RTO चा फुल्ल फॉर्म काय ? | RTO Full Form In Marathi

दळणवळण क्षेत्र किंवा ट्रान्सपोर्ट क्षेत्र हे जगातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. भारतात प्रत्येक राज्यात ह्या क्षेत्राशी संबंधित, विविध सेवा भारत सरकार द्वारे पुरवल्या जातात.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा RTO हा शब्द ऐकत असतो, परंतु याबाबत अनेकांना अपूर्ण माहिती असते किंवा बिलकुल माहिती नसते, म्हणून या लेखात आपण RTO विषयी विविध प्रकारची माहिती पाहणार आहोत, जसे कि आरटीओ म्हणजे नेमके काय, RTO Full Form In Marathi, आरटीओ कोणते कार्य पार पडते इत्यादी.


RTO म्हणजे काय ?

२०१० च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२३ करोड इतकी होती आणि हाच आकडा वर्तमानकाळात १३० करोड पेक्षा देखील अधिक आहे, एकशे तीस करोड पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ह्या देशात भारत सरकार द्वारे विविध सेवा सुविधा पुरवल्या जातात, तसेच विविध उपक्रम देखील राबवले जातात, त्यातील एक सेवा विभाग म्हणजे RTO किंवा RTA होय.

RTO हे भारत सरकार द्वारे चालवण्यात येणाऱ्या एक सेवा विभाग आहे, जे भारताच्या प्रत्येक राज्यात कार्यरत असते. हे विभाग जिल्ह्यानुसार किंवा राज्यानुसार वाहने आणि वाहन चालक यांचा संपूर्ण डेटाबेस उपलब्ध करून सरकारपर्यंत पोहचवते, तसेच ट्रान्सपोर्ट क्षेत्रात चालणाऱ्या घोटाळ्यांवर देखील कारवाया करते.


RTO Full Form In Marathi

RTO ला RTA ह्या नावाने देखील ओळखले जाते, म्हणून इथे आपण दोन्ही शब्दांचा फुल फॉर्म आणि मराठीत अर्थ जाणून घेणार आहोत,

1. [ R.T.O ]

R – Reginal [ प्रादेशिक ]

T – Transport [ परिवहन ]

O – Office [ कार्यालय ]

2. [ R.T.A ]

R – Reginal [ प्रादेशिक ]

T – Transport [ परिवहन ]

A – Authority [ प्राधिकरण ]


RTO चे कार्य

आरटीओ द्वारे विविध कार्य पार पाडले जातात, परंतु बहुतांश लोकांना त्या बाबत इतकी माहिती नसते म्हणून इथे आपण आरटीओद्वार केल्या जाणार्‍या काही कामांची माहिती अगदी थोडक्यात पाहणार आहोत,

आरटीओ ड्रायव्हिंग लायसन्स, परिक्षण आणि लर्निंग लायसन्स, लायसन्स चे नवीनीकरण, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स, कंडक्टर लायसन्स असे विविध प्रकारचे लायसन्स उपलब्ध करून देते.

  • वायु प्रदूषण हि अगदी वेगाने वाढणारी समस्या आहे, ह्याचे मुख्य कारण म्हणजे वाहनांची वाढती संख्या. प्रदूषणावर आळा घालण्यासाठी वाहनांचे LPG मध्ये रूपांतर करण्यासाठी आणि PUC म्हणजेच पोल्युशन कंट्रोल कंट्रोल ( Pollution Under Control ) तपासणीसाठी आरटीओ द्वारे विविध ठिकाणी सेवा केंद्रे उभारण्यात आली आहेत.  LPG मध्ये रूपांतर म्हणजेच जी वाहने पेट्रोलवर धावत आहेत, अशा वाहनांमध्ये LPG सिलेंडर बसवून त्यांना LPG गॅस वर चालण्यायोग्य करणे आणि PUC म्हणजे वाहनांमधून किती धूर निघतोय याची तपासणी करणे.
  • वाहनांचे रजिस्ट्रेशन करणे, परमिट जारी करणे, परमिटचे नवीनीकरण करणे, आरसी मध्ये रेकॉर्ड ठेवणे, वाहनांसाठी एनओसी प्रसारित करणे, वाहनांसंबंधित विविध प्रकारचे कर गोळा करून सरकारपर्यंत पोहोचवणे अशी वाहनं संबंधित कामे पार पाडली जातात.
  • चेक पोस्ट म्हणजे टोलनाक्यावर आरटीओ ऑफिसर द्वारे वाहनांचे निरीक्षण करून त्या संबंधित सूचना दिल्या जातात किंवा फाईन मारले जातात जाने भविष्यात येणारे संकट टाळले जाईल.
  • वाहन आणि वाहन मालकाचा किंवा चालकाचा डेटा सरकारपर्यंत पोचवणे.
  • वाहनांच्या कागद पात्रांची तपासणी करणे.

महाराष्ट्रात एकूण किती RTO आहेत ?

संपूर्ण भारतात एकूण ११०० पेक्षा अधिक आरटीओ आहेत, ज्यातील ५० RTO हे एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत, ज्यांची नावे आणि RTO Code खालील तक्त्यात,

क्रं RTO चे नाव इंग्रजीत RTO चे नाव मराठीत RTO कोड
Thane ठाणे MH 04
Mumbai ( Central ) मुंबई सेंट्रल MH 01
Wardha वर्धा MH 32
Amravati अमरावती MH 27
Gadchiroli गडचिरोली MH 33
Kolhapur कोल्हापूर MH 09
Mumbai West पश्चिम मुंबई MH 02
Yavatmal यवतमाळ MH 29
Kalyan कल्याण MH 05
१० Akola अकोला MH 30
११ Chandrapur चंद्रपूर MH 34
१२ Raigad – Pen रायगड – पेन MH 06
१३ Satara सातारा MH 11
१४ Gondia गोंदिया MH 35
१५ Malegaon मालेगाव MH 41
१६ Dhule धुळे MH 18
१७ Solapur सोलापूर MH 13
१८ Hingoli हिंगोली MH 38
१९ Sangli सांगली MH 10
२० Nashik नाशिक MH 15
२१ Vashi ( Navi Mumbai ) वाशी ( नवी मुंबई ) MH 43
२२ Baramati बारामती MH 42
२३ Bhandara भंडारा MH 36
२४ Shrirampur श्रीरामपूर MH 17
२५ Beed बीड MH 23
२६ Aurangabad औरंगाबाद MH 20
२७ Osmanabad उस्मानाबाद MH 25
२८ Jalna जालना MH 21
२९ Latur लातूर MH 24
३० Jalgaon जळगाव MH 19
३१ Ambajogai अंबेजोगाई MH 44
३२ Parbhani परभणी MH 22
३३ Borivali बोरिवली MH 47
३४ Vasai वसई MH 48
३५ Akluj आकलूज MH 45
३६ Nagpur East नागपूर पूर्व MH 49
३७ Nandurbar नंदुरबार MH 39
३८ Washim वाशीम MH 37
३९ Nagpur Rural नागपूर ग्रामीण MH 40
४० Pimpri पिंपरी MH 14
४१ Nagpur Urban नागपूर शहरी MH 31
४२ Mumbai East मुंबई पूर्व MH 03
४३ Buldhana बुलढाणा MH 28
४४ Nanded नांदेड MH 26
४५ Sindhudurg सिंधुदुर्ग MH 07
४६ Ratnagiri रत्नागिरी MH 08
४७ Pune पुणे MH 12
४८ Panvel पनवेल MH 46
४९ Karad कराड MH 50
५० Ahmednagar अहमदनगर MH 16

 

 


 


राज्यांची नावे व RTO कोड

भारतात सर्वच राज्यात RTO कार्यरत असून, प्रत्येक राज्यातील RTO द्वारे गाडयांना विविध अक्षर रुपी कोड दिले जातात, जसे कि MH, UP, ज्यावरून वाहन कोणत्या राज्याचे आहे, ह्याची ओळख पटवणे सोप्पे जाते, इथे आपण विविध राज्यांची नावे आणि त्यांचे RTO कोड खालील तख्त्यात पाहणार आहोत,
 
क्रं राज्याचे इंग्रजी नाव राज्याचे मराठीत नाव RTO कोड
Maharashtra महाराष्ट्र MH
2 Gujarat गुजरात GJ
Tripura त्रिपुरा TR
Punjab पंजाब PB
Bihar बिहार BR
Uttar Pradesh उत्तर प्रदेश UP
Assam आसाम AS
Himachal Pradesh हिमाचल प्रदेश HP
Mizoram मिझोरम MZ
१० Arunachal Pradesh अरुणाचल प्रदेश AP
११ Haryana हरियाणा HR
१२ Jharkhand झारखंड JH
१३ Andhra Pradesh आंध्रप्रदेश AP
१४ Nagaland नागालँड NL
१५ Rajasthan राजस्थान RJ
१६ Goa गोवा GA
१७ Chhattisgarh छत्तीसगड CG
१८ Karnataka कर्नाटक KA
१९ Manipur मणिपूर MN
२० Kerala केरळ KL
२१ Sikkim सिक्कीम SK
२२ Jammu Kashmir जम्मू काश्मीर JK
२३ Madhya Pradesh मध्यप्रदेश MP
२४ Odisha ओडिसा OD
२५ Tamil Nadu तामिळनाडू TN
२६ Telangana तेलंगणा TS
२७ West Bengal पश्चिम बंगाल WB
२८ Uttarakhand उत्तराखंड UK

RTO विभागाची उद्दिष्ठे

दळणवळण व्यवसाय अथवा ट्रान्सपोर्ट सेवा ही प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे असते, ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात कर प्राप्त होते, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम होतो, शिवाय देशातील अधिक तर उद्योगधंदे हे दळणवळण व्यवसायावरच अवलंबून असतात.

गेल्या दहा ते पंधरा वर्षात तंत्रज्ञानात वेगाने विकास घडून येत असल्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाला देखील चालना मिळत आहे. औद्योगिक विकासामुळे ट्रान्सपोर्ट सेवांवर अगदी वेगाने ताण वाढत आहे, शिवाय आज प्रत्येक व्यक्तीकडे दुचाकी आणि चार चाकी वाहने आहेत ज्यामुळे दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या अगदी वेगाने वाढत असल्यामुळे ट्राफिक होणे, गाड्यांचे अपघात, हवेचे प्रदूषण ह्यात देखील सातत्याने वाढ होत आहे.

ज्यामुळे भारत सरकार द्वारे सुरु केलेल्या वाहतुकीच्या इतर सुविधांवर ह्याचा वाईट परिणामी दिसून येत आहे, ज्यामुळे वायू प्रदूषण रोखणे, चालकांचा डेटा सांभाळणे, वाहनांची नोंदणी करणे अशा काही सेवा मंदावत आहेत, हे सर्व मॅनेज करण्यासाठी आणि १९८८ च्या अंतर्गत असलेले नियम यांची अंमलबजावणी करण्याकरिता RTO विभागाची स्थापना भारत सरकारद्वारे करण्यात आली आहे.


FAQ

1. आरटीओ चा फुल फॉर्म काय आहे ?

उत्तर : आरटीओ चा फुल फॉर्म “Reginal Transport Office” असून याचा मराठी अर्थ “प्रादेशिक परिवहन कार्यालय” असा आहे.

2. आरटीओची गरज का आहे ?

उत्तर : भारतातील परिवहन सुव्यवस्थित राखण्यासाठी भारतात RTO गरजेचे आहे.

3. भारतात किती आरटीओ आहेत ?

उत्तर : वर्तमान काळात भारतात एकूण 1100 पेक्षा RTO अधिक आहेत.

4. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी RTO कर आहे ?

उत्तर : भारतातील हिमाचल प्रदेश या राज्यात सर्वात कमी RTO कर आहे.

5. भारतात किती वाहनांची नोंदणी आहे ?

उत्तर : एक रिपोर्टनुसार, 2022 मध्ये एकूण 326.३ दशलक्ष इतक्या वाहनांची नोंदणी होती.

6. महाराष्ट्रात एकूण किती RTO आहेत ?

उत्तर : महाराष्ट्रात एकूण 50 RTO आहेत.

अधिक लेख :

1. WTO Full Form in Marathi

2. CBI Full Form In Marathi

3.ED Full Form In Marathi

4. IFS Full Form in Marathi

Leave a Comment