लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम

लोकसंख्या हा प्रत्येक देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा मुद्दा मानला जातो, कारण लोकसंख्या ही कोणत्याही देशाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती ठरवत असते, परंतु हा महत्त्वाचा मुद्दा किंवा घटक देशासाठीच नव्हे, तर हळूहळू संपूर्ण जगासाठी एक समस्या बनत आहे.

गेल्या शंभर वर्षात लोकसंख्या वाढीचे प्रमाण अगदी दुप्पट तिप्पट झाले आहे. २०२० च्या एका रिपोर्टनुसार जगाची एकूण लोकसंख्या ७५५.२७ करोड इतकी असून हा आकडा कालांतराने वाढतच आहे.

जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश चीन असून, चीनची एकूण लोकसंख्या 2020 नुसार 140 करोड इतकी आहे. चीन नंतर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश भारत आहे, आणि 2020 नुसार भारताची एकूण लोकसंख्या 138 करोड आहे. आणखी पाच वर्षात भारत जगातील महासत्ता बनेल असा तर्क लावण्यात आला आहे.

भारतात उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य असून 2020 नुसार उत्तर प्रदेशची एकूण लोकसंख्या 15 करोड पेक्षा अधिक होती, उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र, बिहार हे काही जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहेत.

कोणत्याही देशाचा महत्त्वाचा घटक असलेली लोकसंख्या वाढल्याने कोणते दुष्परिणाम होतात, या संबंधित माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.


लोकसंख्या वाढ म्हणजे काय ?

लोकसंख्या वाढ साधारणतः एक अशी स्थिती असते, ज्यामध्ये लोकांची संख्या अनियमितपणे किंवा गरजेपेक्षा जास्त होते. लोकसंख्यावाढीचे कोणतीही एक ठराविक कारण सांगणे अयोग्य ठरेल. मृत्यूदर कमी होणे, जन्मदर वाढणे, चांगली वैद्यकीय सेवा मिळणे, लोकांचे स्थलांतर होणे ही काही लोकसंख्यावाढीची मुख्य कारणे सांगितली जातात.

व्यवस्थित निरीक्षण केले असता असे निदर्शनास येते की, तंत्रज्ञान विकासामुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक लाभकारक बदल घडून आले आहेत, ज्यामुळे योग्य उपचार मिळू लागले आहेत आणि परिणामी लोकसंख्या नियंत्रित राहिली नाही.

आज पासून अगदी काही वर्षांपूर्वी पाहिले तर, त्या काळी होणारी महायुद्धे, उद्भवणारी प्रतिकूल परिस्थिती यामुळे लोकसंख्या नियंत्रित राहत होती, परंतु जसेच या विसाव्या शतकाची सुरुवात झाली, लोकसंख्या वाढीचे प्रमाण अचानक वाढू लागले. अनेकदा असे दिसून आले आहे की, लोकसंख्यावाढीची विकसित देशांपेक्षा विकसनशील देशांमध्ये जास्त आहे.


लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम

लोकसंख्या वाढीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

1. इंधन आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा होणारा ऱ्हास

वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम हे आपण विचार करतो त्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक असतात. वाढत्या लोकसंख्येचा पहिला वाईट परिणाम हा निसर्गावर होत असतो. याचे मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक संसाधने ही मर्यादित उपलब्ध असतात, ही संसाधने निसर्गात होणाऱ्या अनेक प्रक्रियांमधून तयार होत असतात, ज्यांना कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. जसे की पाणीसाठा, पेट्रोल, डिझेल हे नैसर्गिक संसाधनाचे उत्तर उदाहरण ठरू शकते.

संपूर्ण पृथ्वीचा एकूण 70 टक्के पेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापला आहे. हे पाणी समुद्र, नद्या, तलाव या स्वरूपात आढळते. या 70 टक्केपेक्षा अधिक पाणीसाठ्यात केवळ एक ते दीड टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. उर्वरित पाणीसाठ्यात सोडियम म्हणजेच मिठाचे प्रमाण अधिक आहे, जे पिल्याने शरीर Dehydrate होते, ज्याने विविध शारीरिक त्रास उद्भवू शकतात. ज्यामुळे आपण हे पाणी पिऊ शकत नाही.

पाण्याप्रमाणेच, इंधन, ऑक्सिजन अशी अनेक संसाधने आहेत, ज्यांचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे.

2. हिंसाचार

विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे देशातील सरकारद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवांवर ताण पडतो आणि नवनवीन वाद उदयास येतात. अनेकदा तर हिंसा देखील होते.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे, भारतात दर वर्षी जाणवणारी पाणीटंचाई. दर वर्षी भारतातील कोणत्या ना कोणत्या भागाला दुष्काळाला सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचे मुबलक साठे उपलब्ध होत नाहीत. आजही भारतात अनेक असे भाग आहेत, जेथील लोक पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करतात.

पाण्यामुळे आज पर्यंत भारतात अनेक वाद विवाद निर्माण झाले आहेत काही ठिकाणी हिंसाचार झाल्याची ही घटना समोर आल्या आहेत.

पाण्याशिवाय आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे अन्न भारतात दर दिवशी दोन करोड पेक्षा अधिक लोक दोन वेळच्या अन्नाची सोय करू शकत नाहीत ज्यामुळे त्यांना उपाशी झोपावे लागते असे एका रिपोर्टनुसार समोर आले आहे त्यामुळे उपासमार कुपोषण या समस्या उद्भवतात ज्याचे कारण कुठेतरी वाढती लोकसंख्या आहे दोन वेळेचे अन्नाची सोय करण्यासाठी चोरी हिंसाचारी यासारख्या घटना समाजासमोर येत आहेत

3. बेरोजगारीची समस्या

कोणत्याही देशाची जेव्हा लोकसंख्या वाढते, तेव्हा त्या देशाला एका समान समस्या मधून जावे लागते, ही बेरोजगारीची समस्या आहे, आणि ही समस्या जवळजवळ जगातील सर्व देशांमध्ये आहे, खासकरून भारतात.

एका जागतिक रिपोर्टनुसार संपूर्ण जगात भारत हा एकुलता एक देश आहे, ज्यामध्ये तरुणांची संख्या इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. 2019 च्या एका रिपोर्टनुसार भारतातील एकूण तरुणांपैकी 23 टक्के पेक्षा अधिक तरुण बेरोजगार आहेत आणि ही संख्या अथवा टक्केवारी कोरोना महामारीमुळे आणखी वाढली आहे.

बेरोजगारीमुळे अनेकदा तरुण चुकीच्या मार्गावर जातात जसे की चोरी, खून ज्यामुळे समाजाला नवनवीन समस्याना सामोरे जावे लागते.

4. महागाई

जेव्हा एखाद्या वस्तू किंवा सेवेची मागणी वाढते, परंतु काही कारणास्तव त्याचे उत्पादन मर्यादित राहते, अशा परिस्थितीत वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात, ज्यामुळे महागाईला सामोरे जावे लागते.

लोकसंख्या वाढीमुळे भारतात जवळजवळ सर्वच मूलभूत वस्तू आणि सेवांची मागणी वाढत आहे, त्यामुळे भारतात सतत महागाई आपल्याला अनुभवायला मिळते.

महागाईचे सध्याच्या परिस्थितीतील उत्तम उदाहरण म्हणजे पेट्रोल, भाजी, LPG gas यांच्या सतत वाढणाऱ्या किमती. दरवर्षी दैनंदिन जीवनातील मूलभूत वस्तू आणि सेवांच्या किमती वाढताना दिसत आहेत, याला आळा घालायचा असेल तर, दोन पर्याय दिसून येतात. पहिला पर्याय म्हणजे लोकसंख्या नियंत्रण आणि दुसरे म्हणजे वस्तू व सेवा यांचे उत्पादन वाढवणे.

5. महामारी

अयोग्य आणि अस्वच्छ असे राहणीमान, लोकांची अधिक घनता, कुपोषण अशा काही कारणांमुळे कोरोना सारखी महामारी जगाला व्यापून टाकते, ज्यात न केवळ ठराविक देशाला तर संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागतात.

लोकांच्या घणाते आणि सतत संपर्कात आल्यामुळे समाजात सतत संसर्गजन्य रोगाचे वास्तव्य असते, याचे एक उदाहरण म्हणजे कोरोना, ज्याच्या परिणामातून आजही जग स्वतःला सावरू शकले नाही. या महामारीमुळे अनेक लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले, देशाची आर्थिक स्थिती ढासळली, वैद्यकीय सेवांवर ताण पडला.

6. कमी जीवन काळ

आज पासून काही वर्षांपूर्वी चे निरीक्षण केले असता असे समजते की, पूर्वी लोकांचे आयुष्य १०० वर्षे व त्यापेक्षा अधिक होते, जे कमी होता होता आधी १०० व नंतर ८० इतके झाले आहे, यातही लोकांची संख्या वाढ कुठेतरी कारणीभूत ठरताना दिसत आहे. महामारी, अपुऱ्या वैद्यकीय सेवा, वैयक्तिक वाहनांमुळे वातावरणात वाढणारे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण, कुपोषण ही काही कारणे आहेत, जे मानवाचे जीवन काळ कमी करण्यात कारणीभूत ठरत आहेत.

जे आजार अथवा समस्या पूर्वी वृद्धांमध्ये जाणवत होते, त्या समस्या हल्ली तरुणांमध्ये अधिक दिसून येत आहेत, जसे की कॅन्सर, अस्तमा, रक्तदाबाचा त्रास, मधुमेह, डोळ्यांचा त्रास, रुदय विकार झटके इत्यादी. ज्यामुळे न केवळ जीवन काळ कमी झाला आहे, तर मृत्यू दरातही वाढ होताना दिसत आहे.

7. विलुप्त होणारे वन्य जीवन

असे नाही की वाढती लोकसंख्या केवळ मानवासाठी घातक आहे तर, याचे वाईट परिणाम विविध घटकांवर देखील होताना दिसतात. वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलतोड आणि प्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे, ज्यामुळे वन्यजीवन हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

अनेक प्राण्यांच्या अशा काही प्रजाती आहेत, ज्या लुप्त झा ल्या आहेत आणि काहींची संख्या इतकी कमी झाली आहे, की काही वर्षात तेही लुप्त होतील, यामुळे कोठेतरी पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास सुरुवात होत आहे, ह्याचे दुष्परिणाम आपल्याला विविध रूपाने भोगावे लागत आहेत जसे की दुष्काळ, पूर, महामारी आणि अधिक.

8. अर्थव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम

भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे आजही भारतातील पन्नास टक्के पेक्षा अधिक लोकांचे वास्तव्य ग्रामीण भागात आहे.

शहरी भागापेक्षा, ग्रामीण भागातील लोकसंख्येची घनता झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे शेतकरी आणि शेती यांचे गुणोत्तर जुळत नाही.

शिवाय शेतजमीन कमी असणे, सतत दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतीला वाव मिळत नाही, परिणामी शेतकरी शेती करण्याऐवजी नोकरीला प्राधान्य देताना दिसत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य पाया शेती आहे

शेतकरी शेतीपासून दूर होत असल्याने, भारताची अर्थव्यवस्था कमकुवत होताना दिसत आहे. अर्थव्यवस्था कमजोर होण्याचे हेच एक मुख्य कारण नसून भ्रष्टाचार, लाच घेणे हे घटकही अर्थव्यवस्थेला कमजोर करण्याचे काम करतात, ज्यामुळे भारतावरील कर्ज वाढत आहे.

9. राहणीमानाचा दर्जा खालावणे

कोणत्याही देशातील लोकसंख्येच्या दरडोई उत्पन्नावर त्याचे राहणीमान ठरते, म्हणजेच दरडोई उत्पन्न जास्त असेल तर, राहणीमान चांगल्या दर्जाचे अथवा उच्च दर्जाचे बनते, याविरुद्ध जर उत्पन्न कमी असेल तर, राहणीमान खालावते.

लोकसंख्यावाढीमुळे दिवसेंदिवस अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांची मागणी वाढत आहे, परंतु अपुरा कच्चामाल, कमी भांडवल आणि कुशल कामगारांची कमतरता, यामुळे या मूलभूत गरजांच्या उत्पादनात वाढ करता येत नाही म्हणून किमती वाढत आहेत, ज्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजांचा चा खर्च वाढतो जे प्रत्येकाला परवडणारे नसते, परिणामी राहणीमानाचा दर्जा खालावला जातो.

राहणीमानाचा खर्च भागविण्यासाठी लोक कर्ज घेण्याचा मार्ग निवडतात, ज्यामुळे गरिबीला सामोरे जावे लागते. भारतात राहणीमानाचा दर्जा फार खालावला आहे, याचा अंदाज आपल्याला धारावी सारख्या झोपडपट्टी भागांना पाहून येतो.

10. पर्यावरणाचा ऱ्हास

पृथ्वीवरील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पर्यावरण, जो अनेक लहान-लहान घटकांपासून बनतो, यामध्ये वन्यजीवन,  झाडे, कीटक, ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड अशा अनेक घटकांचा समावेश असतो. या सर्व घटकांचा समतोल म्हणजे पर्यावरण.

ह्यापैकी कोणताही घटक गरजेपेक्षा अधिक वाढला किंवा गरजेपेक्षा त्या घटकांची संख्या कमी झाली की, पर्यावरणाचा समतोल बिघडतो, ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होते, जसे की भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर इत्यादी.

लोकसंख्या वाढीमुळे अनेक अनावश्यक घटक अमर्यादित रीत्या वाढत आहेत, जसे की जंगल तोड, जीव हत्या वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड, जमिनीची धूप, जल प्रदूषण इत्यादी, ज्यामुळे एक प्रकारची जगबुडी होण्याचे संकेत वर्तविले जात आहेत.

Leave a Comment