महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत आणि कोणते ?

महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला असून त्यातील पहिला शब्द महान असा आहे आणि दुसरा शब्द राष्ट्र असा आहे. महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. 

महाराष्ट्र हा भारताचा एक अवर्णनीय भाग आहे. महाराष्ट्र मधील मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे, तसेच मुंबई ला भारताची आर्थिक राजधानी होण्याचा देखील मान मिळाला आहे. 

महाराष्ट्र हा ३,०७,७१३ km² च्या भागात पसरलेला असून एक भव्य किनारपट्टी देखील महाराष्ट्राच्या हिस्सेदारी मध्ये आहे.

अशा ह्या इतक्या भव्य आणि विस्तारित महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत आणि कोणते असा प्रश्न अनेकांना पडत असेल तर ह्या लेखात आपण त्याबाबतची अगदी विस्तारित रूपाने माहिती घेणार आहोत.

३ लाख पेक्षा जास्त किमी पसरलेल्या महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. जेव्हा महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य म्हणून घोषित झाले तेव्हा केवळ २६ जिल्हे महाराष्ट्रात अस्तित्वात होते, परंतु २०१७ पर्यंत याच जिल्ह्यांची संख्या 36 पर्यंत पोहोचली आहे. ह्या 36 जिल्ह्यांची नावे आपण खालीलप्रमाणे :

क्र. जिल्हा क्षेत्रफळ तालुके
औरंगाबाद १०,१०० km²
अकोला ५,४२८ km²
मुंबई ६०३. ४ km²
बीड १०,६९३ km² ११
अहमदनगर १७,०४८ km² १४
अमरावती १२,२३५ km² १४
धुळे ७,१९५ km²
गडचिरोली १४,४१२ km² १२
गोंदिया ५,२३४ km²
१० भंडारा ३,७१७ km²
११ चंद्रपूर ११,४४३ km² १५
१२ कोल्हापूर ७,६९२ km² १२
१३ सोलापूर १४,८९५ km² ११
१४ लातूर ७,१५७ km² १०
१५ जालना ७,६८७ km²
१६ मुंबई उपनगर ४४६ km²
१७ नाशिक १५,५८२ km² १५
१८ नागपूर ९,८९२ km² १४
१९ उस्मानाबाद ७,५६९ km²
२० पुणे १५,६४३ km² १४
२१ सातारा १०,४८० km² ११
२२ रत्नागिरी ८,२०८ km²
२३ सांगली ८,५७२ km² १०
२४ ठाणे ४,२१४ km²
२५ सिंधुदुर्ग ५,२०७ km²
२६ वाशीम ५,१५० km²
२७ यवतमाळ १३,५८२ km² १६
२८ पालघर ५,३४४ km²
२९ वर्धा ६,३१० km²
३० परभणी ६,२५१ km²
३१ नंदुरबार ५,९५५ km²
३२ हिंगोली ४,५२६ km²
३३ रायगड ७,१५२ km² १५
३४ नांदेड १०,५२८ km²
३५ जळगाव ११,७६५ km² १५
३६ बुलढाण ९,६६१ km² १३
  एकूण ३०७,७१३ km² ३५७

महाराष्ट्राचे विभाग 

महाराष्ट्र हा मुख्यात पाच भागांमध्ये विभागला गेला आहे ज्यांची नवे मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोंकण ह्या प्रमाणे आहे. प्रत्येक भागात विविध जिल्ह्यांचा समावेश आहे जे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

मराठवाडा – औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड़, लातूर, परभणी, हिंगोली.

कोकण – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

पुणे विभाग – पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर

विदर्भ – बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया

खानदेश – नंदुरबार, धुळे, जळगाव. 


FAQ

1. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे ?

उत्तर : महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत.

2. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे ?

उत्तर : महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ ३,०७,७१३ किमी वर्ग इतके आहे.

3. महाराष्ट्राचे पाच विभाग कोणते ?

उत्तर : पुणे विभाग, खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण हे महाराष्ट्राचे पाच विभाग आहेत.

4. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता ?

उत्तर : अहमदनगर हं महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे.

5. महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

उत्तर : महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक तालुके आहे, ज्याची एकूण संख्या १६ इतकी आहे.

6. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लहान जिल्हा कोणता ?

उत्तर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मुंबई शहर जे ६०३ किमी वर्ग सह ३ तालुके असलेला सर्वात लहान जिल्हा आहे.

7. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला पर्यटक जिल्हा म्हणून ओळखले जाते ?

उत्तर : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटक जिल्हा म्हणून ओळखले जाते.

अधिक लेख :

1. महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?

2. भारतात किती राज्य आहेत ?

3. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

4. जगातील सर्वात लहान देश कोणता ?

Leave a Comment