पब्जी म्हणजे काय व पब्जीची (PUBG) वैशिष्टये कोणती ?

वर्तमान काळात तरुण पिढीमध्ये संगणकीय प्रणालीवर आधारित गेम खेळण्याची फार आवड दिसून येत आहे, ज्यामुळे भारतातील विडिओ गेमिंग क्षेत्रही अगदी वेगाने विस्तारत आहे, दर दिवशी मार्केटमध्ये एक नवीन विडिओ गेम अधिराज्य करत आहे.

गेमिंग क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पब्जी संबंधित विविध माहितीचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,


पब्जी म्हणजे काय ?

पब्जी (PUBG) हा मुळात एक ऍक्शन गेम (Action Game) आहे, जो ऑनलाईन पद्धतीने संगणक आणि स्मार्ट फोनवर खेळला जातो. हा एक मल्टि प्लेयर गेम आहे, ज्यामध्ये एकाच वेळी एकापेक्षा अधिक लोक इंटरनेटच्या सहाय्याने एकाच वेळी एकत्ररित्या खेळू शकतात. पब्जीची निर्मिती Bluehole Studio नामक कोरियन विडिओ गेम कंपनीने २०१७ केली आहे.

१ डिसेंबर २०१७ मध्ये हा गेम कंपनीद्वारे लॉन्च करण्यात आला होता. सुरुवातीला हा गेम केवळ मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिम (Microsoft Window OS) असलेल्या संगणकावरच खेळाला जाऊ शकत होता, परंतु पब्जीची वाढती लोकप्रियता पाहता, निर्मात्यांनी हा गेम अँड्रॉइड (Android) आणि IOS साठी देखील तयार केला.


PUBG Full Form In Marathi

P – Player

U – Unknown

B -Bettle

G – Ground

PUBG या इंग्रजी लघु शब्दाचे विस्तारित रूप “PlayerUnknown’s BattleGround” हे आहे.


खेळाची माहिती

जेव्हा गेम सुरु होतो, तेव्हा प्रथम आपल्याला एका ८x८ किलोमीटर अंतर असलेल्या बेटावर विमानाच्या सहाय्याने सोडले जाते, जेथे आपल्या सोबत आणखी ९९ म्हणजे एकूण १०० खेळाडू असतात.

जेव्हा आपण मोबाईल अथवा संगणकामध्ये गेम सुरु करतो, तेव्हा स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपल्याला नकाशा (Map) दिसतो, ज्याच्या सहाय्याने आपण आपल्या गेमची दिशा ठरवू शकतो.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला दिलेल्या नकाशाच्या क्षेत्राअंतर्गतच खेळायचे असते, नकाशाच्या बाहेरील क्षेत्रावर गेल्यावर आपण गेम मधून बाहेर होतो.

या ९९ खेळाडूंमध्ये आपल्याला शेवट पर्यंत संघर्ष करत टिकून रहायचे असते, जो खेळाडू शेवट पर्यंत टिकून राहतो, त्याला विनर म्हणून घोषित केले जाते.

जेव्हा आपल्याला विमानाच्या साहाय्याने बेटावर सोडले जाते, तेव्हा आपल्याकडे काहीही नसते, या बेटांवर असलेल्या घरांमध्ये जाऊन आपल्याला आपल्या गरजेच्या वस्तू जमा करायच्या असतात, ज्यामध्ये कपडे, शस्त्रे, अन्न, बॅग अशा विविध घटकांचा समावेश असतो.

पब्जी गेम मध्ये आपण २, ४ किंवा त्यापेक्षा देखील अधिक लोकांचा समूह तयार करून एकजुटीने खेळू शकतो. तसेच समूहातील प्लेअरला मिळालेल्या गोष्टी जसे कि अन्न, शस्त्र, कपडे आणि बॅग हे समूहातील व्यक्तींसोबत देखील शेअर करू शकतो, या व्यतिरिक्त आपण समूहातील प्लेअरला जीवनदान देऊ शकतो.

जेव्हा आपण एखाद्या ऍनेमि अथवा शत्रूला मारतो, तेव्हा त्याला मारल्यानंतर त्याच्याकडील सर्व वस्तूंचा ताबा आपण प्राप्त करू शकतो.

खेळादरम्यान जसे जसे प्लेअर कमी होत जातात, तसे तसे खेळ क्षेत्र (Play Zone) देखील लहान होत जाते, उर्वरित प्रतिस्पर्धी देखील याच क्षेत्रात असतात, जेव्हा आपण सर्वाना आऊट करून शेवट पर्यंत टिकतो, तेव्हा आपल्याला विनर विनर चिकन डिनर म्हणून घोषित केले जाते.


आवश्यक घटक

पब्जी खेळण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टीची पूर्तता असणे गरजेचे आहे, हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,
 • पब्जी ऑनलाईन गेम असल्यामुळे पब्जी खेळताना मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन अथवा मोबाईलला वायफाय कनेक्शन जोडलेले असणे गरजेचे आहे.
 • मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टिम चे व्हर्जन Android Mobile 5.1.1 व त्यापेक्षा ही वरच्या दर्जाचे असणे गरजेचे आहे.
 • PUBG Mobile या गेमची साईज एक जीबी असल्यामुळे, तो मोबाईल मध्ये यशस्वी रित्या चालविण्यासाठी मोबाईलचा रॅम (Ram) किमान दोन GB असणे गरजेचे आहे.
 • PUBG संगणकावर खेळण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टिम 64-Bit , प्रोसेसर i5-4430/AMD FX-6300 हा अथवा यापेक्षा उत्तम व रॅम 8 GB असणे गरजेचे आहे.

वैशिष्ठ्य

इथे आपण पब्जीच्या, त्या वैशिष्ठ्यांचा आढावा घेणार आहोत, ज्यामुळे पब्जी इतके लोकप्रिय आहे.

1. उत्तम दर्जाचे ग्राफिक आणि ध्वनी

पब्जी गेमिंग यंत्रणेत उत्तम दर्जाच्या Unreal Engine-4 चा उपयोग केला गेला आहे, ज्याद्वारे गेम दरम्यान वापरकर्त्यांसाठी उत्तम दर्जाचा Visual Experience निर्माण केला जातो. Visual Effect सोबतच गेमिंग दरम्यान 3D Sound निर्मिती होते, जे युजरचे मुख्य आकर्षण आहे.

2. मोबाईल व्हर्जन

सुरुवातीला पब्जी केवळ संगणकासाठी तयार केला गेला होता, परंतु वाढती प्रसिद्धि पाह्ता पब्जीचा मोबाईल व्हर्जन लॉन्च करण्यात आला, ज्यामुळे आज प्रत्येक मोबाईल युजर पब्जी खेळण्याचा अनुभव प्राप्त करत आहे. मोबाईल व्हर्जन पब्जी गेमचे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे, पब्जीच्या संगणक व्हर्जन गेम क्वालिटीचा अनुभव आपण मोबाईलमध्ये प्राप्त करू शकतो, गेमच्या क्वालिटीत काहीही फरक जाणवत नाही, फरक जाणवतो, तो केवळ स्क्रीन साईज मध्ये.

3. वास्तविक दर्जाची शस्त्रे

पब्जी गेम निर्मात्यांनी, युजरला गेमिंगचा चांगला अनुभव देण्यासाठी अगदी वास्तविक रित्या शस्त्रांची रचना केली आहे. यामध्ये मिली वेपण, फायरआर्म, थ्रोवेबल वास्तविक बॅलिस्टिक आणि ट्रॅव्हल ट्रान्सेक्टरी यांचा समावेश होतो, जे युजरला बिट डाऊन, शूट यांसारखे विविध पर्याय उपलब्ध करून देतात.

4. समूह खेळ

पब्जीमध्ये एकाच वेळी १०० प्लेयर खेळू शकतात, ज्यामुळे खेळ अगदी रोमांचकारी होतो. आर्टीफिसिअल प्लेअर पेक्षा वास्तविक प्लेयर सोबत गेम खेळताना अनुभव अधिक उत्तम होतो. यामध्ये प्लेयर्सला इन्व्हाईट म्हणजेच आमंत्रित करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे आपण हव्यात्या प्लेयर्स सोबत पब्जीचा आनंद घेऊ शकतो.

5. प्रवास पर्याय

पब्जी खेळादरम्यान प्लेयरला प्रवासासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत, जसे कि ट्रक, कार, बाईक, बोट आणि अधिक. पब्जी गेम लॉन्च होण्यापूर्वी अगदी मोजकेच असे गेम होते, जे युजरला गेम खेळण्यांदरम्यान इतके पर्याय उपलब्ध करून देत होते.


तथ्य

 • पब्जी गेम मधील Erangel नामक नकाशा, खेळताना सर्वाधिक वेळा वापरला गेला आहे.
 • भारतात पब्जी इतके प्रसिद्ध झाले आहे, कि पब्जी वर “दोस्ती का नया मैदान” नामक एक वेब सिरीस देखील तयार करण्यात आली आहे.
 • ज्या कंपनीने पब्जीची निर्मिती केली, त्या कंपनीद्वारे पब्जीच्या मार्केटिंगवर एकही रुपया खर्च केला गेला  नाही, गेम उत्तम दर्जाचा आणि युजर फ्रेंडली असल्यामुळे, तो न मार्केटिंग करता प्रसिद्ध झाला.
 • पब्जी प्रणालीद्वारे दर आठवड्यात अवैध खेळ खेळणाऱ्या १००,००० पेक्षा अधिक खेळाडूंना बॅन केले जाते.
 • पब्जी संगणक व्हर्जन पेक्षा पब्जी मोबाईल व्हर्जन अधिक प्रसिद्ध आहे.
 • पब्जी मधील नकाशांमध्ये (Map) काही वास्तविक स्थळांचा देखील समावेश केला आहे.
 • पब्जी हा पहिला मोबाईल गेम आहे, ज्याची जाहिरात भारतातील टीव्हीवर प्रसारित करण्यात आली होती, या आधी कोणत्याही गेमची जाहिरात भारतातील टीव्हीवर प्रसारित केली गेली नव्हती.
 • पब्जी गेममध्ये bot नामक प्रणालीचा वापर पब्जीच्या नवीन युजरला गेमकडे आकर्षित करण्यासाठी केला जातो.

FAQ

1. पब्जी गेम कोणत्या कंपनीद्वारे तयार केला गेला आहे ?

उत्तर : Bluehole Studio नामक कंपनीने पब्जी गेम तयार आहे.

2. पब्जी गेम तयार करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ?

उत्तर : Brendan Green यांना पब्जी गेम तयार करण्याचे श्रेय दिले जाते.

3. पब्जी गेमला भारतात केव्हा बॅन करण्यात आले ?

उत्तर : सप्टेंबर २०२० मध्ये, अनेक चायनीस अँप सहित पब्जी गेमला देखील भारतातून बॅन करण्यात आले.

4. Battleground India गेम कोणाद्वारे तयार करण्यात आला आहे ?

उत्तर : भारतातील krafton नामक कंपनीद्वारे Battleground India गेम तयार करण्यात आला आहे.

5. पब्जीतील एका गेम मध्ये जास्तीत-जास्त किती खेळाडू खेळू शकतात ?

उत्तर :  पब्जीतील एका गेममध्ये जास्तीत-जास्त १०० खेळाडू खेळू शकतात.

Leave a Comment