OYO चा फुल फॉर्म आणि मराठीत अर्थ | OYO Meaning in Marathi

आज लोक travelling ला अधिक पसंती देताना दिसत आहेत. नवनवीन ठिकाणांना भेट देणे लोकांना आवडत आहे, त्यामुळे दैनंदिन जीवनाच्या तणावापासून मुक्ती मिळतेच, पण सोबतच मन देखील ताजे तवाने होते.

ट्रॅव्हलिंग करण्याहेतू किंवा इतर कारणास्तव आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो, तेव्हा साधारणता आपण हॉटेल रूम भाड्याने घेऊन तेथे राहतो. आपण जर एकाच ठिकाणी सतत जात असेल तर कोणते हॉटेल स्वस्त आहे आणि चांगले आहे याची कल्पना आपल्याला असते, परंतु जेव्हा आपण नवीन ठिकाणी फिरायला जातो, अशा वेळेस आपल्याला तेथील हॉटेलची माहिती नसते, त्यामुळे अनेकदा आपण होटेल रूमसाठी अधिक पैसे मोजतो, पण तरीही आपल्याला सेवा देखील चांगले मिळत नाही, अशा वेळेस आपल्याला जे सर्वात जास्त कामी येते, ते म्हणजे OYO होय.

आता OYO म्हणजे काय असा, प्रश्न नक्कीच अनेकांच्या मनात येत असणार, तर याचेच निराकरण करत आपण या लेखात OYO बद्दल विविध प्रकारची माहिती पाहणार आहोत, जसे की OYO म्हणजे नेमके काय, OYO ची स्थापना, OYO चे अकाउंट कसे खोलावे, घरबसल्या OYO रूम कसा बुक करावा आणि oyo चे फायदे इत्यादी.


OYO म्हणजे नेमके काय ? (OYO Meaning in Marathi)

OYO साधारणतः एक हॉटेल चैन आहे, जी अगदी कमीत कमी दरात आणि उत्तम सेवा सुविधांसोबत ग्राहकांना उत्तम होटेल रूम उपलब्ध करून देते, यामुळे आपल्या हॉटेल बाबतच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत नाही.

पूर्वी प्रथम एक चांगले हॉटेल शोधण्यासाठी खूप मशागत करावी लागत होती आणि जरी चांगले हॉटेल मिळाले तरी तेथे आपल्यासाठी रिकामे रूम उपलब्ध असतीलच असेही नव्हते, आणि खूप मशागत केल्यानंतर चांगल्या हॉटेलमध्ये रुम जरी रिकामे असले तरी तेथे ग्राहकांची गरज पाहता जास्त पैसे घेतले जायचे, जे देण्यावाचून ग्राहकाकडे दुसरा पर्याय उरत नव्हता, परंतु OYO आगमनानंतर या संपूर्ण समस्यांचे निरसरण झाले. कारण OYO कंपनीद्वारे ग्राहकांच्या सुविधांसाठी ॲप तयार करण्यात आला, ज्यामुळे आपण प्रवासाला निघण्याआधी ठराविक तारखेला ऑनलाइन पद्धतीने आपल्या बजेटनुसार घर बसल्या OYO रूमस किंवा होटेल रूम बुक करू शकतो.


OYO Room फुल फॉर्म

O – On

Y – Your

O – Own

OYO (On Your Room) च्या सविस्तर रूपाचा मराठी अर्थ तुमचे स्वतःचे रूमअसा होतो.


OYO ची स्थापना

OYO या कंपनीची स्थापना 2013 मध्ये रितेश अग्रवाल नावाच्या तरुण मुलाने केली होती. OYO चे मुख्यालय हरियाणामधील गुरगाव या ठिकाणी आहे आणि रितेश हेच OYO चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO आहेत.

रितेश चा जन्म भारतातील ओडीसा या ठिकाणी झाला असून ते मध्यम वर्गीय घराण्यातून belong करतात. बारावीच्या नंतरचे शिक्षण घेण्यासाठी ते घरापासून दूर राहत असत, तसेच त्यांना फिरणे देखील आवडायचे आणि ही आवड जोपासण्यासाठी ते विविध स्थळांना भेट देत असत, या दरम्यान रितेश बाहेरच हॉटेल रूम भाड्याने घेऊन रहात असत. विविध हॉटेल मध्ये राहत असताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असे, जसे की महागडे हॉटेल्स रूम, गैर सुविधा, अनेकदा रूमच न भेटे आणि अधिक. हा त्रास न केवळ आपला असून सर्वांचाचं आहे आणि याचे निराकरण करण्यासाठी त्यांनी OYO रूमस या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला OYO चे कामकाज Offline पद्धतीने चालत होते, परंतु OYO चा प्रसार करण्याहेतू कामकाज ऑनलाइन घेऊन जाण्याचा निर्णय रितेश यांनी घेतला.

2018 मध्ये रितेश यांना OYO साठी Star Virtue Investment Ltd या कंपनीकडून एक बिलियन डॉलर इतकी फंडिंग मिळाली, त्याचा वापर करून रितेश यांनी कंपनीचा प्रसार केला, त्यानंतर पुन्हा 2019 मध्ये एका चायनीज कंपनीद्वारे फंडिंग मिळाली आणि अशाप्रकारे OYO चे संपूर्ण जगभरात प्रसारण होते गेले.

आज OYO केवळ भारतातच कार्यरत नसून मलेशिया, चीन, नेपाल, अमेरिका अशा अनेक देशांमध्ये देखील कार्यरत आहे.

अशा प्रकारे एका सामान्य Problem Solving कल्पनेमधून भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनीची स्थापना झाली.


वैशिष्टये

OYO ही भारतातील हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे, जी रूम्सच्या बुकिंगसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म चालवते. OYO ने लक्षणीय वाढ अनुभवली आहे आणि जागतिक स्तरावर तिच्या कार्याचा विस्तार केला आहे. OYO ची काही प्रमुख वैशिष्टये खालीलप्रमाणे :

1. तंत्रज्ञान-चलित

OYO स्वतःचे कार्य कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भागीदार हॉटेलसाठी इन्व्हेंटरी, किंमत आणि खोलीचे वाटप ऑप्टिमाइझ करण्यासाठी कंपनी तिचे मालकीचे सॉफ्टवेअर आणि अल्गोरिदम वापरते.

3. बजेट-फ्रेंडली

OYO चे मुख्य फोकस म्हणजे प्रवाशांसाठी परवडणारे हॉटेल रूम्स प्रदान करणे हे आहे. OYO हे स्पर्धात्मक किमती ऑफर करते.

4. मानकीकरण

OYO भागीदार हॉटेल्स अपग्रेड करण्यासाठी आणि त्याच्या नेटवर्कवर विशिष्ट गुणवत्ता मानके राखण्यासाठी प्रमाणित दृष्टिकोनाचे अनुसरण करते. अत्यावश्यक सुविधा आणि सेवांसह अतिथींना सातत्यपूर्ण अनुभव देणे हे OYO चे उद्दिष्ट आहे.

5. जलद विस्तार

OYO ने जगभरातील विविध देशांमध्ये आपली उपस्थिती झपाट्याने वाढवली आहे. आक्रमक विपणन, भागीदारी आणि धोरणात्मक अधिग्रहणांमुळे या विस्ताराला चालना मिळाली आहे.

6. ग्राहक-केंद्रित

OYO ग्राहकांच्या समाधानावर भर देते आणि ग्राहकांचा अनुभव वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवते. OYO स्वतःच्या सेवा सुधारण्यासाठी ते अनेकदा ग्राहकांकडून फीडबॅक गोळा करते.

7. विवाद

OYO ला काही विवाद आणि टीकेचा सामना करावा लागला आहे, विशेषत: भागीदार हॉटेल्सच्या कराराच्या अटींशी संबंधित आणि काही हॉटेल मालकांनी कमिशन दर, देय विलंब आणि करार पद्धतींबाबत उपस्थित केलेल्या समस्यांशी संबंधित.कंपन्यांची वैशिष्ट्ये आणि स्थिती कालांतराने विकसित होऊ शकते. सर्वात अद्ययावत माहितीसाठी, अलीकडील स्त्रोत किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटचा संदर्भ घेणे सर्वोत्तम आहे.


OYO वर अकाउंट कसे खोलावे ?

अगदी 4 ते 5 स्टेपमध्ये आपण OYO मध्ये आपले अकाउंट अगदी सहज सुरू करू शकतो, OYO मध्ये अकाउंट सुरू करण्याचे स्टेप खालील प्रमाणे,

Step 1:- प्रथम मोबाईल मध्ये प्लेस्टोर चा वापर करून OYO ॲप डाऊनलोड करा.

Step 2:- जसेच मोबाईल मध्ये ॲप चालू करू आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारला जाईल, तो देऊन Continue करा.

Step 3:- मोबाईल नंबर दिल्यावर आपल्यासमोर आणखी एक वेब पेज उघडेल, जेथे आपले नाव, ईमेल आयडी आणि जो मोबाइल नंबर आपण आधी दिला होता, त्यावर पाठवलेला OTP विचारला जाईल, ही संपूर्ण माहिती भरली की केवळ Create Account या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपले OYO वरील अकाउंट Create होईल.


OYO Rooms कसे बुक करावेत ?

Step 1:- प्रथम OYO एप्लीकेशन चालू करा किंवा ब्राउजर मध्ये OYO च्या वेबसाईटला भेट देऊन तुमचे ID आणि Password टाकून तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन व्हा.  ॲप मध्ये आणि ब्राउझर मध्ये चालू केलेल्या वेबसाईटचे इंटरफेस हे जवळजवळ सारखेच असते, त्यात इतका फरक नसतो.

Step 2:- जेव्हा ॲप किंवा वेबसाईटचे इंटर्फेस उघडेल, तेव्हा स्क्रीन च्या वरच्या बाजूला तुम्हाला एक सर्च बार दिसेल, तेथे ज्या ठिकाणी तुम्हाला होटेल रूम हवे आहेत, त्या ठिकाणचे नाव सर्च बॉक्समध्ये लिहा आणि इंटर करा, सर्च केल्यावर त्या ठिकाणी किती हॉटेल्स आहे ते तुम्हाला दिसेल.

Step 3:- लोकेशन टाकल्यावर तुम्हाला Check In आणि Check Out ची तारीख तेथे द्यावे लागेल, सोबतच तुम्हाला किती लोकांसाठी रूम हवा आहे याची माहिती देखील भरा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका रूम मध्ये केवळ चारच लोक राहू शकतात.

Step 4:- माहिती भरल्यावर Countinue बटनावर क्लिक करा, ज्याने जितके रूम्स तुमच्या गरजेनुसार available आहेत याची माहिती तुम्हाला मिळेल.

Step 5:- OYO द्वारे तुम्हाला एक फिल्टर देखील पुरवले जाते, ज्यामध्ये माहिती भरल्यावर तुम्ही भरलेला माहितीनुसार तुम्हाला रूम दाखवले जातील, उदाहरणार्थ पैशांचे फिल्टर.

Step 6:- तुम्हाला जे होटेल रूम आवडेल, त्यावर क्लिक करा जाने तुमच्यासमोर तुम्ही निवडलेल्या होटेल रूम चे विविध अँगलने फोटो येतील. Discription मध्ये तुम्ही निवडलेल्या रूम मध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत हेही सांगितले जाते. हॉटेल रूम रेटिंगच्या मदतीने तुम्हाला रूम निवडणे आणखी सोपे जाईल.

Step 7:- तुम्हाला रूम आवडला की Book Now वर क्लिक करा, जेव्हा तुमचे रूम यशस्वीरित्या Book होईल, तेव्हा तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वर एक Confermation चा मेसेज येईल आणि अशा प्रकारे तुम्ही OYO वर घरबसल्या रूम बुक करू शकता.

अधिक लेख :

1. ओटीटी (OTT) म्हणजे काय ? | OTT Meaning in marathi

2. Vibe म्हणजे काय ? | Vibes Meaning in Marathi

3. जॉब रिस्युम (Resume) म्हणजे काय ? | Resume Meaning in Marathi

4. Freelancer म्हणजे काय ? | Freelancer Meaning In Marathi

Leave a Comment