समाज म्हणजे काय ? (सविस्तर माहिती)

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या माणसाच्या काही मूलभूत गरजा आहेत. समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यांमुळे वस्तूंची निर्मिती होत असते. शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधांमुळे माणूस सन्मानाने जगू शकतो. या सर्व बाबी अथवा सुविधा समाजात उपलब्ध होतात, ज्यामुळे माणूस समाजात राहण्यास प्राधान्य देतो.

या लेखात आपण समाजासंबंधित विविध माहितीचा आढावा सोप्या आणि सरळ शब्दात घेणार आहोत,


समाज म्हणजे काय ?

जेव्हा मानवाद्वारे गट अथवा समूहातील परस्पर संबंधांचे व्यवस्थापन केले जाते, अशा परिस्थितीत समाज अस्तित्वास येतो. अस्तित्वात आलेल्या समाजातील व्यक्तिंच्या वर्तनाचे नियमन झाले की, मग समाजाला एक विशिष्ट असे स्वरूप प्राप्त होते.

 
“विविध अशा नात्यांनी अथवा संबंधांनी आणि वर्तन विशेषांनी बांधल्या गेलेल्या व्यक्तींच्या संघटनात्मक स्वरूपाला समाज असे म्हणतात.”
समाजाची एक विशिष्ठ स्वरूपाची अशी ओळख असते, जी समाजातील लोकांच्या वर्तनातून पटत असते. समाजातील लोकांच्या वैशिष्ठ्य पूर्ण अशा स्वभावधर्मामुळे एक समाज दुसऱ्या समाजापेक्षा वेगळा ठरतो.

“समाज” हा शब्द संघटनात्मक संरचनेला सूचित करतो, त्यामुळेच जमाव, गट, घोळका, समुदाय या शब्दांपेक्षा समाज हा शब्द अधिक व्यापक ठरतो. समाज संघटनेनंतर समुदाय अस्तित्वास येतात. ज्या मानवी समूहात व्यक्तीचे जीवन व्यतीत होते, अशा समूहाला ‘समुदाय‘ या नावाने ओळखले जाते.

देश, शहर आणि ग्रामीण भाग अशा विविध ठिकाणी वावरणाऱ्या लोक समूहाला समुदाय म्हणून ओळखले जाते. इंग्रजीत समुदायाला “community” असे म्हणतात. ग्रामीण भागात वावरणाऱ्या समुदायाला “रूरल कॉम्म्युनिटी” आणि शहरी भागात वावरणाऱ्या समुदायाला “अर्बन कॉम्म्युनिटी” असे म्हटले जाते.


समाजशास्त्र म्हणजे काय ?

माणसाचा समाजासोबत असलेला अंतरसंबंध याचा केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय.” या अभ्यासात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजात अस्तित्वात असलेले रीतिरिवाज यांचा शोध समाजशास्त्रात घेतला जातो. समाजात उद्धभणारे प्रश्न यांची उकल करण्यासाठी समाजशास्त्राची गरज भासते.


प्रकार

आपण समाजाचे साधारणतः तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण करू शकतो, हे तीन प्रकार नेमके कोणते यासंबंधित माहितीचा खालील प्रमाणे घेणार आहोत,

  • आरंभिक समाज 
  • विकसनशील समाज
  • प्रगत अथवा विकसित समाज  

सुरुवातीच्या काळातील समाजाने शिकार करणे, पाळीव प्राण्यांची काळजी घेणे, पशु पालन करणे यांसारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या आणि निसर्गावर आधारित संसाधनांची लागवड करण्यावर लक्ष केंद्रित केले. या व्यतिरिक्त कोणतेही संसाधन स्वतः न तयार करता जे आधीच उपलब्ध आहेत, त्याद्वारे तो स्वतःच्या गरजा भागवत होता. जसे कि प्रवासासाठी पायपीट करणे अथवा घोड्यांसारखे प्राणी उपयोगात आणणे.

विकसनशील समाजांनी स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी विविध पद्धतीच्या प्रणाली तयार केल्या. या प्रणालींमध्ये जी प्राथमिक उत्पादने घेतली जात होती, त्यापैकी अन्न, वस्त्र आणि निवारा हे होते.

प्रगत अथवा विकसित समाजाने भौतिक वस्तू, त्यांचे उत्पादन आणि कल्पनांच्या प्रसाराकडे अधिक लक्ष केंद्रित केले. जसे की वाहन, विमान यांसारख्या वाहतूक पर्यायाचा शोध लावला. परिणामी विकसित समाजाने वैज्ञानिक संशोधनात प्रगतीचा आस्वाद घेतला.


निर्मिती

इतिहासपूर्व काळापासून रानटी अवस्थेतील माणसांच्या टोळ्यांनी स्वतःच्या जीवनक्रमाला सुरुवात केली. अगदी लाखो वर्षांपूर्वी म्हणजेच आदीअश्मयुगात माणसांनी शिकारीसाठी विविध लाकडी आणि दगडी हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये भाला, धनुष्यबाण यांसारख्या हत्यारांचा समावेश होता. मानवी इतिहासात हा प्रगतीचा महत्वाचा टप्पा मानला जातो.

कालांतराने याच युगात माणसाने लाकूड तोडने, चाक तयार करणे, झाडांच्या साली काढणे, मृत जनावरांच्या कातडी काढणे या क्रिया आत्मसात केल्या. या क्रियांसाठी माणसाला प्रथम समूहाची गरज भासू लागली, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

इ.स. पूर्व पाचशेच्या दरम्यान म्हणजेच ताम्रपाषाण युगात माणसाने वसाहती करण्यास सुरुवात केली. याच काळात माणसाचे भटकंतीचे आयुष्य संपले आणि संघटित स्वरूपाचे सामाजिक जीवन आकार घेऊ लागले. लोक समूहाने राहण्यास प्राधान्य देऊ लागले आणि अशा प्रकारे समाज ही संकल्पना वाढीस लागली.


महत्व

समाज हा संपूर्ण जीवन चक्रातील एक अविभाज्य असा भाग आहे. जीवनातील विविध पायाभूत गरजांपैकी समाज एक आहे. सुरळीत जीवन जगण्यासाठी समाज सर्वात महत्वाचा ठरतो.

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, ज्या मानवाला जीवन जगण्यासाठी सहाय्य करतात. या गरजा मानव एकटा पूर्ण करू शकत नाही, यासाठी एक मानव दुसऱ्या मानवावर अवलंबून राहतो अथवा यासाठी मानवाला इतर मानवाची गरज भासते, ही गरज समाजामुळे अथवा समाजाद्वारे पूर्ण होते.

उदा. एकटा व्यक्ती स्वतःच्या कुटुंबाची अन्नाची, वस्त्रांची गरज भागवू शकत नाही, या गरजा भागविण्यासाठी त्याला समाजातील विविध घटकांवर अवलंबुन रहावे लागते. उदा शेतकरी.

समाजामुळे न केवळ इतर व्यक्तींचा सहवास मिळतो, तर सोबतच कामात अधिक कुशलता दिसून येते. अन्न, वस्त्र, निवाऱ्या व्यक्तिरिक्त कठीण परिस्थितीत अथवा संकट काळात समाज आणि समाजातील लोक महत्वपूर्ण भूमिका बजावतात.

पूर्वी म्हणजेच जेव्हा लोक भटकंती करत होते, तेव्हा आपल्या आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी लोक समूह करून राहत होते, त्यामुळे न केवळ मूलभूत गरज भागविण्यासाठी तर सोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देखील समाज महत्वाचा ठरतो.


नियम

समाजात वावरणाऱ्या लोकांद्वारे समाजाचे व्यवहार सुरळीत चालावेत, यासाठी कायदे, नियम यांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन हे भाहुतांशी विविध रूढी-परंपरा यांच्याद्वारे केले जात असते, परंतु आधुनिक समाजाचे नियमन हे न केवळ रूढी परंपरा यांच्याद्वारे केले जाते, तर समाजातून मिळणारे संकेत यांच्याद्वारे देखील केले जाते.

आपल्या रूढी-परंपरा, संकेत इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप हे फार वेगळे असते. हे सर्व घटक लक्षात घेऊन आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था व संघटनक करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमनाच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावतात.


सहभाग

समाजात सहवास करत असताना न कळत आपल्या अंगी काही गुणी आत्मसात होतात व सोबतच आपल्याला नवनवीन संधी उपलब्ध होतात, ज्या आपल्या संपूर्ण जीवनाच्या वाटचालीसाठी महत्वपूर्ण ठरतात. हे गुण नेमके कोणते, याचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

सहकार्य – कोणताही समाज हा समाजातील व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्य यावर आधारलेला असतो. व्यक्ती-व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाजाचे अस्तित्व टिकू शकत नाही.

परस्पर अडचणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय.

सहकार्य अभावी आपला विकास रखडेल, सोबतच दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्य अथवा मदतीमुळे समाजातील परस्परावलंबण अधिक निकोप होते, समाजातील सर्वांना सामावून घेता येते.

सहिष्णुता आणि सामंजस्य – समाजात ज्याप्रमाणे सहकार्य असते, अगदी तसेच अनेकदा मतभेत, वाद आणि संघर्ष देखील निर्माण होत असतात. दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये जेव्हा मते, विचार आणि दृष्टीकोन जुळत नाहीत, तेव्हा वाद आणि निर्माण होऊ शकतो.

एकमेकांविषयी असणारे गैरसमज हे देखील अनेकदा वाद अथवा संघर्षाचे कारण बनू शकतात. अशात सामंजस्य दाखवणे आणि वाद संपवणे अधिक लाभकारक ठरते. सामंजसपणा हा समाजात वावरत असताना व समाजातील विविध घटनांचा आढावा घेत असताना आपल्या अंगीकृत होतो.

विविध भूमिका पार पाडण्याची संधी – समाजात वावरताना आपल्या वाट्याला विविध भूमिका येत असतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असतो. व्यक्तीद्वारे पार पाडल्या जाणाऱ्या प्रत्येक भूमिकेची जबाबदारी आणि कर्तव्य ठरलेली असतात. अनेकदा कुटुंबात आणि समाजात आपण केवळ या भूमिकांमुळेच एकमेकांसोबत जोडले जातो.


वैशिष्ठ्य

 1. परस्परावलंबन

समाजाचे एक प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे परस्परावलंबन होय. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, जो एकटा राहून स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, त्याला इतरांवर अवलंबून रहावे लागते. या परस्परावलंबन प्रक्रियेमुळेच समाजात लोक एकमेकांसोबत जोडले जातात.

2. अमूर्तता

समाज हा लोकांचा समूह नसून, मानवीय अंतरसंबंधांचे एक व्यवस्थापन आहे असे आपण म्हणू शकतो. हे संबंध अमूर्त असतात. अमूर्त म्हणजे ज्याला पाहता आणि स्पर्श करता येत नाही परंतु त्याचे अस्तित्व असते असे. समाज ही कोणतीही वस्तू नाही, ज्याला आपण आपल्या इंद्रियांचा उपयोग करून स्पर्श करू शकतो, तर समाज हा अमूर्त आहे जो लोकविचारावर आधारित आहे.

3. व्यापक संस्कृती

समाजात अगणित समूह असतात. या समूहांना वांशिक समूह असे म्हटले जाते. या वांशिक समूहांची स्वतःची एक वेगळी संस्कृती असते, जी लोकांच्या भाषेतून, खान-पानातून, जीवन पद्धतीतून, पोशाखातून आणि सण-उत्सवांमधून दिसून येते. या उप संस्कृती कालांतराने व्यापक होत राहतात.

भारतात अनेकानेक उप-संस्कृती आहेत. भारतात प्रत्येक राज्यात आपल्याला नवीन संस्कृतीचा अनुभव येतो. उप संस्कृतींमध्ये विभिन्नता असूनही, काही अशी मूलभूत तत्वे आहेत, ज्यामुळे या उप संस्कृतींना जोडून भारतीय संस्कृती बनते.

4. कामाची विभागणी

समाजाचे उपक्रम हे कधीच एकसारखे नसतात, याचे मुख्य कारण म्हणजे समाजाच्या वैविध्यपूर्ण गरजा होय. समाजातील काही लोक शेतात राबतात, तर काही लोक उद्योग-व्यवसाय करतात. प्रत्येक जण शेती अथवा व्यवसाय करू शकत नाही.

पूर्वी समाजात जातींवरून कामाची विभागणी केली जाते असे,  म्हणजे कुंभार भांडी घडवणार, तेली तेलाचा व्यवसाय करणार, क्षत्रिय समाजाचे संरक्षण करणार आणि अधिक.

आधुनिक समाजात कामाची परिभाषा पूर्णतः बदलली आहे. वर्तमान काळात जातींवरून नव्हे, तर कौशल्यावरून कामाची विभागणी केली जात आहे.

Leave a Comment