पोलीस भरती माहिती | Police Bharti Information in Marathi

आज भारतामध्ये इतर देशांपेक्षा सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण आहे, ह्याचे एक कारण म्हणजे वाढती लोकसंख्या. भारताची लोकसंख्या १३० कोटी पेक्षा जास्त गणली गेली आहे. तसेच भारताचे एक वैशिष्ठ्य असे आहे की, भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त तरुण पिढी आहे.

लोक विविध कामाच्या संधी शोधत असतात. त्यातीलच एक नोकरीची संधी म्हणजे पोलिस भरती. ही एक सरकारी नोकरी असून, ह्या डिपार्टमेंट मध्ये वेतन देखील उत्तम आहे, म्हणूनच इथे आपण पोलिस भरती माहिती [Police Bharti Information In Marathi] चा आढावा घेणार आहोत, जसे की पोलीस भरती प्रक्रिया स्टेप्स, शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वयोमर्यादा, मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, कागदपत्रे तपासणी, मेडिकल टेस्ट इत्यादी.

पोलीस भरती प्रक्रिया

पोलीस भरती हे एक विशेष टप्प्याने पार पडली जाते ज्याचा आढावा आपण खालील प्रमाणे घेतला आहेत.

 • मैदानी परीक्षा ( एकूण गुण १०० )
 • लेखी परीक्षा ( एकूण गुण १०० )
 • मेरिट लिस्ट ( कट ऑफ )
 • मेडिकल तपासणी
 • कागदपत्र पडताळणी

शैक्षणिक पात्रता

आजचे युग हे विकासाचे युग म्हणून ओळखले जाते. विकासासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे शिक्षण.  शिक्षणाच्या जोरावर माणसाने जितका विकास गेल्या शंभर वर्षात केला नाही, तितका विकास गेल्या दहा वर्षात केला आणि करत आहे.

कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला त्याबद्दल माहिती असावी लागते, जी आपण विविध माध्यमांद्वारे घेतो परंतु, त्याआधी आपल्याला आपले शालेय शिक्षण पूर्ण करणे गरजेचे असते, कारण तो आपला शिक्षणाचा पाया असतो, ज्यामुळे आपल्याला समाजात कसे वावरावे ह्याची माहिती मिळते.

पोलीस भरती होण्यासाठी देखील शिक्षणाची एक अट आहे. ह्यामध्ये कालांतराने बदल होत आहे आणि शक्यतो होत राहील.

अगदी ३० ते ३५ वर्षां आधी पोलीस भरती होण्यासाठी केवळ इयत्ता ७ वी किंवा ८ वी उत्तीर्ण असणे गरजेचे असायचे, परंतु वाढत्या विकासामुळे आणि पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत वाढ पाहून ह्या अटीत बदल केला आणि आज म्हणजे २०२१ मध्ये पोलीस भरती होण्यासाठी इयत्ता १२ वी पास असणे गरजेचे आहे.

तुम्ही कोणत्या क्षेत्रातून १२ वी उत्तीर्ण होत आहात हे गरजेचे नाही आणि तसेच तुम्हाला किती टक्के मिळाले आहेत हे देखील महत्वाचे नाही, केवळ तुम्ही १२ वी पास असणे गरजेचे असते.

शारीरिक पात्रता

पोलिसांचे मुख्य काम असते ते म्हणजे गुन्हेगारी क्षेत्र कमी करणे अथवा नष्ट करणे.

ह्यासाठी अनेकदा त्याना स्वतःच्या जीवाची बाजी लावावी लागते. तसेच अनेक तास न बसता बंदोबस्त मध्ये देखील उभे राहावे लागते, अनेक दहशतवादी  हल्ल्याना  सामोरे जावे लागते, जसे कि २६ नोव्हेंबर २००८.

यासाठी पोलिसांची शारीरिक क्षमता उत्तम असणे गरजेचे आहे, म्हणूनच पोलीस भरती मध्ये आपल्याला शारीरिक पात्रतेची अट असते. हि अट स्त्री आणि पुरुष उमेदवारांसाठी विभिन्न असते. जी आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

उंची (स्त्री) :- १५१ सेमी किंवा त्यापेक्षा जास्त

उंची (पुरुष) :- १६५ सेमी किंवा त्यापेक्षा जास्त

छाती (पुरुष) :- नॉर्मल ७९+ सेमी आणि फुगवून ५ सेमी जास्त म्हणजे ८४ सेमी

छाती (स्त्री) :- लागू नाही

वयोमर्यादा

आपण केवळ एका ठराविक वयातच पोलीस भरती देऊ शकतो. कारण कालांतराने आपल्या शरीराची क्षमता ही  बदलत जाते. खास करून आपण जेव्हा ३० वय ओलांडतो तेव्हा.

पोलीस भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा ही जाती प्रमाणे विभिन्न आहे, तसेच इथे प्रकल्प ग्रस्त आणि भूकंप ग्रस्त उमेदवारांसाठी देखील काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे, ज्याबद्दल आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

ओपन [Open] जातीचे उम्मेदवार :- १८ ते २८ वर्ष

प्रकल्प ग्रस्त/भूकंप ग्रस्त उम्मेदवार :- १८ ते ४५ वर्ष

SC/ST/OBC जातीचे उम्मेदवार :- १८ ते ३३ वर्ष

मैदानी परीक्षा

मैदानी परीक्षा/चाचणी हा पोलीस भरती  पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे. मैदानी परीक्षेमध्ये उमेदवाराला एकूण १०० गुणांची परीक्षा द्यावी लागते. ज्यामध्ये पुरुषांसाठी एकूण ५ तर स्त्रियांसाठी एकूण ४ इव्हेंट्स असतात. ज्याची माहिती खालील प्रमाणे:

गोळा फेक :-

 • स्त्री = ४ किलो गोळा (एकूण गुण २५)
 • पुरुष = ७ किलो २५० ग्राम (एकूण गुण २०)

१०० मीटर धावणे :-

 • महिला :- एकूण गुण २५
 • पुरुष :- एकूण गुण २०

धावणे :-

 • महिला (१००० मीटर) :- एकूण गुण २५
 • पुरुष (१६०० मीटर ) :- एकूण गुण २०

पूल अप्स [Pull Ups] :-

 • पुरुष :- १० पूल अप्स = एकूण गुण २०
 • स्त्री :- लागू नाही

लांब उडी :-

 • पुरुष :- एकूण गुण २०
 • स्त्री :- एकूण गुण २५

लेखी परीक्षा

लेखी परीक्षा हा पोलीस भरतीचा दुसरा टप्पा आहेत. लेखी परीक्षा हि एकूण १०० गुणांची असून प्रश्न सोडविण्यासाठी एकूण ९० मिनिटे इतका वेळ दिलेला असतो.

प्रश्नपत्रिकेत एकूण गणित, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व चालूघडामोडी आणि बुद्धिमत्ता ह्या चार विषयांचा समावेश असतो. प्रत्येक विषयासाठी एकूण २५ गुण विभागले आहेत.

गणित                                          २५ गुण

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी        २५ गुण

बुद्धिमत्ता चाचणी:-                        २५ गुण

मराठी व्याकरण:-                          २५ गुण

————————-

एकूण                                      १०० गुण

आवश्यक कागदपत्रे

 • पासपोर्ट साईझ फोटो
 • जातीचा दाखल [ आरक्षणाचा लाभ घेण्यास इच्छुक असाल तर ] [ Open कास्टसाठी लागू नाही]
 • आधार कार्ड, पॅनकार्ड, वोटिंग कार्ड किंवा इतर ओळखपत्र
 • महाराष्ट्राचा रहिवासी दाखला
 • जात वैधता प्रमाणपत्र [ Open कास्ट साठी लागू नाही ]
 • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

पोलीस भरती देण्यापुरती ज्या ज्या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे त्या सर्वांचा आढावा आपण वरील माहिती मध्ये घेतलेला आहेत हि माहिती तुम्हाला पोलीस भरती देताना नक्कीच उपयोगी पडलं अशी आशा.

Leave a Comment