महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

महाराष्ट्र राज्याकडे भारतातील सर्वात विशेष राज्य म्हणून पाहिले जाते, ह्याची कारणे देखील तितकीच महत्वाची आहेत, जसे कि भारतात सर्वाधिक कर भरणारे राज्य, अधिक लोकसंख्या असलेले राज्य, भारताचे मुख्य द्वारे, सर्वात मोठे औद्योगिक राज्य, सर्वात श्रीमंत राज्य आणि अधिक.
 
अशा ह्या महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का, कि महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, जर माहित नसेल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी आहे, कारण इथे आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा, त्यातील तालुके, त्याचा इतिहास, त्या जिल्यातील वैशिष्ट्य आणि तेथील पर्यटक स्थळे ह्या बद्दल माहिती घेणार आहोत.
 

 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, ज्यातील अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा असून अहमदनगर चे एकूण क्षेत्रफळ हे ३९.३ किलोमीटर वर्ग इतके आहे. २०११ च्या जण गणना नुसार अहमदनगर ची लोकसंख्या ही ३.५ लाख इतकी होती. अहमदनगर मध्ये एकूण १४ जिल्ह्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील तालुके

अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यांची नावे खालील प्रमाणे,
 
क्रमांक तालुका माहिती
कोपरगाव
गावांची संख्या: ७९
लोकसंख्या: ६५,२७३
पिन कोड: ४२३६०३
श्रीरामपूर
गावांची सांख्य: ५४
लोकसंख्या: ८९०००
पिन कोड: ४१३७०९
राहुरी
गावांची सांख्य: ९६
लोकसंख्या: ५५०००
पिन कोड: ४१३७०५
अकोले
गावांची संख्या: १९१
लोकसंख्या: १८,२७८
पिन कोड: ४२२६०१
शेवगाव
गावांची संख्या: ११२
लोकसंख्या: ३८,४००
पिन कोड: ४१४५०२
संगमनेर
गावांची संख्या: १७१
लोकसंख्या: ७ लाख 
पिन कोड: ४२२६०५
राहाता
गावांची संख्या: ६०
लोकसंख्या: १९,०००
पिन कोड: ४२३१०७
जामखेड
गावांची संख्या: ८८
लोकसंख्या: ३४,०००
पिन कोड: ४१३२०१
कर्जत
गावांची संख्या: ११८
लोकसंख्या: दोन लाख 
पिन कोड: ४१४४०२
१० नगर
गावांची संख्या: ११७
लोकसंख्या: ३,५०,०००
पिन कोड: ४१४००१
११ पाथर्डी
गावांची संख्या: १३२
लोकसंख्या: २,२९,०००
पिन कोड: ४१४१०२
१२ श्रीगोंदा
गावांची संख्या: ११५
लोकसंख्या: ३,१५,९८०
पिन कोड: ४१३७०१
१३ नेवासा
गावांची संख्या: १२०
लोकसंख्या: ३,२६,०००
पिन कोड: ४१४६०३
१४ पारनेर
गावांची संख्या: १३१
लोकसंख्या: २४,०९८
पिन कोड: ४१४३०२

Note:- वरील तक्त्यात दिलेली लोकसंख्या ही २०११ च्या जनगणने नुसार मांडली गेली आहे. लेटेस्ट जणगणना पार पडताच वरील दिलेली माहिती update करण्यात येईल.


इतिहास

१५ व्या शतकाच्या दरम्यान, बहामनी नावाच्या राज्याचे विभाजन झाले, ह्या विभाजनादरम्यान मलिक अहमदशाह हा वेगळा झाला, नंतर अहमदशाह ने पुन्हा स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा निश्चय केला आणि त्याने १४९४ मध्ये सीना नावाच्या नदीकाठी एक शहर वसवले. ह्या शहराचे नाव अहमदशाह ने स्वतः च्या नावावरून ठेवले आणि अशा प्रकारे अहमदनगर ची स्थापना अथवा निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. जेव्हा अहमदनगर ची स्थापन अहमदशाह ह्याने केली तेव्हा अहमदनगर हे एक स्वतंत्र राज्य म्हणून ओळखले जात होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अहमदनगर चे राज्य हे शहाजी महाराज चालवत होते, पुढे संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या काही वर्षांनंतर म्हणजेच १७५९ च्या सुमारास हे पेशव्यांच्या ताब्यात गेले आणि तेथून ते इंग्रजांच्या हुकूमात सामील झाले आणि ह्याच दरम्यान १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याती स्थापना केली.

असे म्हटले जाते कि, महाराष्ट्रातील पहिली लोकवसाहत हि अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी च्या किनारी झाली होती. तसेच श्रीरामपूर ह्या तालुक्यातील दायमाबाद येथील उत्खननात काही सिंधू संस्कृतीचे पुरावे आढळून आले, ज्यामुळे अहमदनगर चा इतिहास हा फार जुना असल्याचा अंदाज लावला गेला.

भारत स्वतंत्र होण्यापूर्वी अनेक चळवळी उदयास आल्या होत्या, त्यातीलच एक म्हणजे चलेजाव आंदोलन. ह्या आंदोलनामध्ये लाखो लोक सामील झाले होते, तसेच ह्या आंदोलनाचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल आणि मौलाना आझाद हे करत होते, ह्या आंदोलन दरम्यान ह्याचे नेतृत्व करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल आणि मौलाना आझाद ह्यांना इंग्रजांनी अहमदनगर मधील नगर तालुक्यातील एक किल्यात कारावासात ठेवले होते आणि ह्याच दरम्यान नेहरू ह्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचा प्रसिद्ध ग्रंथ देखील लिहिले होते.


जिल्ह्याचे वैशिष्ठ्य

महाराष्ट्राची ओळख आणखी एका नावाने होते ती म्हणजे संतांची भूमी. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यातीलच एक म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या जीवन काळात लोक कल्याणासाठी अनेक ग्रंथ लिहिले असाच एक ग्रंथ म्हणजेच ग्रंथराज. अनेक पौराणिक कथांमधून असे दिसून येते कि, संत ज्ञानेश्वरांनी ग्रंथराज हा ग्रंथ आजच्या अहमदनगर मधील श्री नेवासे क्षेत्रात लिहिला होता.

अहमदनगर ची आणखी एक ओळख म्हणजेच सर्वाधिक साखर कारखान्यांची नोंदी असलेला जिल्हा. अहमदनगर मध्ये जून १९५० च्या दरम्यान पहिला साखर कारखाना हा डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ह्यांच्या द्वारे सुरु करण्यात आला होता, ज्याचे पहिले अध्यक्ष म्हणून धनंजय गाडगीळ ह्यांची ओळख आहे. येथील साखर कारखान्यांची भरभराहट पाहता कालांतराने इथे कारखान्यांची सर्वात मोठी साखळी तयार झाली, ज्याच्यासाठी आज अहमदनगर प्रसिद्ध आहे.


अहमदनगरमधील ४ पर्यटन स्थळे

अहमदनगर मध्ये अनेक अशी स्थळे आहेत जी पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध आहेत, परंतु आपण इथे केवळ ४ पर्यटन थोडक्यात पाहणार आहोत.

1. भंडारदरा तलाव

वीज निर्मितीसाठी आज विविध पद्धतींचा वापर केला जातो, त्यासाठी हजारो एकरांवर विद्युत केंद्र देखील उभारले जातात, असेच एक विद्युत केंद्र अहमदनगर मधील भंडारदरा ह्या गावाजवळ आहे. तसेच इथे एक धरण देखील आहे, ज्याला गावाच्या नावावरून म्हणजेच भंडारदरा ह्या नावाने ओळखले जाते, परंतु ह्या धरणाचे खरे नाव हे विल्सन आहे, जे इंग्रजांनी बांधले होते, हे धरण मुख्यतः प्रवरा नदीवर बांधले गेले आहे, ह्या नदीचा उगम हा रतनगडावर होतो, तसेच ह्या नदीला अमृतवाहिनी म्हणून देखील ओळखले जाते.

भंडारदरा हे गाव नदीकाठी वसलेले असल्यामुळे, येथे अधिकतर कोळी जमातीचा वावर दिसून येतो. मोठमोठे नैसर्गिक धबधबे, मोठमोठी जलाशये, हिरवा परिसर, टेकड्या आणि डोंगररांगा हे भंडारदरा चे वैशिठ्य आहे. दरवर्षी हजारो लोक इथे पर्यटक म्हणून भेट देतात. येथील निसर्गच पर्यटकांचे मुख्य केंद्र बिंदू मानले जाते.

2. अमृतेश्वर मंदिर

अमृतेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील महादेवाचे रेखीव मंदिर आहे. हे मंदिर १२०० वर्ष जुने आहे, असा अंदाज लावला गेला आहे. ह्या मंदिराची निर्मिती लाल आणि काळ्या दगडांवर रेखीव काम करून केली गेली आहे. ९ व्य शतकातील राजा झांज ह्यांनी, त्याकाळी एकूण १२ मंदिरे तयार केली होती आणि अमृतेश्वर हे त्यातीलच एक आहे.

प्रवरा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर भंडारदरा पासून फक्त एक किलोमीटर च्या अंतरावर आहे. मंदिराच्या आजूबाजूला असलेले हिरवागार परिसर हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

3. अहमदनगरचा किल्ला

अहमदनगर चा किल्ला हीच खरी अहमदनगर ची ओळख मानली जाते. आजूबाजूला बचावात्मक टेकड्या अभेद्य बुरुज असे ह्या किल्याचे वैशिष्ट्य आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का, कि पहिल्यापासून हा किल्ला असा नव्हता. जेव्हा मलिक निजाम ह्याने अहमदनगर ची स्थापना केली होती, तेव्हा परकीय आक्रमण रोखण्यासाठी ह्या किल्याची स्थापना केली होती, परंतु सुरुवातीच्या काळात हा किल्ला मातीचा होता. जेव्हा अधिक सुरक्षेची गरज भासू लागली, तेव्हा ह्या किल्याची डागडुगी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भक्कम असा किल्ला तयार करण्यासाठी १५५९ ते १५६२ असा चार वर्षांचा कालावधी लागला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दिल्ली तख्ताचा बादशाह औरंगजेबाचा मृत्यू देखील ह्याच किल्ल्यात झाला, नंतर कालांतराने इंग्रजांच्या हाती हा किल्ला लागला इंग्रज त्याकाळी ह्या किल्याचा वापर कारागृह म्हणून करत होते ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या किल्ल्याचे अभेयद्यपन. आज ह्या किल्याचा वापर भारतीय जवान करत आहेत.

4. घाटघर चे धरण

घाटघर धरण हे मुख्यतः अहमदनगर मधील घाटघर ह्या गावात वसले आहे. केवळ पाणी पुरवठ्यासाठीच ह्या धरणाचा वापर केला जात नसून, इथे विद्युत निर्मिती केंद्र देखील तयार करण्यात आली आहे, ज्याची स्थापना २००८ मध्ये केली गेली होती.

धरणाचे नियोजन करून तयार करण्यासाठी एकूण पाच वर्षांचा कालावधी लागला होता. दिसताना हे केवळ एकच धरण दिसते, परंतु ह्याचे Upper Dam आणि Lower Dam अशा दोन भागात विभाजन झाले आहे आणि हे दोन्ही धरणे रोलर कॉम्पॅक्ट काँक्रीट चा वापर करून तयार करण्यात आले आहेत, ह्यातील वरच्या बाजूचे धरण हे १५ मीटर उंच तर खालच्या बाजूचे धरण हे ८६ मीटर उंच आहे


आपण काय शिकलो?

  • महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे.
  • अहमदनगर चे एकूण क्षेत्रफळ ३९.३ किलोमीटर वर्ग इतके आहे.
  • अहमदनगर ची स्थापना अहमदशाह ह्यांनी केली होती.
  • अहमदनगर मध्ये एकूण १४ तालुके आणि १५८४ गावे आहे.
  • अहमदनगर मध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत.
  • जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल आणि मौलाना आझाद ह्यांना चलेजाव आंदोलनामुळे अहमदनगर च्या किल्ल्यात कोठडी सुनावली होती.

अधिक लेख :

1. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?

2. महाराष्ट्रात किती तालुके आहेत आणि कोणते ?

3. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

4. भारतात किती राज्य आहेत ?

Leave a Comment