LIC चा फुल फॉर्म काय ? | LIC Full Form in Marathi

विमा म्हणजे एक अशी संकल्पना, ज्याद्वारे आपण जोखीम चे व्यवस्थापन करू शकतो. विमाला इंग्रजीत “insurance” असे म्हटले जाते. विमामुळे आपत्कालीन वेळेत आर्थिक नुकसान टाळता येते. विमा हा विविध प्रकारचा असतो, जसे की जीवन विमा, वाहन विमा, स्वास्थ्य विमा आणि अधिक.

सोलोमन हुइब्नर्स यांना विमा चे जनक म्हणून ओळखले जाते. सोलोमन यांनीच प्रथम जगासमोर विमाची संकल्पना मांडली होती. वर्तमान काळात भारतात अनेक अशा कंपन्या आहेत, ज्या विमा विक्री करतात, यामध्ये सरकारी आणि वैयक्तिक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.

LIC ही भारतातील सर्वात मोठी आणि नामांकित अशी विमा कंपनी आहे. या लेखात आपण LIC चा फुल फॉर्म आणि LIC संबंधित विविध माहितीचा आढावा घेणार आहोत,


LIC म्हणजे काय ?

LIC एक वैधानिक विमा आणि गुंतवणूक संस्था अथवा महामंडळ आहे. ही संस्था अथवा महामंडळ भारतीय सरकारच्या मालकी हक्काचे असून याचे मुख्यालय महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात आहे. जेव्हा भारतीय संसदेद्वारे भारतातील विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करणारा भारतीय जीवन विमा कायदा संमत करण्यात आला तेव्हा म्हणजेच साल १९५६ मध्ये या संस्थेची स्थापन झाली.

एकूण २४५ विमा कंपन्यांचे विलीनीकरण करून भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. LIC मध्ये ज्या कंपन्यांचे विलीनीकरण झाले होते, त्यामध्ये १५४ जीवन विमा कंपन्या, ७५ भविष्य निर्वाह कंपन्या आणि १६ विदेशी कंपन्यांचा समावेश होता.


LIC Full Form in Marathi

L – Life
I – Insurance
C – Corporation Of India

LIC चा फुल फॉर्म “Life Insurance Corporation Of India” असा असून याचा मराठी अर्थ “भारतीय आयुर्विमा महामंडळ” असा होतो.


इतिहास

“Bombay Mutual Life Assurance Society” ही भारतातील पहिली जीवन विमा देणारी कंपनी होती. या कंपनीची स्थापना साल १८१८ मध्ये कोलकत्ता येथे करण्यात आली होती. या कंपनीचे प्राथमिक प्राधान्य हे युरोपिअन ग्राहक होते. यानंतर साल १९०७ मध्ये भारताचे पहिले IAS अधिकारी सुरेंद्रनाथ टागोर यांनी हिंदुस्थान विमा सोसायटीची स्थापन केली. पुढे जाऊन याच हिंदुस्थान विमा सोसायटीचे आयुर्विमा महामंडळामध्ये रूपांतर झाले.

साल १९५५ मध्ये खासदार फिरोज गांधी यांनी खाजगी विमा एजन्सीद्वारे होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला. चौकशी दरम्यान भारतातील श्रीमंत उद्योगपती सचिन देवकेकर आरोपी म्हणून पुढे आहे, यामुळे त्यांना दोन वर्षांचा कारावास देण्यात आला. सचिन देवेकर हे Times Of India चे मालक होते.

पुन्हा फसवणुकीच्या घटना घडू नये म्हणून १९ जून १९५५ मध्ये भारतीय संसदेत भारतीय जीवन विमा कायदा संमत करण्यात आला. या घटनेमुळे भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) निर्मिती झाली. १९५६ च्या औद्योगिक धोरणात्मक निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील १७ विविध क्षेत्रांवरचे भारत सरकारने नियंत्रण वाढविले, परिणामी विमा क्षेत्रातील २५४ कंपन्यांचे विलीनीकरण करून LIC ची स्थापना करण्यात आली.


तथ्य (Facts)

  • LIC चा IPO हा साल २०२२ चा सर्वात मोठा IPO होता.
  • LIC ही भारतातील सर्वात जुनी आणि मोठी विमा कंपनी आहे.
  • वर्तमान काळात भारतात एकूण २९ करोडपेक्षा अधिक लोकांकडे LIC विमा आहे.
  • एक रिपोर्टनुसार भारतात एकूण १.३ दशलक्ष इतके LIC एजंट आहेत.
  • वर्तमान काळात भारतात LIC चे एकूण २१०० पेक्षा अधिक कार्यालये आहेत.
  • LIC कंपनीची स्थापन होऊन एकूण ६५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. विमा क्षेत्रात इतके वर्ष यशस्वीरित्या कार्य करणारी ही पाहली कंपनी आहे.
  • LIC मध्ये एकूण २४५ कंपन्यांचे विलीनीकरण झाले आहे, ज्यातील १६ कंपन्या या विदेशी होत्या.
  • LIC भारतसह फिजी, मॉरिशस, युनाइटेड किंग्डम, कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती, ओमन, केनिया, नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर, बांग्लादेश आणि न्यूझीलँड या देशांमध्ये देखील कार्यरत आहे.
  • “योगक्षेमं वहम्यहम्” हे LIC चे घोष वाक्य आहे, ज्याचा मराठी अर्थ “तुमचे कल्याण हीच आमची जबाबदारी” असा आहे.
  • १९५९ मध्ये जेव्हा LIC ची स्थापना झाली, तेव्हा LIC च्या चेन्नई कार्यालयाची इमारत ही भारतातील सर्वात उंच इमारत होती.

FAQ

1. LIC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

उत्तर : १ सप्टेंबर १९५६ साली LIC ची स्थापना झाली.

2. LIC चे मुख्य कार्यालय कोठे आहे ?

उत्तर : महाराष्ट्रातील मुंबई येथे LIC चे मुख्य कार्यालय आहे.

3. भारतातील पहिली विमा कंपनी कोणती ?

उत्तर : “Bombay Mutual Life Assurance Society”  भारतातील पहिली विमा कंपनी होती.

4. LIC चा मालकी हक्क कोणाकडे आहे ?

उत्तर : LIC चा मालकी हक्क भारतीय सरकारकडे आहे.

5. LIC चे वर्तमानकालीन अध्यक्ष कोण ?

उत्तर : “मंगलम रामासुब्रमण्यन कुमार” हे LIC चे वर्तमानकालीन अध्यक्ष होते.

6. LIC चा IPO केव्हा प्रक्षेपित झाला ?

उत्तर : ४ मे २०२२ रोजी LIC चा IPO प्रक्षेपित (Lounch) करण्यात आला.

अधिक लेख –

1. BMW चा फुल फॉर्म काय ?

2. KTM चा फुल फॉर्म काय ?

3. HDFC चा फुल फॉर्म काय ?

4. NGO चा फुल फॉर्म काय ?

1 thought on “LIC चा फुल फॉर्म काय ? | LIC Full Form in Marathi”

Leave a Comment