Memes म्हणजे काय, सविस्तर माहिती | Memes Meaning in Marathi

आपण आपल्या दिवसभरातील बराचसा वेळ हा social media वर घालवत असतो. ह्या दरम्यान अनेक शब्द आपल्या निदर्शनास येत असतात त्यातीलच एक म्हणजे Memes. Memes हा मुळात एक अनेक वचनी शब्द असून ह्याचा एक वचनी शब्द Meme असा आहे.

या लेखात आपण Memes बद्दल विविध प्रकारची माहिती पाहणार आहोत, जसे की Memes म्हणजे काय, Meme ह्या शब्दाची उत्पत्ती कधी झाली, इंटरनेट वरील meme चे प्रकार आणि अधिक.

अनुक्रमणिका


Memes म्हणजे काय ? (Memes Meaning in Marathi)

अधिकतर इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ आपण एकाच शब्दात सांगतो, जसे की Article म्हणजे लेख, House म्हणजे घर इत्यादी. परंतु Memes हा एक असा इंग्रजी शब्द आहे, ज्याचा अर्थ एका शब्दात सांगणे थोडे कठीण आहे.

Memes ह्या शब्दा सोबत अधिक तर लोकांची ओळख ही  सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली आहे, कारण या शब्दाचा वापर सोशल मीडियामध्ये वारंवार होताना आपण पाहू शकतो.

Memes हा शब्द आपल्या ओळखीचा जरी सध्याच्या काळात झाला असला तरी, या शब्दाचे अस्तित्व हे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अस्तित्वाच्याही आधीपासून आहे. तसेच आता Meme चा जो अर्थ आपल्याला माहित आहे, पूर्वी हा याचा खरा अर्थ नव्हता, कालांतराने या शब्दाचा अर्थ बदलत गेला आणि आज आपण Meme या शब्दाला एका वेगळ्याच अर्थात पाहत आहोत.

Memes हया शब्दाची उत्पत्ती 1976 च्या दरम्यान झाली होती. 1976 मध्ये Richard Bawkins जे एक जीवशास्त्रज्ञ होते, ह्यांनी “the selfish Gene” नावाचे एक पुस्तक प्रसारित केले होते आणि या पुस्तकात प्रथम Meme या शब्दाचा वापर केला गेला होता.

Richard Bawkins यांच्याद्वारे प्रसारित केल्या गेलेल्या पुस्तका मध्ये ” Meme म्हणजे एक विचार किंवा संकल्पना जे कालांतराने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे असे प्रसारित होत जाते “, असे असं अर्थ सांगितलं गेला होता.

हल्ली आपण meme शब्दाचा वापर एका अशा कला कृतींसाठी वापरतो, जे अगदी कमी शब्दात भावना व्यक्त करतात

Meme या शब्दाचा जगातील पहिला अर्थ Richard Bawkins यांच्याद्वारे सांगण्यात आला होता, परंतु आज आपण Meme चा जो अर्थ समजतो, तो richard Bawkins यांनी मांडलेल्या अर्था सोबत बिलकुल जुळत नाही. कारण सध्याच्या काळात ह्या शब्दाला एक वेगळेच रूप धारण झाले आहे.

आज आपण इंटरनेटवर विविध प्रकारचे Memes पाहत असतो, जे मुळात मनोरंजनाच्या हेतूने बनवले जातात. इंटरनेटवरील या Memes सोबत आपल्या भावना जुळल्या जातात, म्हणजे जर Meme funny असेल तर, आपण आनंदी होतो आणि ह्या उलट Meme जर दुखी असेल तर त्यासोबत आपल्या भावना दुखावल्या जातात.

आज वापरल्या जाणाऱ्या Meme शब्दाची संकल्पना ही 1990 च्या दरम्यान उदयास आली होती, या काळात इंटरनेटला इतकी प्रसिद्धी मिळाली नव्हती, त्यामुळे इंटरनेटचा अधिकतर वापर कार्यालयांमध्ये होत होता. या दरम्यान भावना दर्शवणारी लहान व्हिडिओ क्लिप असायचे, ई-मेल द्वारे शेअर केले जायचे, ह्याच व्हिडिओ क्लिप्स ला Meme म्हटले जाऊ लागले.

कालांतराने फेसबुक, यू-ट्यूब यांसारख्या सोशल मीडिया उदयास आल्या आणि Meme या संकल्पनेला चालना मिळत गेली ज्यामुळे आज आपल्याला विविध प्रकारच्या memes अनुभवायला मिळत आहेत.


Memes चे 5 प्रकार

1. क्लासिक मीम (Classic Meme)

Classic Meme हया प्रकारामध्ये एखाद्या फोटोला Edit करून त्यावर मजकूर (text) लिहून त्या मजकुराद्वारे आनंद, दुःख, राग यासारख्या भावना व्यक्त केल्या जातात. मीम बनवण्याची ही एक साधी आणि सोपी पद्धत आहे.

2. ट्रेंडिंग मीमस (Trending Memes)

जसे की नावावरून समजते की, हे मिमस ट्रेनिंग टॉपिक वर असतील. जेव्हा एखादी अशी घटना घडते, जी कमी वेळात खूप प्रसिद्ध होते, साधारणतः अशा घटनांवर मीमस बनवले जातात. उदाहरणार्थ, कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हाला रामायण संबंधित एक सोपा प्रश्न विचारला होता, परंतु तिला त्या साध्या प्रश्नाचे उत्तर देखील माहीत नव्हते, ही घटना काही दिवसांपूर्वी खूप प्रसिद्ध झाली होती. या घटनेवरून सोनाक्षीला ट्रोल करत तिच्यावर अनेक मीमस तयार केले गेले होते.

3. सिरीज मिमस (Series Memes)

सिरीज मीम हे ठराविक घटनेवर किंवा कथेवर संग्रह रूपात तयार केले जातात. या संग्रहात अगदी हजारोंच्या संख्येत देखील मीमस असू शकतात.

4. शैक्षणिक मिमस (Educational Memes)

शैक्षणिक मीमस हे मनोरंजनात्मक नसून, केवळ माहिती प्रसारणाच्या हेतुने हे तयार केले जातात, म्हणजे अगदी कमी वेळात मीम पाहणाऱ्याला काही तरी शिकण्यास मिळते आणि हाच शैक्षणिक मीमचा मुख्य उद्देश असतो, या प्रकारच्या मिम द्वारे कोणत्याही प्रकारची शैक्षणिक माहिती प्रसारित केली जाऊ शकते.

5. अस्पष्ट मीमस (Obscurity Memes)

ह्या प्रकारचे मीमस साधारणतः मनोरंजनाचा हेतू मनात ठेवून बनवले जातात, अशा मीमस ची रचना ही अस्पष्ट असून केवळ मनाला आनंद मिळावा, यासाठी हे मीमस तयार केले जातात. सोशल मीडियावर अशा मीमस चा क्रेझ अधिक पाहायला मिळते, कारण हे मीमस मनोरंजक असल्यासोबतच, आपल्या जीवनातील अनेक हास्यआत्मक घटनांशी संबंधित देखील असतात.


Memes कसे बनवावेत?

1. इमेज मीमस (Image Memes)

इमेज मीम बनवणे, हे अगदी सोपे आणि कमी वेळ देणारे असते. आज इंटरनेटवर असे अनेक सॉफ्टवेअर फोटो एडिटर एप्लिकेशन्स आणि वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आपण मीमस तयार करू शकतो.

इमेज मिम हे साधारणतः फोटोवर मजकूर ऍड करून आणि दोन किंवा त्यापेक्षा अधिक फोटोला एकाच फोटोमध्ये मर्ज करून बनवले जाते. हे मीमस बनवण्यासाठी सर्वात उत्तम एप्लीकेशन म्हणजे PicsArt होय. PicsArt हे एक इमेज एडीटर ॲप आहे, जे आपण मोबाईल आणि संगणकाचा अशा दोन्ही प्रणाली मध्ये वापरू शकतो.

संगणकामध्ये आपण कोणतीही आपलिकेशन डाऊनलोड न करता संगणकात उपलब्ध असणाऱ्या Paint या सॉफ्टवेअरद्वारे देखील Memes बनवू शकतो.

2. व्हिडिओ मीमस (Video Memes)

व्हिडिओ मीमस् बनवणे, हे देखील काही फार अवघड नाही, तर यासाठी तुम्हाला केवळ व्हिडिओ एडिटिंग करता आली पाहिजे. व्हिडिओ Memes देखील आपण संगणक आणि मोबाईल या दोन्ही प्रणालिंद्वारे तयार करू शकतो, फक्त फरक जाणवतो तो म्हणजे स्क्रीन साईज याव्यतिरिक्त काही नाही.

व्हिडिओ Meme मध्ये व्हिडिओ लहान लहान भागांमध्ये म्हणजेच अगदी सेकंदाच्या कालावधीत कट करून त्यामध्ये व्हिडिओ नुसार संगीत आणि मजकूर ऍड केले जातात.

VSDC, OpenShot हे संगणकीय तर Kine Master आणि Power Director हे मोबाईल मधून व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी वापरले जाणारे सुप्रसिद्ध आणि वापरण्यास सोप्पे असे सॉफ्टवेअर आहेत.


Memes मध्ये वापरल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध चेहऱ्यांची माहिती

आपण सोशल मीडियावर विविध प्रकारचे Meme पाहत असतो. Meme मध्ये विविध लोकांच्या चेहऱ्याचा वापर केला जातो. इथे आपण Memes मध्ये वापरल्या जाणाऱ्या काही फेमस चेहर्या बद्दल माहिती आणि त्यांची नावे जाणून घेणार आहोत,

1. Osita Ihema

[ Images: Osita Ihema ]

Osita हे एक नायजेरियन ॲक्टर आणि कॉमेडियन असून यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1982 मध्ये झाला होता. Osita यांचा चेहरा आपल्याला केवळ इमेज Meme मध्येच पाहायला मिळत नाही, तर व्हिडिओ Meme मध्ये देखील यांचा चेहरा अनेकदा निदर्शनास येतो. एका आजारामुळे Osita यांचे वय वाढत आहे, परंतु त्यांची उंची नाही. ज्यामुळे meme मध्ये ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे भासतात.

Akina Akwa नामक चित्रपटात Pawpaw नावाच्या पात्राचे काम केल्यामुळे Osita यांना एका कॉमेडियन ची ओळख प्राप्त झाली आहे. Osita हे Inspired Moment Of Africa चे संस्थापक देखील आहेत, ज्याद्वारे तरुण पिढीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. 2006 मध्ये Osita ह्यांना प्रसिद्ध आफ्रिकी पुरस्काराद्वारे देखील पुरस्कृत करण्यात आले आहे.

2. Sarim Akhtar

[ Images: Sarim Akhtar ]

Sarim Akhtar हे पाकिस्तानी नागरिक असून सध्या स्वतःच्या कुटुंबासोबत ते इंग्लंड येथे राहत आहेत. Sarim यांनी त्यांचे शिक्षण हे पाकिस्तान मध्ये पूर्ण केले आहे. लंडनला शिफ्ट होण्याआधी ते कुवेत येथे काम करायचे.

2019 दरम्यान पाकिस्तानची मॅच पाहण्यासाठी ते स्टेडियम मध्ये गेले होते, त्यांची आवडती टीम म्हणजे पाकिस्तान टीम योग्य रीतीने न केल्याने ते स्टेडियम मध्ये निराश भावनेने उभे होते, ते उभे असतानाच फोटो रातोरात प्रसिद्ध झाला, त्यांच्या या फोटो द्वारे हजारो Memes बनवण्यात आले, त्यांच्या हा फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांचे अनेक चॅनेल्सवर इंटरव्यू देखील घेण्यात आले होते.

3. Yao Ming

[ Images: Yao Ming ]

Yao Ming ह्यांचा हसता चेहरा, आपण सतत मीमवर पाहत असतो. Yao Ming हे एक चायनीज बास्केटबॉल खेळाडू आहे, जे शांघाई शार्क नावाच्या चायनीज बास्केटबॉल टीम साठी खेळतात. Yao Ming ह्यांचा जन्म 12 सप्टेंबर 1980 मध्ये चायना मधील सांगा येथे झाला होता आता त्यांचे वय 41 आहे.


फायदे

मीम्स, जे विनोदी किंवा संबंधित प्रतिमा किंवा व्हिडिओ आहेत जे इंटरनेटद्वारे वेगाने पसरतात, ऑनलाइन संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहेत. ते अनेक फायदे देतात, यासह:

1. विनोद आणि करमणूक

मीम्स मुख्यत्वे विनोदासाठी तयार केले जातात, जे लोकांमध्ये हशा आणि आनंद आणू शकतात, मानसिक कल्याण वाढवू शकतात आणि जीवनातील तणाव कमी करू शकतात.

2. सामायिक करणे आणि पसरवणे सोपे

मीम्स सहसा लहान आणि दृष्यदृष्ट्या आकर्षक असतात, ज्यामुळे त्यांना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग अॅप्सवर शेअर करणे सोपे होते. त्यांची सामायिकता त्यांच्या व्हायरल स्वरुपात योगदान देते, ज्यामुळे कल्पना आणि संदेश वेगाने पसरतात.

3. सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि ओळख

मीम्स अनेकदा विविध सांस्कृतिक संदर्भ, सामाजिक समस्या आणि लोकप्रिय ट्रेंड प्रतिबिंबित करतात. ते लोकांसाठी त्यांची ओळख, विश्वास आणि विशिष्ट गट किंवा समुदायाशी संबंधित असल्याची भावना व्यक्त करण्याचा मार्ग बनू शकतात.

4. सामाजिक संबंध

मीम्स शेअर करणे आणि चर्चा केल्याने इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये सौहार्द आणि बाँडिंगची भावना वाढू शकते, ज्यामुळे विनोद आणि अनुभव सामायिक केले जातात.

5. क्रिएटिव्ह आउटलेट

मीम्स तयार करणे आणि शेअर करणे व्यक्तींना त्यांच्या सर्जनशीलतेचा वापर करण्यास अनुमती देते. वापरकर्ते सामग्रीमध्ये त्यांचा स्वतःचा अद्वितीय स्पर्श जोडून रीमिक्स करू शकतात, जुळवून घेऊ शकतात किंवा नवीन मीम्स तयार करू शकतात.

6. मार्केटिंग आणि ब्रँडिंग

व्यवसाय आणि संस्था त्यांच्या प्रेक्षकांशी मजेदार आणि संबंधित पद्धतीने गुंतण्यासाठी मीम्सचा वापर करू शकतात. व्हायरल होणारे मीम्स ब्रँड दृश्यमानता आणि ओळख वाढवू शकतात.

7. माहिती आणि जागरूकता पसरवणे

मीम्सचा वापर सामाजिक समस्या, आरोग्य आणि चालू घडामोडींसह विविध विषयांबद्दल महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. जबाबदारीने वापरल्यास, मीम्स हे शिक्षण आणि संवादाचे शक्तिशाली साधन ठरू शकतात.

8. संबंधित आणि ट्रेंडी राहणे

मीम्स बर्‍याचदा वर्तमान इव्हेंट्स, पॉप संस्कृती किंवा इंटरनेट घटनांचा संदर्भ देतात, त्यांना प्रासंगिक आणि ट्रेंडी बनवतात. जे ऑनलाइन चर्चा ताजे आणि आकर्षक ठेवते.

9. कॉपींग मेकॅनिझम

मीम्स ही आव्हानात्मक काळात सामना करणारी यंत्रणा असू शकते, जी लोकांना कठीण परिस्थितीतही विनोद आणि आशा शोधण्याचा मार्ग प्रदान करते.

10. भाषा उत्क्रांती

मीम्स भाषा आणि संप्रेषण शैलीच्या उत्क्रांतीमध्ये योगदान देऊ शकतात. नवीन शब्द, वाक्प्रचार आणि आतील विनोद बहुतेक वेळा लोकप्रिय मीम्समधून उद्भवतात आणि इंटरनेट स्थानिक भाषेचा भाग बनतात.

हे फायदे असूनही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, सर्व मीम्स निरुपद्रवी किंवा सकारात्मक नसतात. म्हणून, जबाबदारीने मीम्स वापरणे आणि त्यांच्या संभाव्य प्रभावाची जाणीव ठेवणे महत्वाचे आहे.


तोटे

मेम्सचे असंख्य फायदे असले तरी ते काही तोटे आणि जोखमींसह देखील येतात, ज्याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

1. चुकीची माहिती आणि फेक न्यूज

खोटी माहिती किंवा खोट्या बातम्या पसरवण्यासाठी मीम्सचा सहज वापर केला जाऊ शकतो. जे बर्‍याचदा वेगाने प्रसारित होत असल्याने, चुकीची माहिती त्वरीत मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते आणि गोंधळ निर्माण करू शकते.

2. आक्षेपार्ह सामग्री

काही मीम्स आक्षेपार्ह, असंवेदनशील किंवा अनुचित असू शकतात. ते हानिकारक स्टिरियोटाइप कायम ठेवू शकतात, द्वेषयुक्त भाषणाचा प्रचार करू शकतात किंवा विशिष्ट व्यक्ती किंवा समुदायांना दुखवू शकतात.

3. सायबर धमकी आणि छळ

मीम्सचा वापर सायबर धमकी आणि छळाचे साधन म्हणून केला जाऊ शकतो. विशिष्ट व्यक्तींवर निर्देशित केलेल्या आक्षेपार्ह मीममुळे व्यक्तीला भावनिक त्रास होऊ शकतो, ज्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिष्ठा खराब होऊ शकते.

4. अमानवीकरण आणि असंवेदनीकरण

गंभीर समस्यांवर प्रकाश टाकणारे किंवा हिंसेचे चित्रण करणारे मीम्समुळे असंवेदनशीलता आणि वास्तविक-जगातील समस्यांबद्दल आणि मानवी दुःखांबद्दल सहानुभूतीचा अभाव होऊ शकतो.

5. व्यसन आणि वेळ वाया घालवणे

सोशल मीडियाचे व्यसन आणि मिम्स वापरामुळे मोबाईलवर जास्त वेळ जातो आणि लोकांचे लक्ष अधिक महत्त्वाच्या कामांपासून आणि जबाबदाऱ्यांपासून विचलित होऊ शकते.

6. गोपनीयतेची चिंता

मीम्समध्ये काहीवेळा अनवधानाने किंवा हेतुपुरस्सर वैयक्तिक माहिती समाविष्ट केली जाऊ शकते, ज्यामुळे संमतीशिवाय शेअर केल्यावर गोपनीयतेची चिंता निर्माण होते.

7. कॉपीराइट उल्लंघन

बर्‍याच मीम्स योग्य परवानगीशिवाय कॉपीराइट केलेल्या प्रतिमा किंवा सामग्री वापरतात, ज्यामुळे निर्माते आणि शेअरर्स दोघांनाही कायदेशीर समस्या येतात.

8. जटिल विषयांची उथळ समज

मीम्स बर्‍याचदा सोप्या आणि विनोदी पद्धतीने कल्पना व्यक्त करतात, ज्यामुळे गुंतागुंतीच्या मुद्द्यांची उथळ समज होऊ शकते आणि सखोल विश्लेषणास परावृत्त केले जाऊ शकते.

9. मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव

मीम्स विनोद आणि मनोरंजनाचे स्रोत असू शकतात, परंतु ते काही व्यक्तींमध्ये अपुरेपणा, FOMO (गमावण्याची भीती) किंवा तुलनात्मक चिंता देखील उत्तेजित करू शकतात.

10. कमी लक्ष कालावधी

मीम्स सामग्रीचा सतत भडिमार, यामुळे लक्ष कमी होण्यास आणि दीर्घ स्वरूपाच्या सामग्रीवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते.

11. व्हायरल फसवणुकीचा प्रसार

मीम्स अनावधानाने व्हायरल फसवणूक आणि शहरी दंतकथा पसरवू शकतात, ज्यामुळे चुकीच्या माहितीच्या समस्येला हातभार लागू शकतो.

मिम्स चे तोटे कमी करण्यासाठी, वापरकर्त्यांनी मीमचे गंभीर ग्राहक असणे, माहिती शेअर करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासणे आणि सामग्री तयार करताना किंवा शेअर करताना इतरांचा आदर करणे आवश्यक आहे.

Leave a Comment