निफ्टी म्हणजे काय व निफ्टीची गणना कशी करावी ?

शेअर बाजार हा नेहमीच प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एक आकर्षणाचा विषय राहिला आहे. आज भारतात देखील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या कालांतराने वाढत आहे. अशात नवीन गुंतवणूकदारांना गुंतवणुकी दरम्यान अनेक घटक आहेत जे गोंधळवून टाकतात, त्यातीलच एक घटक म्हणजे निफ्टी (NIFTY) होय.

या लेखात आपण निफ्टी संबंधित विस्तारित माहितीचा आढावा अगदी सोप्या शब्दात घेणार आहोत,


निफ्टी म्हणजे काय ?

निफ्टी या शब्दाची उत्पत्ती “नॅशनल स्टॉक एक्सचेंज” (National Stock Exchange) आणि “फिफ्टी” (Fifty) या दोन शब्दांच्या मिश्रणाने झाली आहे. निफ्टीला “निफ्टी फिफ्टी” (Nifty 50) असे देखील म्हटले जाते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फिफ्टी (National Stock Exchange Fifty) असे निफ्टी फिफ्टी चे संक्षिप्त रुप आहे.

निफ्टी म्हणजे शेअर मार्केटमधील उत्तम कामगिरी बजावणाऱ्या पन्नास कंपन्यांच्या शेअरचा संग्रह अथवा समूह होय. Nifty 50 द्वारे शेअर मार्केटमधील पन्नास विविध सेक्टरच्या प्रमुख कंपन्यांच्या शेअरचा आढावा घेतला जातो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Nifty 50 मध्ये सामील होण्यासाठी कंपनी शेअर मार्केटमध्ये सुचीबद्द असणे गरजेचे असते.

Nifty 50 मध्ये सामील कंपन्यांच्या शेअरच्या किमतीमधील चढ-उताराचा आढावा मिळतो. भारतातील गुंतवणूकदारांसाठी Nifty 50 एक महत्वपूर्ण Index आहे, कारण Nifty 50 वरून संपूर्ण शेअर मार्केटची दिशा ठरते.


निफ्टीमध्ये कोणत्या कंपन्यांना सामील केले जाते ?

नवीनतम कंपन्यांच्या शेअरची कामगिरी दर्शविण्यासाठी दर सहा महिन्यांच्या कालावधीत निफ्टीमध्ये नवीनतम कंपन्यांचा समावेश केला जातो. nifty 50 मध्ये शामिल होण्यासाठी कंपन्यांना काही ठराविक अटींवर खरे उतरावे लागते, ज्या कंपन्या या अटी पूर्ण करतात, अशाच कंपन्यांना Nifty 50 मध्ये स्थान मिळते. जेव्हा कोणतीही कंपनी Nifty 50 चा भाग बनते, त्या आधी कंपनीला ४ आठवड्यांपूर्वी नोटीस देण्यात येते.

Nifty 50 चे गठन करण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजद्वारे एका सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे, जी निफ्टी निर्देशांकाचे व्यवस्थापन करते. शेअर मार्केटमधील कंपन्यांना Nifty 50 चा हिस्सा होण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात, याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

  • शेअर मार्केटमध्ये कंपनी सूचीबद्ध असावी.
  • कंपनीच्या स्टॉकमध्ये तरळता (Liquidity) असावी. स्टॉकची तरळता मोजण्यासाठी कंपनीच्या शेअरच्या किमतींमधील होणारी चढ-उतार याचा आढावा घेतला जातो.
  • कंपनी Nifty 50 मध्ये सामील होण्यापूर्वी मागील सहा महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये केली जाणारी ट्रेडिंगची वारंवारता किती आहे, हे तपासाला जाते. इथे ट्रेडिंगची वारंवारता ही १००% असणे गरजेचे असते.
  • कंपनीची Free-Floating सरासरी शेअर मार्केटच्या भांडवला इतकी असावी, तसेच ही सरासरी शेअर मार्केटमधील इतर लहान कंपन्यांच्या तुलनेत दीडपट अधिक असावी.
  • Differential Voting Rights” असलेल्या कंपन्यादेखील अनेकदा Nifty 50 चा हिस्सा होण्यास पात्र ठरू शकतात.

या अटींव्यतिरिक्त जेव्हा कंपनीचे विलीनीकरण, निलंबन अथवा Spin-Off  होते, तेव्हा देखील Nifty 50 ची पुनर्रचना केली जाऊ शकते.


निफ्टी ची गणना

NSE मधील Nifty 50 संबंधित सर्व व्यवस्थापन हे NSE द्वारे स्थापित एका समितीद्वारे केले जाते. ही एक प्रकारची सल्लागार समिती आहे असे आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये अनेक विशेषतज्ज्ञानाचा समावेश असतो.  Nifty 50 ची गणना ही Float-Adjusted आणि Market Capitalization Weighted या दोन पद्धतींद्वारे केली जाते.

निफ्टी ची गणना करण्यासाठी वापरले जाणारे सूत्र खालीलप्रमाणे,

” इंडेक्स व्हॅल्यू = करंट मार्केट व्हॅल्यू/बेस मार्केट कॅपिटल * १००० “


निफ्टी कंपन्यांची यादी 

Nifty 50 मध्ये समाविष्ट ५० कंपन्यांची नावे खालीलप्रमाणे,
 
कंपनीचे नाव क्षेत्र
Wipro Ltd. माहिती तंत्रज्ञान
UPL Ltd रसायन
Titan Company Ltd ग्राहकउपयोगी वस्तू उत्पादक
Ultra Tech Cement Ltd सिमेंट
Tata Steel Ltd धातू क्षेत्र
Tech Mahindra Ltd माहिती तंत्रज्ञान
Tata Motors Ltd. ऑटो मोबाईल
Tata Consultancy Service Ltd. माहिती तंत्रज्ञान
Tata Consumer Products Ltd. वस्तू उत्पादक
State Bank Of India बँकिंग
Sun Pharmaceutical Industries Ltd. औषधी क्षेत्र
SBI Life Insurance Co. विमा
Shree Cement Ltd. सिमेंट
Realiance Industries Ltd. तेल आणि गॅस क्षेत्र
Oil & Natural Gas Corporation Ltd. तेल अंडी गॅस क्षेत्र
Power Grid Corporation Of India Ltd. ऊर्जा-शक्ती क्षेत्र
Nestle India Ltd. वस्तू उत्पादक
NTPC Ltd. ऊर्जा-शक्ती क्षेत्र
Maruti Suzuki India Ltd. ऑटो-मोबाईल क्षेत्र (वाहन उत्पादन)
Larsen & Toubro Ltd. बांधकाम क्षेत्र
Mahindra & Mahindra Ltd. ऑटो-मोबाइल
Kotak Mahindra Bank Ltd. बँकिंग
ITC Ltd. वस्तू उत्पादक
JSW Steel Ltd धातू क्षेत्र
Induslnd Bank Ltd. बँकिंग क्षेत्र
Infosys Ltd. माहिती तंत्रज्ञान
ICICI Bank Ltd. बँकिंग क्षेत्र
Indian Oil Corporation Ltd. तेल आणि गॅस
HDFC Ltd. वित्तीय सेवा
Hindalco Industries Ltd. धातू
Hindustan Unilever Ltd. वस्तू उत्पादक
HDFC Life Insurance Co. Ltd. विमा
Hero Motocorp Ltd. ऑट-मोबाईल
HCL Technologies Ltd. माहिती तंत्रज्ञान
HDFC Bank Ltd. बँकिंग क्षेत्र
Grasim Industries Ltd. सिमेंट
Dr. Reddy’s Laboratories Ltd. औषध क्षेत्र
Eicher Motors Ltd. ऑटोमोबाईल
Divi’s Laboratories Ltd. औषध क्षेत्र
Cipla Ltd. औषध क्षेत्र
Coal India Ltd. खाणकाम
Britannia Industries Ltd. वस्तू उत्पादक
Bharat Petroleum Corp. Ltd. तेल आणि गॅस
Bharti Airtel Ltd. दूरसंचार क्षेत्र
Bajaj Finserv Ltd. वित्तीय सेवा
Bajaj Auto Ltd. ऑटो-मोबाइल
Bajaj Finance Ltd. वित्तीय सेवा
Asian Paints Ltd. वस्तू उत्पादक
Axis Bank Ltd. बँकिंग क्षेत्र
Adani Port & Special Economic Zone पायाभूत सुविधा

Nifty 50 आणि Sensex यातील फरक

शेअर मार्केटमध्ये Nifty 50 वगळता Sensex हा देखील एक महत्वाचा घटक मानला जातो. बऱ्याच नवीन गुंतवणूकदारांना Nifty 50 आणि Sensex हा एक सामायिक घटक वाटतो, हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण Nifty 50 आणि Sensex यात काय फरक आहे याचा आढावा घेणार आहोत,
 
Nifty 50 Sensex
“National Fifty” या शब्दापासून “Nifty 50” या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. “Sensitive Index” या शब्दापासून “Sensex” शब्दाची उत्पत्ती झाली आहे.
Nifty 50 ला CNX Fifty असे देखील म्हटले जाते. Sensex ला BSE index या पर्यायी नावाने देखील ओळखले जाते.
NSE ची सुरुवात साल १९९६ मध्ये झाली होती. Sensex ची सुरुवात १९८६ पासून झाली.
Nifty 50 चे संचालन NSE द्वारे केले जाते. Sensex चे संचालन BSE द्वारे केले जाते.
Nifty 50 चे मूल्य १००० इतके आहे. Sensex चे मूळ मूल्य १०० इतके आहे.
Nifty चे मूळ भांडवल २.०६ लाख करोड रुपये इतके आहे. Sensex चे स्वतःचे भांडवल नाही.
Nifty मध्ये एकूण ५० कंपन्यांच्या शेअरचा समावेश होतो. Sensex मध्ये एकूण ३० कंपन्यांच्या शेअरचा समावेश होतो.
Nifty मध्ये २४ विविध क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होतो. Sensex मध्ये १३ विविध क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होतो.

वैशिष्ट्ये

“निफ्टी 50” हा सामान्यत: नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या (NSE) निफ्टी 50 निर्देशांकाचा संदर्भ देतो. निफ्टी 50 हा भारतातील एक बेंचमार्क स्टॉक मार्केट इंडेक्स आहे, ज्यामध्ये NSE वर सूचीबद्ध 50 सर्वाधिक सक्रियपणे व्यापार केलेले आणि लिक्विड स्टॉक्स आहेत. हे भारतीय इक्विटी बाजाराच्या एकूण कामगिरीचे प्रातिनिधिक सूचक म्हणून काम करते. निफ्टी 50 ची काही वैशिष्ट्ये येथे आहेत:

1. रचना

निफ्टी 50 मध्ये NSE वर सूचीबद्ध असलेल्या सर्वात मोठ्या आणि सक्रियपणे व्यापार करणाऱ्या 50 कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमधून येतात, जसे की बँकिंग, वित्त, तंत्रज्ञान, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि बरेच काही.

2. विविधीकरण

निर्देशांक विविध क्षेत्रांमध्ये विविधता प्रदान करण्यासाठी डिझाइन केले आहे, जे एकूण निर्देशांकावरील कोणत्याही एका क्षेत्रातील खराब कामगिरीचा प्रभाव कमी करण्यास मदत करते.

3. बाजार भांडवल भारित

निफ्टी 50 हा बाजार भांडवल-भारित निर्देशांक आहे, याचा अर्थ निर्देशांकातील प्रत्येक समभागाचे वजन त्याच्या बाजार भांडवलाने (स्टॉकची किंमत थकबाकी असलेल्या समभागांच्या संख्येने गुणाकार) निर्धारित केली जाते. परिणामी, मोठ्या कंपन्यांचा निर्देशांकाच्या हालचालीवर जास्त प्रभाव असतो.

4. तरलता

निफ्टी 50 मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्या त्यांच्या तरलतेच्या आधारावर निवडल्या जातात, म्हणजे तुलनेने कमी बिड-आस्क स्प्रेड आणि उच्च ट्रेडिंग व्हॉल्यूमसह व्यापार करण्याची त्यांची क्षमता. हे सुनिश्चित करते की निर्देशांक सक्रियपणे व्यवहार केलेल्या समभागांनी बनलेला आहे.

5. बेंचमार्क

निफ्टी 50 हा भारतीय शेअर बाजाराच्या एकूण कामगिरीसाठी बेंचमार्क म्हणून काम करतो. याचा वापर गुंतवणूकदार, निधी व्यवस्थापक आणि विश्लेषक बाजाराचे आरोग्य आणि ट्रेंड मोजण्यासाठी करतात.

6. प्रतिनिधी

भारतातील विविध क्षेत्रे आणि उद्योगांची कामगिरी परावर्तित करून व्यापक अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधीत्व करणे हे निर्देशांकाचे उद्दिष्ट आहे.

7. पुनर्संतुलन

निफ्टी 50 च्या रचनेचे वेळोवेळी पुनरावलोकन केले जाते आणि ते बदलते बाजारातील गतिशीलता प्रतिबिंबित करत आहे याची खात्री करण्यासाठी समायोजित केले जाते. स्टॉक त्यांच्या कार्यप्रदर्शन आणि प्रासंगिकतेच्या आधारावर जोडले किंवा काढले जाऊ शकतात.

8. इंडेक्स फंड आणि ईटीएफ

निफ्टी ५० इंडेक्सचा मोठ्या प्रमाणावर इंडेक्स फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETFs) साठी आधार म्हणून वापर केला जातो. या गुंतवणूक उत्पादनांचे उद्दिष्ट निर्देशांकाच्या कामगिरीची प्रतिकृती बनवणे आणि गुंतवणूकदारांना 50 समभागांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये निष्क्रियपणे गुंतवणूक करण्याचा मार्ग प्रदान करणे आहे.

9. अस्थिरता निर्देशक

निफ्टी 50 निर्देशांकातील बदल बहुतेकदा बाजारातील भावना आणि अस्थिरतेचे सूचक म्हणून वापरले जातात. निर्देशांकातील लक्षणीय हालचाल व्यापक आर्थिक आणि बाजारातील कल दर्शवू शकतात.

10. जागतिक ओळख

निफ्टी 50 निर्देशांकाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारतीय इक्विटी मार्केटमध्ये एक्सपोजर मिळविण्यासाठी त्याचा वापर करत आहेत.

लक्षात ठेवा की माझे ज्ञान सप्टेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे आणि तेव्हापासून काही घडामोडी किंवा बदल झाले असतील.


FAQ

1. Nifty 50 ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

उत्तर : Nifty 50 ची संकल्पना १९९२ मध्ये उदयास आली होती, परंतु NSE द्वारे साल १९९६ मध्ये प्रथम Nifty Index प्रकाशित केले गेले.

2. Bank Nifty म्हणजे काय ?

उत्तर : बँक निफ्टी म्हणजे शेअर मार्केटमध्ये सूचिबद्ध सर्व बँकिंग स्टॉकचा समावेश असलेला निर्देशांक म्हणजे होय.

3. NSE चा फुल फॉर्म काय ?

उत्तर : National Stock Exchage हा NSE चा फुल फॉर्म आहे.

4. निफ्टी गुंतवणूकदारांसाठी का महत्वाचे आहे ?

उत्तर : गुंतवणूकदारांना Nifty 50 द्वारे संपूर्ण शेअर मार्केटच्या चढउताराचा आढावा घेण्यास मदत मिळते, म्हणून Nifty 50 गुंतवणूकदारांसाठी महत्वाची ठरते.

5. Nifty 50 चे संक्षिप्त रुप काय ?

उत्तर : National Stock Exchange Fifty हे Nifty 50 चे संक्षिप्त रूप आहे.

6. NSE कोठे स्थित आहे ?

उत्तर : NSE मुंबईमधील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आहे.

अधिक लेख –

1. शेअर बाजार संपूर्ण माहिती

2. IPO चा फुल फॉर्म काय ?

3. सेबी चे कार्य कोणते आहे ?

4. FD म्हणजे काय व FD चे फायदे कोणते ?

Leave a Comment