रेडिओचा शोध कोणी लावला ? | Radio Cha Shodh Koni Lavla

गेल्या अनेक वर्षांमध्ये न केवळ भरतात तर संपूर्ण जगात तंत्रज्ञान विकास अगदी वेगाने होत आहे, ज्यामुळे नवनवीन यंत्र लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत आणि  बनत आहेत, त्यातीलच एक म्हणजे मोबाईल.

मोबाईल मुळे मनोरंजनाचे अनेक स्त्रोत उभे राहिले आहेत, पण जर आपण आजपासून १५ ते २० वर्षांपूर्वी पाहीले, तर मनोरंजनाचे मुख्य साधन रेडिओ ला मानले जात होते, परंतु कालांतराने त्याचा वापर आणि महत्व कमी होऊ लागले.

तुम्हाला माहीत आहे का की, आज आपण जे मोबाईल, टीव्ही वापरतो त्याचा पाया हा रेडिओच आहे. ह्याची अनेक लोकांना माहिती नसेल. अशात एक महत्वाचं प्रश्न उभा राहतो तो म्हणजे रेडिओचा शोध कोणी लावला (Radio cha shodh koni lavla).

ह्या लेखात आपण रेडिओ बद्दल विविध प्रकारच्या माहितीचा आढावा घेणार आहोत,


रेडिओ म्हणजे काय ?

रेडिओ म्हणजे एक असे यंत्र, जे विजेचा वापर करून इलेकट्रोमॅग्नेटिक तरंगे ( Wave ) तयार करते, ज्यांच्या द्वारे संदेशाची देवाण घेवाण केली जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पाठवणाऱ्या रेडिओ ला ट्रान्समीटर तर तरंगे म्हणजेच वेव्ह स्वीकारून त्याचे रूपांतर आवाजात करणाऱ्या रेडिओ ला Receiver असे म्हटले जाते. रेडिओ ३०० Hz इतक्या क्षमतेने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करू शकते.


रेडिओ जॉकी (RJ) म्हणजे काय ?

जे व्यक्ती रेडिओ वर चालणाऱ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात, अशा व्यक्तींना RJ किंवा Radio Jocky असे म्हणतात.

RJ  अर्चना महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध Radio Jocky असून तिच्या द्वारे सूत्रसंचालन केला जाणारा रेडिओ वरील ” कसं काय मुंबई ” हा कार्यक्रम महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे, खास करून मुंबई शहरात.


रेडिओ चे कार्य

रेडिओ सिग्नल तयार करून त्याची देवाण घेवाण करण्याचे काम करते. मुख्यतः रेडिओ विजेचा वापर करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह्स तयार करते, ज्यांची वारंवारता हि ३० Hz ते ३०० Hz इतकी असते.

रेडिओ मध्ये एक ट्रान्समीटर नामक यंत्र असते, ज्याच्या द्वारे रेडिओ वेव्हस तयार करते. हे ट्रान्समीटर एका अँटीना ला जोडलेले असते, जे तयार केलेले वेव्हस वातावरणात पसरवते आणि दुसऱ्या ठिकाणी असलेले Receiver अँटेना ते वेव्हस capture करून त्याचे रूपांतर आवाजात करण्याचे काम करते.

आज विविध क्षेत्रात, विविध पद्धतीने आणि विविध यंत्रांमध्ये रेडिओ चा मोठया प्रमाणात वापर केला जाऊ लागला आहे, जसे कि रडार पद्धत, रडार कोम्मुनिकेशन पद्धत, रडार रिमोट कंट्रोल पद्धत आणि अधिक

रडार कोम्मुनिकेशन वापर मुख्यतः टीव्ही, मोबाइल आणि वायरलेस नेटवर्किंग मध्ये केला जातो.

रडार चा वापर लढाऊ विमान, पाण्यातील जहाज, पाणबुडी ह्यांसारख्या यंत्रांमध्ये केला जातो, ज्यामुळे आपल्या टार्गेट चे लोकेशन मिळवणे सोपे जाते.

रडार रिमोट कंट्रोल पद्धतीचा चा वापर ड्रोन, रिमोट कंट्रोल कार ह्यांसारख्या गोष्टींमध्ये होतो. ह्या मध्ये ट्रान्समीटर हे receiver ला कमांड देण्याचे काम करते.


रेडिओ चे प्रकार

कालांतराने जस जसे रेडिओ तंत्रज्ञानात विकास होत गेला तसे तसे रेडिओ चे नवनवीन प्रकार उदयास आहे, त्यातीलच तीन मुख्य प्रकारच्या रेडिओ च्या माहितीचा आढावा खालील प्रमाणे:

1. ए.एम रेडिओ [AM Radio]

AM रेडिओ ची सुरुवात साल १९०० च्या दरम्यान झाली. AM रेडिओ ची कमीतकमी वेळात जास्त लोकप्रियता मिळविण्याचे मुख्य कारण म्हणजे Vaccum Tube ट्रान्समीटर आणि रिसीव्हरचा शोध.

गाणे आणि आवाज वेव्ह च्या द्वारे पाठविण्यासाठी तयार केलेली AM रेडिओ हि जगातील पहिली यंत्रणा होती. ह्या आधी रेडिओ द्वारे संपर्क केला जात होता, परंतु एका विशिष्ट पद्धतीने. ठराविक frequency च्या काही खुणा ठरविल्या जात होत्या आणि त्यानुसारच संदेश ओळखले जात होते.

AM रेडिओ मध्ये Amplitude Modulation ह्या पद्धतीचा चा वापर केला जातो, ज्यामुळे आवाज रुपी संदेश पाठवता येऊ लागले, तसेच ह्यापासून निघनाऱ्या तरंगांची quality देखील उच्च दर्जाची होती.

2. एफएम रेडिओ [FM Radio]

FM रेडिओ चा शोध 1930 च्या दरम्यान अमेरिका या देशात लागला, Edwin Armstrong या इंजिनियर ने FM रेडिओ चा शोध लावला होता.

FM रेडिओ मध्ये वेव्हस पाठवण्यासाठी फ्रिक्वेन्सी मॉडरेशन ( Frequency Modulation ) या पद्धतीचा वापर केला जातो, ज्यामुळे जास्त वारंवारते निशी अचूक आणि जलद संदेश पाठवणे सोपे झाले होते.

जास्त वारंवारता आणि अचूकता ह्या मुळे FM Radio चा अधिक तर वापर बातम्या, गाणे ऐकणे ह्यांसारख्या कामासाठी होऊ लागला. आज देखील आपण पाहतो कि, प्रत्येक चार चाकी गाडी मध्ये FM Radio चा वापर केला जात आहे.

3. डिजिटल रेडिओ [Digital Radio]

मोबाइल चे शतक असल्यामुळे आज प्रत्येक काम डिजिटल पद्धतीने होऊ लागले आहे, अगदी ह्याच प्रमाणे रेडिओ चा देखील डिजिटल वापर वाढला आहे, ज्याला डिजिटल रेडिओ असे म्हटले जाते.

तळ हात एवढ्या मोबाइल मध्ये फक्त एक अँप इन्स्टॉल करा आणि तुम्ही रेडिओ वापर करू शकता, ह्यामुळे पूर्वी प्रमाणे चौकोनी आकाराचे Physical रेडिओ घेऊन वावरण्याची गरज राहिली नाही. आज जवळ जवळ प्रत्येक मोबाइल मध्ये radio चा पर्याय हा कंपनी द्वारेच पुरवला जातो.


रेडिओचा इतिहास

रेडिओचा शोध हा १८९५ मध्ये लागला होता, परंतु त्याची संकल्पना ९ वर्षांआधी म्हणजेच १८८६ मध्ये जर्मनी मधील भौतिकशास्त्रज्ञ Heinrich Hertz यांनी मांडली होती, परंतु त्यांनी केवळ संकल्पनाच मांडली होती रेडीओ तयार केला नव्हता, त्यांनी मांडलेल्या संकल्पनेचा आधार घेऊन १८९५ मध्ये रशियन संशोधक आणि भौतिकशास्त्रज्ञ Alexander Stepanovich Popov ह्यांनी प्रात्यक्षिक करून जगातील पहिला रेडिओ तयार केला.

प्रथम रेडिओ तयार करताना ट्रान्समीटर आणि रिसिवर यांमध्ये अगदी काही सेंटिमीटर अंतर होते, ज्यामध्ये व्यवस्थित वेव्हस ची देवाण-घेवाण करण्यात आली होती, तसेच यातून कोणत्याही प्रकारचे संदेश न पाठवता केवळ विजेच्या सहाय्याने तयार केलेले तरंगे (Wave) ह्यांची देवाण-घेवाण करण्यात आली होती, त्यानंतर पुन्हा ह्याच पद्धतीचा वापर करून आणि काही बदल करून २०० मीटर पेक्षा अधिक अंतरावरून वेव्हस पाठविण्याचा प्रयत्न केला गेला आणि ह्यात देखील यश प्राप्त झाले.

Alexander Stepanovich Popov ह्यांनी तयार केलेल्या रेडिओ मध्ये २३ डिसेंबर १८८९ च्या दरम्यान कॅनडामधील संशोधक Reginald A. Fessenden यांनी सुधार करून 1.6 किलोमीटर इतक्या अंतरावरून ट्रान्समीटर द्वारे रिसिवर ला व्हॉईस मेसेज पाठवला आणि हा जगातील रेडिओ वेव्हस द्वारे पाठवला गेलेला पहिला व्हॉइस मेसेज होता.

Reginald A. Fessenden ह्यांच्या यशस्वी प्रयत्नांच्या सहा वर्षानंतर Christmas ह्या व्यक्तीने जगातील पहिली वायरलेस ब्रॉडकास्टिंग पार पाडली आणि अशाप्रकारे रेडिओ ची संकल्पना संपूर्ण जगात पसरली आणि रेडिओ लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनू लागला.

१९२० च्या सुरुवातीस तंत्रज्ञान विकासामुळे Vaccum ट्रान्समीटर (Transmiter) आणि रिसिवर (Receiver) चा शोध लागला, त्याचा वापर करून AM Radio तयार करण्यात आले, AM म्हणजे Amplitude Modulation. AM Radio मुळे पाठवल्या जाणाऱ्या संदेशांमध्ये स्पष्टता आणि अचूकता निर्माण झाली, ह्यामुळे रेडिओ चा वापर वाढला. १९५० पर्यंत संपूर्ण जगात AM Radio चे जाळे पसरले होते.

१९५० नंतर रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करून पुन्हा FM रेडिओ आणि टीव्ही चा शोध लागला.

FM रेडिओ ची प्रमाणली हि Frequency Modulation ह्या पद्धतीने कार्य करते, ज्यामुळे संदेश अगदी वेगाने आणि अचूक Receiver पर्यंत पोहोचतो, तसेच त्याकाळी टीव्ही तंत्रज्ञान देखील विकसित होत होते,  टीव्ही मध्ये आवाजाबरोबर स्थिरचित्र पाहता येत होती, ज्यामुळे FM Radio आणि टीव्ही लोकांचे आकर्षण बिंदू बनले आणि कालांतराने AM रेडिओ लोकांपासून दुर होऊ लागले.

टीव्ही हा देखील रेडिओचाच एक अंश आहे, असे म्हणण्यात काहीच हरकत नाही, अशा प्रकारे अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आज रेडिओ विविध यंत्रांद्वारे आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे.


वैशिष्ठ्ये

संप्रेषण आणि प्रसारणाचे माध्यम म्हणून रेडिओमध्ये अनेक प्रमुख वैशिष्ट्ये आहेत जी त्याला वेगळे आणि मौल्यवान बनवतात. येथे रेडिओची काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत:

1. ऑडिओ ट्रान्समिशन

रेडिओ प्रामुख्याने ऑडिओ सिग्नलच्या प्रसारणावर अवलंबून असतो. हे केवळ आवाजावर आधारित संगीत, बातम्या, भाषण आणि मनोरंजनाच्या विविध प्रकारांचे प्रसारण करण्यास अनुमती देते.

2. वायरलेस कम्युनिकेशन

रेडिओ वायरलेस ट्रान्समिशनद्वारे चालतो, याचा अर्थ सिग्नल प्रसारित करण्यासाठी त्याला भौतिक तारांची आवश्यकता नसते. हे वैशिष्ट्य ते एक पोर्टेबल आणि प्रवेशयोग्य माध्यम बनवते.

3. जनसंवाद

जनसंवादासाठी रेडिओ हे एक शक्तिशाली साधन आहे. माहिती, बातम्या आणि मनोरंजन मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते एक प्रभावी माध्यम बनवून एकाच वेळी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते.

4. एक-ते-अनेक संप्रेषण

रेडिओ एका-ते-अनेक संप्रेषण मॉडेलचे अनुसरण करतो. एक रेडिओ स्टेशन त्याची सामग्री संभाव्य अमर्यादित श्रोत्यांना प्रसारित करू शकते.

5. रिअल-टाइम वितरण

रेडिओ प्रसारण रिअल-टाइममध्ये होतात, ज्यामुळे श्रोत्यांना इव्हेंट, बातम्या आणि संगीत ऐकू येतात. हा रिअल-टाइम पैलू विशेषतः आणीबाणीच्या परिस्थितीत आणि इव्हेंटच्या थेट प्रसारणासाठी मौल्यवान आहे.

6. प्रवेशयोग्यता

रेडिओ हे लोकांच्या विस्तृत श्रेणीसाठी प्रवेशयोग्य आहे, ज्यांना दूरदर्शन किंवा इंटरनेट सारख्या माध्यमांच्या इतर प्रकारांमध्ये मर्यादित प्रवेश असू शकतो. रेडिओ सहसा परवडणारे असतात, आणि प्रसारणे दुर्गम किंवा ग्रामीण भागात पोहोचू शकतात जिथे इतर माध्यमे अनुपलब्ध असू शकतात.

7. स्थानिक आणि प्रादेशिक प्रासंगिकता

रेडिओ स्टेशन विशिष्ट स्थानिक किंवा प्रादेशिक श्रोत्यांना त्यांच्या आवडी आणि गरजांनुसार सामग्री ऑफर करू शकतात. हे वैशिष्ट्य समुदाय आणि जोडणीची भावना वाढविण्यात मदत करते.

8. तात्कालिकता

रेडिओ बदलत्या कार्यक्रमांना आणि प्रेक्षकांच्या पसंतीस त्वरित प्रतिसाद देऊ शकतो. ही लवचिकता प्रसारकांना त्यांची सामग्री आणि प्रोग्रामिंग वर्तमान ट्रेंड किंवा उदयोन्मुख बातम्यांनुसार समायोजित करण्यास अनुमती देते.

9. पोर्टेबल आणि मोबाईल

रेडिओ हे सहसा पोर्टेबल उपकरणे असतात आणि कार रेडिओ आणि मोबाईल ऍप्लिकेशन्स सारख्या तंत्रज्ञानाच्या आगमनाने, सतत मनोरंजन आणि माहिती प्रदान करून, फिरताना रेडिओ सामग्रीमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

10. किफायतशीर

माध्यमांच्या इतर काही प्रकारांच्या तुलनेत, रेडिओ प्रसारण तुलनेने किफायतशीर असू शकते, ज्यामुळे विविध संस्था आणि व्यवसायांसाठी ते एक आकर्षक पर्याय बनते.

11. कर्णमधुर प्रतिबद्धता

श्रोत्यांच्या कल्पनाशक्ती आणि भावनांना गुंतवून ठेवण्यासाठी रेडिओ ध्वनीच्या सामर्थ्यावर अवलंबून असतो. ऑडिओ सामग्री मजबूत कनेक्शन तयार करू शकते आणि प्रभावीपणे भावना जागृत करू शकते.

12. वैविध्यपूर्ण प्रोग्रामिंग

रेडिओ स्टेशन्स संगीत, टॉक शो, बातम्या, खेळ, शैक्षणिक सामग्री आणि बरेच काही यासह प्रोग्रामिंगची विस्तृत श्रेणी देऊ शकतात. ही विविधता भिन्न प्रेक्षक आणि स्वारस्य पूर्ण करण्यात मदत करते.

एकूणच, रेडिओ हे त्याच्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे आणि विविध श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याच्या आणि त्यांना गुंतवून ठेवण्याच्या क्षमतेमुळे, डिजिटल युगातही एक संबंधित आणि प्रभावशाली माध्यम आहे.


रेडिओचा शोध कोणी लावला ?

जगातील पहिल्या रेडिओचा शोध हा रशियातील भौतिकशास्त्रज्ञ Alexander Stepanovich Popov ह्यांनी १८९५ मध्ये लावला. Alexander Stepanovich Popov चा जन्म १६ मार्च १८५९ मध्ये झाला असून, रशियन नेवल स्कूल मध्ये एक शिक्षक म्हणून ते कार्यरत होते आणि ह्याच दरम्यान त्यांनी रेडिओचा शोध लावल्याचा विक्रम केला होता.


भारतात रेडिओ सेवा केव्हा सुरू करण्यात आली ?

भारतात इंग्रजांचे राज्य असतानाच, म्हणजेच ३ जून १९२३ मध्येच भारतात रेडिओ सेवा सुरू करण्यात आली होती, त्यावेळेस इंग्रजांनी भारतात केवळ दोनच ब्रॉडकास्टिंग उभारण्याची परवानगी दिली होती, त्यातील पहिले ब्रॉडकास्टिंग मुंबई मध्ये तर दुसरे ब्रॉडकास्टिंग कोलकत्ता येथे रेडिओ क्लब ऑफ इंडिया द्वारे उभारण्यात आले होते, कारण मुंबई आणि कोलकत्ता हे त्यावेळेस इंग्रजांचे मुख्य केंद्र होते, तसेच हे दोन्ही शहर अधिक लोकसंख्या असलेले देखील होते.

भारतात रेडिओ चा प्रसार हा अधिक तर 1930 मध्ये झाला, कारण या काळात इंग्रजांनी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्विस प्रत्येक राज्यात सुरू केली होती, त्यामुळे जवळजवळ प्रत्येक राज्यात ब्रॉडकास्टिंग सेवा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आज संपूर्ण जगातील भारत हा एकुलता एक असा देश आहे, ज्यामध्ये २१ पेक्षा अधिक भाषांमध्ये ब्रॉडकास्टिंग केली जाते.


आपण काय शिकलो ?

  • Heinrich Hertz ह्यांनी पहिला रेडिओ तयार होण्याच्या ९ वर्षांपूर्वी रेडिओ ची संकल्पना मांडली होती.
  • १८९५ मध्ये alexander Popov ह्यांनी जगातील पहिला रेडिओ तयार केला
  • रेडिओ चे मुख्यतः तीन प्रकार पडतात ते म्हणजे AM RAdio, FM Radio आणि Digital रेडिओ.
  • ३ जून १९२३ मध्ये भारतात पाहिल्याचं रेडिओ सेवा सुरूकरण्यात आली.
  • आज भारतात २१ पेक्षा अधिक भाषणमध्ये ब्रॉडकास्टींग केली जाते.
  • AM म्हणजे Amplitude Modulation आणि FM म्हणजे Frequency Modulation.
  • टीव्ही आणि मोबाइलला चे शोध हे पूर्णतः रेडिओ वरती आधारित आहेत.
  • रेडिओ चा वापर विविध यंत्रांमध्ये विविध पद्धतीने केला जातो, रडार कोम्मुनिकेशन हि त्यातीलच एक पद्धत आहे.
  • भारतातील पहिले ब्रॉडकास्टींग मुंबई आणि दुसरे कोलकत्ता ह्या शहरात उभारण्यात आले होते.

अधिक लेख :

1. मोबाईल चा शोध कोणी लावला ?

2. टीव्हीचा शोध कोणी लावला ?

3. छपाई यंत्राचा शोध कोणी लावला ?

4. कॅमेराचा शोध कधी लागला ?

1 thought on “रेडिओचा शोध कोणी लावला ? | Radio Cha Shodh Koni Lavla”

Leave a Comment