NASA माहिती मराठीत | NASA Information in Marathi

आज संपूर्ण जग विकासची वाट चालत आहे आणि या विकासाच्या व तंत्रज्ञानाच्या आधारेच माणूस केवळ पृथ्वी पुरतीच मर्यादित राहिला नाही, तर अवकाशात ही प्रवास करू लागला आहे. चंद्र, मंगळ हे ग्रह तर मानवाच्या अगदी ओळखीचे झाले आहेत.

NASA information in marathi

अंतराळ संबंधित प्रयोग, अभ्यास आणि संशोधन हे प्रत्येक देश स्वतःच्या पद्धतीने करत असतो. अंतराळ संबंधीत संशोधनासाठी अनेक देशांनी स्वतःची अंतराळ संस्था (Space Agency) तयार केली आहे.

संपूर्ण जगात एकूण 195 देश आहेत, प्रत्येक देशाकडे स्वतःची अंतराळ संस्था (Space Agency) आहेच, असे नाही.  195 देशांपैकी जगात फक्त 72 देशांकडे स्पेस एजन्सी आहेत. या 72 स्पेस एजन्सी मधील सर्वात सुप्रसिद्ध स्पेस एजन्सी म्हणजे NASA होय.

या लेखात आपण NASA संबंधित विविध घटकांची माहिती पाहणार आहोत, जसे की NASA म्हणजे नेमके काय, NASA चा फुल फॉर्म, NASA चा इतिहास, NASA चे 5 यशस्वी प्रयोग आणि अधिक.


Nasa म्हणजे नेमके काय ?

NASA ही एक सरकारी संस्था आहे, जी अमेरिका या देशात स्थिती आहे, मुळात ही एक अमेरिकन संस्था आहे असे आपण म्हणू शकतो. NASA हे आपल्या देशासाठी म्हणजेच अमेरिकेसाठी अंतराळा संबंधित कामे पार पडते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर यांच्या नेतृत्वाखाली 1 ऑक्टोबर 1958 रोजी NASA ची स्थापना करण्यात आली.

अमेरिका या देशाला अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रात देशाचा विकास करणे ही NASA ची मुख्य उद्दिष्टे आहेत.

NASA च्या स्थापनेपासून म्हणजे 1958 पासून ते आतापर्यंत NASA ने अवकाश संबंधी अनेक महत्त्वपूर्ण कामाला न केवळ पाठिंबा दिला, तर ते पूर्ण देखील केले आहे, ज्यामुळे अमेरिकेची जगासमोर एक वेगळी प्रतिमा उभी राहिली आहे.

NASA द्वारे 1968 च्या दरम्यान Moon Landing नावाच्या प्रोजेक्ट ची सुरुवात केली होती. माणसाला चंद्रावर घेऊन जाणे हा ह्या मोहिमेचा उद्देश होता आणि हा प्रोजेक्ट यशस्वी रित्या पार देखील पडला. Moon Landing हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यात NASA ला 20 अब्ज डॉलर इतका खर्च आला होता. नासाच्या संपूर्ण इतिहासातील Moon Landing किंवा Apollo हा सर्वात महागडा प्रोजेक्ट म्हणून सिद्ध झाला आहे.


NASA Full Form In Marathi

N – National – राष्ट्रीय

A – Aeronautics – वैमानिक

S – Space – अवकाश

A – Administration – प्रशासन


NASA चा इतिहास

NASA च्या स्थापनेनंतर म्हणजेच 1 ऑक्टोबर 1958 पासून पुढील काळात NASA ने अनेक यशस्वी कार्य पार पाडले, ज्यामुळे केवळ अमेरिकाच नव्हे, तर संपूर्ण जगाला अनेक ग्रह आणि उपग्रह यांची ओळख पटली. आज केवळ अमेरिकेतच नव्हे, तर NASA द्वारे केल्या जाणाऱ्या मोहिमांवर संपूर्ण जगाची नजर टपलेली असते.

नासाच्या स्थापनेचे कहानी ही 4 ऑक्‍टोबर 1957 च्या दरम्यान सुरू झाली होती, कारण या साली सोवियत या संस्थेने ( Union of Soviat ) जगातील पहिली मानव निर्मित Satellite अंतराळात सोडली होती, ज्याचे नाव sputnik असे होते.

या काळात अमेरिका आणि रुस म्हणजेच आजचे रशिया ह्या दोन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालू होती, हे एक प्रकारचे शीतयुद्ध होते, जे हत्यार आणि सैनिकांं शिवाय लढले जात होते.

इथे 4 ऑक्टोबर 1957 मध्ये रशियाने सॅटॅलाइट अंतराळात सोडली आणि तिथे रूस ला टक्कर देण्यासाठी अमेरिकेने देखील एक अंतराळ संस्थेची (Space Agency) स्थापना केली आणि अशा प्रकारे NASA ची स्थापना झाली.

1961 मध्ये Alan Bartlett Junior ने एक अमेरिकन अंतराळवीर जे जगातील दुसरे आणि अमेरिकेतील पहिले व्यक्ती ठरले जे अंतराळात गेले होते, याच वर्षी अमेरिकेचे 35 वे राष्ट्रपती केनेडी यांनी Moon Mission या विषयावर एक जगप्रसिद्ध भाषण केले होते.

1962 च्या दरम्यान NASA द्वारे John Herschel Glenn जे इंजिनियर, अंतराळवीर, व्यावसायिक आणि राजकारणी होते, त्यांना अंतराळात पाठविण्यात आले आणि अंतराळात जाणारे john हे जगातील तिसरे व्यक्ती तर पृथ्वीच्या कक्षेत (Earth Orbit) जाणारे पहिले व्यक्ती ठरले.

1963 मध्ये NASA ने एका अनोख्या प्रयोगाची सुरुवात केली, ज्यामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या विरुद्ध Aircraft पखांशिवाय आकाशात घेऊन जायचे होते, हा प्रयोग जवळजवळ 1978 सालापर्यंत सुरू होता.

हा प्रयोग सुरू होण्याच्या दोन वर्षानंतर म्हणजे 1965 च्या दरम्यान पुन्हा Edward White Jonior यांना अंतराळात पाठवण्यात आले आणि Edward हे अमेरिकेसोबत जगातील पहिले व्यक्ती ठरले, ज्यांनी अंतराळात चालून दाखवले म्हणजेच Space Walk केली.

ह्या नंतर तो साल आला, ज्या दिवशी मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि अनोखा दिवस येणार होता, तो म्हणजे 10 जुलै 1969 हा दिवस. या दिवशी NASA ने Apollo 11 नावाचे अंतराळयान चंद्रावर उतरवले. यामुळे चंद्रा विषयी च्या अनेक तथ्यांचा उलगडा जगासमोर आला. या अंतराळयानात बसून दोन अंतराळवीर चंद्रावर गेले होते, ज्यांचे नाव Neil Armstrong आणि Buzz Aldrin असे होते. या दोन्ही अंतराळवीरांनी चंद्रावर जाण्याचा एक अनोखा इतिहास रचला.

NASA द्वारे 10 ऑगस्ट 1975 ते 21 मे 1983 दरम्यान एक Viking नामक प्रोग्राम चालविण्यात आला. या दरम्यान Viking Probs ला मंगळ ग्रहावर उतरवण्यात आले होते.

Voyager प्रोग्राम हा NASA चा असा प्रोग्राम आहे, त्याची सुरुवात 1977 च्या दरम्यान झाली होती आणि आजही हा प्रोग्रामवर नासाचे वैज्ञानिक कार्यरत आहे. ह्या प्रोग्राम दरम्यान Voyager 1 आणि Voyager 2 असे दोन रोबोटिक इंटरस्टेलर आकाशात सोडण्यात आले होते जे 17किमी / सेकंद इतक्या वेगाने अंतराळात प्रवास करत असून आजही अंतराळातील माहिती पृथ्वीवर पाठवत आहेत. Voyager ला अंतराळात सोडून 40 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे.

1983 दरम्यान नासाने Sally Kristen नामक महिलेला अंतराळात पाठवले, ज्यामुळे sally Kristen ही केवळ अमेरिकेतीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील पहिली महिला अंतराळवीर ठरली.

Dr. Hubble यांच्या द्वारे big-bang नावाचा एक सिद्धांत मांडण्यात आला. या सिद्धांतानुसार जे अंतराळ आहे हे कालांतराने वाढतच आहे. ज्या वर्षी Dr.Hubble ह्यांनी Big-bang सिद्धांत मांडला, त्याच वर्षी NASA ने एक नवीन मोहीम सुरू केली, ज्याचे नाव Origin असे ठेवण्यात आले होते. या मोहिमअंतर्गत नासाचे वैज्ञानिक आकाशगंगेतील इतर ग्रहांवर जीवन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा प्रयोग आजही कार्यशील आहे.

अशाच अनेक क्रांतीचे जनक मोहिमा पार पाडत, NASA ही जगातील पहिल्या नंबरची स्पेस एजन्सी बनली आहे.


वैशिष्ट्ये

NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) ही युनायटेड स्टेट्स ची सरकारी एजन्सी आहे, जी देशाच्या नागरी अंतराळ कार्यक्रमासाठी आणि एरोनॉटिक्स आणि एरोस्पेस संशोधनासाठी जबाबदार आहे. अंतराळाचा शोध घेणे, वैज्ञानिक संशोधन करणे आणि अवकाश संशोधनाशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान हे NASA चे ध्येय आहे. नासाची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

1. अवकाश अन्वेषण

आपल्या सौरमालेतील ग्रह, चंद्र, लघुग्रह आणि त्यापुढील ग्रहांसह अवकाशाचा शोध घेणे हे नासाच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक आहे. हे खगोलीय पिंडांचा अभ्यास करण्यासाठी आणि विश्वाबद्दल डेटा गोळा करण्यासाठी रोबोटिक आणि मानवी अंतराळ मोहिमेचे आयोजन करते.

2. मानवी स्पेसफ्लाइट

NASA कडे अपोलो मून लँडिंग आणि स्पेस शटल प्रोग्रामसह मानवी स्पेसफ्लाइट मोहिमांचा इतिहास आहे. एजन्सी आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाठवत आहे.

3. वैज्ञानिक संशोधन

NASA खगोलशास्त्र, खगोलभौतिकी, ग्रह विज्ञान आणि पृथ्वी विज्ञान यासारख्या विविध विषयांमध्ये विस्तृत वैज्ञानिक संशोधन करते. पृथ्वी आणि अवकाशातील घटनांचा अभ्यास करण्यासाठी ते उपग्रह, दुर्बिणी आणि इतर उपकरणे वापरतात.

4. अंतराळ तंत्रज्ञान

NASA अंतराळ यान, रोव्हर्स, दुर्बिणी आणि वैज्ञानिक उपकरणांसह अवकाश तंत्रज्ञान विकसित आणि प्रगत करते. या नवकल्पना व्यावहारिक अनुप्रयोग आहेत आणि इतर क्षेत्रातील प्रगतीमध्ये योगदान देतात.

5. आंतरराष्ट्रीय सहयोग

NASA विविध अंतराळ मोहिमा आणि वैज्ञानिक प्रकल्पांवर इतर देशांतील अंतराळ संस्था आणि संस्थांसोबत सहयोग करते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे अंतराळ संशोधनातील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे एक प्रमुख उदाहरण आहे.

6. रोबोटिक मिशन्स

ग्रह, चंद्र, धूमकेतू आणि लघुग्रहांचा शोध घेण्यासाठी NASA असंख्य मानवरहित रोबोटिक मोहिमा राबवते. या मोहिमा सौरमाला आणि व्यापक विश्वाबद्दलची आपली समज वाढवण्यास मदत करतात.

7. शिक्षण आणि पोहोच

NASA लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी, शास्त्रज्ञांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि अवकाश संशोधन आणि त्याच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी शिक्षण आणि पोहोच उपक्रमांसाठी वचनबद्ध आहे.

8. एरोनॉटिक्स संशोधन

अवकाश संशोधनाव्यतिरिक्त, नासा विमान वाहतूक सुरक्षा, कार्यक्षमता आणि पर्यावरणीय प्रभाव सुधारण्यासाठी एरोनॉटिक्समध्ये संशोधन करते. यामध्ये नवीन विमान तंत्रज्ञान आणि हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे समाविष्ट आहे.

9. दीर्घकालीन उद्दिष्टे

NASA अंतराळ संशोधनासाठी दीर्घकालीन नियोजनात गुंतलेली आहे, ज्यामध्ये आर्टेमिस प्रोग्रामचा समावेश आहे, ज्याचा उद्देश मानवांना चंद्रावर परत आणणे आणि अखेरीस मंगळावर अंतराळवीर पाठवणे आहे.

10. सरकारी एजन्सी

सरकारी एजन्सी म्हणून, NASA फेडरल फंडिंग आणि काँग्रेसच्या देखरेखीच्या अधीन आहे. हे यूएस सरकारने त्याच्या विविध कार्यक्रम आणि मोहिमांसाठी वाटप केलेल्या बजेटमध्ये कार्य करते.

कृपया लक्षात ठेवा की प्रदान केलेली माहिती सप्टेंबर २०२१ पर्यंत NASA च्या स्थितीवर आधारित आहे आणि तेव्हापासून काही घडामोडी किंवा बदल झाले असतील. सर्वात अद्ययावत माहितीसाठी, मी NASA च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याची किंवा अलीकडील बातम्या लेख आणि प्रकाशनांचा संदर्भ देण्याची शिफारस करतो.


NASA च्या 5 यशस्वी मोहिमा

1. Viking

Viking probe 1 ह्या अंतराळ यानाला 1976 च्या दरम्यान लॉन्च करण्यात आले होते, तसेच हे जगातील पहिले अंतराळ यान बनले जे मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या land झाले होते.

Viking 1 probe ला नासा द्वारे लॉन्च करण्याआधी सोव्हिएत संस्थेद्वारे ( Union of Soviat ) Soviat 2 आणि Soviat 3 हे अंतराळयान लॉन्च करण्यात आले होते, परंतु हे अंतराळयान मंगळ ग्रहावर लँड होऊ शकले नाही, ज्यामुळे सोव्हिएत संस्थेचा ( Union of Soviat ) हा प्रयोग अयशस्वी ठरला.

नासा द्वारे लॉन्स केलेले Viking probe हे 16 वर्षे 16 दिवस मंगळवार होते आणि तेथील फोटोग्राफ्स पृथ्वीवर NASA ला पाठवत होते. सहा वर्ष मंगळवार वास्तव्य करणारे Viking probe हे जगातील पहिले अंतराळ यान होते.

2. Chandra X-ray Observatory

Chandra X-Ray Observatory हे पूर्वी Advance X-ray Astrophysics Facility या नावाने ओळखले जायचे. हे मुळात एक Space Telescope आहे. Space Telescope म्हणजे एक अशी दुर्बिण जी अवकाशात ग्रह पाहण्याच्या पात्रतेची आहे.

Chandra X-Ray Observatory टेलिस्कोप कोलंबियातील Space Center मध्ये 23 जुलै 1999 च्या दरम्यान NASA द्वारे लॉन्च करण्यात आली होते. Chandra हे Telescope इतर कोणत्याही X-ray दुर्बीण पेक्षा शंभर पट अधिक उत्तम आहे. हे Chandra दुर्बिण मध्ये बसविण्यात आलेल्या उच्च कोनिय आरशांच्या Resolution मुळे शक्य झाले.

आपल्या पृथ्वीच्या अवतीभवती काही असे वातावरण अस्तित्वात आहे, जे X-ray ला शोषून घेते, ज्यामुळे पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या दुर्बिणीतून आकाशगंगेचे निरीक्षण योग्य रीत्या करता येत नाही, म्हणूनच Chandra X-Ray Observatory लॉंच करण्यात आले होते आणि हे मिशन वर्तमान काळात देखील कार्यशील आहे.

3. Voyager

Voyager 1 आणि Voyager 2 हे मुळात एक Spacecraft आहे, जे 1977 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. या स्पेसक्राफ्ट मुळे जगाला शनि आणि गुरू या दोन ग्रहांची पुरेपूर माहिती उपलब्ध झाली.

चंद्रावरील ज्वालामुखींची तंतोतंत माहिती फोटो द्वारे शास्त्रज्ञान पर्यंत पोचली. Voyager हे पहिले स्पेसक्राफ्ट आहे, जे युरेनस च्या जवळ पोचले, ज्यामुळे एक नवीन इतिहास रचला गेला.  कारण यापूर्वी कोणतेही एअरक्राफ्ट युरेनस च्या जवळ पोचले नव्हते. युरेनस या कक्षेत जाऊन Voyager ने जो डेटा पृथ्वीवर पाठवल्या, त्यावरून 10 नवीन चंद्राचा शोध लागला.

Voyager 2 ह्या स्पेसक्राफ्ट ने इतके अंतर पार केले आहे की, ते पृथ्वी पासुन खुप लांब पोहोचली आहे व Voyager 1 आणि Voyager 2 हे दोन्ही aircraft साल 2025 पर्यंत पृथ्वीवर योग्य क्षमतेने data पाठवू शकतील अशी माहिती NASA च्या वैज्ञानिकांद्वारे मिळाली आहे.

4. Pioneer

Pioneer 10 आणि Pioneer 11 हे 1973 साली लॉन्च केले गेले होते, हे पहिले अंतराळ यान होते, जे गॅस निर्मिती ग्रह आहेत, म्हणजेच गुरु आणि शनी ची माहिती पृथ्वीवर पाठवण्यास सक्षम होते.

Pioneer 10 हे पहिले अंतराळयान होते, जे आकाशगंगेतील Asteroid Belt मधील क्षेत्रात परिक्रमाकरत होते. Asteroid Belt म्हणजे मंगळ ग्रह आणि गुरु ग्रह यातील असा भाग ज्यात उल्कापात फिरत असतात.

Pioneer लॉन्च केल्याच्या दीड वर्षानंतर Pioneer 10 हे गुरु ग्रहावर पोचले आणि तेथील एका विशिष्ट ठिकाणाची माहिती आणि फोटो वैज्ञानिकांना पाठवली, यावरून वैज्ञानिकांनी त्या ठिकाणाला Great Red Spot असे नाव दिले. गुरू ग्रहानंतर एका वर्षाने हे अंतराळ यान शनी ग्रहावर गेले आणि तेथील माहिती पुन्हा वैज्ञानिकांनी पर्यंत पोचवली.

वर्तमान काळात ह्या अंतराळ यानात बिघाड आल्याची शंका नासाच्या वैज्ञानिकांनी दर्शवली आहे, त्यामुळेच कदाचित Pioneer 10 ने पृथ्वीवर माहिती पाठवणे बंद केले असावे.

5. Apollow

Apollo Mission हे  NASA चे इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण असे मिशन मानले जाते. हे एक असे मिशन होते, ज्यामुळे माणूस पहिल्यांदा अवकाशाला अनुभव शकला. Apollo मिशनमध्ये 1968 मध्ये अपोलो नावाच्या एका अंतराळ यानातून माणसाला चंद्रावर पाठवले होते आणि हे संपूर्ण मानवी इतिहासात पहिल्यांदाच घडले होते. Apollo मिशनसाठी 2,540 करोड डॉलर इतका खर्च आला होता, तसेच हे मिशन जरी 1968 ते 1972 ह्या दरम्यान पार पडले असले, तरी याची सुरुवात 1961 च्या दरम्यान सुरू झाली होती, याचा अर्थ चार वर्षात मिशन पार करण्यासाठी सात वर्षांची तयारी केली गेली होती.


NASA चे मुख्यालय कोठे आहे ?

NASA ही जगातील सुप्रसिद्ध स्पेस एजन्सी आहे, हे तर आपण जाणतोच, परंतु NASA चे मुख्यालय कोठे आहे ? याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही. NASA चे मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे स्थित आहे. वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी असून रोटोमॅक नदीच्या तीरावर वसले आहे. अमेरिकेतील दोन मुख्य केंद्रे वाईट हाऊस आणि सुप्रीम कोर्ट हेदेखील वॉशिंग्टन मध्येच आहेत.


अधिक लेख :

1. डेटा सायन्स म्हणजे काय ?

2. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय व याचे प्रकार कोणते ?

3. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान म्हणजे काय व याचे प्रकार कोणते ?

4. अवकाश तंत्रज्ञान म्हणजे काय ?

Leave a Comment