प्रदूषण माहिती मराठीत | Pollution Information in Marathi

आज मानूस जितका तंत्रतज्ञानाच्या आणि यंत्रांच्या जवळ जाऊ लागला आहे, तितकाच तो निसर्ग आणि पर्यावर्णापासून दुरु होऊ लागला आहे, म्हणूनच माणसाच्या जीवनात अनेक नवनवीन आव्हाने समोर येऊ लागली आहेत, त्यातीलच एक म्हणजे प्रदूषण. प्रदूषणामुळे दिवसेंदिवस आपल्या अवतीभोवती असलेल्या पर्यावर्णाचा समतोल बीघडत आहे, ज्यामुळे जीवन चक्र विस्कळीत होत आहेत आणि जर ह्यावर वेळ असता उपाय योजना न केल्यास पृथ्वीवरील जीवन नष्ट होण्यास फार काळ लागणार नाही.

इ.स. १८०० पासून तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडून आली, परंतु ह्यामुळे माणसाची निसर्गाच्या चक्रात ढवळाढवळ वाढू लागली, ज्यामुळे निसर्गाचे चक्र बिघडू लागले आणि परिणामी प्रदुषणाचा प्रभाव देखील वाढू लागला. ह्या लेखात आपण प्रदूषणा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जसे कि प्रदूषण म्हणजे काय,  प्रदूषणाचे प्रकार कोणते, प्रदूषणाची करणे आणि त्यावर उपाय इत्यादी.

प्रदूषण म्हणजे काय ?

प्रदूषण ह्या शब्दाला जर निरखून पाहिले, तर दूषण अथवा दूषित हा शब्द नजरेस पडतो, ह्या वरून आपण असे समजू शकतो कि एखाद्या गोष्टीला दूषित करने अथवा त्याच्या चक्रात अडथळा आणणे म्हणजे प्रदूषण होय.

जसे कि पर्यावरणाचे प्रदूषण. हल्ली आपल्याला सतत नजरेस पडत असते कि, मानवाने कोणताही शोध लावला कि तो प्रथम त्याचा प्रयोग पर्यावरणावर अथवा निसर्गावर करतो, ज्यामुळे अनेक घातक घटक पर्यावरणात पसरतात, ज्यामुळे प्रदूषण घडून येते. हे काहीसे निसरगला आव्हान देण्यासारखे घडून येते, ज्यामुळे अनेक नैसर्गिक  आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागते.


प्रदूषणाचे प्रकार

प्रदूषण हे पर्यावरणाच्या वेगवेगळ्या भागांना प्रदूषित करून त्यांच्या कार्यात अडथळा आणत असल्यामुळे त्या त्या भागानुसार प्रदूषणाचे प्रकार ठरविण्यात आले आहेत. प्रदूषणाचे मुख्य चार प्रकार पडतात ज्यांची नवे खालील प्रमाणे:

 • ध्वनी प्रदूषण
 • जल प्रदूषण
 • हवा प्रदूषण
 • जमिनीचे प्रदूषण

ध्वनी प्रदुषण

ध्वनी प्रदूषण म्हणजे काय ?

जसे कि नावावरूनच आपल्याला समजते कि ध्वनी प्रदूषण म्हणजेच आवाजाचे प्रदूषण. जेव्हा अनुपयुक्त आवाजाचा प्रभाव पर्यावरणात वाढतो, तेव्हा त्याला ध्वनी प्रदूषण ह्या नावाने संबोधले जाते.

अतिरिक्त ध्वनी मुळे पर्यावरणात उपलब्ध असणारे जण जीवन विस्कळीत होण्याची संभावना निर्माण होते. ध्वनी हा वायू मार्गे म्हणेज हवेच्या मार्गाने प्रवास करतो, ज्यामुळे किती ध्वनी उत्पन्न झाला हे मोजण्यासाठी डेसिबेल ह्या युनिट चा वापर केला जातो. आवाजाची तीव्रता हि जर ९० डेसीबेल च्या वर गेल्यास माणसाला भैरेपण येण्याची शक्यता दाट होते.

अतिरिक्त ध्वनी पासून मानवी शरीरात उच्च रक्तदाब, डोकेदुखी, चिडचिडे पण, हृदय विकराचा झटका असे अनेक त्रास उद्भवण्याची शक्यता असते.

ध्वनी प्रदूषण कारणे

अनुपयुक्त आवाज अथवा ध्वनी उत्पन्न होण्याची विविध करणे आहेत, जे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

 • गाड्यांच्या हॉर्न चा कर्कश आवाज
 • मोठमोठ्या कारखान्यातून येणार यंत्रांचा आवाज
 • गाड्यांच्या सायलेन्सर चा आवाज
 • रेल्वे च्या हॉर्न चा आवाज
 • बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साधनांचा आवाज
 • लग्नात वाजवल्या जाणाऱ्या मोठमोठ्या स्पीकर्स चा आवाज.
 • मोठं मोठ्या विमानाचा आवाज

ध्वनी प्रदूषण उपाय

ध्वनी प्रदूषणाचा प्रभाव हा जवळ जवळ जगातील सर्वच देशांवर असून विविध देशांनी हे रोखण्यासाठी विविध उपाय योजना देखील केल्या आहेत, परंतु त्याचा काहीही उपयोग नाही, केवळ ह्यासाठी उपाय योजना राबवताना सरकारच्या तिजोरीला ताण येत आहे. काय काय उपाय केल्याने ध्वनी प्रदूषण कमी होईल अथवा करता येईल हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

 • लग्नात मोठमोठ्या स्पीकर्स चा वापर टाळावा.
 • आवाज करणाऱ्या सायलेन्सर चा वापर करू नये.
 • विनाकारण गाडीचा हॉर्न वाजू नये.
 • टीव्ही पाहताना अथवा गाणी ऐकताना ह्या यंत्रांचा आवाज कमी ठेवावा.

जल प्रदूषण माहिती

जल प्रदूषण म्हणजे काय ?

जल स्रोतांना दूषित करण्याच्या अथवा होण्याच्या क्रियेला जल प्रदूषण म्हणून संबोधले जाते. इतर प्रदूषणापेक्षा जल प्रदूषण हे सजीव सृष्टी साठीघातक असल्याचे सांगितले गेले आहे. संपूर्ण पृथ्वीवर जमिनी पेक्षा पाण्याचे प्रमाण अधिक आहे. केवळ २९% जमीन असून ७१% पाणी आहे. ह्या ७१ टक्के पाण्यापैकी केवळ १ ते १.५ % पाणी पिण्यायोग्य मानले जाते, त्यातही प्रदूषणामुळे हळू हळू पिण्यायोग्य पाणी १% पेक्षा कमी होत आहे.

मानवी शरीर हे ६०% पेक्षा जास्त पाण्यापासून बनले आहे, त्यामुळे वेळोवेळी आपल्या शरीराला पाण्याची गरज भासत असते. पाण्याशिवाय संपूर्ण सजीव सृष्टी जगणे अशक्य आहे, त्यामुळे जल प्रदूषण टाळणे ह्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे उरला नाही.

जल प्रदूषण कारणे

 • नद्यांमध्ये कारखान्यातून सोडले जाणारे रसायने
 • नदी मध्ये अंघोळ करणे, कपडे  धुणे, आणि जनावरे धुणे
 • देवा धर्माच्या नावावर नद्यांमध्ये देवांच्या सिमेंट च्या मुर्त्या व हार फुले विसर्जित करणे.
 • घरगुती कचरा नद्यांमध्ये फेकने.
 • समुद्रात मालवाहू जहाजांमुळे होणारी तेल गळती.

जल प्रदूषण उपाय

 • पाण्याचा योग्य आणि गरजेपुरता वापर करणे
 • कपडे अथवा जनावरे नद्यांमध्ये न धुणे,
 • सांडपाण्याचा निचरा जमिनीत करणे
 • कारखान्यातून निघणाऱ्या रसायनांची योग्य विल्हेवाट लावणे

हवा प्रदूषण माहिती

हवा प्रदूषण म्हणजे काय ?

हानिकारक रसायनांचा धूर अथवा जैविक रेणूचा समावेश जेव्हा वातावरणातील हवेत होतो, तेव्हा त्या घटनेला अथवा परिस्थितीला हवा किंवा वायू प्रदूषण म्हणून संबोधले जाते.

वायू प्रदूषणामुळे आपल्याला दोन प्रकारच्या संकटाना सामोरे जावे लागते, पहिले म्हणजे हवेत घातक वायू चे प्रमाण वाढल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होते आणि दुसरे म्हणजे ओझोन थराचे अस्तित्व संपुष्टात येते. ओझोन थर हे पृथ्वीच्या वातावरणातील एक असे कवच आहे, जे सूर्यापासून निघणाऱ्या घातक किरणांना पृथ्वीपर्यंत येण्यास रोखते. सूर्यापासून निघणाऱ्या घातक किरणांमुळे त्वचा रोग सारखे परिणाम दिसून येऊ शकतात.

वायू प्रदूषणामुळे अंटार्टिका येतील ओझोन थर नष्ट झाल्याचे शास्त्रज्ञानी माहिती दिली आहे.

वायू प्रदूषण कारणे

 • गाड्यांमधून निघणारा CO2 (कार्बन-डायऑक्साईड )
 • कारखान्यातून निघणारा रासायनिक धूर
 • दिवाळीत जाळले जाणारे फटाके
 • मोठमोठ्या कारखान्याना लागणारी आग
 • गावाकडे चुलीसाठी लाकूड जाळल्याने त्यातून निघणारा धूर
 • सिगारेट च्या धुरामधून मधून निघणारे विषारी वायू

वायू प्रदूषण उपाय

 • सार्वजनिक वाहनांचा वापर करणे, ज्यामुळे गाड्यांमधून निघणारा धूर याचे प्रमाण कमी होईल
 • सिगारेट च्या सेवन पासून दूर राहणे
 • केमिकल्स ला आग न लावता त्याची योग्य रित्या विल्हेवाट लावने.
 • चुलींचा वापर न करता गॅस सिलेंडर चा वापर करावा.

जमिनीचे प्रदूषण माहिती

जमिनीचे प्रदूषण म्हणजे काय ?

जमिनीचे कण हवे मार्फत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, ज्यामुळे परिणामी जमिनीची जिझ होते त्यालाच आपण जमिनीचे प्रदूषण असे म्हणतो.

मातीचे कन अथवा धूळ जेव्हा हवेत उपलब्ध असते, तेव्हा आपण श्वास घेतल्यानंतर ती धूळ अथवा मातीचे काळ आपल्या फुसफुसनमध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे दम्याचा त्रास, तसेच केसांना धुळ-माती लागल्याने केस गळतीचा त्रास अशा अनेक त्रासांना आपल्याला सामोरे जावे लागते.

जमिन प्रदूषणाची कारणे

ज़मिनीचे प्रदूषण होण्याचे एकच मुख्य कारण आहे ते म्हणजे जंगल तोड. वाढती लोकसंख्या ह्यामुळे लोक राहण्यासाठी मोठमोठ्या जंगलातील झाडांची कत्तल करून लोक तेथेच स्थिरावत आहे, तसेच मोठमोठे कारखाने स्थापन करण्यासाठी आणि जागेची उपलब्धता नसल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहे.

जमीन प्रदूषण उपाय

जमिनीचे प्रदूषण रोखण्याचा एक मात्र उपाय म्हणजे जमेल तितक्या झाडांचे रोपन करणे, कारण झाडांची मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवण्याची कामे करतात, ज्यामुळे जमिनीची धूप होत नाही.

Leave a Comment