पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत ?

पाणी  हा पृथ्वीवरील एक महत्वपूर्ण घटक आहे जो तलाव, नदी, समुद्र, महासागर यांच्या स्वरूपात स्वतःचे वास्तव्य टिकवून आहे. या लेखात आपण पाण्याचा सर्वात मोठा स्रोत समजल्या जाणाऱ्या महासागरांसंबंधित विविध माहितीचा आढावा घेणार आहोतं,

महासागर म्हणजे काय ?

महासागर म्हणजे विशाल अथवा अथांग समुद्र होय. महासागर हा साधारणतः खाऱ्या पाण्याचा विलक्षण साठा असतो, असे आपण म्हणू शकतो. वर्तमान काळात संपूर्ण पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी ७०.८% म्हणजेच ३६१,०००,००० किमी वर्ग इतका भाग हा महासागरांद्वारे व्यापला गेला आहे.

महासागर हे पृथ्वीवरील जलमंडळाचा प्रमुख भाग आहेत. महासागरांमुळे पृथ्वीवर विविध प्रकारचे ऋतू घडून येतात. महासागरातील पाण्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन डायॉक्साईड सारखे अनेक वायू विरघळलेल्या स्वरूपात असतात. या वायूंची देवाणघेवाण ही महासागराच्या तळाशी होत असते, ज्यामुळे पाण्याच्या क्षारतेचे प्रमाण आणि तापमान ठरते.

जीवाष्म इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणात कार्बन डायॉक्साईड चे प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे महासागराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात सांद्रता होते आणि महासागरांचे आम्लीकरण घडून येते.


पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत ?

पृथीवर एकूण पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्टिक महासागर आणि दक्षिण महासागर असे ५ महासागर आहेत. ज्याबद्दल थोडक्यात माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत,

1. पॅसिफिक महासागर

पॅसिफिक महासागर ज्याला प्रशांत महासागर असे ही म्हटले जाते, हा पृथ्वीवरील सर्वात विशाल आणि खोल असा महासागर आहे. उत्तरेकडील आर्टीक महासागरापासून ते दक्षिणेकडील दक्षिण महासागरापर्यंतचे आणि पश्चिमेला आशिया, ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिकी खंडापर्यंत असे सर्वाधिक क्षेत्रफळ प्रशांत महासागराने व्यापले आहे.

१६५,२५०,००० किमी वर्ग इतक्या क्षेत्रफळात पसरलेल्या प्रशांत महासागराने जल मंडळाचा एकूण ४६% भाग तर पृथ्वीचा ३२% भाग व्यापला आहे.  प्रशांत महासागराने पृथ्वीचे जितके क्षेत्रफळ व्यापले आहे, त्याचे प्रमाण पृथीवरील भू-पृष्ठाच्या तुलनेत अधिक आहे. प्रशांत महासागराची एकूण खोली ही ४,००० मीटर म्हणजेच १,३०० फूट इतकी आहे.

प्रशांत महासागराच्या पश्चिम सीमांत दक्षिण चीन समुद्र, पूर्व चीन समुद्र, जपान चा समुद्र, ओखोटस्क समुद्र, फिलिपीन चा समुद्र, कोरल समुद्र अशा विविध समुद्राचे अस्तित्व आहे.

2. अटलांटिक महासागर

५ महासागरांपैकी अटलांटिक महासागर हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ १०६,४६०,००० किमी वर्ग इतके असून, पृथ्वीचा एकूण २० % तर जल मंडळाचा एकूण २९% भाग अटलांटिक महासागरद्वारे व्यापला गेला आहे.

आफ्रिका, युरोप आणि आशियाला अमेरिकेपासून वेगळा करणारा महासागर म्हणून अटलांटिक महासागराची ओळख आहे. अटलांटिक महासागराने पूर्व युरोप, आफ्रिका आणि पश्चिम अमेरिका दरम्यान “S” आकाराचे क्षेत्र व्यापले आहे.

अटलांटिक महासागर हा उत्तरेला आर्टिक महासागर, नैऋत्येला प्रशांत महासागर, आग्नेयेला हिंदी महासागर आणि दक्षिणेला दक्षिण महासागरासोबत जोडला गेला आहे.

3. हिंदी महासागर

हिंदी महासागर हा जगातील तिसरा सर्वात मोठा महासागर आहे, जो ७०,५६०,००० किमी वर्ग इतक्या क्षेत्रफळात विस्तारला आहे. हिंदी महासागराने पृथ्वीवरील १९.८ % इतके क्षेत्रफळ व्यापले आहे. या महासागराच्या उत्तरेला आशिया, पश्चिमेला आफ्रिका तर पूर्वेला ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचे वास्तव्य आहे.

हिंदी महासागरामध्ये लक्षद्वीप समुद्र, सोमाली समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अरबी समुद्र इत्यादी प्रादेशिक समुद्रांचा समावेश होतो.

इ. स.  १५१५ पासून हिंदी महासागराला त्याच्या वर्तमान नावापासून ओळखले जाऊ लागले, तत्पूर्वी या महासागराला पूर्व महासागर म्हणून ओळखले जात होते.

4. दक्षिण महासागर

दक्षिण महासागराला अंटार्टिक महासागर म्हणून देखील ओळखले जाते. दक्षिण महासागर हा पृथीवरील दुसरा सर्वात लहान महासागर आहे. पृथ्वीच्या दक्षिणेकडील भाग या महासागराने व्यापला असल्यामुळे, याला दक्षिण महासागर म्हटले जाते.

दक्षिण महासागराचे एकूण क्षेत्रफळ १०६,५००,००० किमी वर्ग इतके असून हा महासागर ७,४३४ मीटर म्हणजेच २४,३९० फूट इतका खोल आहे.

5. आर्टिक महासागर

आर्टिक महासागर हा जगातील ५ महासागरांपैकी सर्वात लहान महासागर आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ १४,०६०,००० किमी वर्ग इतके आहे. इतर ४ महासागरांच्या तुलनेत आर्टिक महासागर थंड आहे.

आर्टिक महासागर हा उत्तर अमेरिका आणि युरेशिया ने वेढला गेला असून, या व्यतिरिक्त दक्षिणेस ६०°N पर्यंत पसरला आहे. आर्टिक महासागर अधिकतर काळ बर्फाने झाकलेला असतो, ज्यामुळे विविध ऋतूंमध्ये या महासागरातील क्षारतेचे प्रमाण बदलत असते. इतर ४ महासागरांच्या तुलनेत आर्टिक महासागरात क्षारतेचे प्रमाण फार कमी आहे.

दर उन्हाळी ऋतूमध्ये आर्टिक महासागरातील ५०% बर्फ विरघळतो अथवा कमी होतो.


महासागरांचे महत्व

1. ऑक्सिजन निर्मिती

ऑक्सिजन ज्याला आपण प्राणवायू देखील म्हणतो हा वायू पृथ्वीवरील जीवन ठीकविण्यासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. पृथ्वीच्या वातावरणातील जवळजवळ ५०% ऑक्सिजन हे समुद्री वनस्पतींद्वारे निर्मित केले जाते. भू वनस्पतींप्रमाणेच समुद्री वनस्पतींना देखील स्व-विकासासाठी सूर्यप्रकाशाची गरज भासते.

एका जागतिक रिपोर्टनुसार दरवर्षी १० गिगाटन कार्बनडाय ऑक्साईड वातावरणातून समुद्रात स्थलांतरित होते, ज्याचे मुख्य कारण समुद्री वन्यजीवांना समजले जाते.

2. हवामान निर्मिती

पृथीवर जमिनीच्या तुलनेत महासागराचे वर्चस्व अधिक असल्यामुळे सूर्य प्रकाशाचा अधिक तर भाग हा महासागरांद्वारे व्यापला जातो. “US National Oceanic & Atmospheric Administration” च्या म्हणण्यानुसार गेल्या पन्नास वर्षांमध्ये पृथीवर जितकी तापमान वाढ झाली आहे, त्यापैकी ९०% पेक्षा अधिक तापमान वाढ ही महासागरांमध्ये झाल्याचे आढळून येते. पाण्याचे सर्वाधिक बाष्पीभवन महासागरांमध्ये उद्भवते, ज्यामुळे उन्हाळा, पावसाळा यासारखे ऋतू पृथ्वीवर घडून येतात.

3. खाद्य स्रोत

महासागर हे मासे, समुद्री वनस्पतींसारख्या खाद्य पदार्थांचे उत्तम स्रोत मानले जाते, या व्यतिरिक्त महासागरात  काही असे ही घटक आढळून येतात, ज्याचा उपयोग करून विविध आजारांवर औषधे तयार केली जात आहेत. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये मानवी आहारात Sea Food चा उपयोग खूप पटीने वाढला आहे.

4. समुद्री जीवन

शास्त्रज्ञांना ज्ञात नसेल तरी महासागरांमध्ये असंख्य प्रजातीचे सजीव वास्तव्य करत आहेत. एका रिपोर्टनुसार समुद्रातील बऱ्याच सजीवांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे, परंतु अद्यापही समुद्रात ९१% पेक्षा अधिक अशा प्रजाती आहेत, ज्याबद्दल कोणाला माहीत नाही. या लाखो सजीवांचा महासागर पालनहार आहे असे म्हणण्यात काहीही हरकत नाही.

5. देशाची अर्थव्यवस्था

महासागर देशाच्या अर्थव्यस्थेसाठी देखील महत्वाचा ठरतो. कारण न केवळ भारतात, तर संपूर्ण जगात अनेक असे क्षेत्र आहेत, जे महासागरांवर आधारित आहेत, जसे की जल वाहतूक, मासेमारी आणि अधिक.


FAQ

1. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?

उत्तर : प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे.

2. जगातील सर्वात लहान महासागर कोणता ?

उत्तर : आर्टिक महासागर हा जगातील सर्वात लहान महासागर आहे.

3. महासागरांनी पृथ्वीवरचा एकूण किती % भाग व्यापला आहे ?

उत्तर : महासागरांनी पृथ्वीचा एकूण ७१ % भाग व्यापला आहे.

4. पृथ्वीवर सर्वाधिक ऑक्सिजन निर्मिती कोठे होते ?

उत्तर : पृथ्वीवरील ५०% पेक्षा अधिक ऑक्सिजन वायूची निर्मिती महासागरांमध्ये समुद्री वनस्पतींद्वारे केली जाते.

5. पृथ्वीवरील सर्वात थंड महासागर कोणता ?

उत्तर : आर्टिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात थंड महासागर आहे.

Leave a Comment