department), ATB (Anti Terrorism Bureau), SRPF (State Reserve Police Force) आणि अधिक.

या लेखात आपण SRPF संबंधित माहितीचा आढावा घेणार आहोत,


SRPF म्हणजे काय ?

SRPF ला राज्य राखीव पोलीस बल म्हणून देखील ओळखले जाते. SRPF ही अवकाळी येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीला हाताळण्यासाठी तयार करण्यात आलेली फोर्स असून, SRPF केवळ ठराविक राज्यापुरतीच मर्यादित असते.

ठराविक कामगिरी बजावण्यासाठी SRPF च्या जवानांचे गट तयार केले जातात, ज्यामुळे SRPF चे जवान हे नेहमी आपल्याला समूहातच कार्य करताना दिसून येतात.

आज संपूर्ण महाराष्ट्रात SRPF चे १५ पेक्षा अधिक गट तयार करण्यात आले आहेत. ह्या गटांची संख्या कालांतराने वाढविली जात आहे. हे गट आपल्याला महाराष्ट्रातील काही मुख्य केंद्रांवरच दिसून येतात, जसे कि मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि अधिक.

महाराष्ट्राला आणखी सुरक्षित बनविणे हाच SRPF च्या स्थापनेचा मुख्य हेतू मानला जातो.


SRPF Full Form In Marathi

S – State

R – Reserve

P – Police

F – Force

SRPF चा फुल फॉर्म “State Reserve Police Force” असा असून ह्याचा मराठी अर्थ “राज्य राखीव पोलीस बल” असा होतो.


SRPF चा इतिहास

राज्य राखीव पोलीस बलाचा इतिहास हा आज पासून केवळ ५० ते ६० वर्ष इतका जुना आहे. भारतातील काही राज्याच्या पुनर्रचनेनंतर राज्यांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था रहावी, यासाठी राज्य राखील पोलीस दलाची स्थापना करण्यात आली होती.

साधारणतः १९४८ दरम्यान SRPF ची स्थापना करण्यात आली होती. SRPF चा मुख्य हेतू म्हणजे राज्याअंतर्गत सुरक्षा टिकून राहावी.

हैद्राबाद, मध्यप्रांत आणि बेरार येथील सशस्त्र पोलीस तुकड्या एकत्रित करण्याच्या निर्णयामुळे SRPF दल आणखी प्रबळ होत गेले. SRPF स्थापनेच्या साधारणतः २० ते २२ वर्षांनंतर भाभा ऍटोमिक सेंटर, मुंबईचे विमानतळ अशा अनेक महत्व पूर्ण प्रतिष्ठानच्या सुरक्षेकरिता SRPF ची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कालांतराने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या अस्तिस्त्वामुळे गडचिरोली आणि हिंगोली सारख्या जिल्ह्यांमध्ये SRPF च्या नवनवीन गटांची स्थापना करण्यात आली.

विविध कारणास्तव SRPF ची नेमणूक वाढत गेल्याने राज्य राखील पोलीस बलाचा विस्तार होत गेला. आज महाराष्ट्रातील कोल्हापूर, दौंड, मुंबई, औरंगाबाद, हिंगोली, पुणे, धुळे, सोलापूर, नागपूर, जालना, गोंदिया, अमरावती अशा अनेक जिल्यांमध्ये एकूण १३ पेक्षा SRPF गट कार्यरत आहेत. ह्या गटांची संख्या कालांतराने वाढताना दिसत आहे.


SRPF च्या स्थापनेची उद्दिष्टे

 • समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखणे
 • वन रक्षण करणे
 • नक्षल विरोधी कारवाही करणे
 • आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करणे.
 • राज्यातील महत्वाच्या प्रतिष्ठानांचे संरक्षण करणे.

SRPF ची स्थापना कधी झाली ?

भारत स्वतंत्र झाल्याच्या अगदी वर्षभरातच म्हणजेच ६ मार्च १९४८ दरम्यान महाराष्ट्रात SRPF (State Reserve Police Force) अथवा राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. SRPF दलाचे दोन गट (Unit) सुरवातीच्या काळात तयार करण्यात आले होते, ज्यातील पहिला गट हा पुरंदर, तर दुसरा गट हा (unit) सांबरे जे आजच्या बेळ्गाव कर्नाटक मध्ये स्थित आहे, येथे तयार करण्यात आले होते.


पात्रता

1. शैक्षणिक पात्रता

SRPF मध्ये भरती होण्यासाठी आपल्याला उच्च शिक्षण घेण्याची गरज भासत नाही, इथे आपल्याला केवळ १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे असते. १२ वी देखील ठराविक क्षेत्रासंबंधितच असली पाहिजे असे नाही, तर आपण कोणत्याही क्षेत्रातून म्हणजेच कला (Arts), वाणिज्य (Commerce) आणि विज्ञान (Science) क्षेत्रातून आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकतो. ह्या व्यतिरिक्त सोयीस्कर असल्यास आपण उच्च दर्जाचे शिक्षण देखील पूर्ण करू शकतो.

2. शारीरिक पात्रता

उंची १७० सेमी
छाती ७९ सेमी
छाती (फुगवून ) ८४ सेमी (५ सेमी जास्त)

SRPF भरतीची प्रक्रिया

SRPF ची भरती प्रक्रिया हि साधारणतः ३ टप्प्यांमध्ये पूर्ण होते. उम्मेदवाराला भरती होण्यासाठी ह्या तीनही टप्प्यांमध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे असते. हे तीन टप्पे कोणते, ह्या संबंधित सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

1. मैदानी परीक्षा

मैदानी परीक्षा हि उम्मेदवारेची शारीरिक पात्रता जाणून घेण्यासाठी घेतली जाते. SRPF भरती करीता घेतल्या जाणाऱ्या मैदानी परीक्षेत आपल्याला तीन इव्हेंट्स असतात. हे इव्हेंट्स साधारणतः ५ किमी धावणे, १०० मीटर धावणे आणि गोळा फेक ह्या प्रमाणे असतात.

1.5 किलोमीटर दौड

भरती दरम्यान ५ किमी चे अंतर पूर्ण करण्यासाठी आपल्याला २५ मिनिटांचा कालावधी दिलेला असतो. हा इव्हेंट एकूण ५० मार्कांचा असतो. इथे जर आपण २५ मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी घेतल्यास आपल्याला किती मार्क भेटतील, ह्या संबंधित माहिती आपण खालील तक्त्यात पाहणार आहोत,

वेळ गुण
२५ मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी ५०
२५ मिनिटांपेक्षा जास्त परंतु २६ मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी ४५
२६ मिनिटांपेक्षा जास्त परंतु २७ मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी ४०
२७ मिनिटांपेक्षा जास्त परंतु २८ मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी ३५
२८ मिनिटांपेक्षा जास्त परंतु २९ मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी ३०
२९ मिनिटांपेक्षा जास्त परंतु ३० मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी २५
३० मिनिटांपेक्षा जास्त परंतु ३१ मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी १५
३१ मिनिटांपेक्षा जास्त परंतु ३२ मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी ०५
३२ मिनिटांपेक्षा  कमी

१०० मीटर धावणे

१०० मीटर चे अंतर पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकूण ११.५० सेकंदांचा कालावधी दिला जातो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा इव्हेंट एकूण २५ गुणांचा असतो.  ह्या व्यतिरिक्त आपण किती वेळ अधिक घेतल्यास आपल्याला किती गुण मिळू शकतात, ह्या संबंधित माहिती आपण खालील तक्त्यात पाहणार आहोत,
वेळ गुण
११.५० सेकंद किंवा त्या पेक्षा कमी २५
११.५० सेकंद पेक्षा जास्त परंतु १२.५० सेकंदांपेक्षा कमी २२
१२.५० सेकंद पेक्षा जास्त परंतु १३.५० सेकंदांपेक्षा कमी २०
१३.५० सेकंद पेक्षा जास्त परंतु १४.५० सेकंदांपेक्षा कमी १८
१४.५० सेकंद पेक्षा जास्त परंतु १५.५० सेकंदांपेक्षा कमी १५
१५.५० सेकंद पेक्षा जास्त परंतु १६.५० सेकंदांपेक्षा कमी १०
१६.५० सेकंद पेक्षा जास्त परंतु १७.५० सेकंदांपेक्षा कमी ०५
१७.५० सेकंद पेक्षा जास्त ००

गोळा फेक

गोळा फेक हा इव्हेंट एकूण २५ गुणांचा असतो. ह्यामध्ये उम्मेदवाराला ७.२६० ग्राम इतक्या वजनाचा गोळा दिला जातो, जो उम्मेदवाराने ८.५० मीटर अंतर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर फेकल्यास उम्मेदवार २५ पैकी २५ गुण घेण्यास सज्ज होतो आणि ह्या अगदी विरुद्ध जर उम्मेदवाराने गोळा ३.१० किंवा त्यापेक्षाही कमी अंतरावर फेकल्यास उम्मेदवाराला शून्य गुण अवगत होतात.

2. लेखी परीक्षा

SRPF च्या अभ्यासक्रमात साधारणतः गणित, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयांचा समावेश असतो. SRPF चा लेखी पेपर एकूण १०० गुणांचा असतो. हा लेखी पेपर २५ गुण गणित, २५ गुण बुद्धिमत्ता, २५ गुण मराठी व्याकरण, आणि २५ गुण सामान्य ज्ञान अशा ४ भागात विभागला गेलेला असतो.

हा १०० गुणांचा पेपर सोडविण्यासाठी आपल्याला एकूण ९० मिनिटांचा म्हणजेच  दीड तासांचा वेळ दिला जातो, ह्याचा अर्थ एक प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याकडे एक मिनीटांपेक्षाही कमी वेळ असतो. परीक्षा साधारणतः मराठी भाषेतच घेतली जाते.

3. कागदपत्र तपासणी

उम्मेदवार मैदानी आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाला कि, उम्मेदवाराची कागदपत्रांची पडताळणी होते. हा SRPF भरतीचा शेवटचा टप्पा असतो.

कागदपत्र पडताळणी करीता आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची गरज असते, हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

 • १० वी आणि १२ वी बोर्ड प्रमाणपत्र
 • जातीचा दाखला
 • रहिवासी दाखला
 • नॉन क्रिमीलेयर
 • आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड
 • फोटो
 • जात पडताळणीचा दाखला

सूचना :- वरील प्रमाणे दाखविलेली कागद पत्रे ही मागासवर्गीय जाती मधील उम्मेदवारासाठीच आवश्यक आहेत, जे उम्मेदवार open category मधून आहेत, त्याउम्मेदवाराकडे जातीचा दाखला आणि नॉन क्रिमीलेयर वगळता इतर सर्व कागद पात्र असणे गरजेचे आहे.


SRPF चे सांकेतिक स्थळ

Leave a Comment