शेअर बाजार संपूर्ण माहिती | Share Market Information in Marathi

तुमच्या अवती भवती तुम्ही अनेक लोकांना शेअर मार्केट बद्दल चर्चा करताना ऐकले असेल परंतु शेअर मार्केट बद्दल माहिती नसल्यामुळे तुम्हाला त्या लोकांच्या चर्चेत सामील होता येत नाही.

भारतात शेअर बाजाराला सट्टा, जुगार आणि जोखीम असे म्हटले जाते, तर दुसरी कडे अनेक उद्योगपती ह्यामध्ये गुंतवणूक करून करोडो रुपये कमवतात. कारण प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असतो.

जर तुम्हाला शेअर मार्केट बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे आणि पैसे कमवायचे आहेत तर नक्कीच हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात आपण share Market information in marathi जसे की शेअर बाजार म्हणजे काय?, Demat Account काय आहे?, trending Account म्हणजे काय, योग्य स्टॉक कसा निवडावा या बद्दल विस्तारित आणि सोप्प्या भाषेत माहिती पाहणार आहोत.  तसेच ही माहिती अशा लोकांसाठी आहे ज्यांना शेअर मार्केट बद्दल काहीच माहिती नाही आणि नव्याने सुरुवात करायची आहे.


शेअर बाजार म्हणजे काय ?

शेअर बाजार हे एक असे ठिकाण किंवा बाजार आहे जेथे एखाद्या वस्तू व सेवांच्या जागी companies च्या शेअर किंवा stocks ची देवाण घेवाण केली जाते.

विविध प्रकारच्या कंपनी स्वतः ला improve करण्यासाठी स्वतःचे शेअर लोकांना विकतात व त्यातून funds तयार करतात व त्याचा उपयोग कंपनी मध्ये विविध प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी आणि इतर  विविध कामासाठी वापरतात . शेअर म्हणजे “हिस्सा”, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनी चे शेअर विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनी चे शेअर होल्डर म्हणून ओळखले जाता, म्हणजे तुम्ही त्या कंपनी मध्ये काही प्रमाणात हिस्सेदारी मिळवता मालकी मिळवता.

कंपनी ला स्वतःचे शेअर लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आधी स्वतःचा ipo (Initial Public Offerings) लाँच करावा लागतो. ipo लाँच करण्यासाठी कंपनी ला  SEBI सोबत करारनामा करावा लागतो. काही अटींचे पालन करावे लागते.

SEBI एक संस्था आहे जी stock market मधील कंपनीच्या legal आणि illegal activities वर नजर ठेवते व कायदेशीर कारवाई देखील करते.

SEBI सोबत करारनामा झाल्यावर कंपनी ला आपल्या शेअर ची किंमत BSE आणि NSE मध्ये मूल्यांकन करावी लागते, ज्यानंतर ते shares लोकांपर्यंत पोहोचण्याचा पात्रतेचे होतात.

BSE आणि NSE म्हणजे असे ठिकाण जेथे लोक शेअर ची देवाणघेवाण करतात.

BSE म्हणजे bombay stock exchange जे भारतातील पहिले आणि सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे, ज्याची स्थापना 1875 मध्ये झाली आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ज्यामध्ये जवळपास भारतातील सर्वच कंपनीस चा समावेश असतो आणि हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे stock exchange आहे, ज्याची स्थापना 1992 मध्ये झाली होती.

शेअर मार्केट मध्ये दोन महत्वाच्या term चा समावेश असतो ज्याद्वारे लोकांना माहिती मिळते की शेअर बाजार कसे परफॉर्म करत आहे आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती ठरू शकते. त्या दोन term म्हणजे sensex आणि nifty 50. ह्या दोनही term तुम्हाला NSE आणि BSE ह्या दोन्ही stock exchange मध्ये पाहण्यास मिळतात ज्याची माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Nifty 50 : Nifty 50 हा एक प्रकारचा ग्रुप आहे, ज्यामध्ये चांगल्या परफॉर्मन्स असणाऱ्या आणि विविध क्षेत्रातील 50 कंपनीस चा समावेश आहे. जर nifty 50 चांगला performance करत असेल तर मार्केट चांगला performance करत आहे असे समजले जाते. म्हणजेच ह्या 50 companies च्या performance वर मार्केट चा परॉर्मन्सवर कसा आहे हे काही प्रमाणात ठरवले जाते.

Sensex : sensex ही term देखील Nifty 50 प्रमाणेच आहे किंवा त्याच्याशी निघडीत आहे. ह्या मध्ये केवळ काही प्रमाणातच फरक आढळून येतो तो म्हणजे sensex मध्ये केवळ 30 विविध क्षेत्रातील कंपनीस चा समावेश आहे. sensex वरून देखील आपल्याला काहीप्रमाणात माहिती मिळते की मार्केट कसे आहे आणि कसे असेल.


डिमॅट खाते म्हणजे काय ?

तुम्ही अनेकदा demat account चे नाव नक्कीच ऐकले असेल, परंतु काही निष्कर्ष मिळाला नसेल. Demat account हे शेअर मार्केट मध्ये invest करण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे.

पूर्वी शेअर्स हे फिसिकल म्हणजेच कागदी असायचे परंतु ऑनलाईन चा जमाना आल्यापासून शेअर्स हे फिसिकॅल मधून डिजिटल करण्यात आले जे अस्तित्वात असतात परंतु आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही.

demat account हे अगदी आपल्या बँक अकाऊंट सारखे आहे. आपण खरेदी केलेले शेअर किंवा स्टोक्स हे तुमच्या डिमॅट account मध्ये तुमच्या नावाने save होतात आणि अशा प्रकारे डिमॅट अकाउंट कार्य करते. demat account हे तुम्हाला एका ब्रोकर मार्फत ओपने करावे लागते जे अगदी मोफत आहे तुम्ही तुमच्या इच्छनुसार ब्रोकर ची निवड करू शकता.


ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय ?

जेथे डिमॅट अकाउंट मध्ये शेअर जमा होतात तेथे trending account चे कार्य हे थोडे वेगळे आहे. ट्रेडिंग अकाउंट द्वारे आपण आपल्या शेअर्स ची खरेदी विक्री करतो, अर्थात आपल्या शेअर्स ला ग्राहक मिळवून देण्याचे कार्य हे ट्रेडिंग account व्दारे केले जाते.


शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ?

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे मुळात दोन भिन्न मार्ग आहेत. पहिलं म्हणजे long term गुंतवणूक आणि दुसरे म्हणजे short term गुंतवणूक. short term गुंतवणुकीला ट्रेडिंग ह्या नावाने ओळखले जाते. ट्रेडिंग मध्ये देखील scalper trading आणि intraday trending हे दोन प्रकार येतात.

1. Scalper Trading

ह्या प्रकारची गुंतवणूक हे झटपट प्रॉफिट मिळवण्यासाठी केली जाते. stocks विकत घेतल्यानंतर अगदी काही सेकंदात किंवा मिनिटात पुन्हा त्याची विक्री केली जाते.

2. Intraday Trading

intraday मध्ये संपूर्ण दिवसात विकत घेतलेले stocks आपल्याला स्टॉक exchange बंद होण्याआधी विकावे लागतात ह्यालाच intraday trading म्हणतात, ह्यामध्ये मोठी गुंतवणूक हे नेहमी फायदेशीर ठरते, परंतु तोटा होण्याचा धोका देखील खूप असतो.

शॉर्ट टर्म गुंतवणूक हे खूप फायदेशीर आहे पण ह्यासाठी मोठी किंमत गुंतवावी लागते आणि जर तुम्हाला कमी रुपयात जास्त पैसे कमवायचे आहेत आणि investment चे चांगले knowledge प्राप्त करायचे असेल, तर long term investment तुमच्या साठी खूप फायदेशीर ठरते, ज्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात.


योग्य स्टॉक कसा निवडावा ?

long term investment हा एक उत्तम पर्याय आहे, हे तर आपण जाणून घेतले परंतु कोणत्या स्टॉक वर invest करायचे, किती करावे आणि कसे करावे हे जाणून घेतल्या शिवाय तुमचे investment चे knowledge हे अर्धवट आहे.

स्टॉक मार्केट मधून तुम्हाला नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला योग्य स्टॉक विकत घेणे गरजेचे आहे. योग्य stocks घेण्यासाठी अनेक महत्व पूर्ण गोष्टींचा विचार करणे देखील फार गरजेचे असते. अशाच काही मुद्यांचा माहिती आपण खालील प्रमाणे विस्तारित पाहणार आहोत.

1. P/E Ratio

P/E Ratio ला Rrice To Earing Ratio ( Formula = Stock Price/Earning Per Share) म्हणून ओळखले जाते. ह्याचा अर्थ असा होतो की खऱ्या शेअर च्या किमतीपेक्षा आपल्याला किती पट पैसे जास्त द्यावे लागणार. उदा. ABC ही एक कंपनी आहे ज्याच्या शेअर ची किंमत 10 रुपये आहे आणि जर त्याचा P/E = 2 असेल म्हणजे त्या कंपनी चा शेअर विकत घेण्यासाठी आपल्याला खऱ्या share  च्या किमतीपेक्षा दुप्पट पैसे द्यावे लागणार जसे कि २० रुपये.

शेअर निवडताना P/E Ratio (P/E Ration < 10 ) कमी असणे, आपल्यासाठी फायदेशीर ठरते त्यामुळे शेअर निवडताना ह्याचा विचार नक्की कर.

2. P/B Ratio

P/B Ratio ला Price To Book Values असे संबोधले जाते. ह्या Ratio द्वारे आपल्याला असे समजते की कंपनी ने एका शेअर माघे किती रुपयांचे Assets ठेवले आहे.

उदा. एका शेतकऱ्याला 90 एकर जमीन आहे आणि तीन मुले आहेत. त्याने प्रत्येक मुलाच्या नावावर 30 एकर जमीन केली, म्हणजे एका मुला मागे शेतकऱ्याने ३ एकर चे asset ठेवले आहे. इथे P/B Ratio = 30 एकर इतकी आहे.

3. Company Futur Planning

ज्या कंपनी मध्ये आपण पैसे गुंतवत आहोत त्या कंपनीच्या भविष्य काळातील योजना जाणून घेतल्याने ती कंपनी भविष्यात आपल्याला पैसे कमवून देईल का ? ह्याचा आपल्याला अंदाज येतो व शेअर खरेदी करताना कॉन्फिडन्स येतो.

4. Dept

Dept म्हणजे एखाद्या कंपनी वर किती रुपयांचे कर्ज आहे ते कर्ज कंपनी ने कशासाठी घेतले आहे व ते कर्ज फेडण्याची कंपनी ची capacity आहे का? हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे, कारण भूतकाळात अनेक अशा नामांकित कंपनी होत्या, जे कर्ज न फेडता आल्यामुळे बंद झाल्या त्यामुळे ही खबरदारी घेणे फार गरजेचे आहे.

5. Company Civil

Company कितीही चांगला performance दाखवत असेल आणि जर त्या कंपनी वर पोलिस केस किंवा कोणताही fraud case असेल तर त्या कंपनी च्या शेअर मध्ये liquidity उरत नाही म्हणजे जास्त प्रमाणात देवाण-घेवाण होत नाही, जे गुंतवणूक दारांसाठी चांगले नसते.

6. Performance

तुम्ही ज्या कंपनी मध्ये invest करताय त्या कंपनी चे मागील पाच ते आठ वर्षांचे performance चेक करा. ज्यामुळे कंपनी ने कोणत्या महिन्यात चांगला performance केला आणि कोणत्या महिन्यात वाईट performance केला ह्याची माहिती मिळते ह्या वरून आपल्याला अंदाज येतो की कंपनी मध्ये invest करण्याची योग्य वेळ कोणती आहे.

7. Business Model

एखादी कंपनी कोणत्या तत्वांवर कार्य करत आहे, काय कार्य करत आहे, कोणत्या प्रकारे करत आहे आणि कसे manage करते त्यावरून समजते की कंपनी चा बिझनेस मॉडेल काय आहे आणि ह्यावरून ती कंपनी किती काळ मार्केट मध्ये टिकू शकते ज्याची माहिती आपल्याला मिळते.

8. Profit Margin

कोणत्याही व्यवसायाचा मुख्य मुद्दा असतो तो म्हणजे नफा. प्रत्येक व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठी उभारला जातो. कंपनी द्वारे तयार केलेल्या प्रॉडक्ट मध्ये कंपनी ला किती % नफा होतो हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. जितका कंपनी चा profit जास्त तितका कंपनी चा performance चांगला होतो कारण कंपनी कडे स्वतः ला improve करण्यासाठी मार्गे पैसे येत असतात ज्याने ते स्वतःचे प्रॉडक्ट अँड user एक्सपेरियन्स बेटर करून इम्प्रोव्हमेन्ट आणतात.

मार्केट मध्ये अनेक अशा कंपनी आहेत ज्यांच्या प्रॉफिट Margin पेक्षा खर्च जास्त आहे अशा कंपनी जास्त काळ स्वतःच्या positions hold करू शकत नाहीत आणि loss मध्ये जातात.

9. Products

product हे मुळात दोन प्रकारचे असतात पहिले म्हणजे physical product’s ज्यांना आपण विकत घेऊन दैनंदिन जीवनात वापर करू शकतो जसे की पेन, साबण आणि दुसरे म्हणजे सेवा रुपी products म्हणजे transport इत्यादी.

एखाद्या कंपनी चा जर प्रॉडक्ट उत्तम आणि फायदेशीर ठरतो, अशी कंपनी अगदी कमी काळात खूप उंचावते अशा कंपनी मध्ये invest करणाऱ्या लोकांना खूप फायदा करून देते, म्हणून तुम्ही ज्या कंपनी मध्ये invest करणार आहात अशा कंपनी बद्दल माहिती जाणून घ्या किंवा त्या कंपनी  चा  प्रॉडक्ट स्वतः  वापरून पहा.

10. Companies Investment

कंपनी स्वतः चे पैसे कोठे गुंतवत आहे ह्यावरून आपल्याला त्या कंपनी चा दृष्टिकोन समजून येतो जे चांगले प्रॉफिट कमावून देण्यास खूप मदत करते.

हे काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्यांचा विचार stock विकत घेताना केल्यास नक्कीच चंगला प्रॉफिट मिळवून देण्यास मदत करते, तसेच तुम्हाला loss पासून दूर ठेवते.

अशा प्रकारे आपण काही महत्व पूर्ण गोष्टींकडे लक्ष देऊन काही चांगले स्टोक्स निवडून चांगला नफा कमवू शकतो.


FAQ

1. भारतात एकूण किती स्टॉक एक्सचेंज आहेत ?

उत्तर : भारतात BSE आणि NSE हे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत.

2. भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज कोणते ?

उत्तर : BSE हे भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे, ज्याची सुरुवात साल १८७५ मध्ये झाली होती.

3. BSE आणि NSE चा फुल फॉर्म काय ?

उत्तर : Bombay Stock Exchage हा BSE चा तर National Stock Exchage हा NSE चा फुल फॉर्म आहे.

4. डिमॅट खाते खोलण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज भासते ?

उत्तर : डिमॅट खाते खोलण्यासाठी मुख्यतः आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोन कागदपत्रांची गरज भासते.

5. शेअर मार्केट किती वाजता सुरु होते ?

उत्तर : शेअर मार्केट सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ वाजता सुरु होते व ३:३० वाजता बंद होते, या व्यतिरिक्त शनिवार आणि रविवार शेअर मार्केट बंद असते.

6. भारतात एकूण किती लोकसंख्या शेअर बाजारात गुंतवणूक करते ?

उत्तर : वर्तमान काळात भारतात १.२ करोड पक्ष अधिक लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत.

अधिक लेख :

1. सेबी चे कार्य कोणते आहे ?
2. निफ्टी म्हणजे काय ?
3. IPO चा फुल फॉर्म काय ?
4. डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

Leave a Comment