MBA चा फुल फॉर्म काय ? | MBA Full Form In Marathi

अन्न, वस्त्र आणि निवाऱ्या सोबतच काळानुसार शिक्षण हि आपली मूलभूत गरज बनली आहे. जीवनाला जर योग्य दिशा द्यायची असेल तर शिक्षण महत्वाचे असते. 

शिक्षणाचे साधारणतः तीन मुख्य भाग पाडण्यात आले आहेत. पहिले म्हणेज प्राथमिक शिक्षण, दुसरे माध्यमिक शिक्षण आणि तिसरे म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण. ह्या प्रकरांनुसार शिक्षण पद्धतीत बदल होत असतो. 

शिक्षण पद्धतीत विविध प्रकारचे डिग्री उपलब्ध असल्यामुळे विध्यार्थी त्याच्या आवडीनुसार शिक्षण घेऊ शकतो. 

शिक्षण पद्धतीत MBA ह्या डिग्री चे महत्व काळानुसार वाढतच आहे. त्यामुळे ह्या लेखात आपण MBA संबंधित विविध घटकांची माहिती पाहणार आहोत जसे कि MBA म्हणजे नेमके काय, MBA चा फुल्ल फॉर्म काय, MBA कोर्स चा इतिहास, MBA चे प्रकार, पात्रता, फी आणि अधिक. 

जगातील सुप्रसिद्ध पदवींपैकी MBA एक आहे. ह्या मध्ये साधारणतः व्यवसायाचा विस्तार कसा करावा, व्यवसायाचे मॅनेजमेंट कसे करावे ह्या संबंधित अभ्यासक्रम शिकवला जातो. न केवळ भारतात तर संपूर्ण जगात एमबीए पदवीधर व्यक्तीला नोकरी करीत प्रथम प्राधान्य दिले जाते, कारण ह्यामुळे कंपनीला एक Trained कर्मचारी मिळतो. 

ह्या डिग्री मध्ये विद्यार्थ्यांच्या मार्केटिंग, अकॉउंटिंग आणि फायनान्स कौशल्यांना प्राधान्य दिले जाते. भारतात दरवर्षी हजारो विद्यार्थी Graduation नंतर ह्या डिग्री साठी Apply करत असतात. भारतात private आणि सरकारी कॉलेज मध्ये MBA शिकण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु, private पेक्षा सरकारी कॉलेज मध्ये कमी फी आकारण्यात येते. 


MBA Full Form in Marathi

M – Master Of 

B – Business

A – Administrator

MBA चा फुल फॉर्म “Master Of Business Administrator” असा असून याचा मराठी अर्थ “व्यवसाय प्रशासन विशेषज्ञ” असा होतो.


MBA कोर्सची पार्श्वभूमी 

MBA कोर्स मध्ये व्यवसाय संबंधित शिक्षण दिले जाते. व्यवसाय क्षेत्रात MBA सारख्या प्रचलित पदवीची उत्पत्ती नेमकी झाली कशी?, तसेच आज MBA पदवी इतकी प्रसिद्ध का आहे, हे आपल्याला MBA कोर्स चा इतिहास पाहिल्यावर लक्षात येईल. 

Unite State Of America ( USA ) या देशात  १८८१ दरम्यान, जगातील पहिली व्यवसायासंबंधित शिक्षण देणारी युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली होती. या युनिव्हर्सिटी चे नाव “The Wharton School of The University of Pennsylvania” असे होते. Joseph Wharton नामक व्यक्तीने दान स्वरुपी दिलेल्या पैशांमधून ह्या University ची स्थापन करण्यात आली होती.

साल १९०० च्या दरम्यान अमेरिकेतीलच Tuck School of Business ह्या विद्यालयाव्दारे व्यवसाय संबंधीत प्रशिक्षण देणारी प्रथम Degree तयार करण्यात आली. ह्या Degree ला First Advanced Degree म्हणून देखील संबोधले जाते.

१९०८ दरम्यान Harvard Graduate School of Business या विद्यापीठामार्फत जगातील पहिला MBA प्रोग्राम स्थापित करण्यात आला, यामध्ये १५ सदस्य, ४७ विशेष विद्यार्थी आणि ३३ रेगुलर विद्यार्थ्यांचा समावेश होता.  यावेळी MBA च्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम हा Frederic Taylor’s यांच्या Scientific Management वर आधारित होता.

कालांतराने MBA ची प्रसिद्धी वाढत गेली आणि १९३० पर्यंत MBA चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १०७० पर्यंत पोहोचली होती, यावेळी MBA चे प्रशिक्षण देणारा अमेरिका हा एकुलता एक देश होता. 

१९३० मध्ये Massachusetts Institute of Technology येथे जगात प्रथम Management Of Leader Education कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

University Of chicago Booth School Of Business या विद्यापीठात १९४३ मध्ये प्रथम,  कार्यरत व्यावसायिकांसाठी MBA संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. chicago University हि जगातील पहिली यूनिवर्सिटी आहे, ज्याचे सिंगापूर ( युरोप ), chicago ( अमेरिका ), बारसलोना ( युरोप ) ह्या तीन ठिकाणी पर्मनंट कॅम्पस आहेत. सध्या काही कारणास्तव chicago ने त्याचे कॅम्पस लंडन आणि होंग कोंग येथे स्थलांतरित केले आहे. 

१९५० मध्ये प्रथम Thunderbird School Of Global Management या विद्यापीठाने आंतराष्ट्रीय स्तरावर MBA ला नेह्ण्याचा प्रयत्न केला होता, ज्याने MBA ची प्रचिती इतर देशांमध्ये ही पसरावी.

अमेरिकेनंतर १९५१ मध्ये साऊथ आफ्रिकेतील Pretoria नामक युनिव्हर्सिटीने MBA चा अवलंब करण्यास सुरुवात केली होती. आफ्रिके नंतर १९५३ मध्ये भारतातील IISWBM ( Indian institute Of Social Welfare & Business Management ) द्वारे MBA चा अवलंब करण्यात आला होता. अशाप्रकारे १९५७ मध्ये युरोप, १९६३ मध्ये स्पेन द्वारे MBA प्रोग्राम अवलंबण्यात आले आणि MBA चा विस्तार वाढत गेला आणि आज जगातील प्रत्येक देशातील युनिव्हर्सिटीमध्ये MBA चा अभ्यासक्रम शिकविला जात आहे.


MBA चे प्रकार

1. डिस्टन्स एमबीए (Distance MBA)

डिस्टन्स MBA मध्ये उमेदवार अथवा विद्यार्थी संप्रेषण किंवा पत्रव्यवहाराव्दारे डिग्रीचा पाठपुरावा करू शकतो. हे काहीसे मुक्त विद्यापीठ (Open University) प्रमाणे आहे, ज्यात उमेदवाराला स्वतःचा अभ्यास स्वतः करावा लागतो ज्याला आपण इंग्रजीत Self Study असे म्हणतो, इथे कोणत्याही प्रकारचे lecture होत नाहीत. 

Distance MBA , ही डिग्री अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांच्याकडे वेळ, पैसे व इतर संसाधनांची कमतरता आहे. यामध्ये उमेद्वाराला वेळेच्या लवचिकतेचा फायदा मिळतो, म्हणजेच डिस्टन्स एमबीए मध्ये उमेदवार दोन ते पाच वर्षांमध्ये त्याचे एमबीए पूर्ण करू शकतो. संपूर्ण भारतात एकूण ४९० असे कॉलेज आहेत, ज्याद्वारे आपण डिस्टन्स एमबीए करू शकतो. 

2. पार्ट टाइम एमबीए (Part-Time MBA)

ज्या व्यक्तींना व्यवसाय करता करता स्वतःमध्ये व्यवसाय संबंधित कौशल्य धारण करायचे असतील अथवा सुधारायचे असतील, अशा लोकांसाठी पार्ट टाइम एमबीए एक उत्तम पर्याय मानला जातो. 

पार्ट टाईम एमबीए दरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारची Placement ऑफर केली जात नाही.

आज संपूर्ण भारतात एकूण ३०० पेक्षा अधिक कॉलेज आहेत, ज्याद्वारे उमेदवार पार्ट टाइम एमबीए चा लाभ घेऊ शकतो. ह्या ३०० कॉलेजमध्ये सरकारी आणि प्रायव्हेट अशा दोन्ही कॉलेजचा समावेश आहे. 

3. फुल टाइम एमबीए (Full Time MBA)

फुल टाइम एमबीए हा नॉर्मल एमबीएचा प्रकार आहे. फुल टाइम एमबीएचा कालावधी साधारणतः दोन वर्षांचा असतो. फुल टाइम एम बी मध्ये लाईव्ह क्लास, परीक्षा होतात, सोबतच प्लेसमेंट देखील उमेदवाराला मिळते. संपूर्ण भारतात फुल टाइम MBA शिकवणारे एकूण ५००० विद्यापीठ आहेत. 

4. ऑनलाईन एमबीए (Online MBA)

परिपूर्ण सुविधा आणि लवचिकता यामुळे ऑनलाईन एमबीए हा एमबीएचा एक सुप्रसिद्ध प्रकार मानला जातो. यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लेक्चर आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात, तेही परिपूर्ण प्रणाली सहीत, त्यामुळे एमबीए करण्यासाठी घरापासून किंवा शहरापासून दूर राहण्याची गरज लागत नाही, ज्यामुळे आपला बराचसा खर्च वाचतो. 

लेक्चर रेकॉर्ड करून आपल्याला हवे त्या वेळी आपण लेक्चर पाहू शकतो.  भारतात १७० ऑनलाइन पद्धतीने एमबीए शिकवणारे विद्यापीठ आहेत. 

5. एक्सिक्युटीव्ह एमबीए (Exicutive MBA)

ज्या उमेदवारांना पाच वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे, अशा उमेदवारासाठी Exicutive MBA उपयुक्त ठरतो.  Exicutive MBA आणि Full Time MBA मध्ये साधारणतः सारखाच अभ्यासक्रम असतो, परंतु याचा कार्यकाळ कमी म्हणजे १५ ते १९ महिने इतका असतो. येथे उमेदवाराला थोडी जास्त फी मोजावी लागते, तसेच भारतात Exicutive MBA असणारे एकूण ४४० विद्यापीठ आहेत. 

6. इंटिग्रेटेड एमबीए (Integrated MBA)

Integrated MBA चा कालावधी साधारणतः पाच वर्षांचा असतो, तसेच इंटिग्रेटेड एमबीएचा लाभ Post Graduate उमेदवार आणि Under graduate उमेदवार देखील घेऊ शकतात. या पाच वर्षात उमेदवाराला BBA+MBA किंवा Btech+MBA असा अभ्यासक्रम शिकवला जातो.

Integrated MBA चा अभ्यासक्रम भारतातील काही मोजक्याच विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. जसे की IIM Jammu, IIM Bodhak आणि अधिक. 


MBA साठी लागणारी पात्रता

  • उमेदवाराचे तीन वर्ष कालावधी असलेले शिक्षण, म्हणजेच TY ( Third Year ) पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. 
  • Graduation मध्ये उमेदवाराला ५०% टक्के मार्क मिळणे गरजेचे आहे. 
  • MBA मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी CAT, XAT, GMAT, JMET अशा काही प्रवेश परीक्षेत उमेदवाराला उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

MBA फी 

MBA फी साधारणतः २५,००० ते २५,००,००० इतकी असू शकते, हे पूर्णतः कॉलेजवर अवलंबून असते. सरकारी कॉलेजमध्ये कमी आकारली जाते. 

भारतात University Of Delhi, GGSIPO Delhi, Delhi School Of Economics, Simshree Mumbai, PUMBA Pune हे काही असे युनिव्हर्सिटी  आहेत, जे MBA  साठी कमी फी आकारतात. ह्या युनिव्हर्सिटी ची फी साधारणतः २५,००० ते १,५०,००० इतकी असू शकते. 


MBA करण्यासाठी भारतातील १० सर्वोत्तम कॉलेज

क्र कॉलजे ठिकाण फी
IIM:CulCutta कोलकत्ता २२,००,००० ते २२,७०,०००
IIM:Ahmedabad अहमदाबाद २२,५०,००० ते २३,००,०००
IIM:Bangalore बंगळूर २३,००,००० ते २३,३०,०००
SPJIMR मुंबई १७,००,००० ते १७,५०,०००
XLIR:Jamshedpur जमशेदपूर २३,००,००० ते २३,६०,०००
IIM:Lucknow लखनऊ १९,००,००० ते १९,३०,०००
IIM:Indore इंदोर १६,००,००० ते १६,५०,०००
IIM:Hyderabad हैद्राबाद २२,००,००० ते २२,५०,०००
Gurugram Management Development Studies गुरुग्राम २०,००,००० ते २१,००,०००
१० IIM:New Delhi Faculty Of Managment Studies नवी दिल्ली १८,००,००० ते १८,५०,०००


 

 

 

 

 

 

 

MBA पदवीधर व्यक्तीला किती वेतन मिळते  ?

MBA हि एकच पदवी नसून आपण विविध क्षेत्रामध्ये एमबीए करू शकतो व त्या क्षेत्रानुसारच  MBA पदवीधर व्यक्तीला किती वेतन असेल हे ठरते. इथे आपण उमेदवाराच्या Specialization वरून त्याचे वार्षिक उत्पन्न किती असू शकते ह्या बाबत माहिती खालील तक्त्यात पाहणार आहोत,
 
क्रमांक क्षेत्र वार्षिक उत्पन्न
१. MBA In Information Technology ५ लाख ते १२ लाख
२. MBA In Business Analytics ५ लाख ते १८ लाख
३. Finance ७ लाख ते २२ लाख
४. HR ५ लाख ते ८ लाख
५. MBA In Event Managment २ लाख ते १८ लाख
६. Digital Marketing ५ लाख ते २५ लाख
७. MBA In Health Care ५ लाख ते १२ लाख
८. Marketing ७ लाख ते २५ लाख

अधिक लेख –

1. Bsc चा फुल फॉर्म काय ?

2. CBSE चा फुल फॉर्म काय ?

3. डिप्लोमा म्हणजे काय ?

4. शिक्षण म्हणजे काय व शिक्षणाचे प्रकार कोणते ?

Leave a Comment