सेबी चे कार्य कोणते आहे ?

भारतीय शेअर बाजाराची गणना ही जगातील काही विशाल शेअर बाजारांमध्ये केली जाते. भारतात एकूण बॉंम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange किंवा BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange किंवा NSE) असे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE हे भारतातील सर्वात जुने आणि मोठे स्टॉक एक्सचेंज आहे, ज्याची स्थापन १८७५ मध्ये झाली होती.

वर्तमान BSE मध्ये ५,२०० पेक्षा अधिक आणि NSE मध्ये ७,४०० पेक्षा अधिक कंपन्या सुचीबद्द आहेत. या दोन्ही स्टॉक एक्सचेंजचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी भारत सरकारद्वारे साल १९८८ मध्ये सेबी नामक संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था सेबी कायदा १९९२ (SEBI Act 1992) अंतर्गत स्वतःचे कार्य पार पाडते.

या लेखात आपण सेबी चे कार्य नेमके कोणते व त्यासोबतच इतर विविध प्रकारच्या माहितीचा आढावा घेणार आहोत,


सेबी म्हणजे काय ?

सेबी (SEBI) भारत सरकारद्वारे स्थापित एक नियामक संस्था आहे, जी भारतीय शेअर बाजाराचे नियमन आणि शेअर बाजार नियंत्रित करण्याचे कार्य पार पाडते. १२ एप्रिल १९८८ पूर्वी म्हणजेच सेबीच्या स्थापने पूर्वी ही कामगिरी CCI (The Controller Of Capital Issues) द्वारे सांभाळली जात होती.

सेबी शेअर्स जारी करणारे (कंपन्या), बाजारातील मध्यस्थ अथवा दलाल आणि गुंतवणूकदार यांच्यावर नियंत्रण ठेवते. या व्यतिरिक्त आचारसंहिता प्रस्थापित करणे, स्टॉक एक्सचेंज संबंधित निरोगी कामकाजाला प्रोत्साहन देणे व शेअर बाजारासंबंधित घडणारे गैरप्रकार टाळणे अथवा त्यांना आळा घालणे अशी काही कामे सेबीद्वारे केली जातात.


SEBI Full Form in Marathi

S – Securities and
E – Exchange
B – Board Of
I – India

SEBI चा फुल फॉर्म “Securities & Exchange Board Of India” असा आहे.


सेबी चे कार्य कोणते आहे ?

सेबी (SEBI) शेअर मार्केट संबंधित संरक्षणात्मक, नियामक आणि विकासात्मक अशा तीन विविध प्रकारची कामगिरी बजावते. या कामगिरीचा विस्तारित आढावा आपण खालीलप्रमाण घेणार आहोत,

1. संरक्षणात्मक कार्य

शेअर बाजारातील जे गुंतवणूकदार आहेत, त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सेबीद्वारे संरक्षणात्मक कामगिरी बजावली जाते.

इनसाईडर ट्रेडिंगला (Insider Trading) आळा घालणे. जेव्हा शेअर बाजारात काम करणारे कर्मचारी जसे की संचालक अथवा इतर वर्ग किंवा ठराविक कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी, कंपनी संबंधित गुप्त माहिती सहित शेअर मध्ये गुंतवणूक करतात, या प्रक्रियेला इनसाईडर ट्रेडिंग (Insider Trading) असे म्हणतात. इनसाईडर ट्रेडिंगमुळे ठराविक कंपनीच्या शेअरवर परिणाम होतो. या व्यतिरिक्त जे अस्सल गुंतवणूकदार आहेत, त्यांच्यावर अन्याय होतो. इनसाईडर ट्रेडिंगला आळा घालण्यासाठी सेबी शेअर बाजारात सूची बद्ध असणाऱ्या कंपन्यांना त्यांचे स्वतःचे शेअर्स दुय्यम बाजारातून विकत घेण्यास प्रतिबंधित करते, या व्यतिरिक्त कंपनीतील गैर प्रकार टाळण्यासाठी नियमित तपासणी करते.

शेअरच्या किमतीत होणारी हेराफेरी रोखणे. किमतींमध्ये होणाऱ्या हेराफ़ेरीमुळे शेअरच्या बाजारभावात अगदी वेगाने चढ-उतार होतो, ज्यामुळे व्यापारी वर्ग आणि गुंतवणूकदार वर्ग यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. किमतींमध्ये होणारी हेराफेरी रोखण्यासाठी सेबी किमतीतील हेराफेरीला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर सतत लक्ष केंद्रित करून असते.

निष्पक्ष आणि उचित व्यापार पद्धतींना प्रोत्साहन देणे. भारतीय शेअर बाजारात होणाऱ्या अयोग्य आणि अनुचित व्यापार पद्धतींना आळा घालण्यासाठी सेबीद्वारे शेअर मार्केटमध्ये विशिष्ट अशी आचारसंहिता स्थापन जाते.

नवीन गुंतवणूकदारांना आर्थिक शिक्षण देणे व त्यांच्या मनात शेअर बाजाराची योग्य प्रतिमा निर्माण करणे. २१ व्या शतकातही भारतातील बहुसंख्य लोक शेअर बाजाराला जुगार समजतात आणि शेअर बाजारात गुंतवणुकीवर विश्वास ठेवत नाहीत. अशा समाजात जण जागृती करण्यासाठी सेबी ऑनलाईन आणि ऑफलाईन सेमिनार आयोजित करते, जेथे शेअर बाजार संबंधित संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते, यामुळे न केवळ शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढते, तर सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील हातभार लागतो.

2. नियमक कार्य

नियामक कार्य साधारणतः शेअर बाजारातील आर्थिक व्यवसायाचे कार्य तपासण्यासाठी पार पाडले जाते. या व्यतिरिक्त शेअर बाजारातील आर्थिक मध्यस्थी आणि कॉर्पोरेट नियमन करणे हे देखील नियामक कार्याचाच एक भाग आहे.

 • शेअर बाजारातील ब्रोकर्स, सब ब्रोकर्स आणि सहयोगी बँक अथवा संस्था यांची नोंदणी नियंत्रित करणे.
 • म्युच्युअल फंड प्रक्रियेचे नियमन करणे.
 • स्टॉक एक्सचेंजला नियमित चौकशी आणि ऑडिट करण्यासाठी परवानगी देणे.
 • कंपनीचा ताबा मिळविण्यासाठी नियम सूची स्थापित करणे.
 • खाजगी प्लेसमेंटवर निर्बंध घालणे.
 • शुल्क आकारणी नियंत्रित करणे.

3. विकासात्मक कार्य

विकासात्मक कामे ही साधारणतः शेअर बाजारातील सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने केली जातात, ही कामे कोणती याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

 • शेअर बाजारतील मध्यस्थांना प्रशिक्षण सत्र देणे.
 • डिमॅट खात्याचे स्वरूप सादर करणे.
 • स्वनियमन संस्थांना प्रोत्साहन देणे.
 • योग्य व्यवहारांना प्रोत्साहन देणे.
 • ब्रोकरेज डिस्काउंट देणे.
 • शेअर बाजारात नोंदी असलेल्या ब्रोकर्सद्वारे ऑनलाईन ट्रेडिंग सुरु करणे.

सेबी चे अधिकार

कार्य पार पाडण्यासाठी सेबीला कोणकोणते अधिकार बहाल करण्यात आले आहेत, याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

 • दलाल आणि उप-दलाल यांची नोंदणी करणे.
 • शेअर बाजारासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीला मंजुरी देणे.
 • शेअर बाजारासंबंधित नियमांमध्ये सुधारणा करणे.
 • आर्थिक मध्यस्थिती करणाऱ्या संस्थेच्या खात्यांसंबंधित पुस्तकांची (Account Book) तपासणी करणे.
 • कंपन्यांना शेअर बाजारात सूचिबद्ध करणे.
 • काही ठराविक कंपन्यांना त्यांचे शेअर्स एक किंवा एकापेक्षा अधिक Security Exchange मध्ये सूचिबद्ध करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणणे.

सेबी ची उद्दिष्टे

सेबी आपल्या कार्यातून कोणकोणती उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करते, याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

1. गुंतवणूकदारांचे हित

गुंतवणूकदार हा शेअर बाजारातील सर्वात मुख्य घटक आहे. जो पर्यंत गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या सुरक्षेची हमी मिळत नाही तो पर्यंत शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढणार नाही, त्यामुळे सेबी चे प्राथमिक उद्दिष्ट्य म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे हक्क आणि हित यांची रक्षा करून त्यांना निरोगी वातावरणात मार्गदर्शन करणे आणि त्यांनी गुंतविलेल्या पैशांचे संरक्षण करणे हे आहे.

2. निपक्ष कामकाजाला प्रोत्साहित करणे

भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचे वाईट परिणाम सहन करावे लागले, त्यामुळे शेअर बाजाराचे कामकाज योग्य रित्या राखण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारद्वारे सेबीची स्थापन करण्यात आली आहे. शेअर बाजारासंबंधित इतिहासातील घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भारत सरकारने सेबीला आर्थिक मध्यास्थ्यांच्या क्रियापलांवर लक्ष ठेवण्याचे व शेअर बाजारातील कंपन्यांचे संपूर्ण क्षमतेने नियमन करण्याचे आदेश दिले आहेत.

3. गैरप्रकारांवर प्रतिबंध घालणे

सेबीच्या स्थपनेचा मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणुकी संबंधित गुंतवणूकदरांची होणारी फसवणूक आणि गैरप्रकारांवर प्रतिबंध घालणे होय. गैर प्रकरणामध्ये इनसाईडर ट्रेडिंग सारख्या क्रियांना आळा घालण्याचे कार्य पार पाडले जाते.

4. आचासंहिता राखणे

शेअर बाजारातील दलाल, अंडररायटर (underwriter) व इतर महत्वपूर्ण घटक यांच्याकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सेबीने आचारसंहिता विकासीत करणे गरजेचे आहे.


सेबी चे विविध विभाग

सेबी अंतर्गत येणाऱ्या २० विविध विभागाद्वारे सेबी भारतीय वित्तीय बाजाराचे नियमन करते, हे २० विभाग कोणते याचा आढावा आपण खालील तक्त्यात घेणार आहोत,

क्रं.   विभाग
१  महामंडळ वित्त विभाग
२ आर्थिक आणि धोरण विश्लेषण विभाग
३ कर्ज आणि हायब्रीड सिक्युरिटीस विभाग
४ वस्तू व्युत्पन्न बाजार नियामक विभाग
५ अंमलबजावणी विभाग – १
६ अंमलबजावणी विभाग – २
७ चौकशी आणि निर्णय विभाग
८ सामान्य सेवा विभाग
९ मानवी संसाधन विभाग
१० माहिती तंत्रज्ञान विभाग
११ एकात्मिक पर्यवेक्षण विभाग
१२ चौकशी/तपास विभाग
१३ गुंतवणूक व्यवस्थापन विभाग
१४ कायदेशीर व्यवहार विभाग
१५ बाजार मध्यस्थ नियमन आणि पर्यवेक्षण विभाग
१६ बाजार नियमन विभाग
१७ आंतराष्ट्रीय घडामोडींचे कार्यालय
१८ गुंतवणूकदार सहाय्य आणि शिक्षण कार्यालय
१९ अध्यक्ष कार्यालय
२० प्रादेशिक कार्यालय


FAQ

1. सेबी ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

उत्तर : सेबी ची स्थापन ही मुळात १२ एप्रिल १९८८ मध्ये करण्यात आली होती, परंतु ३० जानेवारी १९९२ मध्ये सेबी कायद्या अंतर्गत सेबी ला अधिकार बहाल करण्यात आले.

2. सेबी चे मुख्य कार्यालय कोठे आहे ?

उत्तर : महाराष्ट्रातील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे सेबी चे मुख्य कार्यालय आहे.

3. सेबी चे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर : सुरेंद्र अंबालाल दावे हे सेबी चे पहिले अध्यक्ष होते.

4. सेबी चे वर्तमानकालीन अध्यक्ष कोण ?

उत्तर :  “Madhabi Puriv Buch” या सेबीच्या वर्तमानकालीन अध्यक्ष आहेत.

5. सेबीचा मालकी हक्क कोणाकडे आहे ?

उत्तर : सेबीचा मालकी हक्क “वित्त मंत्रालय भारत सरकार” कडे आहे.

अधिक लेख –

1. शेअर बाजार संपूर्ण माहिती

2. IPO चा फुल फॉर्म काय ?

3. निफ्टी म्हणजे काय व निफ्टीची गणना कशी करावी ?

4. FD म्हणजे काय व FD चे फायदे कोणते ?

Leave a Comment