KTM चा फुल फॉर्म काय ? | KTM Full Form in Marathi

पूर्वी प्रवासासाठी लोक पायी अथवा बैलगाडी किंवा घोडागाडीचा पर्याय निवडत होते. हा पर्याय प्रत्येकीसाठीच उपलब्ध नव्ह्ता, ज्यामुळे लोक अधिकतर पायी प्रवासाचा पर्याय निवडत होते. कालांतराने मानवी विकास होत गेला. साल १८१७ मध्ये सायकल चा शोध लागला, यामुळे माणसाला प्रवासासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झाला, जो स्वस्त आणि सुलभ होता.

साल १८५३ मध्ये रेल्वे प्रवासाला सुरुवात झाली. रेल्वे प्रवास स्वस्त तर होता, परंतु सुलभ नव्हता. कालांतराने बस, मोटर सायकल, कार सारखे विविध प्रवासी पर्याय उपलब्ध होऊ लागले. प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवास हा कमी अंतरावरील प्रवास आणि जास्त अंतरावील प्रवास अशा दोन भागांमध्ये विभागला गेला.

कमी अंतरावरील प्रवासासाठी लोकांनी Bike, Car यांसारख्या वैयक्तिक वाहनांना अधिक प्राधान्य देऊ लागले, ज्यामुळे Bike उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात अस्तित्वात आल्या आणि कंपन्यांमध्ये आपापसातच स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले.

स्पर्धेमुळे बाजारात नवनवीन प्रकारच्या Bike बाजारात येऊ लागल्या, ज्यामुळेलोकांमध्ये देखील bike चे एक वेगळेच क्रेज दिसू लागले. लोक bike प्रवासासाठी नव्हे तर फॅशनसाठी विकत घेऊ लागले.

या लेखात आपण KTM या प्रसिद्ध Bike निर्मिती करणाऱ्या कंपनी बद्दल विविध माहितीचा आढावा घेणार आहोत,


KTM म्हणजे काय ?

KTM ही एक ऑस्ट्रेलियन स्पोर्ट मोटार वाहन बनवणारी कंपनी आहे. johnn hans trunkenpolz यांनी या कंपनीची स्थापना १९३४ साली केली होती. साल २०१२ मध्ये कंपनीचे नाव बदलून KTM AG असे ठेवण्यात आले. वर्तमान काळात KTM च्या एकूण हिस्सेदारीपैकी ४९.७९ % इतकी हिस्सेदारी ही भारतीय Auto Mobile कंपनी “Bajaj Auto” कडे आहे.

KTM कंपनीचे मुख्य कार्यालय हे ऑस्ट्रेलियातील Mattighofen मध्ये आहे. KTM ही युरोपमधील सर्वात आघाडीची मोटार वाहन निर्मित कंपनी आहे. २०१७ च्या एक रिपोर्ट नुसार KTM कंपनीमध्ये ३००० पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत.


KTM Full Form In Marathi

K – Kraftfahrzeuge
T – Trunkenpolz
M – Mattighofen

KTM चा फुल फॉर्म “Kraftfahrzeuge Trunkenpolz Mattighofen” असा असून यामध्ये जर्मन आणि इंग्रजी शब्दांचा केलेला उपयोग आपल्याला दिसून येतो. KTM च्या फुल फॉर्म मधील Trunkenpolz हे कंपनीच्या संस्थापकाचे नाव आहे, Mattighofen हे ऑस्ट्रेलियातील एका ठिकाणाचे नाव आहे, जेथे कंपनीची स्थापना करण्यात आली होती आणि Kraftfahrzeuge चा मराठी अर्थ “मोटार वाहन” असा होतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर KTM च्या इंग्रजी फुल फॉर्म चा मराठी अर्थ मोटार वाहने असा होतो.


इतिहास

वर्ष घटना
१९३० Hans Trunkenpolz नामक इंजिनिअर ने ऑस्ट्रेलियातील Mattighofen  या ठिकाणी एक Metal-Working Shop सुरु केले, ज्याला Kraftfahrzeuge Trunkenpolz Mattighofen असे नाव देण्यात आले. याच शॉप ने कालांतराने कंपनीचे रूप धारण केले.
१९५१ कंपनीने “R100” नामक मॉडेलची पहिली मोटार Bike तयार केली.
१९५३ कंपनीचे नाव बदलून “Kronreif Trunkenpolz Mattghofen” (KTM) असे ठेवण्यात आले, जेथे २० कर्मचारी दर दिवशी ३ मोटार Bike ची निर्मिती करत होते.
१९५४ कंपनीने प्रथम १०० KTM गाड्यांची डिलिव्हरी केली.
१९५७ पर्थम “The Trophy 125cc” नामक स्पोर्ट Bike तयार केली.
१९७० कंपनीने स्वतःच्या गाड्यांसाठी स्वतः इंजिनची निर्मिती करण्यास सुरुवात केली
१९७५ कंपनीने जगासमोर “Comet Grand Prix 125 RS” मॉडेलची Bike सादर केली.
१९७६ कंपनीने प्रथम स्वतःचे 125cc चे इंजिन तयार केले.
१९८१ “Water-Cooled 125 cc” मोटार Bike चे उत्पादन सुरु केले.
१९८२ कंपनीनें Water-Cooling सह पहिले ४ स्ट्रोक चे इंजिन तयार केले.
१९८८ कंपनीने स्कुटरचे उत्पादन घेणे बंद केले.
१९८९ कंपनीचे संस्थापक “Hans Trunkenpolz” यांचे निधन झाले..
१९९६ इलेकट्रीक स्टार्टर आणि KTM LC4 नामक इंजिनचे उत्पादन सुरु केले.
१९९७ KTM LC4 मॉडेलची Adventure Bike जगासमोर आणली.
१९९८ 125cc आणि 200cc इंजिनच्या नवीन डिजाईन कंपनीद्वारे सादर करण्यात आल्या.
१९९९ Racing 400/520 नामक ४-स्ट्रोक इंजिन चे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.

सुप्रसिद्ध Bikes

भारतात विकल्या जाणारी कंपनीच्या काही सुप्रसिद्ध KTM Bike च्या मॉडेल्सचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार  आहोत,
 
मॉडल किंमत (ऑन रोड)
KTM 790 Duke रु. ८.६३ लाख व अधिक
KTM 125 Duke रु. १.९८ लाख व अधिक
KTM 200 Duke रु. २.१८ लाख व अधिक
KTM 250 Duke रु. २.९१ लाख व अधिक
KTM RC 125 रु. २.०९ लाख व अधिक
KTM RC 200 रु. २.४४ लाख व अधिक
KTM RC 390 रु. ३.३४ लाख व अधिक
KTM 390 Duke रु. ३.४६ लाख व अधिक
KTM 390 Adventure रु. ३.९२ लाख व अधिक

तथ्य (Facts)

  • KTM ची सुरुवात १९३० मध्ये एका मेटल शॉपच्या स्वरूपात झाली होती आणि साल १९३४ मध्ये मेटल स्टोरला Bike निर्मिती कंपनीचे स्वरूप धारण झाले.
  • KTM द्वारे साल १९५३ मध्ये प्रथम मोटर Bike तयार करण्यात आली, ज्याचा मॉडेल “R100” हा होता.
  • कंपनी स्पोर्ट Bike सोबतच स्कुटर चे देखील उत्पादन घेत होती, परंतु १९८८ मध्ये काही कारणास्तव कंपनीला स्कुटर चे उत्पादन बंद करावे लागले.
  • साल १९७१ येता येता कंपनीने एक विलक्षण स्थान Auto Mobile क्षेत्रात मिळवले होते.
  • KTM कंपनी स्पोर्ट Bike सोबतच स्पोर्टकार चे देखील उत्पादन घेते.
  • john penton  आयातदारामुळे KTM चे पदार्पण अमेरिका या देशात झाले.
  • KTM 390 Adventure मॉडेलची Bike KTM कंपनीची सर्वात महाग Bike आहे.
  • भारतातील bajaj auto कडे KTM या कंपनीची ४९.७५ टक्के इतकी हिस्सेदारी आहे.
  • KTM 125 Duke ही KTM ची भारतात सर्वाधिक प्रमाणात विकली जाणारी Bike आहे.

FAQ

1. KTM कंपनीचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?

उत्तर : ऑस्ट्रेलियातील Mattighofen येथे KTM कंपनीचे मुख्य कार्यालय आहे.

2. KTM चे संस्थापक कोण ?

उत्तर : Hans Trunkenpolz हे KTM कंपनीचे संस्थापक आहे.

3. KTM कंपनीची सर्वात महागडी स्पोर्ट कार कोणती ?

उत्तर : 1290 Super Duke R STD मॉडेलची कार ही KTM ची सर्वात महागडी कार आहे, ज्याची किंमत भारतात १२.५० लाख रुपये इतकी आहे. 

4. कंपनीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

उत्तर : KTM कंपनीची सुरुवात साल १९३४ मध्ये झाली.

5. KTM कंपनीच्या Bike चा सर्वाधिक वेग किती आहे ?

उत्तर : KTM कंपनीची “RC390” मॉडेलची Bike ही KTM ची सर्वाधिक वेगाने धावणारी Bike म्हणून ओळखली जाते, ज्याचा वेग १७० किलोमीटर प्रति तास इतका आहे.

अधिक लेख –

1. LIC चा फुल फॉर्म काय ?

2. BMW चा फुल फॉर्म काय ?

3. HDFC चा फुल फॉर्म काय ?

4. NGO चा फुल फॉर्म काय ?

Leave a Comment