शिक्षण म्हणजे काय व शिक्षणाचे प्रकार कोणते ?

जेव्हाही आपण शिक्षणासंबंधी विचार करतो किंवा बोलतो, तेव्हा अनेकदा लोकांच्या मनात शाळा, कॉलेज, शिक्षक आणि वर्ग या गोष्टींचा विचार येतो, यावरून शालेय शिक्षण हेच परिपूर्ण शिक्षण असे आपण म्हणू शकत नाही.

शिक्षण विविध प्रकारचे देखील असू शकते, जे अनेकदा आपल्याला शाळेतही शिकता येत नाही, अशात जर शिक्षणाची योग्य व्याख्या सांगायचे झाली तर ती नक्की काय असेल ?

या लेखात आपण शिक्षणा संबंधित विविध घटकांची माहितीचा आढावा घेणार आहोत,


शिक्षण म्हणजे काय ?

शिक्षण म्हणजे विविध कौशल्य, विविध कला, ज्ञान, आणि नैतिक मूल्य आत्मसात करण्याची प्रक्रिया होय. शैक्षणिक प्रक्रियेमध्ये निर्देशित केलेले संशोधन, प्रशिक्षण, चर्चा, आणि कथाकथन या घटकांचा समावेश होता. असे नाही की, शिक्षण हे दर वेळेस शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल, तर शिक्षण औपचारिक किंवा अनौपचारिक पद्धतीने देखील आत्मसात केले जाऊ शकते.

अनेकदा आपला अनुभव, आपल्या मार्फत घडलेली कृती आणि आपले विचार यातूनही आपल्याला काही शिकायला मिळत असते जे एक प्रकारचे शिक्षणच असते. जेव्हा एखाद्या शिक्षका मार्फत विद्यार्थ्याला शिक्षण दिले जाते, त्या प्रक्रियेला अध्यापनशास्त्र असे म्हणतात.

साधारणतः जे शिक्षण आपण शाळेतील शिक्षकां मार्फत, वर्गात बसून आत्मसात करत असतो, ते मुख्यतः दोन ते तीन टप्प्यात विभागले गेले आहे, जसे की प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण.

भारतातील साक्षरता वाढावी याकरिता, भारत सरकारद्वारे प्रत्येक बालकाला पहिली ते आठवी म्हणजेच प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आले आहे.


शिक्षणाचे प्रकार

शिक्षण हे मुख्यतः औपचारिक, अनौपचारिक आणि गैर औपचारिक अशा तीन प्रकारांमध्ये विभागले गेले आहे. या तिन्ही प्रकारच्या शिक्षण पद्धतीचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

1. औपचारिक शिक्षण

औपचारिक शिक्षण म्हणजे ते, जे आपण शाळेत वर्गात बसून घेत असतो. शाळेत आपल्याला साधारणतः व्यावहारिक, मूलभूत आणि शैक्षणिक कौशल्ये शिकवली जातात.

तसे पाहायला गेलो, तर लहान मुलांची शैक्षणिक सुरुवात ही बालवाडी, अंगणवाडी, सिनियर केजी, ज्युनिअर केजी पासून होते, परंतु लहान मुलांचे खरे शारीरिक शिक्षण पहिली ते आठवी म्हणजेच प्राथमिक शिक्षणात दरम्यान पार पडते. यानंतर वेळ येते ती, माध्यमिक शिक्षणाची यामध्ये ८ वी, ९ वी, १० वी, ११ वी, आणि १२ वी चा समावेश होतो.

१२ वी नंतरचे जे शिक्षण असते, त्याला आपण उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयीन शिक्षण असे म्हणतो, ज्यामध्ये विद्यार्थ्याला ठराविक पदवी संबंधित शिक्षण दिले जाते, जसे की BSC, BA, B.Com इत्यादी.

शालेय जीवनात जे शिक्षक आपल्याला शिक्षण देत असतात, त्यांना देखील ठराविक क्षेत्रात पदवीधर व्हावे लागते, त्यानंतर ते शिक्षण देण्यास पात्र ठरतात.

2. अनौपचारिक शिक्षण

अनौपचारिक शिक्षण पद्धती मध्ये ठराविक वेळ, स्थान अथवा शिक्षक नसतात. अनौपचारीक शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचे शिक्षण असू शकते, व त्या शिक्षणाला शिकवणारा कोणताही व्यक्ती असू शकतो. जसे की सायकल चालवणे, जेवण बनविणे हे आपल्याला आपल्या पालकांना द्वारे शिकविले जाते.

विद्यार्थी ग्रंथालयात व पुस्तकालयातील पुस्तके, किंवा इंटरनेटचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने देखील शिक्षण घेऊ शकतो, ज्याला आपण सेल्फ एज्युकेटेड असेही म्हणू शकतो.

अनौपचारिक शिक्षण म्हणजे, तुम्ही कोणत्याही शाळेत जात नाही किंवा ठराविक प्रणालीचा वापर करत नाही, इथे शिक्षण हे विविध काळ आणि परिस्थितीत, कोणत्याही व्यक्तीकडून मिळू शकते.

अनौपचारीक शिक्षणात साधारणतः अनुभव, येणारा काळ अथवा वर्तमान काळातील परिस्थिती यांचा देखील समावेश असू शकतो.

3. गैर-औपचारीक

गैर-औपचारिक शिक्षण हे अशा लोकांसाठी असते, ज्यांना ठराविक क्षेत्रातील कौशल्य शिकायची असतात. या दरम्यान विद्यार्थी शालेय शिक्षण घेत नसतो, गैर-औपचारिक शिक्षण प्रक्रियेत घरगुती शिक्षण आणि मुक्त विद्यापीठ आणि यांचा समावेश होत असतो. Web Development, Computer Programming आणि MSCIT ही गैर-औपचारिक शिक्षणाची उदाहरणे आहेत.


भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास

तक्षशिला हे साधारणतः ८ व्या शतकापासून भारतातील उच्च शिक्षणाचे मुख्य केंद्र मानले जाते, परंतु सध्याच्या काळात तक्षशिला आधुनिक भारतातील शिक्षणाचे केंद्र बनवायचे का, नाही ? यावर आजही वाद सुरूच आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, पूर्वी भारतीय शिक्षणपद्धतीत वेदांचा आधार घेतला जायचा, परंतु वर्तमान काळात व्यक्तीला शिक्षक बनण्यासाठी ठराविक क्षेत्रात पदवीधर व्हावे लागते आणि प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षक अधिकृत की अनधिकृत हे ठरवले जाते. तसेच तक्षशिला मध्ये नालंदा व इतर प्राचीन भारतीय विद्यापीठांप्रमाणे व्याख्यान कक्ष आणि विद्यार्थ्यांसाठी निवास कक्षाचे अस्तित्व देखिल दिसुन येत नाही, ज्यामुळे तक्षशिला परिपूर्ण नाही असे मानले जात आहे.

नालंदा ही भारतीय इतिहासातीलच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या इतिहासातील पहिले, प्राचीन काळातील आधुनिक पद्धतीचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात मुख्यतः पाली भाषेचा वापर केला जात होता, मोगल शासक मोहम्मद घोरी ने या विद्यापीठाला नष्ट केल्याचे सांगितले जाते, नालंदा विश्वविद्यालय सध्याच्या बिहार राज्यातील राजगिरी मध्ये स्थित आहे.

भारतातील बौद्ध मठांमध्ये अनेक धर्मनिरपेक्ष संस्थाने निर्माण झाली होती, जे व्यावहारिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करत होते. प्राचीन भारतातील ४०० आणि ५०० व्या शतकात नालंदा आणि महाराष्ट्रातील नाशिक मधील मनसा ही मुख्य शैक्षणिक केंद्रे बनली होती.

नालंदा आणि मनसा या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना पाली भाषेतील व्याकरण, तर्कशास्त्र आणि पाली सहित्यांवर आधारित अभ्यासक्रम शिकवला जात होता. शैक्षणिक पद्धत पाहून देश-विदेशातील विद्यार्थी, येथे शिकण्यासाठी येत होते. येथील शिक्षकांच्या यादीत चाणक्यांचे देखील नाव सामील आहे, ज्यांनी मौर्या साम्राज्याच्या स्थापनेसाठी मोलाची कामगिरी बजावली होती.

पूर्वी गुरु गुरु-दक्षिणा घेऊन शिक्षण प्रसाराचे कार्य करत होते, नंतर आश्रंमा संबंधित लागणारा खर्च टाळण्यासाठी मंदिरांमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात झाली. अनेक वर्ष भारतातील मंदिरे हीच शिक्षणाचे मुख्य केंद्रे होती, परंतु इंग्रजांच्या राज्यात भारतातील ही प्रथा बंद झाली, कारण इंग्रजांद्वारे शिक्षण घेण्याकरिता मोठमोठ्या इमारती तयार करण्यात आल्या आणि मंदिरात शिक्षण ही प्रथाच बंद झाली.

आधुनिक भारतात कालांतराने शिक्षण क्षेत्रात विविध बदल करण्यात आले, त्यातीलच एक सर्वात मोठा बदल म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धती, यामुळे संपूर्ण शिक्षण पद्धतीची कायापालट झाली.


शिक्षणाचे फायदे

(१) आज भारतात आर्थिक दृष्ट्या मागास वर्गासाठी पुरेपूर शिक्षणाची सोय उपलब्ध नाहीत आणि गरिबी चे मुख्य कारणही शिक्षणाचा अभावच आहे. एका अनुमानानुसार विद्यार्थ्यांनी केवळ वाचन कौशल्य आत्मसात करून जरी शाळा सोडली, तरी भारतातील 171 दशलक्ष लोकसंख्या ही गरिबीतून बाहेर येऊ शकते. 171 दशलक्ष लोकसंख्या म्हणजे जगातील एकूण गरिबीत जगत असणाऱ्या लोकसंख्येपैकी 30 टक्के लोकसंख्या होय.

(२) शिक्षणामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता वाढते यामुळे औद्योगिक विकास होतो. सुशिक्षित व्यक्तीला नेहमी उच्च पगाराच्या नोकरीकरिता प्रथम प्राधान्य दिले जाते. सुशिक्षित आणि योग्य व्यक्तीचा जर व्यवसायात प्रवेश झाला तर, उत्पन्नाचा वेग, रोजगाराच्या संधी आणि व्यवसायाचा विस्तार वाढीस लागतो.

(३) ज्ञानामुळे समानतेला प्रोत्साहन मिळते, जाती अथवा धर्म न पाहता प्रत्येकाला समान दर्जा मिळतो, याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात दिला जाणारा सन्मान आणि बरोबरीचे हक्क.

(४) साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेल्या देशांचे वार्षिक उत्पन्न किंवा जीडीपी अधिक असते, तर या उलट साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या देशांना विकसनशील देश म्हणून ओळखले जाते, तसेच या देशांची GDP किंवा वार्षिक उत्पन्न कमी असते, यावरून समजते की देशातील नागरिकांच्या साक्षरतेवर देशाचा विकास अवलंबून आहे. कारण जितके साक्षरतेचे प्रमाण अधिक असेल तितक्याच नोकरीच्या संधी अधिक निर्माण होतील, त्यामुळे कर (tax) देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत होईल, ज्यामुळे देश विकासाच्या मार्गावर चालू लागेल.

(५) शिक्षणामुळे व्यक्तीला ध्येय प्राप्तीचा मार्ग मिळतो, सोबतच विचारांचे देखील शुद्धीकरण होते, ज्यामुळे लोकांमधील द्वेष, राग यांसारख्या भावनांचा नाश होतो. भारतात गरीबीचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या आणि पैशाच्या हेतूने गुन्हेगारीकडे वळतात, परंतु शिक्षणामुळे आपोआपच अनेक संधींची दारे उघडली जातात, त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत मिळते.

(६) बालविवाह ही अनेक विकसनशील देशांमधील एक मोठी समस्या आहे. खास करून भारत देशात. शिक्षण या प्रथेला काही प्रमाणात आळा घालू शकतो, असे दिसून आले आहे. एका जागतिक रिपोर्टनुसार प्राथमिक शिक्षण प्राप्तीमुळे दरवर्षी बालविवाहाचे प्रमाण ५% कमी होत आहेत.

(७) झाडे आणि वातावरण आपल्यासाठी किती गरजेचे आहे हे तर आपण जाणतोच, परंतु दरवर्षी अगदी क्षुल्लक कारणांसाठी हजारो झाडांची कत्तल केली जाते, ज्यामुळे पर्यावरण संपुष्टात येत आहे. शिक्षणामुळे जनजागृती वाढेल आणि पर्यावरणा चे महत्व लोकांना समजेल, त्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहण्यास मदत होईल.

अधिक लेख –

1. शिक्षणाचे महत्त्व वर निबंध

2. डिजिटल साक्षरता म्हणजे काय ?

3. मूलभूत हक्क म्हणजे काय ?

4. शैक्षणिक कर्ज माहिती मराठीत

2 thoughts on “शिक्षण म्हणजे काय व शिक्षणाचे प्रकार कोणते ?”

  1. धन्यवाद. तुमच्या माहितीमुळे माझ्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली. यामुळे माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत होऊ शकेल.

    Reply
  2. धन्यवाद सर तुमाच्या मोलाच्या मार्गादर्शनाने मला खूप काही समजले 🙏

    Reply

Leave a Comment