सौर ऊर्जा माहिती मराठी | Solar Energy information in Marathi

ह्या २१ व्या शतकात आपल्या दैनंदिन जीवनातील संपूर्ण  दिवस हा यंत्रांनी व्यापला गेला आहे. जसे की मोबाईल, TV, संगणक, फ्रिज आणि अधिक. ही सर्व यंत्रे विजेवर चालतात, ज्यामुळे ह्या यंत्रांचा उपभोग घ्यायचा म्हटले की विजेची गरज भासते.

भारतात वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी देखील वाढली आहे, ज्यामुळे विजेच्या युनिटचा दरही वाढला आहे. विजेसाठी दर महिना पैसे मोजूनही विजेसंबंधीत आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

वीज वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वीज कंपनीनं देखील फार मशागत करावी लागते. अशात एक सर्वोत्तम उपाय म्हणजे सौर ऊर्जा. सौर ऊर्जा न केवळ आपली विजे संबांधित समस्या दूर करते, तर आपला खर्च देखील वाचवते.

आता, नेमक सौर ऊर्जा म्हणजे काय, सौर ऊर्जेचा शोध कोणी लावला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण ह्या लेखात पाहणार आहोत,

अनुक्रमणिका


सौर ऊर्जा म्हणजे काय ?

सौर ऊर्जा म्हणजे सूर्य किरण आणि उष्णतेतुन तयार होणारी ऊर्जा. सौर ऊर्जा साठवून त्याचे थर्मल किंवा विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते. सौर ऊर्जा प्रणाली हा ऊर्जा निर्मितीचा सर्वात सोपा, स्वस्त आणि स्वच्छ असा मार्ग आहे.

सौर ऊर्जा प्रणालीचा वापर करून कमी वेळेत अधिक क्षमतेने ऊर्जा निर्मिती करता येते. जगातील सर्वात प्रगत आणि बलाढ्य म्हणून ओळखला जाणारा अमेरिका हा देश मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मित करतो. तसेच अमेरिकेकडे सौर ऊर्जा प्रणालीसाठी उत्तम दर्जाचे आणि महागडे संसाधने देखील उपलब्ध आहेत.

सौर ऊर्जा प्रणालीतून निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर आपण विविध पद्धतीने करू शकतो, जसे की वीज निर्मित करणे, पाण्याचे बाष्पीभवन करणे इत्यादी.


सौर ऊर्जा प्रणालीचा इतिहास

सौर ऊर्जा निर्मितीच्या संकल्पनेचा जन्म १८३९ दरम्यान झाला होता. कारण १८३९ मध्ये Alexander Edmond Becqueres जे एक भौतिक शास्त्रज्ञ होते, यांनी काही अशा उपकरणांचे निरीक्षण केले, ज्यांच्याकडे सूर्यप्रकाशापासुन ऊर्जा निर्मित करण्याची क्षमता होती. ह्या निरिक्षणातूनच एक मानव हिताची संकल्पना उदयास आली.

१८३७ मध्ये Willoughby Smith जे एक इलेक्ट्रिक इंजिनिअर होते, त्यांनी “प्रकाश Selenium वर आदळल्यामुळे ऊर्जा निर्मिती होते” असा सिद्धांत मांडला. Willoughby  Smith यांच्या सिद्धांतामुळे Alexander Becquerel च्या निरीक्षणाची पुनरावृत्ती होऊ शकली नाही.

Willoughby Smith यांनी मांडलेल्या सिद्धांतानंतर १८७६ दरम्यान Richard Evans आणि William Adams यांनी “The Action of Light on Selenium” नामक एक पुस्तक प्रकाशित केले, यामध्ये त्यांनी अशा काही प्रयोगांचे वर्णन केले होते, ज्याद्वारे Smith ह्यांच्या निकालांची प्रतिकृति केली जाऊ शकत होती.

१८८१ मध्ये जगातील पहिले Solar Panel (सौर पत्रा) तयार केले गेले, ज्याद्वारे सौर ऊर्जानिर्मिती केली जाऊ शकत होती, परंतु हे Solar Panel इतके सक्षम रित्या कार्य करू शकत नव्हते,  तसेच हे कोळसा ऊर्जा निर्मिती Plant पेक्षा कमी कार्यशील होते.

या Solar Panel चा शोध charles Fritts ह्यांनी लावला होता. Charles Fritters हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ होते.

Charles Fritters ह्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तयार केलेले Solar Panel हे न केवळ सूर्य किरणांद्वारे वारंवार, स्थिर आणि लक्षणीय ऊर्जा तयार करू शकत होते, तर मंद उजेडात देखील हे ऊर्जानिर्मिती करू शकत होते.

सुरुवातीच्या काळात जे सौर पत्रे (Solar Panel) होते, ते अगदी साधारण यांत्रिक उपकरणांन करिता ऊर्जानिर्मितीसाठी सक्षम होते, त्यामुळे तेव्हा सौर पत्र्यांचा वापर प्रकाशाचे मोजमाप करण्यासाठी केला जात होता.

१९३९ दरम्यान Russell Ohl यांनी आधुनिक Solar Panel मध्ये वापरल्या जाणारे Solar Cell डिझाईन केले. ही डिझाईन तयार केल्याच्या दोन वर्षानंतर म्हणजेच १९४१ मध्ये Russell Ohl यांनी स्वतःच्या Solar Cell च्या डिझाईनला स्वतःच्या नावावर पेटंट केले.

१९५४ मध्ये जगात प्रथम Bell Lab द्वारे Russell Ohl यांनी तयार केलेला डिझाईनचा वापर करून व्यावसायिक दृष्ट्या Solar Panel चे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.

१९५७ मध्ये मोहम्मद अटाला यांनी एक पद्धत प्रसारित केली, ज्याद्वारे Silicone चा पृष्ठभाग निष्क्रिय केला जाऊ शकतो. मोहम्मद अटाला यांनी प्रचलित केलेली ही पद्धत तेव्हापासून ते आजपर्यंत Solar Cell च्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.


सौर ऊर्जा प्रणालीची साधने

सौर ऊर्जा निर्मिती पूर्वी त्याची संपूर्ण System तयार केली जाते, ज्यामध्ये विविध साधनांचा वापर केला जातो. सौर ऊर्जा System मध्ये नेमकी कोणती साधने वापरली जातात, ह्या संबंधित माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. सौर पत्रा (Solar Panel)

सौर पत्रे हा कोणत्याही सौर प्रणालीचा मुख्य पाया असतो. प्रकाशाच्या संपर्कात येताच हे सौर पत्रे ऊर्जा निर्मितीसाठी सक्षम होतात. या पत्र्याव्दारे किती Volt ऊर्जा निर्मित केली जाऊ शकते, हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते, ज्यामुळे दरवेळेस ऊर्जा निर्मितीची वारंवारता वेगळी आढळून येते.

जेव्हा जेव्हा ऊर्जेचे Output वाढवायचं असते किंवा अधिक ऊर्जा निर्माण करायची असते तेव्हा एकापेक्षा अधिक सौर पत्र्यांचा उपयोग केला जातो.

आज बाजारात दोन विविध तंत्रज्ञानावर आधारित सौर पत्रे आपल्याला पाहायला मिळतात, जे साधारणतः Monocrystalline आणि Polycryatalline या नावाने ओळखले जातात. विविध तंत्रज्ञानावर आधारित ही सोलार पत्रे तसे सारखेच काम करतात, परंतु फरक हा आपल्याला पत्र्यांच्या रचनेत आणि किमतीत आढळून येतो.

Monocrystalline पत्रे ही गडद निळ्या रंगात आढळतात, तसेच ह्याची किंमत देखील अधिक असते. ह्या अगदी उलट Polycryatalline सौर पत्रे हलक्या निळ्या रंगात आढळतात तसेच ह्यांच्या किमती देखील कमी असतात.

2. इन्वर्टर (Inverter)

सौर ऊर्जा प्रणाली मधील Battery आणि Solar Cell हे DC (Direct Current) विद्युत ऊर्जा पुरवतात. DC (Direct Current) म्हणजे ठराविक Volt ची ऊर्जा पुरवते, परंतु आपण घरात विविध प्रकारची विद्युत उपकरणे वापरतो, ज्यांना विविध Volt विद्युत ऊर्जेची गरज असते, त्यामुळे Electric Outlet ( घरातील Plug) मध्ये AC (Alternative Current) चे वास्तव्य असणे गरजेचे असते.

सौर ऊर्जा प्रणाली मध्ये वापरले जाणारे Inverter हे  DC (Direct Current) ला AC (Alternative Current) मध्ये परावर्तित करून घरापर्यंत पोहोचवते.

3. बॅटरी (Battery)

सौर ऊर्जा System मध्ये वापरल्या जाणाऱ्या Charge Controller मार्फत उर्जा Battery मध्ये Store करून ठेवली जाते. बॅटरीमध्ये ऊर्जा ही Ampire Rating च्या आधारे साठवली जाते.

Ampire Rating द्वारे एका तासात साठवलेल्या उर्जेतील किती output मिळू शकतो, हे दर्शविले जाते. सौर ऊर्जेत वापरली जाणारी Battery ही Long Life म्हणजे अधिक काळ चालणारी असते.

4. ऊर्जा नियंत्रक (Charge Controller)

सौर ऊर्जा यंत्रणेतुन मिळणारे ऊर्जेचे आउटपुट हे पूर्णतः सूर्यप्रकाशावर अवलंबून असते, कारण सूर्य आपली स्थिती आणि जागा सतत बदलत असल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश हा देखील भिन्न क्षमतेचा असतो. जसे की पहाटेच्या वेळी सूर्यकिरणे कमी उष्णतेची असतात, तर दुपारच्या वेळी सूर्याची जास्त उष्णता पृथ्वीवर असते, यामुळे सौर ऊर्जा प्रणाली मधून संपूर्ण दिवसभरात अस्थिर वारंवारतेने ऊर्जा निर्मिती होत असते.

जर कमी सूर्यप्रकाश असेल किंवा सूर्यप्रकाशच नसेल तर अशा वेळेस अगदी कमी तीव्रतेने किंवा काहीच ऊर्जा निर्मिती होत नाही आणि ज्या वेळेस अधिक प्रकाश आणि सूर्यकिरणे असतात, अशा वेळेस अधिक तीव्रतेने ऊर्जा निर्मिती होत असते.

जर आपण एखादे यंत्र डायरेक्ट सौर ऊर्जा प्रणाली सोबत जोडले, तर यंत्राला पुरेपूर ऊर्जा मिळत नाही किंवा जास्त ऊर्जा मिळाल्याने यंत्र खराब होऊ शकते, यामुळेच सौर ऊर्जा प्रणाली मध्ये ऊर्जा नियंत्रक (Charge Controller) चा उपयोग केला जातो.

हे ऊर्जा नियंत्रक सौर पत्रा (Solar Panel) आणि बॅटरी ह्या दोन साधनांची मध्यस्थी करते.

Solar Panel मधून ऊर्जानिर्मिती होऊन ती प्रथम charge Controller च्या दिशेने जाते. Charge Controller द्वारे ह्या अस्थिर ऊर्जेचे रूपांतर स्थिर volt च्या ऊर्जेत केले जाते, आणि नंतर मग ते Battery मध्ये जमा करून ठेवली जाते. ऊर्जा नियंत्रकमुळे सौर ऊर्जा प्रणालीला एक प्रकारची सुरक्षितता लाभते.

5. ग्रीड टाईड प्रणाली (Grid Tied System)

Power Grid म्हणजे DP सारख्या यंत्राला Solar Panel system जोडून, Solar Panel system द्वारे तयार केलेल्या ऊर्जेला store न करता आपल्या घरापर्यंत पोहचवले जाते.  यात Grid Tied System मध्ये Grid Power चा वापर होत असल्याने, इथे Charge Controller आणि Battery हे पर्यायी साधने आहेत.


सौर ऊर्जा फायदे

1. कमी उत्पादन खर्च

सौर ऊर्जा निर्मितीसाठी इतर प्रणालींप्रमाने कच्चामाल जसे की कोळसा आणि नैसर्गिक संसाधने जसे की पाणी, वारा याची बिलकुल गरज भासत नाही, ज्यामुळे सौर प्रणाली द्वारे ऊर्जा निर्मितीचा खर्च शून्य येतो.

येथे आपल्याला खर्च हा तेव्हाच येतो, जेव्हा सौर ऊर्जा प्रणाली ची स्थापना करायची असेल किंवा प्रणालीची सर्विसिंग करायची असेल. खर्च आपल्याला सुरुवातीच्या काळातच करावा लागतो आणि सौर ऊर्जा प्रणाली कार्यशील झाली की केवळ उपभोग घ्यायचा असतो खर्च नाही.

2. वाहतुकीदरम्यान कमी वाया जाणारी ऊर्जा

साधारणतः वीज निर्माण केल्यानंतर ती घराघरात पोहोचवली जाते. वीज घरोघरी पोहचविण्यासाठी मोठ्या मोठ्या तारा, खांब, कित्येक किलोमीटर चे अंतर आणि Electric Pole साठी जागा या गोष्टींची गरज भासत असते. तसेच वीज वाहतुकीचा दरम्यान काही Volt वीज अथवा ऊर्जा वाया जाते. या वाया जाणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण अधिक नसते, परंतु याचा काही प्रमाणात नकारात्मक प्रभाव आपल्याला दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी दिसून येतो.

याउलट सौर ऊर्जा प्रणाली आपण आपल्या घराच्या पटांगणात किंवा छतावर बसवू शकतो, यामुळे वीज वाहतुकीचे अंतर फार कमी होते, सोबतच वाहतुकीदरम्यान वाया विजेचे प्रमाणही कमी होते.

3. सोपी आणि सुलभ स्थापना

सोपी आणि सुलभ स्थापना म्हणजे सौर ऊर्जा प्रणालीची स्थापना आपण कोणत्याही ठिकाणी अगदी कमी जागेनिशी करू शकतो.

सौर ऊर्जा प्रणाली मध्ये केवळ सौर पत्र्यानाच थोडीफार जागा लागते, याव्यतिरिक्त कोणत्याही साधनांना अधिक जागा लागत नाही.

जेव्हा आपण व्यवसायिक दृष्ट्या सौर ऊर्जा प्रणालीची स्थापना करतो, तेव्हाच आपल्याला अधिक जागेची गरज भासते, त्या व्यतिरिक्त नाही. सहज स्थापने सह कमी वेळात आपण ह्या system चे स्थलांतर करू शकतो.

4. ऊर्जा मागणी पूर्तता

उर्जेचा अथवा विजेचा अधिकतर वापर सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:०० यादरम्यान अधिक होताना दिसतो, ज्यामुळे १०:०० ते ०५:०० या वेळेत ऊर्जेची अथवा विजेची मागणी आणि गरज वाढते.

याआधीही आपण पाहिले की, सौर ऊर्जेची निर्मिती वातावरणावर अवलंबून असते. सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:०० च्या दरम्यान सूर्यप्रकाशाची तीव्रता अधिक असते.

सौर ऊर्जा प्रणाली अधिक विद्युत गरज भागवण्या इतकी सक्षम आहे, त्यामुळे विजेची टंचाई भासत नाही किंवा विजेच्या वापरण्यासाठी आपल्याला अधिक रक्कम मोजावी लागत नाही.

5. पर्यावरणाचे कमी नुकसान

कृत्रिमरीत्या ऊर्जा निर्मिती करायची म्हटली की, त्यासाठी मोठ्या प्रमाणात संसाधनांची गरज भासते. कृत्रिम ऊर्जा निर्मितीसाठी कोळसा पद्धतीचा अधिक वापर होताना दिसून येत आहे.

कोळशापासून वीज निर्मिती दरम्यान कोळशाची राख हवेत पसरून प्रदूषण होणे, कोळशाच्या खाणीत आग लागल्याने जीवित हानी होणे यासारख्या घटना सतत आपल्या कानी पडत असतात, ज्यामुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणावर हवा आणि ध्वनी प्रदूषणाची वाढ होते. सौर ऊर्जा प्रणालीच्या वापरामुळे आपल्याला पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळता येऊ लागला आहे.

6. वाढलेली सुरक्षितता

शॉर्ट सर्किट होणे, विजेचे खांब पडणे, विजेच्या तारा तुटने यासारख्या अनेक दुर्घटना विजेसंबंधित घडत असतात, खास करून पावसाळ्यात, यामुळे केवळ जीवाचा धोका वाढत नाही तर सोबतच संसाधनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

सौर ऊर्जा प्रणालीमध्ये असा कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही, कारण सौर ऊर्जा प्रणाली आपण आपल्या घरात देखील बसवू शकतो, त्यामुळे आपल्या सुरक्षिततेत वाढ होते.

7. भक्कम अर्थव्यवस्था

सूर्यकिरणांपासून ऊर्जेची निर्मिती करणे म्हणजे खर्चात लक्षणीय बचत किंवा घट होय, कारण सूर्य हा ऊर्जेचा असा स्त्रोत आहे जो मोफत आणि अमर्यादित रित्या उपलब्ध आहे. तसेच बाजारातील मंदी आणि तेही याचा काहीही संबंध सौर ऊर्जा प्रणाली सोबत नसतो, फक्त यात आपल्याला प्रारंभिक गुंतवणूक करावी लागते, ज्याला पण इंग्रजीत “One Time Investment” असे म्हणतो.

जास्त प्रमाणात ऊर्जा निर्मितीसाठी आपल्याला यामध्ये केवळ सौर पत्र्यांच संख्या वाढवायची असते, त्यामुळे इतर वीज निर्मिती प्रक्रिये प्रमाणे आपल्याला ट्रान्सपोर्टचा खर्च, कामगारांचे पगार, संसाधनांचा खर्च द्यावा लागत नाही.

सौरऊर्जा प्रणालीला अतिरिक्त देखभालीची गरज देखील भासत नाही, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतून होणारा अधिक तर खर्च वाचतो आणि अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच देशातील नागरिकांना विद्युत सेवेसाठी जास्त पैसे मोजावे लागत नाही.


तोटे

सौरऊर्जा पॅनेल अनेक फायदे देतात, परंतु ते काही तोटे देखील देतात. यापैकी काही तोटे समाविष्ट आहेत:

1. उच्च प्रारंभिक खर्च

सौर पॅनेलच्या स्थापनेमध्ये पॅनेलची किंमत, इन्व्हर्टर, माउंटिंग उपकरणे आणि इंस्टॉलेशन मजुरांसह महत्त्वपूर्ण आगाऊ खर्चाचा समावेश होतो. हे खर्च कालांतराने कमी होत असताना, ते अजूनही अनेक व्यक्ती किंवा व्यवसायांसाठी अडथळा ठरू शकतात.

2. मध्यांतर आणि हवामान अवलंबित्व

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतानाच सौर पॅनेल वीज निर्माण करतात. याचा अर्थ ते हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असतात आणि ढगाळ दिवसांमध्ये, रात्रीच्या वेळी किंवा मर्यादित सूर्यप्रकाश असलेल्या प्रदेशांमध्ये ते कमी प्रभावी असतात. बॅटरीसारखे ऊर्जा साठवण उपाय ही समस्या कमी करू शकतात, परंतु ते अतिरिक्त खर्च जोडतात.

3. जागा आवश्यकता

सौर पॅनेलला अर्थपूर्ण वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जागा लागते. मर्यादित उपलब्ध जागा असलेल्या शहरी भागांसाठी किंवा स्थानांसाठी हे आव्हान असू शकते.

4. सौंदर्यविषयक चिंता

काही लोकांना सौर पॅनेल त्यांच्या घरांच्या किंवा इमारतींच्या सौंदर्यासाठी अनाकर्षक किंवा बाधक वाटतात. विशेषत: कठोर वास्तुशिल्प मार्गदर्शक तत्त्वे असलेल्या भागात ही चिंतेची बाब असू शकते.

5. ऊर्जा संचयन खर्च

सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी, सूर्यप्रकाश नसताना वापरण्यासाठी सनी कालावधीत निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा साठवण्यासाठी तुम्हाला अनेकदा ऊर्जा साठवण प्रणाली (बॅटरी) मध्ये गुंतवणूक करावी लागते. या स्टोरेज सिस्टम एकूण खर्चात भर घालतात.

6. देखभाल खर्च

सौर पॅनेलमध्ये कमीत कमी हलणारे भाग असले तरी, त्यांना इष्टतम कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी नियमित देखभाल आवश्यक असते. धूळ, मोडतोड आणि इतर पर्यावरणीय घटक कालांतराने त्यांची प्रभावीता कमी करू शकतात.

7. ऊर्जा उत्पादन परिवर्तनशीलता

सौर पॅनेलद्वारे उत्पादित ऊर्जेचे प्रमाण पॅनेलची कार्यक्षमता, स्थान आणि छायांकन यासारख्या घटकांवर आधारित बदलू शकते. ही परिवर्तनशीलता सातत्यपूर्ण ऊर्जा निर्मितीसाठी अंदाज बांधणे आणि योजना करणे आव्हानात्मक बनवू शकते.

8. उत्पादनाचा पर्यावरणीय प्रभाव

सौर पॅनेलच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये विविध सामग्रीचा वापर समाविष्ट असतो, ज्यापैकी काही सामग्री काढण्यासाठी आणि उत्पादनासाठी संसाधन-केंद्रित असू शकतात. याव्यतिरिक्त, त्यांच्या जीवनचक्राच्या शेवटी पॅनेलची विल्हेवाट लावणे ही पर्यावरणीय चिंतेची बाब असू शकते जर ती योग्यरित्या हाताळली गेली नाही.

9. ऊर्जा प्रसारण आणि वितरण

काही प्रकरणांमध्ये, सर्वात जास्त सौर क्षमता असलेले क्षेत्र उर्जेची गरज असलेल्या ठिकाणापासून दूर असू शकतात. लांब अंतरावर वीज प्रसारित केल्याने ऊर्जेची हानी होऊ शकते आणि नवीन ट्रान्समिशन पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.

10. मर्यादित कार्यक्षमतेत सुधारणा

सौर पॅनेल तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरी, सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करण्यात ते कितपत कार्यक्षम असू शकतात याला अजूनही मर्यादा आहेत. याचा अर्थ असा आहे की सूर्यप्रकाशातील सर्व ऊर्जा रूपांतरित होऊ शकत नाही आणि काही उष्णता म्हणून नष्ट होतात.

हे तोटे असूनही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सौरउद्योग सतत विकसित होत आहे आणि तांत्रिक प्रगती, सुधारित डिझाईन्स आणि ऊर्जा साठवण उपायांसह उत्तम एकीकरणाद्वारे यापैकी अनेक समस्यांचे निराकरण करत आहे.


FAQ

1. सौर ऊर्जेचा शोध कधी लागला ?

उत्तर : १८३९ मध्ये सौर ऊर्जेचा शोध लागला.

2. सौर ऊर्जा तंत्रज्ञांचे दोन प्रमुख प्रकार कोणते ?

उत्तर : PV (Photovoltaics) आणि CSP (Concentrating Solar Thermal Power) हे सौर ऊर्जा तंत्रज्ञांचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

3. जगातील कोणता देश सर्वाधिक सौर ऊर्जेचा उपयोग करतो ?

उत्तर : चीन देश संपूर्ण जगात सर्वाधिक सौर ऊर्जेचा वापर करत आहे.

4. भारतातील कोणते राज्य सौर ऊर्जा वापरण्यात अग्रेसर आहे ?

उत्तर : भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाणारे राज्यस्थान हे भारतातील सर्वाधिक सौर ऊर्जा वापरणारे राज्य आहे.

5. सौर ऊर्जेचा शोध कोणी लावला ?

उत्तर : Russell Ohl ह्यांनी प्रथम सौर सेल चा शोध लावल.

अधिक लेख –

1. खनिजे म्हणजे काय व याचे प्रकार कोणते ?

2. बायोगॅस म्हणजे काय व याचे फायदे कोणते ?

3. पावरलूम चा शोध कोणी लावला ?

4. व्हाट्सअप माहिती मराठी

1 thought on “सौर ऊर्जा माहिती मराठी | Solar Energy information in Marathi”

Leave a Comment