माझा आवडता सण | Maza Avadta San Essay in Marathi

भारत हा एक असा देश आहे, जेथे विविध जातीचे आणि धर्माचे लोक एकत्रित गुण्यागोंविंदाने राहतात, जसे कि हिंदू  मुस्लिम, सिख, इसाई आणि अधिक. हजारो वर्षांपूर्वी पासून हे लोक इथे राहत आहेत. इथे प्रत्येक धर्माची वेगळी संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीची वेगळीच परिभाषा आहे, त्यांचे विविध सण आणि प्रत्येक सणाचे एक वेगळेच वैशिष्टय आणि महत्व आहे.

भारतात दिवाळी, होळी, गणेश उत्सव, गुडी पाडवा, ईद हे सण अगदी जोमाने साजरे होतात. त्यातील माझा आवडती सण म्हणजे गुडीपाडवा.  गुडीपाडवा हा सण हिंदू धर्मात नव वर्षाचा सण म्हणून साजरा केला जातो, ह्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करून नवनवीन कपडे परिधान केले जातात आणि त्या नंतर वेळ येते ती गुडी उभारण्याची. गुडी उभारल्या नंतर सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांना तिळगून दिले जातात. तिळगुळ ह्यासाठी, कारण ते चवीला गोड असतात आणि नवीन वर्षाची सुरुवात ही गोडव्यानेच केली जाते.

गुडी पाडव्याच्या दिवशी आम्ही मित्र मित्र जेव्हा शाळेत वर्गात तिळगून देऊन सर्वाना गुडी पाडव्याच्या शुभेच्छा देत असतो तेव्हा आमचे एक वाक्य ठरलेलेच असते ते म्हणजे ” गुडी पाडवा आणि नीट बोल गाढव “, असे आहेत तर सामान्यच वाक्य पण मित्रांच्या गटात एक वेगळेच हास्य पसरवून जाते.


गुडी पाडव्याचा इतिहास

गुडी पाडवा साजरा करण्यापाठी अनेक कारणे आणि अनेक कथा सांगितल्या जातात, अशाच काही कथांचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत.

कथा:- ब्रम्हा, विष्णू आणि महेश संपूर्ण सृष्टीचे पालनहार आहेत. ब्रम्ह देवाने संसाराची निर्मिती केली, विष्णू देव त्याचे पालन करतात आणि महेश म्हणजेच महादेव अथवा शिवशंकर हे पृथ्वीचे चालक आहेत. असे म्हटले जाते की पृथ्वी वर जेव्हा सजीव जीवाची निर्मिती झाली तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता, त्यामुळे हा दिवस गुडी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

कथा:- त्रेता युगात घडलेले रामायण हे हिंदू संस्कृती मधील एक धार्मिक कथा आहे. अयोध्या नगरीचे राजा प्रभू श्रीरामचंद्र हे आपल्या वडिलांच्या वचनामुळे १४ वर्षाचं वनवास भोगण्यासाठी जंगलात रवाना होतात. तेव्हा त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सीता आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण हे देखील असतात.

जेव्हा ते १४ वर्षांचा वनवास भोगत असतात, ह्या दरम्यान त्यांची भेट शूर्पणखा ह्या राक्षसनी सोबत होते. शूर्पणखा ला प्रभू राम आवडत होते, एकदा तिने एका सुंदर महिलेचे रूप घेऊन प्रभू रामचंद्रांसमोर गेली आणि त्यांना तिच्यासोबत लग्न करण्यासाठी विचारले तेव्हा श्रीराम ह्यांनी नकार देत म्हणाले मी विवाहित आहे आणि माझ्या पत्नीचे नाव सीता आहे आणि मी तिच्या सोबतच खुश आहे, ह्या घटने नंतर तिने श्रीराम ह्यांचे भाऊ लक्ष्मण ह्यांना लग्नासाठी विचारले त्यांनीही नकार दिला ह्या दरम्यान त्यांच्या सोबत असे काही घडते कि लक्ष्मण ह्यांच्या द्वारे त्या राक्षसीणीचे नाक कापले जाते, हि गोष्ट जेव्हा शूर्पणखा च्या भावाला म्हणजेच रावणाला समजते तेव्हा रावण क्रोधीत होतो. रावण हा मुळात एक ब्राम्हण राक्षस असतो जो महापंडित म्हणून देखील ओळखला जातो ज्याची लंका हि सोन्याची होती.

आपल्या बहिणीचा सूड घेण्यासाठी रावण रामचंद्रांच्या पत्नी म्हणजेच सीता चे अपहरण करण्याचे ठरवतो आणि ते करतो देखील, ह्यादरम्यान रावण समोर अनेक अडचणी उभ्या राहतात, परंतु त्या सर्व नष्ट करत तो
पुढे निघत जातो आणि शेवटी लंकेत पोहचून सीता ला नजर कैदेत ठेवतो.

ही खबर जेव्हा प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचते, तेव्हा ते क्रोधीत होऊन त्यांच्या पत्नीं सीता ह्यांना परत आणण्याचा निर्णय घेऊन वाटचाल करू लागतात, त्यांच्यासोबत महाबली हनुमान सारखे महाबलाढ्य योद्धे जुळतात आणि अथक प्रयन्तांनंतर ते आपल्या पत्नी सीता यांना वाचवण्यात यशस्वी होतोत. ह्या दरम्यान अनेक वर्षांचा कालावधी निघून जातो आणि त्यांचा १४ वर्षांचा वनवास देखील संपतो आणि ते अयोध्ये साठी प्रस्थान करतात असे म्हणतात कि ज्या दिवशी प्रभू रामचंद्र, सीता आणि त्यांचे बंधू लक्ष्मण हे ज्या दिवशी अयोद्धेयमध्ये पोहोचले त्यादिवशी त्यांचा झालेला विजय साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या विजयाचे प्रतीक दर्शविण्यासाठी अयोध्यामध्ये प्रत्येक घरात गुडी उभारण्यात आली आणि अशा प्रकारे गुडी पाडव्याचा शुभ आरंभ झाला असे सांगितले जाते.

कथा ३:- देवी पार्वतीने महादेवासोबत लग्न रचण्याची कल्पना मनात आणली आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप करू लागली. अनेक वर्ष निघून गेली आणि पार्वतीची श्रद्धा पाहून महादेव प्रसन्न झाले आणि देवी पार्वती सोबत विवाह करण्याचे वचन पार्वतीला दिले, ज्या दिवशी महादेव आणि पार्वतीचा विविह ठरला तो दिवस गुडी पाडव्याचा होता असे म्हटले जाते.


गुडी कशी उभारली जाते ?

  1. प्रथम एक बांबूची काठी घ्या आणि त्याचा पाण्याने अभिषेक करा.
  2. एक नवीन कपडा घ्या, साडी असेल तर अति उत्तम फक्त कोणत्याही काळ्या रंगाच्या कपड्याचा वापर करू नका कारण तो रंग अशुभ मानला जातो.
  3. आता त्या कपड्याला अथवा साडीला काठीच्या वरच्या टोकाला बांधा आणि अगदी वरच्याच टोकाला पितळेचा तांब्या घाला.
  4. आंब्याची पाने आणि कडुलिंबाची पाने एक धाग्यात ओवून कपड्याच्या अथवा साडीच्या अवतीभवती गुंडाळा.
  5. झेंडूच्या फुलांचा हार घाला.
  6. आता त्याला साखऱयांचा हार घाला.
  7. हळद कुंकू लावा आणि अशा प्रकार तुमची गुडी उभारण्यास तयार होईल. हि गुडी तुम्ही दरवाजात अथवा अनेक जण खिडकि मध्ये देखील लावतात.

गुडी पाडव्याचे महत्व

गुडी पाडवा हा हिंदू संस्कृती मधून सांस्कृतिक सण असून दिनदर्शिके प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष हा एक पौराणिक ग्रंथ असून गुढी पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त आहे, असे ह्या ग्रंथात सांगितले आहे. हिंदू धर्माची नवीन सुखमय वर्षाची सुरुवात म्हणून हा सण साजरा होतो. तसेच गुडी ला विजयाचे प्रतीक देखील मानले जाते. असे म्हणतात कि, ह्या दिवशी कोणत्याही कामाची सुरुवात हि त्या कामाला यशस्वी रित्या पूर्ण करते आणि त्यात आपल्याला विजय प्राप्त होतो.

संस्कृती जपण्याच्या हेतूने हा एक महत्वाचा सण आहे. तसेच ह्या दिवशी अनके सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात, ज्या दरम्यान अनके लोक दान धर्म देखील करतात, ज्यामुळे सामाजिक दृष्टीने देखील ह्या सणाला एक विशेष असे महत्व लाभले आहे.

गुडी पाडवा दिवशी कोणत्याही व्यक्ती सोबत भेदभाव केला जात नाही आणि चांगल्या कामाची देखील सुरुवात होते, ज्यामुळे भारतीय एकात्मतेच्या दृष्टीकोनातून देखील हा सण महत्वाचा मानला जातो.

तर, असा हा माझा आवडती सण गुडीपाडवा जो हिंदू नवीन वर्ष आणि आनंद दोन्ही एकाच वेळी घेऊन येतो.

Leave a Comment