एम एस ऑफिस माहिती मराठी | MS Office Information In Marathi

मायक्रोसॉफ्ट विंडो ही संगणकीय प्रणालीत, जगात सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टिम आहे. मायक्रोसॉफ्ट आपल्या युजरच्या उत्तम अनुभवासाठी युजरला विविध सॉफ्टवेअर देखील उपलब्ध करून देते, मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे याचे उत्तम उदाहरण आहे. या लेखात आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस संबंधितच विविध माहितीच आढावा घेणार आहोत,


 

एम एस ऑफिस म्हणजे काय ?

एम एस ऑफिसला मायक्रोसॉफ्ट ऑफिस असे देखील म्हटले जाते, हे मुळात एक क्लायंट सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त विविध प्रकारच्या टूल्सचा समावेश असतो. १ ऑगस्ट १९८८ मध्ये एम एस ऑफिस च्या लॉन्चिंग संबंधित घोषणा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल गेट्स यांनी केली होती. सुरुवातीच्या व्हर्जनमध्ये, एम एस ऑफिस मध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेल, पॉवर पॉईंट आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड या तीनच टूल्सचा समावेश होता.

कालांतराने एम एस ऑफिसमधील टूल्समध्ये स्पेल चेकर (Spell Checker), डेटा ईंटेग्रेशन (Data Integration), विज्वल बेसिक (Visual Basic) सारख्या सुविधा मायक्रोसॉफ्ट ने युजरच्या उत्तम अनुभवासाठी ऍड केल्या.

एम एस ऑफिस हे वैयक्तिक आणि कॉर्पोरेट अशा दोन्ही स्तरावर कार्य करण्यास सक्षम आहे. आज जवळ जवळ संपूर्ण कॉर्पोरेट क्षेत्र एम एस ऑफिसद्वारे व्यापले गेले आहे. १० जुलै २०१२ मध्ये सॉफ्टपेडिया (Softpedia) द्वारे प्रसारित केलेल्या एका रिपोर्टनुसार जगातील १ अब्जाहून अधिक लोक मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा उपयोग करत आहेत, व कालांतराने युजरची संख्या ही वाढताना दिसत आहे.

एम एस सॉफ्टवेअरमध्ये वर्ड प्रोसेसर (Word Processor) , स्प्रेडशीट (Spredsheet), प्रेसेंटेशन प्रोग्रॅम (Presentation Program), ई-मेल क्लायंट (Email Client), डेटा बेस मॅनेजमेंट सिस्टिम (Database Management System) आणि डेस्कटॉप प्रकाशक अँप (Desktop Launching App) इत्यादी घटकांचा समावेश केला गेला आहे. युजरच्या उत्तम अनुभवासाठी मायक्रोसॉफ्ट ने एम एस ऑफिसच्या विविध आवृत्त्या देखील तयार केल्या आहेत.

युजर मायक्रोसॉफ्टचा उपयोग मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिम (Operating System) सोबतच मॅक ओएस (Mac OS), अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (IOS) मध्ये देखील करू शकतो. मोबाईलसाठी विशेष आवृत्ती तयार करण्यात आली आहे, जी अगदी सहज प्लायस्टोर (Play Stor) व उपलब्ध होते. तसेच एम एस ऑफिसचा उपयोग आपण एखाद्या वेब ब्राऊसर वरून देखील करू शकतो.

एम एस ऑफिस २०१३ नंतर पासून, मायक्रोसॉफ्ट कंपनीने ऑफिस ३६५ (Microsoft Office 365) चा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. मुळात ऑफिस ३६५ हे एक प्रकारचे सब्स्क्रिप्शन (Subcripton) प्रमाणे आहे, जसे आपण ऍमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स चे घेतो अगदी तसेच. ऑफिस ३६५ चे सुबक्रिप्शन हे युजरला लाईफटाइम मिळते, सोबतच नवनवीन फिचर वापरने, सॉफ्टवेअर चे अपडेट मिळवणे, एम एस ऑफिसमधील सर्व सॉफ्टवेअर चा ऍक्सेस मिळवणे या सुविधा देखील दिल्या जातात.


एम एस ऑफिस चे टूल्स

एम एस ऑफिस हा मुळात एक सॉफ्टवेअर गट आहे, हे तर आपण जाणतो. या गटात नेमक्या कोणत्या मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरचा अथवा टूल्सचा समावेश होतो, हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. एम एस वर्ड (MS Word)

 • एम एस वर्ड हा एक सर्वसाधारण वर्ड प्रोसेसर सॉफ्टवेअर आहे.
 • एम एस वर्ड ची सुरुवात मायक्रोसॉफ्ट ने २५ ऑक्टोबर १९८३ मध्ये केली होती.
 • वर्ड चा उपयोग आपण एम एस ऑफिस अंतर्गत आणि वैयक्तिक रित्या देखील वापरू शकतो.
 • प्रोफेशनल राईटउप, तयार कागदपत्रांमध्ये बदल करणे, ग्राफिकल कागदपत्रांची निर्मिती करणे, अशी हजारो कामे आपण एम एस वर्डद्वारे पार पाडू शकतो.
 • एम एस वर्डमध्ये तयार केले गेलेले डॉक्युमेंट्स “doc” या एक्सटेंशन मध्ये सेव्ह होतात.

2. एम एस आऊटलूक (MS Outlook)

 • ओउटलुक ची सुरुवात १६ जानेवारी १९९७ मध्ये केली गेली होती.
 • आऊटलुक एक वैयक्तिक माहिती प्रबंधक प्रणाली आहे.
 •  आऊटलूक चा उपयोग एकाच वेळी एक किंवा एकापेक्षा अधिक वापरकर्ते करू शकतात.
 • टास्क मॅनेजमेंट (Task Management), कॅलेंडरिंग (Calendaring), संपर्क मॅनेज करणे (Contact Management), सर्वसाधारण लॉगिन (Normal Login), इंटरनेट ब्राउजिंग (Internet Browsing) असे विविध टास्क आपण आऊटलूक मध्ये पार पाडू शकतो.
 • .pst हे आऊटलूक फाईल चे एक्सटेंशन आहे, म्हणजे या स्वरूपात आऊट लूक ची फाईल सेव्ह केली जाते.

3. एम एस एक्सेल (MS Excel)

 • मुख्यतः स्प्रेडशीट वर आधारित डॉक्युमेंट तयार करण्यासाठी एक्सेलचा उपयोग केला जातो.
 • स्प्रेडशीट डॉक्युमेंट लहान-लहान बॉक्सच्या आधारावर तयार केले जातात, या बॉक्सला “cell” असे म्हणतात, स्प्रेडशीट मधील हे बॉक्स उभ्या आणि आडव्या रेषांद्वारे तयार होतात.
 • .xls हे एम एस एक्सेल फाईल चे एक्सटेंशन आहे.
 • साल १९८३ मध्ये कंपनीने मायक्रोसॉफ्ट एक्सेल लॉन्च केले होते.
 •  एक्सेल मुळात एक डेटा प्रक्रिया सॉफ्टवेअर (Data Processing Software) आहे.
 • एक्सेल २०१९ १६.०. ६७४२.२०४८” हे एम एस एक्सेल चे लेटेस्ट व्हर्जन आहे.
 •  अगदी हजारो शब्दांचा डेटा सहज मॅनेज करण्यासाठी एम एस एक्सेलचा उपयोग होतो.

4. एम एस वननोट (MS OneNote)

 • एम एस वननोट हा एक माहिती नोंदणी करण्यासाठी तयार करण्यात आलेला सॉफ्टवेअर अथवा टूल आहे.
 • १९ नोव्हेंबर २००३ मध्ये या टूलची सुरुवात करण्यात आली होती.
 • २००३ मध्ये वननोटचा उपयोग केवळ एम एस ऑफिस मध्ये केला जात होता, परंतु नंतर डेव्हलपर्सने याला वैयक्तिक वापरण्यास सक्षम केले.
 • वननोटद्वारे आपण फोटो, लेख अथवा तक्ता स्वरूपात डेटा साठवू शकतो.
 • .one हे एम एस वननोट चे फाईल एक्सटेंशन आहे.

5. पॉवर पॉईंट (Power Point)

 • एम एस पॉवर पॉईंट ला ppt म्हणून देखील ओळखले जाते.
 • २० एप्रिल १९८७ मध्ये मायक्रोसॉफ्टद्वारे या सॉफ्टवेअर ची सुरुवात करण्यात आली होती.
 • ऑडिओ, विडिओ, ग्राफ, लेख, टेबल स्वरुपातील डेटा घेऊन पॉवरपॉईंट शीटच्या आधारे, आपण यामध्ये प्रेझेन्टेशन तयार करू शकतो.
 • या सॉफ्टवेअरचा अधिकतर वापर कॉर्पोरेट क्षेत्रात (Corporate Sector) प्रोजेक्ट निर्मितीसाठी अधिक प्रमाणात केला जातो.
 • .ppt हे एम एस पॉवरपॉईंट फाईल चे एक्सटेंशन आहे.
 • एक्सेल १६.०. ११७२७ .२०१०४” हे जून २०१९ मध्ये लॉन्च केलेले पॉवर पॉईंट चे लेटेस्ट व्हर्जन आहे.

6. एम एस ऍक्सेस (MS Access)

 • एम एस ऍक्सेस हा एक डेटाबेस मॅनेजमेंट (Database Management) सॉफ्टवेअर आहे.
 • १३ नोव्हेंबर १९९२ मध्ये, एम एस ऍक्सेसची सुरुवात केली गेली होती.
 • टेबल, प्रश्न, फॉर्म आणि रिपोर्ट स्वरूपात डेटा, एम एस ऍक्सेसमध्ये तयार केला जाऊ शकतो.
 • एका फॉरमॅट मधून दुसऱ्या फॉरमॅटमध्ये डेटा अगदी सहज हस्तांतरित केला जाऊ शकतो.
 • accdb हे एम एस ऍक्सेस चे फाईल एक्सटेंशन आहे.

एम एस ऑफिस व्हर्जन

एम एस ऑफिस अथवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअर लॉन्च झाल्यापासून म्हणजेच १९ नोव्हेंबर १९९० पासून, त्यातील त्रुटी दूर करून व सॉफ्टवेअर अधिक सुलभ करून, एका नवीन व्हर्जन सहित पुन्हा पुन्हा लॉन्च केले जात आहे. यातीलच  काही व्हर्जन आणि पब्लिश तारीख याचा आढावा आपण खालील तख्यात घेणार आहोत,
 
व्हर्जन (Version) तारीख
मायक्रोसॉफ्ट ऑफिस विंडो १९ ऑक्टोबर १९९०
मायक्रोसॉफ्ट ऑफिस १.५ ३० ऑगस्ट १९९२
मायक्रोसॉफ्ट ऑफिस १.६ ८ जुलै १९९१
मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३.० ३० ऑगस्ट १९९२
मायक्रोसॉफ्ट ऑफिस ४.० १७ जानेवारी १९९४
मायक्रोसॉफ्ट ऑफिस ४.३ २ जून १९९४
मायक्रोसॉफ्ट ऑफिस NT ४.२ ३ जुलै १९९४
मायक्रोसॉफ्ट ऑफिस १९९५ २४ ऑगस्ट १९९५
मायक्रोसॉफ्ट ऑफिस ८.५ २० जून १९९७
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००० ७ जून १९९९
मायक्रोसॉफ्ट ऑफिस XP ३१ मे २००१
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००३ १९ ऑगस्ट २००३
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००७ ३० जानेवारी २००७
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१० १५ जून २०१०
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१३ २९ जानेवारी २०१३
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१६ २२ सप्टेंबर २०१५
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ २४ सप्टेंबर २०१८
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०२१ ५ ऑक्टोबर २०२१

 


वैशिष्ट्ये

 • मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा उपयोग संगणक प्रणाली सोबतच मोबाईलमध्ये देखील करता येतो.
 • मायक्रोसॉफ्ट ऑफिस ने आज जवळजवळ संपूर्ण व्यावसायिक क्षेत्र व्यापले आहे. वर्तमान काळात प्रत्येक कॉर्पोरेट सेक्टरमधील ऑफिसमध्ये, याचा उपयोग केला जातो.
 • मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे इंटरफेस युसर फ्रेंडली असल्यामुळे, ते वापरण्यास अगदी सोप्पे आहे.
 • वर्तमान काळात मायक्रोसॉफ्ट ऑफिस चा उपयोग करण्यासाठी आपल्याला ते संगणक अथवा मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्याची गरज राहिली नाही, तर आपण डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने वेब ब्राऊसारद्वारे त्याचा ऍक्सेस मिळवू शकतो.
 • मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये १० पेक्षा अधिक टूल्सचा समावेश आहे आणि प्रत्येक टूलचा वापर, विविध कार्य पार पाडण्यासाठी केला जातो.
 • मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये स्पेलचेक (Spell Check) नामक प्रोग्रॅम वापरण्यात आला आहे, जो आपल्या स्पेलिंग मिस्टेक दर्शवितो, व एक अचूक आणि अर्थ पूर्ण कागदपत्र तयार करण्यास मदत करतो.
 • मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील, प्रत्येक टूलमध्ये शेअर बटन देण्यात आले आहे, ज्यामुळे एक क्लिक निशी डॉक्युमेंट शेअर करू शकतो.
 • मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये टूल्स सोबतच ते कसे वापरायचे, याचे मार्गदर्शन देखील केले जाते.

FAQ

1. एम एस ऑफिस चे पहिले व्हर्जन केव्हा लॉन्च केले गेले ?

उत्तर : १९ ऑक्टोबर १९९० मध्ये एम एस ऑफिस चे पहिले व्हर्जन लॉन्च केले गेले होते.

2. पहिल्या एम एस ऑफिस मध्ये कोणत्या टूल्स चा समावेश होता ?

उत्तर : पहिल्या एम एस ऑफिसमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि पॉवरपॉईंट या आप्लिकेशन्स चा समावेश होता.

3. एम एस ऑफिस चे मुख्य कार्य कोणते ?

उत्तर : एम एस ऑफिसमध्ये समाविष्ट टूल्सला कार्य पार पाडण्यासाठी सुलभ प्रणाली प्रदान करणे, व अर्थपूर्ण कागदपत्रे तयार करण्यास युजर ला सहाय्य करणे, हे एम एस ऑफिस चे मुख्य कार्य आहे.

4. वर्तमान काळात एम एस ऑफिस मध्ये कोणत्या टूल्सचा समावेश आहे ?

उत्तर : वर्तमान काळात एम एस ऑफिस मध्ये, मायक्रोसॉफ्ट वर्ड (MS Word), एक्सेल (MS Excel), पॉवरपॉईंट (MS Power Point), वननोट (MS OneNote), आऊटलुक (MS Outlook), पब्लिशर (MS Publisher), ऍक्सेस (MS Access), स्काईप (Skype) आणि इन्फोपाथ (MS InfoPath) या टूल्स चा समावेश आहे.

5. एम एस ऑफिस मध्ये सर्वाधिक वापर कोणत्या टूलचा वापर केला जातो ?

उत्तर : एक रिपोर्ट नुसार एम एस ऑफिस (MS Word) मधील एम एस वर्ड या टूल चा सर्वाधिक वापर केला जातो.

6. मायक्रोसॉफ्ट कंपनी चे संस्थापक कोण ?

उत्तर : बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत.

अधिक लेख –

1. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मराठी माहिती

2. PPT चा फुल फॉर्म काय ?

3. सॉफ्टवेअर म्हणजे काय ?

4. ईमेल आयडी म्हणजे काय ?

Leave a Comment