महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?

भारतातील महाराष्ट्र हे असे राज्य आहे, ज्याला सर्वाधिक निसर्गाचा वारसा प्राप्त झाला आहे, म्हणजेच भव्य डोंगररांगा, दऱ्याखोऱ्या, हिरवा निसर्ग, कालवे, धबधबे आणि नद्या ह्यामुळे भारतातील विविध भागातील लोकांचे महाराष्ट्राबद्दलचे आकर्षण अधिक प्रबळ होत आहे.

महाराष्ट्रात अनेक नद्या वाहतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आणि तिची लांबी किती, हा प्रश्न न केवळ सामान्य ज्ञानाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, तर भारतात होणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमध्ये देखील असा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला आहे, अनेकांना नदीचे नाव तर माहीत असते, परंतु त्याचे हे ज्ञान केवळ नावापुरतीच मर्यादित असते.

या लेखात महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? नदी चा इतिहास काय आणि त्याची भौगोलिक माहिती अशा विविध प्रकारच्या माहितीचा आढावा आपण घेणार आहोत,


महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?

गोदावरी नदी हि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरीची एकूण लांबी १,४५० किलोमीटर म्हणजेच ९०० मैल इतकी आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे, तसेच ह्या नदीला धार्मिक महत्व देखील प्राप्त आहे.
 
गोदावरीचा उगम हा नाशिक मधील त्र्यंबकेश्वर ह्या प्रसिद्ध धार्मिक ठिकाणी झाला असून, ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झाला आहे, ती जागा जमिनीपासून १,६२० मीटर म्हणजेच ५,३१० फूट इतक्या उंचीवर आहे.

गोदावरी नदीला दक्षिण गंगा ह्या नावाने देखील ओळखले जाते, हि नदी महाराष्ट्रासोबतच भारताच्या इतर राज्यामध्ये देखील वाहते, ज्यांची नावे कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, आणि ओडिसा अशा प्रकारे आहे.


नदीचा भूभाग

गोदावरी नदीची एकूण लांबी १,४५० किलोमीटर इतकी असली तरी गोदावरीने महाराष्ट्रातील केवळ ६५० किलोमीटर इतके क्षेत्रफळ व्यापले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील परभणी चंद्रपूर, नाशिक, बीड, औरंगाबाद आणि अहमदनगर ह्या जिल्ह्यांमधून वाहते. नदी प्रथम नाशिक मधुन अहमदनगर नंतर औरंगाबाद, बीड, परभणी आणि नांदेड अशा क्रमाने वाहते आणि त्यानंतर ती आंध्र प्रदेश ह्या राज्यात प्रवेश करते.

महाराष्ट्रात गोदावरी नदी औरंगाबाद, बीड आणि अहमदनगर हया जिल्ह्यांची सीमा बनते, म्हणजेच एक प्रकारे या जिल्ह्यांचे विभाजन गोदावरी मुळे होते, असे आपण म्हणू शकतो.

अनेक ठिकाणी गोदावरीच्या पात्रात आपल्याला गाळापासून तयार झालेली लहान लहान बेटे दिसून येतात, त्यांना लंका या नावाने संबोधले जाते. ह्या लंकांवर तंबाखूचे काही प्रमाणात पीक घेतले जाते.

अनेक वर्षांपासून तयार झालेली गाळ आणि सतत होणारा पाणी पुरवठा, यामुळे गोदावरी नदीचा त्रिभुज प्रदेश बराच सुपीक झाला आहे, सध्याच्या परिस्थितीत हया त्रिभूज प्रदेशात तेलबिया, विविध कडधान्य, कापूस, गहू, ज्वारी, तांदूळ, मोसंबी, द्राक्षे अशा अनेक खाद्यपदार्थांची शेती करून मुबलक प्रमाणात त्यांचे उत्पादन घेतले जाते.

गोदावरी नदीतील पाणी पिण्यायोग्य असल्यामुळे त्यावर महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश सरकारने देखील विविध प्रकारचे प्रकल्प उभारले आहेत, ह्या प्रकल्पाद्वारे दरवर्षी लाखो लोकांची पाण्याची गरज भागवली जाते.


उप नद्या

गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वता मधुन होत असून ती नंतर बंगालच्या उपमहासागरात विलीन होते. गोदावरीच्या अनके उपनद्या आहेत, ज्यातील ११ नद्यांची नावे आणि त्यांची लांबी आपण खालील तक्त्यात पाहणार आहोत,

क्रमांक नदीचे नाव नदीची लांबी
खेळणा १३० कि.मी
दारणा ८० कि.मी
सिंदफणा १२२ कि.मी
कुंडलिका ७४ कि.मी
शिवना ४.५ कि.मी
प्रवरा २०८ कि.मी
बिंदुसरा ४० कि.मी
बोरी १३० कि.मी
कादवा ७४ कि.मी
१० मुळा २२ कि.मी
११ सरस्वती ३६० कि.मी

पौराणिक कथा

गोदावरी नदीला हिंदू धर्मात खूप महत्वाचे स्थान असून, पवित्र नदी अशी गोदावरी नदीची ओळख हिंदू धर्मात आहे. गोदावरीच्या तटावर अनेक पौराणिक धार्मिकस्थळे आहेत ज्यांचे वास्तव्य अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून ह्या भूतलावर आहे. असे म्हटले जाते की गोदावरी नदीत स्नान केल्याने आपले सर्व पाप धुतले जातात, ह्यासाठी दरवर्षी लाखो लोक गोदावरी नदीत आपले पाप धुण्यासाठी येतात, तसेच ह्या नदी काठी दर १२ वर्षांनी कुंभमेळा देखील भरवला जातो.

गोदावरीची एक पौराणिक कथा आहे, ज्यामुळे ह्या नदीला धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे, ती कथा आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

कथा :- एक गौतम नावाचे ऋषी होते जे त्यांच्या पत्नीसोबत नाशिक मधील ब्राम्हगिरी च्या डोंगराळ भागात एक आश्रम करून राहत होते. ऋषी गौतम हे अन्नदानाचे पुण्य काम करत होते, ज्यासाठी ते शेती देखील करत होते.

दुसऱ्या बाजूला ऋषीमुनींच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन गणपती देवाने पृथ्वीवर एक चमत्कारिक गाय पाठवली जिचे नाव माया धेनु असे होते.

ही गाय एखाद्या सामान्य गाई प्रमाणेच दिसत होती. एकदा ऋषी गौतम त्यांच्या आश्रमात गरिबांना दान देण्यासाठी अन्न शिजवत होते, अगदी त्याच वेळेस हि काम-धेनु नावाची गाय त्या आश्रमात प्रवेश करते आणि तेथे सर्व नासधूस करते, हे पाहून त्या गाईला रोखण्यासाठी गौतम ऋषी ह्यांनी तिच्यावर धारदार गावात टाकण्यास सुरुवात केली,  ऋषी गौतम ह्यांना वाटले कि असे केल्याने गाय येथून निघून जाईल, पण असे काहीही न होता, गाय जाग्यावरच मरण पावली. बघता बघता हि खबर सर्वच ऋषिंपर्यंत पोहोचली आणि गौहत्येचे पाप केल्याबद्दल ऋषि गौतम ह्यांना पच्छाताप करण्यास सांगू लागले.

इतर ऋषींचे ऐकून ऋषी गौतम हे त्रंबकेश्वर देवाची आराधन करू लागले, ज्याने त्यांच्यावर असलेलं गौहत्येचे पाप धुहून निघेल. अनेक दिवसांच्या तापस्चर्येनंतर महादेव ऋषी गौतम ह्यांच्यावर प्रसन्न झाले आणि गौतम ऋषी ह्यांच्या समोर प्रकट झाले, ऋषींनी त्यांना सर्व घटना सांगितली हे ऐकून महादेवांनी त्यांची जटा दगडांवर आपटली आणि अशा प्रकारे गोदावरी पृथ्वीवर अवतरली. त्यात स्नान करून गौतम ऋषी ह्यांचे पाप धुतले गेले ह्याच कथेमुळे पाप नष्ट करण्यासाठी आजही गोदावरी नदीत स्नान करण्याची प्रथा प्रचलित आहे.


आपण काय शिकलो?

  • गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.
  • गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर इतकी आहे.
  • गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर ती झाला.
  • गोदावरी नदीला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.
  • बारा वर्षांनी च्या ठिकाणी कुंभमेळा भरवला जातो तीलाच एक ठिकाण म्हणजे गोदावरीचे तठ आहे.
  • गोदावरी शेवटी बंगालच्या उपम महासागरात विलीन होते.

अधिक लेख :

1. भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

2. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत ?

3. जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे ?

4. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

Leave a Comment