लघु उद्योग म्हणजे काय ?

उद्योग क्षेत्र हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा स्तंभ असतो, जो वेळोवेळी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कारणीभूत ठरतो. व्यवसाय क्षेत्र हे आपल्या कल्पनेपेक्षाही खूप विस्तारित आहे, ज्यात विविध घटक सामावलेले आहेत, यातीलच एक घटक म्हणेज लघु उद्योग होय. ज्याबद्दल विविध माहितीच आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

अनुक्रमणिका


लघु उद्योग म्हणजे काय ?

कमी लोक, कमी भांडवल आणि कमी उत्पादन क्षमतेनिशी काम करणाऱ्या उद्योगांना लघु उद्योग असे म्हणतात. लघु उद्योगांमध्ये ठराविक क्षमतेनिशी उत्पादन करणाऱ्या उद्योगांचा समावेश होतो, जेथे लहान यंत्र, कमी भूभाग आणि अल्प संख्यांक कामगारांचा उपयोग केला जातो.

एखादा उद्योग अल्प स्तरावर कार्यरत असला तरी, भारत सरकारद्वारे तयार केलेल्या तत्वांवर कार्य करणे, लघु उद्योगांसाठी फार गरजेचे आहे. भारतात जे काही लघु उद्योग आहेत, त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेची जीवनरेखा म्हणून ओळखले जाते.

लघु उद्योग उत्पादक क्षमतेने जरी अल्प असले तरी, लघु उद्योगांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात, सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील ते आवश्यक असतात.

जसे कि आपण जाणतोच, भारत हा एक विकसनशील देश आहे, ज्यामुळे भारतात वस्तू आणि सेवांची मागणी कालांतराने वाढत आहे, या वाढत्या मागणीमुळेच लघु उद्योग अगदी वेगाने विस्तारत आहेत. भारतात काही असे लघु उद्योग देखील अस्तित्वात आहेत, जे विदेशात वस्तूची निर्यात करतात, ज्यामुळे भारतात विदेशी चलन वाढताना दिसत आहे.


लघु उद्योगांचे प्रकार

लघु उद्योग हे विविध पद्धतीने आणि विविध क्षेत्रांमध्ये होत असल्यामुळे, लघु उद्योगांचे देखील विविध प्रकारांमध्ये विभाजन झाले आहे. हे प्रकार नेमके कोणते याबद्दल माहिती आपण खालील प्रमाणे ,पाहणार आहोत,

1. उत्पादक लघु उद्योग

उत्पादक लघु उद्योग हे साधारणतः ते उद्योग असतात, जे वस्तूंचे उत्पादन घेतात, मग उत्पादन कोणत्याही वस्तूचे असू शकते.

2. सेवा प्रदाते लघु उद्योग

या उद्योगां द्वारे ग्राहकाला ठराविक अशी सेवा पुरवली जाते, जसे कि इलेक्ट्रॉनिक सामान रिपेरिंग, केस कापणे आणि अधिक.

3. सहायक लघु उद्योग

सहायक लघु उद्योग हे मोठ्या उद्योगांना उत्पादनासाठी आवश्यक लहान-लहान वस्तू अथवा यंत्रांचे उत्पादन घेतात.

उदा. iPhone ही जगातील एक नामांकित मोबाईल कंपनी आहे. iPhone कंपनी आपल्या मोबाईलच्या Display चे उत्पादन स्वतः घेत नाही, तर ते इतर कंपनीना डिस्प्ले तयार करण्याची ऑर्डर देते.

4. आयात-निर्यातीकरण

आयात आणि निर्यती याचा समावेश देखील लघु उद्योगांमध्ये होतो. आयत आणि निर्यातीकरणाला आपण इंग्रजीत Import आणि Export असे म्हणतो. वर्तमान काळात Import आणि Export क्षेत्राचा विस्तार हा वेगाने होताना दिसत आहे. प्रत्येक उद्योगासाठी आयात आणि निर्यात फार महत्वाचा भाग आहे, मग उद्योग लहान असो वा मोठा.

आयात आणि निर्यात ही विविध देशांमध्ये आणि राज्यांमध्ये होते, परंतु त्याचा समावेश आपल्याला लघु उद्योगात करता येणार नाही. लघु उद्योगांद्वारे केली जाणारी आयात-निर्यात ही एखाद्या ठराविक शहरापुरती  अथवा जिल्ह्यापुरती मर्यादित असते.

5. ग्रामउद्योग

ग्रामीण भागात चालणाऱ्या उद्योगांना ग्रामउद्योग असे म्हटले जाते. ग्रामउद्योग हे पारंपरिक पद्धतीचे असतात, जे स्थानिक कच्च्या मालावर अवलंबून असतात. यामध्ये दूध उत्पादन, कुकुट पालन, मातीची भांडी बनविणे अशा असंख्य उद्योगांचा समावेश होतो.

6. कुटीर उद्योग

तंत्रज्ञानाचा वापर न करता अथवा अगदी कमी तंत्रज्ञाच्या वापरानिशी पारंपरिक पद्धतीने वस्तू आणि सेवांचे उत्पादन घेणाऱ्या उद्योगांना कुटिरोद्योग असे म्हणतात. कुटीर उद्योगांचा उगम हा साधारणतः घरांमधूनच होत असतो. कुटीर उद्योगांमधून घेतल्या जाणाऱ्या उत्पादनामध्ये लहान लहान मुर्त्यांची निर्मिती करणे, कॅरि बॅग बनविणे, अगरबत्ती तयार करणे यांसारख्या वस्तूंचा समावेश होतो.


लघु उद्योगांचे वैशिष्ठ्य

ज्या प्रमाणे लघु उद्योगांची काही मर्यादा आहे, अगदी त्याच प्रमाणे त्यांचे काही वैशिष्ठ्य देखील आहे, जे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. एकल मालकी हक्क

जे काही मोठे अथवा विस्तारित उद्योग असतात, त्यांचे दोन किंवा त्यापेक्षा देखील अधिक हिस्सेदार असतात, ज्याची अनेक कारणे असू शकतात, जसे कि गुंतवणूक, विस्तार आणि अधिक. कंपनी संबंधित प्रत्येक निर्णयासाठी सर्व मालकांची परवानगी घ्यावी लागते, तसेच निर्णय प्रत्येकालाच पटेलच असे ही नसते, जर एखाद्या हिस्सेदाराला निर्णय पटला नाही तर, त्याच्या अमलबजावणीत अनेक अडचणी उद्भवू शकतात.

लघु उद्योगामध्ये याच्या विपरीत अगदी क्वचितच हिस्सेदारी पाहायला मिळते, अथवा इथे अधिकतर एकल मालकी हक्क असतो, ज्यामुळे उद्योगात एकछत्री निर्णय असतो, ज्याचा फायदा असा कि उद्योगासंबंधित निर्णयाला वेग मिळतो.

2. मनुष्यबळावर आधारित

लघु उद्योग हे साधारणतः मनुष्यबळावर आधारित असतात, ज्यामुळे येथे यंत्रांची गरज मोठ्या उद्योगांच्या तुलनेत फार कमी भासते व यामुळे यंत्रांचा खर्च, त्यांचे मेंटेनंस खर्च लघु उद्योगांमध्ये उद्भवत नाही.

3. व्यवस्थापन

लघु उद्योगांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण हक्क हे दोन्ही एकाच मालकाकडे असतात, जे लघु उद्योगांचे सर्वात लक्षणीय असे वैशिष्ठ्य आहे, यामुळे उद्योगासंबंधित मतभेत निर्माण होण्याचा विषय निर्माण होत नाही.

4. लवचिकता

मोठ्या उद्योगांच्या तुलनेत लघु उद्योगांमध्ये बाजार वातावरणाप्रमाणे बदल घडून आणणे, सहज शक्य होते, ज्यामुळे गरजेच्या मालांची उत्पादक क्षमता वाढवता येते.

5. कमी अपव्यय

लघु उद्योग ठराविक मात्रात उत्पादन करत असल्यामुळे, यांच्याद्वारे उत्पादन प्रक्रियेत कच्च्या मालाचा अपव्यय अगदी सुष्म स्वरूपात होतो, ज्यामुळे कच्च्या मालाची कमतरता भासत नाही.


लघु उद्योगांसाठी सरकारी योजना

भारतात लघु उद्योग सुरु करण्यासाठी आणि सुरु केलेला लघु उद्योग विस्तारण्यासाठी भारत सरकारद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत, ज्यातील ३ योजनांचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

1. प्रधानमंत्री मुद्रा योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँकेकडे काहीही तारण अथवा गहाण न ठेवता, लघु उद्योगांकरिता १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते. इथे प्रत्येक बँकेचे व्याजदर विविध असतात, ज्यामुळे आपल्याला किती व्याजदर आहे, हे पूर्णतः आपण कोणत्या बँकेतून कर्ज घेत आहोत, यावर अवलंबून असते.

2. स्टॅन्ड उप इंडिया योजना

स्टॅन्ड उप इंडिया योजने अंतर्गत अनुसूचित जाती जमातीतील लोक आणि महिला यांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहित केले जाते. या योजने अंतर्गत उम्मेदवार स्वतःच्या, पात्रतेनुसार १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकतो. या योजनेअंतर्गत परतफेडीचा कालावधी हा साधारणतः ७ वर्ष इतका असतो.

3. मेक इन इंडिया

वस्तू व सेवांचे उत्पादन भारतात अधिक प्रमाणात व्हावे आणि भारत स्वावलंबी व्हावा या करीता, ही योजना सुरु करण्यात अली आहे. या योजने अंतर्गत उम्मेदवार ९ ते १३ % व्याजदरा सहित २० ते ५० लाख रुपये इतके कर्ज मिळवू शकतो.

4. लघु उद्योगांची नोंदणी

भारत सरकारद्वारे लघु उद्योग धारकांसाठी “उदयाम रजिस्ट्रेशन” नामक एक पोर्टल अथवा वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. येथे लघु उद्योग धारकांना त्यांच्या उद्योगाची अथवा व्यवसायाची नोंदणी करावी लागते, नोंदणीनंतर उद्योगाला एक अधिकृतपणा प्राप्त होतो, तसेच उद्योग धारकाला सरकारद्वारे एक प्रमाणपत्र देखील दिले जाते.

या नोंदणीमुळे लघु उद्योग धारक विविध सरकारी योजनांचा लाभ घेणास पात्र होतो. नोंदणीची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने  होते, ज्यामुळे आपण अगदी सहज आपल्या मोबाईलद्वारे देखील आपल्या व्यवसायाची नोंदणी udyamregistration.gov.in या सांकेतिक स्थळाला देऊन करू शकतो.

उद्यम पोर्टलचा सर्व कारभार हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाद्वारे पाहिला जातो, ज्यामुळे नोंदणी नंतर आपल्याला अनेक सरकारी कर्ज योजना, कर बचत योजना अशा अनेक योजनांचा फायदा होतो. या व्यतिरिक्त सरकारी कामांमध्ये जे टेंडर निघतात, त्यातही आपल्याला सहभागी होता येते.


लघु उद्योग कल्पना

तसे पाहायला गेलो तर, लघु उद्योगांसाठी अनेक विकल्प आहे, परंतु इथे आपण अशा ५ लघु उद्योगांची माहिती पाहणार आहोत, जे अगदी कमी भांडवला सहित कोणीही सुरु करू शकतो.

1. मसाले बनविणे

भारतात लोकांना मसालेदार पदार्थ खाण्याचे फार वेड आहे, ज्यामुळे भारतात खाद्य मसाल्यांची मागणी फार आहे. भारतातील मसाले हे इतर देशांमध्ये देखील निर्यात केले जातात, ज्यामुळे दिवसेंदिवस मसाल्यांची मागणी अगदी वेगाने वाढत आहे.

आपण घरच्या घरी हळद, लाल मसाला, गरम मसाला असे विविध प्रकारचे मसाले बनवून, स्वतः होलसेलरला कमी भावात विकू शकतो. यासाठी आपल्याला जास्त भांडवलाची देखील गरज भासत नाही. भारतात अनेक अशा मसाले कंपनी आहेत, ज्यांनी लघु उद्योग म्हणून स्वतःची सुरुवात केली होती, परंतु आज ते न केवळ भारतातील तर जगातील नामांकित कंपन्यांपैकी एक आहेत. उदा. MDH.

जर व्यवसायाचा विस्तार करायचं असेल तर, स्वतःच्या व्यवसायाची ब्रॅण्डिंग करणे फार गरजेचे आहे,  ज्यासाठी आपण स्वतःच्या कंपनीचे मसाले पॅकेट स्वतःच्या नावानिशी तयार करू शकतो.

2. कुकूट पालन

जर आपण गावच्या ठिकाणी अगदी मोकळ्या वातावरणात राहत असू, तर आपल्यासाठी कुकूट पालन एक उत्तम व्यवसाय आहे. हा व्यवसाय आपण कोंबड्यांच्या अल्प संख्येनिशी  सुरु करू शकतो. वर्तमान काळात अंड्याची वाढती मागणी आणि कमी पुरवठा, यामुळे अंड्यांचे भाव वाढत आहेत, अशात आपण एक उत्तम संधी साधू शकतो.

सुरुवात आपण ३० ते ५० कोंबड्यानिशी करू शकतो. तसे पाहायला गेलो तर, कोंबड्यांचा खुराख देखील अगदी स्वस्तात उपलब्ध होतो, ज्यामुळे आपण कमी भांडवलासहित एक फायदेशीर उद्योग सुरु करू शकतो.

3. कागदी पिशवी बनविणे

जसे कि आपण जाणतो, प्लास्टिक हा एक अविघटनशील घटक आहे, ज्यामुळे प्लास्टिक हजारो वर्ष पृथ्वीवर साठून राहते, ज्याचा विपरीत परिणाम निसर्गावर होताना दिसत आहे. भारत सरकार देखील प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा, यासाठी विविध कारवाया करत आहे. कारवाई आणि दंड टाळण्यासाठी व्यापारी देखील प्लास्टिक पिशवीचा वापर टाळत आहेत, आणि कागदी पिशव्यांचा वापर करू लागले आहेत.

या संधीचा फायदा घेऊन आपण कमी किमतीत घरबसल्या कागदी पिशव्यांचे उत्पादन घेऊ शकतो, यासाठी आपल्याला अगदी काही किलो उत्तम दर्जाचे कागद आणि गम या गोष्टींचीच गरज भासेल, जे अगदी स्वस्तात उपलब्ध होते.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कागदी पिशव्यांची विक्री, जी आपण मॉल मधील मोठं मोठ्या दुकानांना करू शकतो.

4. अगरबत्ती बनविणे

सध्याच्या काळात भारतातील घराघरात अगरबत्तीचा उपयोग केला जातो. अशात अगरबत्ती व्यवसाय सुरु करणे एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अगरबत्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या यंत्रांचा उपयोग होत नाही, ज्यामुळे अगरबत्तीचे उत्पादन, आपण घरच्या घरी घेऊ शकतो. यासाठी लागणारे साहित्य म्हणजे कोळसा पावडर, लहान लाकडाची काडी, गम, सुगंधासाठी सेंट जे साहित्य अगदी सहज आणि कमी भांडवलात उपलब्ध होतात. कमी भांडवलासहित जास्त नफा मिळविण्यासाठी हा व्यवसाय उत्तम ठरू शकतो.

5. कार्यक्रमांमध्ये डेकोरेशन करणे

वरील चारही उद्योगांच्या तुलनेत हा सर्वात कमी भांडवलात सुरु होणार व्यवसाय आहे, ज्यात आपल्याला लग्न, बर्थडे असा विविध कार्यक्रमांमध्ये सजावट करायची असते. तसेच एकदा खर्च करून घेतलेले सामान आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो, ज्यामुळे येथे भांडवल खर्च देखील एकदाच उद्भवतो.

या उद्योगात आपण सोबतीला मित्राला अथवा जवळील इतर व्यक्तीला घेऊ शकतो. उद्योग सुरु करण्याकरिता प्रथम, ज्या हॉलमध्ये अथवा स्थळावर कार्यक्रम पार पडत असतात, तेथील मालकाशी व्यवहारीकी बोलणे करून घेणे गरजेचे आहे, ज्याने आपल्याला दरदिवशी ऑर्डर मिळतील.

तर हे ५ व्यवसाय आहेत, जे आपण कमी भांडवला सहित सुरु करू शकतो, तसेच याचा स्कोप जास्त असल्यामुळे आपण यातून अधिक नफा अगदी कमी वेळात मिळवू शकतो.


फायदे

लघु उद्योग, ज्यांना सहसा कुटीर किंवा सूक्ष्म उद्योग म्हणून संबोधले जाते, त्यांचे अनेक फायदे आहेत जे आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि प्रादेशिक विकासामध्ये योगदान देतात. लघु-उद्योगांच्या काही प्रमुख फायद्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

1. रोजगार निर्मिती

लघुउद्योग हे रोजगाराचे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहेत, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात. ते स्थानिक रहिवाशांना रोजगार शोधण्याची संधी देतात, ज्यामुळे बेरोजगारी आणि गरिबी कमी होते.

2. स्थानिक आर्थिक विकास

स्थानिक संसाधने आणि श्रम यांचा वापर करून स्थानिक समुदायांच्या आर्थिक विकासात लघुउद्योग योगदान देतात. ते तळागाळातील आर्थिक क्रियाकलापांना चालना देण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे एकूण प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

3. लवचिकता आणि नवीनता

लघुउद्योग अधिक लवचिक आणि बदलत्या बाजार परिस्थितीशी जुळवून घेणारे आहेत. ते ग्राहकांच्या मागण्यांना त्वरीत प्रतिसाद देऊ शकतात, नाविन्यपूर्ण कल्पनांसह प्रयोग करू शकतात आणि नोकरशाहीच्या अडथळ्यांशिवाय नवीन उत्पादने किंवा सेवा सादर करू शकतात ज्यांना मोठ्या उद्योगांना तोंड द्यावे लागते.

4. उद्योजकतेला प्रोत्साहन

लघुउद्योग उद्योजकतेला प्रोत्साहन देतात आणि व्यक्तींना त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी एक मार्ग प्रदान करतात. यामुळे विविध प्रकारच्या व्यवसायांची वाढ होते आणि आर्थिक गतिमानतेला हातभार लागतो.

5. भांडवलाची आवश्यकता कमी

मोठ्या उद्योगांच्या तुलनेत लहान उद्योगांना साधारणपणे कमी भांडवली गुंतवणूकीची आवश्यकता असते. यामुळे व्यक्ती आणि लहान गटांना व्यावसायिक जगात प्रवेश करणे आणि त्यांचे उपक्रम सुरू करणे सोपे होते.

6. उद्योगांचे स्थानिकीकरण

लघुउद्योग हे बहुधा प्रदेश-विशिष्ट असतात आणि स्थानिक गरजा पूर्ण करतात. हे स्थानिकीकरण एखाद्या प्रदेशाची विशिष्ट संस्कृती, परंपरा आणि उत्पादने यांना प्रोत्साहन देण्यास मदत करते, त्याच्या वेगळ्या ओळखीमध्ये योगदान देते.

7. कौशल्य विकास

लघुउद्योग अनेकदा पारंपारिक कारागिरी आणि कौशल्यांवर अवलंबून असतात. या उद्योगांना पाठिंबा देऊन, पारंपारिक कौशल्ये आणि तंत्रे जतन केली जातात आणि नवीन पिढ्या त्यांच्याकडून शिकू शकतात आणि फायदा घेऊ शकतात.

8. कमी पर्यावरणीय प्रभाव

मोठ्या उद्योगांच्या तुलनेत लहान-उद्योगांमध्ये लहान पर्यावरणीय पाऊलखुणा असतात. ते सहसा कमी संसाधने वापरतात, कमी कचरा निर्माण करतात आणि पर्यावरणावर तुलनेने कमी परिणाम करतात.

9. प्रादेशिक असमानता कमी करणे

कमी-विकसित प्रदेशांमध्ये लघु-उद्योगांची स्थापना आणि वाढ आर्थिक क्रियाकलाप आणि संधी अधिक समान रीतीने पसरवून प्रादेशिक असमानता कमी करण्यात मदत करू शकते.

10. कृषी क्षेत्रासाठी समर्थन

अनेक लघुउद्योग शेतीशी घनिष्ठपणे जोडलेले आहेत, जे कृषी उत्पादनात मूल्यवर्धन प्रदान करतात. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते आणि कृषी विकासाला मदत होते.

11. सर्वसमावेशक वाढ

लघुउद्योगांमध्ये उपेक्षित गट, स्त्रिया आणि कारागीर यासह अनेक लोकांचा समावेश असू शकतो. हा सर्वसमावेशक दृष्टिकोन संतुलित आणि शाश्वत विकासाला हातभार लावतो.

12. सरकारी मदत

लघुउद्योगांना चालना देण्यासाठी सरकार अनेकदा प्रोत्साहन, सबसिडी आणि सहाय्यक धोरणे देतात. त्यामुळे त्यांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

एकूणच, लघुउद्योग आर्थिक विविधता वाढविण्यात, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आणि समुदायांच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगदान देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते संतुलित आणि सर्वसमावेशक आर्थिक परिदृश्याचे महत्त्वाचे घटक आहेत.


आव्हाने

लघुउद्योग (SSI) देशाच्या आर्थिक विकासात रोजगार निर्मिती, उद्योजकतेला चालना देऊन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान देऊन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तथापि, त्यांना अनेक आव्हानांचाही सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांची वाढ आणि टिकाव रोखू शकतात. लघु-उद्योगांसमोरील काही सामान्य आव्हानांमध्ये हे समाविष्ट आहे:

1. वित्तपुरवठ्यासाठी मर्यादित प्रवेश

लघुउद्योगांना त्यांच्या कामकाजासाठी आणि विस्तारासाठी पुरेशी आर्थिक संसाधने मिळवण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. बँका आणि वित्तीय संस्था त्यांना धोकादायक कर्जदार म्हणून समजू शकतात, ज्यामुळे त्यांना वाजवी अटींवर कर्ज किंवा क्रेडिट सुरक्षित करणे कठीण होते.

2. तांत्रिक सुधारणांचा अभाव

बर्‍याच SSI मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचा अवलंब करण्यासाठी आवश्यक निधी आणि संसाधनांचा अभाव आहे, ज्यामुळे त्यांची उत्पादकता आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मकता मर्यादित होऊ शकते.

3. मर्यादित बाजारपेठेतील पोहोच

लघुउद्योगांमध्ये मर्यादित विपणन आणि वितरण नेटवर्क असू शकतात, ज्यामुळे त्यांना व्यापक ग्राहक आधारापर्यंत पोहोचण्यापासून आणि त्यांच्या बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्यापासून प्रतिबंधित होते.

4. तीव्र स्पर्धा

SSI ला अनेकदा मोठ्या, अधिक प्रस्थापित कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते, जी स्केल, संसाधने आणि बाजारातील प्रभावाच्या अर्थव्यवस्थेतील फरकांमुळे आव्हानात्मक असू शकतात.

5. इन्फ्रास्ट्रक्चरल अडथळे

अपर्याप्त पायाभूत सुविधा, जसे की अविश्वसनीय वीजपुरवठा, अपुरी वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा, लघुउद्योगांच्या कार्यक्षम कार्यात अडथळा आणू शकतात.

6. कुशल कामगारांची कमतरता

कुशल कामगार शोधणे कठीण होऊ शकते, विशेषत: ज्या प्रदेशांमध्ये कुशल कामगारांची कमतरता आहे. कौशल्यांमधील अंतर उत्पादकता मर्यादित करू शकते आणि वाढीस अडथळा आणू शकते.

7. नियामक आणि अनुपालन ओझे

क्लिष्ट नियामक फ्रेमवर्क नेव्हिगेट करणे आणि अनुपालन आवश्यकता पूर्ण करणे हे लघु उद्योगांसाठी कठीण असू शकते, वेळ आणि संसाधने वापरतात.

8. कच्च्या मालामध्ये प्रवेश

SSI ला सातत्यपूर्ण आणि परवडणारा कच्चा माल मिळविण्यात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे त्यांच्या उत्पादन प्रक्रिया आणि खर्च संरचना प्रभावित होतात.

9. आर्थिक चढउतारांची असुरक्षा

लघु उद्योग त्यांच्या मर्यादित संसाधनांमुळे आणि लहान ग्राहक आधारावर अवलंबून असल्यामुळे आर्थिक मंदीला अधिक असुरक्षित असू शकतात.

10. अपुरे विपणन आणि ब्रँडिंग

अनेक लघुउद्योगांमध्ये प्रभावी विपणन आणि ब्रँडिंग धोरणांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संसाधनांचा अभाव असतो, ज्यामुळे त्यांची दृश्यमानता आणि ग्राहकांच्या निष्ठेवर परिणाम होऊ शकतो.

11. मर्यादित संशोधन आणि विकास

आर्थिक अडचणींमुळे एसएसआयसाठी नवकल्पना आणि संशोधन आव्हानात्मक असू शकतात, त्यांच्या बदलत्या बाजारातील ट्रेंडशी जुळवून घेण्याची क्षमता मर्यादित करते.

12. नेटवर्किंग आणि सहयोगाचा अभाव

लघु उद्योगांमध्ये सहयोग आणि नेटवर्किंगच्या संधींचा अभाव असू शकतो, जे ज्ञानाची देवाणघेवाण आणि व्यवसाय वाढीस अडथळा आणू शकतात.

13. माहितीसाठी अयोग्य प्रवेश

धोरणात्मक निर्णय घेताना बाजारपेठेतील ट्रेंड, उद्योग अंतर्दृष्टी आणि सर्वोत्तम पद्धतींचा मर्यादित प्रवेश लहान-उद्योगांना तोट्यात टाकू शकतो.

14. पर्यावरण नियम

संसाधनांच्या मर्यादांमुळे आणि पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याशी संबंधित खर्चामुळे पर्यावरणीय नियमांचे आणि टिकाऊपणाच्या पद्धतींचे पालन करणे काही लघु उद्योगांसाठी आव्हानात्मक असू शकते.

या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अनेकदा सरकारी धोरणे, आर्थिक सहाय्य, कौशल्य विकास उपक्रम, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि बाजारपेठेतील सुधारित प्रवेशाची आवश्यकता असते. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि स्थानिक उद्योजकतेला चालना देण्यासाठी लघुउद्योगांच्या वाढीला पाठिंबा देणे आवश्यक आहे.

अधिक लेख –

1. ई व्यवसाय म्हणजे काय व याचे फायदे कोणते ?

2. सेवा क्षेत्र म्हणजे काय व याचे प्रकार कोणते ?

3. ई व्यवसाय म्हणजे काय व याचे फायदे कोणते ?

4. करार म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते ?

Leave a Comment