शिक्षणाचे महत्त्व वर निबंध

शिक्षण म्हणजे आयुष्याला किंवा जीवनाला योग्य दिशा देण्याचे साधन होय. जीवन यशस्वी आणि समाधानी बनवायचे असेल, तर त्यासाठी शिक्षणाचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे. शिक्षण घेताना नवनवीन माहिती, कला आपल्या अंगीकृत येत असता.

शिक्षण आपल्या जीवनातील एक  मूलभूत घटक आहे. शिक्षण आपले संपूर्ण जीवन अथवा आयुष्य सावरण्यासाठी पुरेसे असते. ज्ञान हे नेहमी ज्ञानी व अज्ञानी या दिशेने वाटचाल करत असते. शिक्षण किंवा ज्ञानाचा कधीच शेवट होत नाही, ज्ञान हे अनंत असते.

शिक्षण प्रसाराच्या कार्याला अध्यापनशास्त्र असे म्हंटले जाते. शिक्षणाचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जितके आपण शिकू तितके कमीच आहे. शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाची व्याख्या ही, प्रत्येकासाठी सारखी नसते, तर प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिकोन हा शिक्षणाची व्याख्या ठरवत असतो.

शिक्षणामुळे आपली इच्छाशक्ती नैसर्गिक रीत्या आणखी प्रबळ होते, सोबतच वैचारिक क्षमता वाढवते. शिक्षणामुळे आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील अंतर समजते.

सोप्प्या शब्दात सांगायचे झाले, तर शिक्षण हा वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाचा एक मार्ग आहे. विकास हा माहितीवर आधारित आहे आणि माहितीचे मुख्य स्त्रोत शिक्षण आहे.

संवाद साधण्यासाठी आणि आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ज्याप्रमाणे भाषेची गरज असते, तसेच विचार मांडण्याच्या पद्धतीसाठी ज्ञान आवश्यक असते. केवळ शब्द महत्वाचे नसतात तर शब्द मांडण्याची पद्धत माहित असणे देखील फार महत्वाचे असते.

शिक्षणामुळे नवनवीन गोष्टी शिकता येतात आणि शिकलेला गोष्टीबद्दलची विचारधारा वाढते.

शिक्षणाचा उपयोग विविध ठिकाणी, विविध परिस्थितीनुसार आणि विविध केला जातो, यामुळे शिक्षणाचे भिन्न प्रकार अस्तित्वात आले आहेत, जसे की शालेय शिक्षण, सामाजिक शिक्षण आर्थिक शिक्षण इत्यादी.

शालेय शिक्षण म्हणजे शाळेत 1ली ते Graduation किंवा पुढील शिक्षण, जे आपल्याला शाळेत, कॉलेज आणि University मध्ये शिकवले जाते. साधारणतः शालेय ज्ञान हे पूर्णता पुस्तकांवर आधारित असते, जे आपल्याला भविष्यात आपले करिअर घडविण्यात म्हणजे डॉक्टर, इंजिनीअर, कलेक्टर अशा क्षेत्रात पदवी मिळविण्यात मदत करते. शालेय शिक्षण हा आर्थिक आणि सामाजिक शिक्षणाचा पाया आहे, ज्याचा उपयोग आपल्याला भविष्यात होत असतो.

सामाजिक ज्ञान हे आपल्याला समाजात वावरताना महत्त्वाचे असते.स्वतःच्या भावना व्यक्त करणे, योग्य आणि अयोग्य यांची समज, बोलण्याची आणि वागण्याची पद्धत, कोणासोबत काय व कसे बोलावे हा सामाजिक शिक्षणाचा अथवा ज्ञानाचा एक भाग आहे. सामाजिक शिक्षणामुळे आपली समाजात एक प्रतिमा तयार होते आणि याच प्रथिने वरून आपले सामाजिक शिक्षण कसे आहे याचा अंदाज लावता येतो.

व्यवहार हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पूर्वी व्यवहार विविध पद्धतीने होत होता, परंतु आता व्यवहाराची एकच परिभाषा समजली जाते, ती म्हणजे पैसा.

पैसा आपल्याला एक योग्य आणि संतुलित जीवन जगण्यास मदत करतो. आज जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचा एकच हेतु आहे, तो म्हणजे पैसा कमावणे, परंतु जितके महत्त्वाचे पैसे कमावणे आहे, तितकेच महत्त्वाचे पैशाचा उपयोग करणे देखील आहे आणि पैशाचा उपयोग योग्य वेळी व योग्य ठिकाणी कसा करावा, यासाठी आर्थिक ज्ञान असणे फार गरजेचे असते.

आज भारताची लोकसंख्या 120 कोटी पेक्षा अधिक आहे, यातील अधिक तर लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली जगत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक किंवा व्यावहारिक ज्ञानाची अपूर्णता.

आज भारतात लोकसंख्या जरी जास्त असली, तरी साक्षरतेचे प्रमाण हे फारच कमी आहे, त्यामुळेच लोकांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक जागरूकता आणणे, गरजेचे बनले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग हा एकुलता एक जिल्हा आहे, ज्यात महाराष्ट्राच्या इतर भागांत पैकी साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कोणत्याही देशाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती जर बदलायची असेल अथवा सुधारायची असेल, तर त्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यानुसार शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आणि तो प्रत्येकाला मिळायला हवा.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणत्या न कोणत्या समस्या असतात, मग त्या वैयक्तिक असो वा सामाजिक. या समस्यांवर मात करण्याचा एकमात्र आणि अंतिम उपाय म्हणजे शिक्षण होय.

शिक्षण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण हेच आपल्या जीवनाला योग्य दिशा देते. एक चांगले, आदर्श आणि समाधानी जीवन जगण्यात शिक्षणाची महत्त्वाची भूमिका असते, कारण शिक्षणामुळे जीवनाला रचना प्राप्त होते. शिक्षणामुळे व्यक्ती एक चांगला देश नागरिक बनतो, चांगला देश नागरिक घडला की चांगला समाज घडतो आणि चांगला समाज घडला की चांगला देश घडतो, याचा अर्थ चांगला देश जरी घडवायचा असेल, तरी शिक्षण महत्त्वाचे आहे.

बऱ्याच लोकांना माहीत नसेल की, प्राचीन भारत पृथ्वीवर सर्वात प्रगत आणि सुशिक्षित असा देश होता. आज जग जितके विकसित आणि प्रगत आहे, त्यापेक्षाही अधिक. संस्कृत ही प्राचीन भारताची बोली भाषा होती. आज भारतात जितके पौराणिक ग्रंथ आहे ते सर्व संस्कृत भाषेतून होत आहेत.

अनेक वैज्ञानिकांनी संस्कृत भाषेला अनुसरून अनेक प्रयोग केले, त्या प्रयोगांमधून असे समोर आले की, जगातील इतर भाषांपैकी संस्कृती भाषा जास्त अभ्यास करून तयार केली गेली आहे.

जगात जितके ही शोध लागले आहेत, त्या शोधाच्या माहितीचा पाया संस्कृत भाषा आहे, कारण जे शोध लावण्यात आले उदा. विमान, बल्ब, वीज अशा अनेक शोधाबद्दल आधीच भारतातील प्राचीन ग्रंथांमध्ये संस्कृत भाषेतून लिहिले गेले होते, काळानुसार हे ग्रंथ विलुप्त होत गेले.

जगातील पहिले विद्यापीठ किंवा यूनिवर्सिटी नालंदा आहे, जी भारतातील बिहार या राज्यात स्थित आहे. या विद्यापीठाची निर्मिती ही हजारो वर्षांपूर्वी झाली होती, परंतु येथील शिक्षणाचा उच्च दर्जा पाहता मोघल शासक खिलजी ने हे विद्यापीठ उद्ध्वस्त केले होते.

जगात जेव्हा इतर देशांमध्ये लोक जीवन कसे जगावे हे शिकत होते, त्या काळी भारतात नवनवीन शोध लावले जात होते, याचा मुख्य पाया शिक्षण होता.

नालंदा विद्यापीठाची स्थापना ही 5 व्या शतकात झाली होती, हे विद्यापीठ 4.5 किलोमीटर दक्षिण-पूर्व, तर 11.5 किलोमीटर उत्तरेस पसरले आहे. ह्या विद्यापीठात 10,000 विद्यार्थी आणि 2,000 शिक्षक एकाच वेळी समावण्याची क्षमता आहे. विविध देशातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत होते.

विद्यापीठ एकूण 12 हेक्टर म्हणजेच, 30 एकर इतक्या क्षेत्रफळात पसरले आहे. आज जे विद्यापीठ आहे, त्यापेक्षा ही अधिक नालंदा हे Well Develop आहे असे म्हणण्यात काहीच हरकत नाही, कारण नालंदा विद्यापिठात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, मोठे ग्रंथालय, अभ्यास क्षेत्र, खेळण्यासाठी पटांगण तयार करण्यात आले आहे, म्हणजेच ज्याचा विचार आजचे विद्यापीठ करतात, त्याचा विचार हजारो वर्षांपूर्वीच भारतात केला गेला होता.

शालेय शिक्षणाबद्दल तर आपण जाणतोच आणि हे ही जाणतो की, करिअर घडवण्यासाठी किती महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षण ग्रॅजुएशन किंवा डिग्री पुरतीच आपण घेत असतो.  साधारणतः एखादा व्यक्ती जीवनात एक किंवा दोन डिग्री घेते अथवा पदवी मिळते, परंतु भारतातील महाराष्ट्राचे रहिवासी असलेले सचिन जिचकर यांनी त्यांच्या आयुष्यात तब्बल 20 डिग्री मिळविल्या आणि सोबतच 42 युनिव्हर्सिटी मध्ये विविध परीक्षा देखील दिल्या, त्यामुळे सचिन जितके भारतातील आतापर्यंतचे सर्व सुशिक्षित व्यक्ती मानले जातात. सचिन यांनी MBBS, MD, Doctor Of Literature  अशा काही उच्च दर्जाच्या पदव्या देखील मिळविल्या, यावरून आपल्याला समजते की शालेय शिक्षणाला देखील मर्यादा नाही. बरेच लोक असा विचार करतात की, 12 वी किंवा 15 वी पूर्ण झाली की, आपल्याला पुढे शिकावे लागणार नाही आणि त्याची गरजही नाही, परंतु ही पूर्णतः चुकीचे बाब आहे.

आज भारतातील साक्षरता वाढावी म्हणून भारत सरकार द्वारे विविध उपक्रम राबवले जात आहेत.


शिक्षणाचे फायदे

तसे तर शिक्षणाचे दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक फायदे होत असतात, त्यातीलच काही फायद्याचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

1. रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतात 

बेरोजगारी ही समस्या सध्याच्या काळात फार मोठी समस्या आहे आणि ही समस्या केवळ भारतात नसून, संपूर्ण जगात या समस्येपासुन झुंजत आहे. बेरोजगारी वाढल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे.

भारतात तरुणांची काहीच कमी नाही, परंतु सुशिक्षित तरुणांची फार कमी आहे आणि अपुऱ्या शिक्षणामुळेच लोकांना नोकरी मिळत नाही. या बेरोजगारीवर मात करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाला प्राधान्य दिले की नवनवीन कला अंगीकृत येतात, ज्ञानभंडार वाढतो, ज्यामुळे कामाची कधी कमी जाणवत नाही, सोबतच बेरोजगारी सारख्या समस्या देखील दूर होतात.

2. आर्थिक बाजू मजबूत होते.

जे लोक उच्चशिक्षित आणि अनुभवी असतात, अशा व्यक्तींसाठी चांगल्या पगाराची नोकरी ही नेहमी तत्पर असते. जास्त पगार म्हणजे, जास्त पैसे, जास्त पैसा म्हणजे, उच्च दर्जाचे राहणीमान ज्यामुळे आर्थिक बाजू न केवळ स्थिरावते, तर मजबूत देखील होते.

चांगला अनुभव आणि नोकरी हवी असेल तर शिक्षणाला प्राधान्य देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जे लोक शिक्षण प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करतात अशा लोकांची ध्येय प्राप्ती नक्कीच होते.

3. समस्येवर मात करण्याचे कौशल्य प्राप्त होते.

शिक्षण घेण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा याबाबत विचारधारा तयार होते, ज्यामुळे बिकट परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहण्याची क्षमता प्राप्त होते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला या कौशल्याचा फायदा होत असतो. अज्ञान किंवा अशिक्षित लोकांमध्ये ही कला नसते, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही ते स्वतःचा बचाव करू शकत नाही आणि हार मानतात.

4. देशाचा विकास होतो

कोणत्याही देशाचा विकास हा लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी वर अवलंबून नसतो, तर तो देशातील नागरिकांच्या हातात असतो. अमेरिका हा जगातील सर्वात विकसित देशांपैकी एक आहे, कारण अमेरिकेत साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.

देशातील लोक शिकले, तर नवीन नोकरीच्या संधी आणि व्यवसाय उदयास येतात, त्यामुळे लोकांची आर्थिक बाजू बळकट होते आणि राहणीमान सुधारत, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारते. अर्थव्यवस्था सुधारली की, लोक कल्याणासाठी नवनवीन उपक्रम सरकारद्वारे राबवले जातात आणि देशाचा विकास होतो

शिक्षण ही काळाची गरज आहे, त्यामुळे शिक्षणाला महत्त्व देणे फार गरजेचे आहे.

Leave a Comment