समुपदेशन म्हणजे काय व समुपदेशनाचे फायदे कोणते ?

आपले दैनंदिन जीवन हे काही साधे व सरळ राहिले नाही. आधुनिकीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे जीवनात काही नव्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत, ज्यामुळे जीवन अगदी गुंतागुंतीचे झाले आहे. जीवनातील संघर्ष हा पूर्वी पेक्षा अधिक तीव्र झाला आहे.

आधुनिक जगात जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या या युगात व्यक्तीला आपल्या गरजा पूर्ण करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा वेळी जी गोष्ट आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते ते म्हणजे समुपदेशन होय.

समुपदेशन म्हणजे काय

समुपदेशन हा मार्गदर्शन प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग समजला जातो. समुपदेशन ही एक अर्वाचीन संकल्पना आहे. समुपदेशनाला सहमंत्रणा असे देखील म्हटले जाते. समुपदेशना दरम्यान ठराविक समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. ही समस्या व्यावसायिक जीवनातली व वैयक्तिक जीवनातील असू शकते.

या लेखात आपण समुपदेशन या संकल्पनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत,


समुपदेशन म्हणजे काय ?

समुपदेशन हा मार्गदर्शन प्रक्रियेमधील एक महत्वाचा भाग मानला जातो, याला सहमंत्रणा असे म्हटले जाते. सहमंत्रणा म्हणजे विशेष कारणास्तव बोलविलेली एक औपचारिक सभा होय.

समुपदेशनासाठी इंग्रजीत “कॉउंसेल्लिंग (Counselling)” हा शब्द वापरला जातो.  समुपदेशन दरम्यान लोकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाते व समस्यांमधून मार्ग काढण्याचे कार्य पार पाडले जाते. समुपदेशना-दरम्यान दोन अथवा दोनपेक्षा अधिक लोकांचा सहवास असू शकतो.

समुपदेशनात साधारणतः दोन घटक महत्वाचे असतात, ज्यातील पहिला घटक म्हणजे समुपदेशक (Counsellor) व दुसरा घटक म्हणजे समुपदेश्य (प्रेक्षक अथवा श्रोता वर्ग) असतो.समुपदेशकाद्वारे समुपदेशन पार पडले जाते व समुपदेश्यांच्या समस्यांमधून मार्ग काढला जातो.


स्वरूप

समुपदेशन ही दोन व्यक्तीं दरम्यान घडणारी प्रक्रिया असून त्यातील व्यक्ती ही प्रशिक्षित अथवा अधिक अनुभवी असू शकते.

स्वतःची समस्या स्वतः सोडविण्याइतकी व्यक्ती सक्षम करणे हा समुपदेशनाचा मूळ उद्देश मानला जातो. समुपदेशनासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीची अधिकतर निवड केली जाते. समुपदेशन करणाऱ्या व्यक्तीला समुपदेशक (Counselor) तर समुपदेशनाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला समुपदेश्य असे म्हटले जाते.

समुपदेशनात समुपदेशक आणि समुपदेश्य यांच्या दरम्यान एक विशिष्ट्य नाते निर्माण होणे आवश्यक असते, त्या शिवाय समुपदेशनाचा लाभ होत नाही.
समुपदेशन ही प्रक्रिया दोन अथवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींच्या सहवासात घडणारी प्रक्रिया असते.


समुपदेशनाचे टप्पे

1. परिचय

समुपदेशनातील परिचयाचा टप्पा हा महत्वाचा मानला जातो, कारण सल्लागार आणि सल्लार्थी याचा होणारा परिचयामुळे परस्परांसंबंधित आत्मविश्वास निर्माण होत असतो, ज्यामुळे समुपदेशनात पुढील संवादाला चालना मिळते.

2. स्पष्टीकरण

दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच स्पष्टीकरणा-दरम्यान सल्लागार हा सल्लार्थीला समुपदेशन म्हणजे काय व समुपदेशना दरम्यान सल्लार्थीला कोणते सहाय्य केले जाईल या बद्दल माहिती दिली जाते.

3. माहिती

स्पष्टीकरण झाल्यानंतर, सल्लागाराद्वारे सल्लार्थी संबंधित माहितीचा आढावा घेतला जातो. सल्लागाराद्वारे सल्लार्थी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीचा आढावा घेतला जाऊ शकतो. उदा. वैयक्तिक जीवन अथवा व्यावसायिक जीवन

4. माहिती संघटन आणि अर्थनिर्वचन

माहिती चे संघटन केल्यानंतर, सल्लागार व सल्लार्थी यांच्याद्वारे संघटित माहितीवर चर्चा केली जाऊ शकते अथवा त्याचे निर्वचन केले जाऊ शकते.

5. निर्णय निश्चिती

समुपदेशनात सल्लार्थीच्या समस्यांवर चर्चा केली जाते व त्या समस्यांवर योग्य निर्णय घेतले जातात.

6. निर्णयाचे उपयोजन

सल्लार्थीद्वारे ठरविलेल्या निर्णयाचे उपयोजन करण्यास सल्लागार सल्लार्थीला मदत करतो. अर्थातच निर्णयाचे उपयोजन करतो.

7. मूल्यमापन

निर्णयांचे उपयोजन झाल्यानंतर, घेतलेल्या निर्णयांचे काय परिणाम दिसून येतील याचे मूल्यमापन केले जाते.


महत्व

समुपदेशनाचा संबंध थेट व्यक्तीच्या समस्यांशी येत असतो. ज्या वेळी एखादी व्यक्ती स्वतःच्या समस्ये विषयी योग्य निर्णय घेऊ शकत नाही, अशा वेळेस तिच्या मनात आत्मदंषाची भावना निर्माण होय शकते, ही भावना दूर करण्यासाठी व्यक्तीत निर्णयक्षमता असणे फार गरजेचे असते.

निर्णय क्षमता ही साधारणतः स्वतःतील कामातरतांची जाणीव, वस्तू स्थितीचे ज्ञान, त्या वस्तुस्थितीला सामोरे जाण्याची कुवत आणि स्वतः घेतलेल्या निर्णयांच्या परिणामाची जबाबदारी घेण्याची तयारी या तीन बाबींवर अवलंबून असते.

समुपदेशनामुळे या तीनही बाबी सुलभ होण्यास मदत मिळते, या व्यतिरिक्त उत्तम मानसिक आरोग्य घडण्यास देखील मदत मिळते.


उद्दिष्टे

समुपदेशन ही एक उपचारात्मक प्रक्रिया आहे ज्याचा उद्देश व्यक्तींना, जोडप्यांना, कुटुंबांना किंवा गटांना विविध आव्हाने, भावनिक समस्या आणि वैयक्तिक चिंतांवर मात करणे आणि त्यावर मात करणे हे आहे. समुपदेशनाची उद्दिष्टे बहुआयामी आहेत आणि विशिष्ट परिस्थिती, क्लायंटच्या गरजा आणि वापरल्या जाणार्‍या उपचारात्मक दृष्टिकोनावर अवलंबून बदलू शकतात. तथापि, समुपदेशनाच्या काही सामान्य उद्दिष्टांमध्ये हे समाविष्ट आहे:

1. भावनिक आधार

समुपदेशन एक सुरक्षित आणि निर्णायक जागा प्रदान करते जिथे व्यक्ती त्यांच्या भावना, विचार आणि चिंता व्यक्त करू शकतात. भावनिक समर्थन आणि प्रमाणीकरण ऑफर करणे, ग्राहकांना समजले आणि ऐकले जावे असे वाटण्यास मदत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

2. समस्येचे निराकरण

समुपदेशक ग्राहकांसोबत त्यांच्या समस्या आणि आव्हाने ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी काम करतात. अन्वेषण आणि अंतर्दृष्टीद्वारे, ग्राहक या समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी धोरणे आणि उपाय विकसित करू शकतात.

3. आत्म-अन्वेषण

समुपदेशन व्यक्तींना स्वतःची, त्यांची मूल्ये, श्रद्धा, प्रेरणा आणि वर्तन याबद्दल सखोल समजून घेण्यास प्रोत्साहित करते. या आत्म-जागरूकतेमुळे वैयक्तिक वाढ आणि सकारात्मक बदल होऊ शकतात.

4. तणाव आणि चिंता व्यवस्थापन

बरेच लोक तणाव, चिंता आणि इतर भावनिक गडबड व्यवस्थापित करण्यासाठी समुपदेशन घेतात. ग्राहकांना त्यांची भावनिक अवस्था व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी समुपदेशक विश्रांती तंत्रे, मुकाबला करण्याच्या धोरणे आणि माइंडफुलनेस पद्धती शिकवू शकतात.

5. संबंध सुधारणे

समुपदेशन संबंधांमधील संवाद, संघर्ष निराकरण आणि परस्पर कौशल्ये सुधारण्यावर लक्ष केंद्रित करू शकते. हे जोडपे, कुटुंबे किंवा नातेसंबंधातील समस्या हाताळणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.

6. निर्णय घेणे

समुपदेशक ग्राहकांना पर्याय शोधून, साधक-बाधक विचार करून आणि वैयक्तिक उद्दिष्टे स्पष्ट करून माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकतात. हे जीवनातील प्रमुख निर्णय किंवा संक्रमणांसाठी विशेषतः उपयुक्त आहे.

7. वर्तणूक बदल

क्लायंट त्रासदायक किंवा वैयक्तिक वाढीस अडथळा आणणारी वागणूक बदलण्यासाठी समुपदेशन घेऊ शकतात. समुपदेशक अस्वास्थ्यकर सवयी मोडणे आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याबाबत मार्गदर्शन करू शकतात.

8. आत्म-सन्मान आणि आत्मविश्वास निर्माण करणे

समुपदेशन व्यक्तींना सकारात्मक आत्म-प्रतिमा विकसित करण्यास, आत्म-सन्मान वाढवण्यास आणि आत्मविश्वास वाढविण्यात मदत करू शकते. हे विशेषतः ज्यांना स्वत: ची शंका आहे किंवा कमी आत्म-मूल्य आहे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे.

9. नुकसान प्रक्रिया

समुपदेशक व्यक्तींना दुःख आणि नुकसानाचा सामना करण्यास मदत करतात, त्यांना दुःखाच्या टप्प्यांवर नेव्हिगेट करण्यात आणि बरे करण्याचे आणि पुढे जाण्याचे मार्ग शोधण्यात मदत करतात.

10. मानसिक आरोग्य व्यवस्थापित करणे

मानसिक आरोग्य स्थिती असलेल्या ग्राहकांसाठी, समुपदेशन हे एकंदर उपचार योजनेचा भाग असू शकते. हे लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी, सामना करण्याची कौशल्ये वाढविण्यासाठी आणि एकूण कल्याण सुधारण्यासाठी साधने आणि धोरणे प्रदान करू शकतात.

11. आघात पुनर्प्राप्ती

समुपदेशनाचा उपयोग अनेकदा व्यक्तींना आघातजन्य अनुभवातून सावरण्यासाठी मदत करण्यासाठी केला जातो. आघातावर प्रक्रिया करण्यासाठी, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी थेरपिस्ट पुराव्यावर आधारित तंत्रे वापरतात.

12. वैयक्तिक विकास

विशिष्ट समस्यांचे निराकरण करण्यापलीकडे, समुपदेशन वैयक्तिक वाढ आणि विकास सुलभ करू शकते. क्लायंट त्यांची ताकद वाढवणे, ध्येय निश्चित करणे आणि साध्य करणे आणि त्यांची पूर्ण क्षमता ओळखणे यावर कार्य करू शकतात.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की समुपदेशन ही एक सहयोगी प्रक्रिया आहे आणि उद्दिष्टे प्रत्येक क्लायंटच्या अनन्य गरजा आणि उद्दिष्टांना अनुरूप आहेत. अंतिम उद्दिष्ट व्यक्तींना अधिक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आणि भावनिक, मानसिक आणि वर्तणुकीशी कार्य करण्याचे निरोगी मार्ग विकसित करण्यासाठी सक्षम करणे आहे.


वैशिष्ठ्य

 • समुपदेशन हा एक व्यावसायिक कार्यक्रम असतो.
 • समुपदेशन हा संपूर्ण मार्गदर्शन कार्याचा सक्रिय भाग होय.
 • समुपदेशनाची संपूर्ण प्रक्रिया ही अध्ययनाशी निवडीत असते.
 • समुपदेशाना दरम्यान समुपदेशक आणि समुपदेश्य दोघेही हजर असतात.
 • समुपदेशन व्यक्तीच्या समस्यांवर अधिक लक्ष्य केंद्रित करते.
 • समुपदेशन हे पूर्णतः स्वयं मार्गदर्शनावर आधारित असते.
 • समुपदेशन हे एखाद्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तीचे काम असते.
 • समुपदेशना दरम्यान व्यक्तीच्या मानसिक विकासाला केंद्रित केले जाते.
 • प्रत्येक प्रकारच्या समुपदेशना दरम्यान मुलाखत निर्मिती होत असते.
 • समुपदेशनामुळे परस्पर आदर आणि सहानुभूतीची भावना निर्माण होते.

समुपदेशकाचे गुणविशेष

समुपदेशनात समुपदेशक आणि समुपदेश्य यांचे सारखेच महत्व असते, परंतु एक उत्तम समुपदेशन पार पाडण्यासाठी समुपदेशकाकडे साधारणतः कोणते गुण असणे गरजेचे आहे, या संबंधित माहितीचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

1. उत्तम व्यक्तिमत्व

सामाजिक जीवनात एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला अनन्यसाधारण असे महत्व असते, त्यामुळे समुपदेशन पार पाडणाऱ्या समुपदेशकाचे व्यक्तिमत्व उत्तम असणे महत्वाचे आहे. कारण बहुतेकदा समुपदेशनात समुपदेशकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव समोरील व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. या व्यतिरिक्त समुपदेशक दिसण्यास सुंदर नसला तरी चालेल, परंतु व्यक्तीचे व्यक्तिमत्व भारदस्त असावे. पोशाख व्यवस्थित असावा, व्यक्ती रुबाबदार आणि सकारात्मक विचारमत्तेचा असावा.

2. समायोजित वर्तन

समुपदेशक स्वतःच्या परिस्थिती सोबत चांगल्या प्रकारे समायोजित झालेला असला पाहिजे व त्याच प्रकारे त्याचे वर्तन असावे. कारण समायोजित व्यक्ती कधीच इतरांना मार्गदर्शन करू शकत नाही.

3. चारित्र्य संपन्न

समुपदेशक चारित्र्य संपन्न असल्यासोबतच स्नेहशील, दीर्घोद्योगी आणि प्रामाणिक असावा, असा व्यक्ती स्वतःचे कार्य अधिक क्षमतेने पार पाडत असतो.

4. जागरूकता

व्यक्ती जागरूक असावा व अगदी थोडक्या कालावधीत विविध व्यक्तींसोबत व व्यक्तींच्या गटांसोबत संबंध प्रस्थापित करण्याचे व ते हाताळण्याचे कौशल्य त्याच्या अंगी असावे, ज्याने समुपदेश्य समुपदेशनात अधिक रस दाखवतो.

5. उत्तम श्रोता

समुपदेशक एक चांगला वक्ता असल्यासोबतच एक कुशल श्रोता असणे देखील गरजेचे असते, कारण जो पर्यंत आपण समोरील व्यक्तीसोबत व्यवस्थित संवाद साधत नाही, तोपर्यंत त्याच्या समस्यांचा आढावा घेऊ शकत नाही.

6. विनोदी

समुपदेशक अतिगंभीर नसावा, उलट तो विनोदी बुद्धिमतेचा असेल तर, मुलाखतीतील तणाव मोठ्या प्रमाणात कमी होतो, ज्यामुळे समुपदेश्य देखील समुपदेशनात अधिक रस दाखवतो.


फायदे

 • समुपदेशनामुळे व्यक्ती जीवनात उद्भवणाऱ्या समस्येच्या निराकरणासाठी आवश्यक निर्णय घेण्यास सक्षम बनतो.
 • अंतरदृष्टी चा विकास होतो.
 • स्व-जाणिवांचा विकास घडवून येतो.
 • सकारात्मक दृष्टी अधिक दृढ होते.
 • आदर्श असे व्यक्तिमत्व घडून येते.
 • उचित वर्तनाचा विकास होतो.

सारांश

समुपदेशन हे एक अत्यंत जबाबदारीचे काम असते. समुपदेशनाचा प्रभाव एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलू शकतो, त्यामुळे समुपदेशन करणारा व्यक्ती हा एक प्रशिक्षित आणि तज्ज्ञ असावा लागतो. व्यक्तीकडे उत्तम व्यक्तिमत्व, समायोजित वर्तन, जागरूकता, सहानुभूती,, प्रामाणिकपणा आणि मानवी स्वभावाचे व्यापक व सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. समुपदेशनाचा मुख्य उद्देश हा आत्मनिर्भर बनविणे हा असतो.

अधिक लेख –

1. संदेशवहन म्हणजे काय व याचे प्रकार कोणते ?

2. व्यवस्थापन म्हणजे काय व याचे फायदे कोणते ?

3. उदारीकरण म्हणजे काय ?

4. विदारण म्हणजे काय व विदारणाचे प्रकार कोणते ?

Leave a Comment