माझा आवडता छंद मराठी निबंध | Maza Avadta Chand

आज केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आपल्याला क्रिकेटचे चाहते पाहायला मिळतील. क्रिकेट मुळात एक मैदानी खेळ असून हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळला जातो. माझा आवडता छंद देखील क्रिकेट खेळणे हाच आहे.

अगदी जीव की प्राण असे प्रेम माझे क्रिकेटवर आहे, हे क्रिकेट बद्दलचे आकर्षण माझ्या मनात आधीपासून नव्हते, परंतु जेव्हा मी सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळताना पाहिले आणि सचिन तेंडुलकर चा भूतकाळ जाणून घेतला, तेव्हापासून माझ्या मनात क्रिकेट बद्दल एक वेगळे स्थान निर्माण झाले. आमच्या गल्लीत देखील दररोज क्रिकेट हा खेळला जातो, त्यामुळे हळूहळू या खेळात माझी आवड निर्माण होऊ लागली आणि काही अशा प्रकारे मी क्रिकेट या खेळाचा चाहता झालो आणि क्रिकेट माझा छंद.

आजही कधी रिकामा वेळ असला की, चार चौघांना गोळा करून क्रिकेट खेळणे हा बेत आमचा ठरलेलाच असतो. जेव्हा आपल्याला एखादी कृती किंवा गोष्ट आवडू लागते, अशा वेळेस त्या गोष्टीबद्दल आणखी जाणून घेण्याची उत्सुकता देखील आपल्या मनात निर्माण होते आणि हे सहाजिकच असते, असेच काहीसे माझ्यासोबत होऊ लागले आणि क्रिकेट या खेळा बद्दल माहिती जाणून घेण्याची माझी मोहीम सुरू झाली, अशात अधिक तर लोकांनाच्या मनात सर्वात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे क्रिकेट चा शोध कोणी लावला ?

क्रिकेटचा शोध नेमका कोणत्या व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या समूहाने लावला, याची खात्रीशीर माहिती अद्याप उपलब्ध नाही, परंतु इंग्लंडमधील एक लहान गावांमधील मुलांनी या खेळाचा शोध लावला असावा असा अंदाज संशोधन विभागाने लावला आहे.

समूह मध्ये खेळला जाणाऱ्या क्रिकेटचा उल्लेख प्रथम १६११ मध्ये आढळून येतो आणि योगायोगाने याच वर्षात एका शब्दसमूहा मध्ये ” क्रिकेट मुलांचा खेळ आहे “ असा उल्लेख देखील आपल्याला पाहण्यास मिळतो.

१७ व्या शतकापर्यंत क्रिकेटचा पूर्णता विकास झाला होता, सतराव्या शतकामध्ये जगातील पहिली क्रिकेट टीम देखील बनवण्यात आली होती, ज्याचा “काउंटी टीम” या नावाने उल्लेख आढळून येतो.

१८ व्या शतकात लंडन आणि इंग्लंड देशांनी क्रिकेटला स्वतःच्या देशाचा प्रमुख खेळ म्हणून घोषित केले आणि पुढे क्रिकेटला या देशांमध्येच सर्वप्रथम ओळख आणि लोकप्रियता प्राप्त झाली.

आज क्रिकेट खेळ न केवळ पुरुष तर स्त्रिया देखील खेळतात आणि तेही आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि याची सुरुवात देखील लंडन देशापासून झाली. याच देशात १७४५ च्या सुमारास जगातील पहिले महिलांचे क्रिकेट सामने भरविण्यात आले होते.

१७४४ मध्ये क्रिकेटचे नियम लिहिले गेले, तसेच या खेळात विविध गोष्टींचा देखील समावेश केला गेला उदाहरणार्थ, स्टॅम्प, बॅट आणि बॉल. कारण सुरुवातीच्या काळात जेव्हा क्रिकेट हा खेळ खेळाला जात होता तेव्हा बॅट च्या जागी एखादी फळी आणि बॉल च्या जागी एखाद्या लहान गोलाकार वस्तूचा वापर केला जात होता.

१७८७ मध्ये पहिल्या क्कट क्लब ची स्थापना करण्यात आली, कालांतराने एकोणिसाव्या शतकापर्यंत हा खेळ केवळ इंग्लंड आणि लंडन या देशांपर्यंतच मर्यादित न राहता क्रिकेट चे प्रसारण इतर दक्षिण आफ्रिके मधील देशांमध्ये आणि नंतर संपूर्ण जगात झाले.

क्रिकेट हा खेळ एका नियमावली नुसार खेळला जातो ज्याबद्दल माहित असणे फार गरजेचे असते, क्रिकेट चे नियम हे समजण्यास अगदी सोपे आणि सरळ असतात.

क्रिकेट चे नियम :- क्रिकेट हा खेळ दोन गटांमध्ये खेळायला जातो आणि प्रत्येक गटामध्ये अकरा खेळाडूंचा समावेश असतो, त्यातील एक गट बॅटिंग करतो, तर दुसरा गट फिल्डिंग. क्रिकेट मधील मुख्य अजेंटा हा कि, विरुद्ध टीम पेक्षा जास्त रण करणे आणि विरुद्ध टीमला फिल्डिंग द्वारे स्वतः पेक्षा अधिक रन करण्यापासून रोखाने हा असतो. सामना सुरू होण्याआधी टॉस केला जातो, ह्या दरम्यान जो गट टॉस जिंकेल त्याला पहिल्यांदा बॅटिंग किंवा बॉलिंग निवडण्याची मुभा असते. तसे पाहायला गेलो तर टॉस जिंकलेले अधिक तर गट बॉलिंग निवडतात.

प्रत्येक सामना सुरू होण्याआधी एक ठराविक अवधी ठरवला जातो, त्याला इनिंग म्हणून ओळखले जाते. ह्या इनिंग दरम्यान एक टीम बेटिंग आणि दुसरी टीम फिल्डिंग करत असते.

क्रिकेट खेळण्यातसाठी अंडाकार मैदान वापरण्यात येते, याच्या मध्यभागी एक आयताकृती जागा असते, ज्याला पीच असे म्हटले जाते, त्या पीच च्या वरच्या बाजूला ६ आणि खालच्या बाजूला देखील ६ असे एकूण ६ स्टंप लावले असतात.

या आयताकृती पीच च्या एका टोकावरून खेळाडूंद्वारे बॅटिंग तर दुसरा टोकावरून बॉलिंग केली जाते. ज्या टोकावरुन खेळाडू बॅटिंग करत असतो, तिथून 1.2 मीटर अंतरावर एक रेखा असते ज्याला बॅटिंग क्रीस या नावाने ओळखले जाते.

क्रिकेटच्या सामन्या दरम्यान जी टीम बॅटिंग करत असते, त्या टीमचं केवळ दोनच खेळाडू मैदानात उपस्थित राहू शकतात, तर जी टीम बॉलिंग आणि फिल्डिंग करत असते, त्या टीमचे संपूर्ण ११ खेळाडू मैदानात उपस्थित असतात, त्यातील एका खेळाडूची निवड टीम च्या कॅप्टन द्वारे बॉलिंग करण्यासाठी होते आणि उर्वरित १० खेळाडू फिल्डिंग करत असतात, ह्या दहा पैकी देखील एक खेळाडू हा बॅटिंग करणाऱ्या खेळाडू च्या मागे उभा राहून फिल्डिंग करतो, ज्याला विकेट किपर या नावाने ओळखले जाते.

जेव्हा बॉलर चेंडूला बॅट्समन च्या दिशेने फेकतो, तेव्हा बेसमेंटला बॅटीच्या सहाय्याने त्या चेंडूला मारून रण कमावण्यासाठी धावायचे असते, तर या विरुद्ध फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना चेंडूला अडवून तो लवकरात लवकर बॉलर जवळ पोहोचवायचा असतो.

क्रिकेट खेळताना निर्णय घेण्यासाठी एका व्यक्तीची निवड केली जाते ज्याला अंपायर असे म्हटले जाते. अंपायर हा किती रन झाले खेळाडू आऊट झाला कि नाही, असे निर्णय घेतो आणि अंपायर द्वारे घेतला जाणार निर्णय हा शेवटचा असतो.

साधारण ह्याच नियमांच्या आधारे क्रिकेट हा खेळ खेळला जातो, असा हा क्रिकेट आजही माझा छंद आहे आणि भविष्यात देखील राहील.

Leave a Comment