क्षेत्रभेट म्हणजे काय ? (सविस्तर माहिती)

विविध ठिकाणी प्रवास करणे आणि नवनवीन ठिकाणांना भेट देणे हा आपल्या जीवनातीलच एक भाग आहे. प्रवास करणे प्रत्येकालाच आवडते असे नाही, तर अनेक लोकांना प्रवास करणे कंटाळवाणे देखील वाटते. कोणत्याही प्रवासातील सर्वात महत्वाचं घटक म्हणजे क्षेत्रभेट.

क्षेत्रभेट म्हणजे नेमके काय, याचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

क्षेत्रभेट म्हणजे काय ?

क्षेत्रभेट म्हणजे एका व्यक्तीने अथवा व्यक्तींच्या समूहाने, ठराविक क्षेत्राला भेट देऊन, त्या क्षेत्राचा आढावा घेणे होय. शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्रभेट म्हणजे वर्गा बाहेरील कोणत्याही ठराविक क्षेत्राला भेट देणे होय.

क्षेत्रभेटची व्याख्या विविध पद्धतीने मांडण्यात आली आहे, जरी वाक्यांची रचना वेगळी असली तरी, त्याचा अर्थ मात्र एकच होतो, तो म्हणजे ठराविक ठिकाणाला भेट देणे, अथवा ठराविक ठिकाणावर प्रवास करणे.

क्षेत्रभेट म्हणजे शाळेद्वारे आयोजित करण्यात आलेली सहल असे देखील आपण म्हणू शकतो , ज्यात शाळेद्वारे विद्यार्थ्यांना घेऊन क्षेत्रभेट केली जाते, ज्याचा एकच मुख्य उद्देश असतो, तो म्हणजे भारतीय संस्कृतीचा परिचय, संस्कृतीचे महत्व, निसर्गाचा शोध, नवनवीन जीवनशैली आणि भाषेचे आकर्षण, विद्यार्थाना पटवून देणे.


क्षेत्रभेटीचे प्रकार

विविध हेतू साधण्यासाठी विविध ठिकाणच्या क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात, ज्यामुळे क्षेत्रभेटीचे विविध प्रकार उदयास आले आहेत, ज्याचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

1. निसर्ग क्षेत्रभेट

निसर्ग आपल्या संपूर्ण आयुष्यात फार महत्वाची भूमिका बजावत असतो, निसर्ग केवळ आपल्या जीवनाचा, तर संपूर्ण पृथ्वीचा महत्वाचा भाग आहे. निसर्ग एक असा घटक आहे, जो सतत आपल्याला काही न काही देतच असतो, त्यामुळे निसर्गापासून शिकण्यासारखे खूप काही आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गाचा ह्रास अगदी वेगाने होते आहे, ज्याचे विपरीत परिणाम आपण दैनंदिन जीवनात आपण पाहूच शकतो. निसर्ग क्षेत्रभेट करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे निसर्गातील विविध घटकांचा उलघडा करणे, निसर्गाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देणे, निसर्गाची आपल्या जीवनातील महत्वाची भूमिका स्पष्ट करणे, आणि निसर्गाचा परोपकारी भाव हा विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात करणे.

2. सांस्कृतिक क्षेत्रभेट

संपूर्ण भारतात विविध जाती, धर्मची लोक वास्तव्य करतात आणि प्रत्येक जाती धर्मची एक वेगळीच परिभाषा आणि संस्कृती आहे. प्रत्येक संस्कृतीचे विशेष असे महत्व आहे. शास्त्रज्ञानी केलेल्या संशोधनातुन असे समोर आले आहे, की भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात जुनी आणि आकर्षक अशी संस्कृती आहे. या संस्कृतीचा आढावा घेणे हाच सांस्कृतिक क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश असतो.

सांस्कृतीक क्षेत्रभेट ठराविक राज्यात अथवा गावात असू शकते, कारण शहराच्या तुलनेत खेडे गावांच्या ठिकाणी संस्कृतीचे विशेष संगोपन दिसून येते, यामध्ये विद्यार्थ्यांना नवनवीन संस्कृतीचा इतिहास, सण, संस्कृती अंतर्गत लोकांचे पोशाख, खानपान, वाणी अथवा भाषा या संबंधित माहिती मिळते.

3. व्यावसायिक क्षेत्रभेट

वर्तमान काळात व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार अगदी वेगाने होताना दिसत आहे. दर दिवशी नवनवीन पद्धतींचे व्यवसाय उदयास येत आहेत, ज्यामुळे न केवळ बेरोजगारी कमी होत आहे, तर सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठ्या प्रमाणात सहाय्य मिळत आहे. विद्यार्थ्याला एक उत्तम उद्योजक बनण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रभेट ही नेमीचं फायदेशीर ठरते.

व्यावसायिक हेतू ने केलेली क्षेत्रभेट ही साधारणतः एखाद्या उत्पादक फॅक्टरी, व्यावसायिक विद्यापीठ, बँक अथवा नामांकित कंपनीच्या कार्यालयात असू शकते. येथे विद्यार्थ्यांना कार्यालयीन कामकाज, फॅक्टरीमध्ये उपयोगात येणार महत्वाचे यंत्र, उत्पादन कसे होते याची माहिती, ठराविक वस्तूची उत्पादक किंमत, बाजार भाव, कंपनीचा दैनंदिन खर्च, उत्पादनाची प्रक्रिया, एखाद्या व्यवसायाची सुरुवात कशी करावी, विस्तार कसा करावा, अशा विविध विषयांसंबधीत माहिती मिळू शकते.

4. ऐतिहासिक क्षेत्रभेट

भारताचे वास्तव्य हे जगातील इतर देशांच्या तुलनेत फार जुने आहे, ज्यामुळे भारताचा इतिहास हा न केवळ जुना तर प्रभावशाली आहे, मग तो सांस्कृतिक असो वा राजकीय. भारताला पूर्वी “सोनेकी चिडिया” असे म्हटले जायचे, कारण पूर्वी भारतइतकी संपत्ती कदाचितच कोणत्या देशाकडे होती, तसेच भारताचा भूविस्तार हा देखील अखंड होता.

भारताचे वैभव पाहून अनेक परकीय आक्रमण भारतावर झाले, ज्यामुळे भारतातील अनेक ऐतिहासिक स्थळे उद्वस्थ झाली, परंतु भारताचा इतिहास हा आणखी आकर्षक बनला.

ऐतिहासिक क्षेत्रभेट ही साधारणतः गडकिल्ले, ऐतिहासिक राजवाडे, महाल, योध्यांची समाधी, यांसारख्या ठिकाणी आयोजित केली जाऊ शकते, ज्याने विद्यार्थाना भारतीय योध्यांचा पराक्रम कळावा व भारतीय इतिहासाचे संगोपन व्हावे.

5. कृषी विषयक क्षेत्रभेट

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. वर्तमानकाळात भारतातील १५९.६ दशलक्ष हेक्टर इतकी जमीन ही शेती करीता वापरण्यात येते. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, जेथे सर्वाधिक क्षेत्रफळ हे शेतीने व्यापले आहे. तंत्रज्ञान आणि हरित क्रांतीमुळे शेतीचा न केवळ विस्तार झाला, तर सोबतच शेती करण्याच्या पद्धतीत देखील बदल घडून आला, शेती विषयक प्रत्येक कामांमध्ये तंत्रज्ञाचा वापर वाढू लागला, परिणामी उत्पादन क्षमता वाढली.

वर्तमान काळात भाजीपाले व फळांची शेती, मत्स्य शेती अशा विविध पद्धतीची शेती केली जाते, ज्यामुळे कृषी विषयक क्षेत्रभेट ही एखाद्या शेती क्षेत्रात, अथवा ग्रीन होऊस मध्ये आयोजित केली जाऊ शकते.

6. पर्यटन क्षेत्रभेट

महाराष्ट्रातील गडकिल्ले, लोणावळा, खंडाळा घाट, गेट ऑफ इंडिया, गोव्याचा समुद्र किनारा, राजस्थान चे वाळवंट, राजवाडे हे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण बनून राहिले आहे. या पर्यटन स्थळांना न केवळ राष्ट्रीय तर, आंतराष्ट्रीय स्तरावर देखील प्रचिती प्राप्त झाली आहे.

क्षेत्रभेटीसाठी देखील ही पर्यटन स्थळे उत्तम मानली जातात. पर्यटन क्षेत्रभेटीचा एकच मुख्य उद्देश तो म्हणजे नवनवीन पर्यटन स्थळांचा आढावा घेणे आणि प्रवासाचा आनंद घेणे.


क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करायची ?

 1. क्षेत्रभेट पूर्व तयारीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे, योग्य क्षेत्राची निवड करणे. म्हणजे जर आपण पर्यटन क्षेत्रभेटीसाठी चाललो आहोत, तर त्यासाठी एक प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळाची निवड करणे फार गरजेचे आहे.
 2. ज्या ठिकाणी आपण क्षेत्रभेटीसाठी जाणार आहोत, तेथे जाण्यासाठी सोईस्कर वाहन आणि मार्ग कोणता या बद्दल माहिती मिळवणे, व वाहनांची सोया करणे.
 3. प्रवासादरम्यान योग्य खाद्य पदार्थांची आणि पिण्याच्या पाण्याची सोया करणे.
 4. जेथे क्षेत्रभेटीसाठी जाणार आहोत, तेथे जाण्यापूर्वी वेळेचा आराखडा तयार करणे, म्हणजे प्रवासासाठी किती वेळ लागणार आहे, कोणत्या वेळी कोणत्या क्षेत्राला भेट द्यायची, कोणत्या वेळी परत येण्यासाठी निघायचे इत्यादी.
 5. ज्या क्षेत्राला आपण भेट देणार आहोत, तेथील संपूर्ण माहिती ऑनलाईन अथवा पुस्तकाच्या साहाय्याने जाणून घेणे.

अशा प्रकारे आपण कोठेही क्षेत्रभेट देण्यापूर्वी पूर्वतयारी करू शकतो.


क्षेत्रभेटीसाठी लागणारे साहित्य

क्षेत्रभेटी दरम्यान लागणाऱ्या साहित्यांची नावे खालीलप्रमाणे :

 • कॅमेरा
 • नकाशा
 • प्रथमोपचार किट
 • पाणी बॉटल
 • दिशादर्शक यंत्र किंवा होकायंत्र
 • लहान बॅग

क्षेत्रभेटीचे फायदे

क्षेत्रभेटीमुळे विविध ठिकाणांमधील विविध अन्नाचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. क्षेत्रभेट म्हणजे एक प्रकारचा प्रवासच होय आणि कोणताही प्रवास हा, तेथील स्थानिक अन्नाचा आस्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.

क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याला विविध संस्कृतींचा आढावा घेता येतो. कोणतीही संस्कृती साधारणतः इतिहास, भाषा, भूगोल, पेहराव याचा संदर्भ देते. नवीन संस्कृतीबद्दल जाणून घेणे हे नेहमीच एक रोमांचक असे कार्य आहे. प्रत्येक नवीन संस्कृती आपल्याला नवीन शिकवण आणि अविस्मरणीय असा अनुभव देऊन जाते.

क्षेत्रभेटीमुळे कोठे न कोठे आपल्या शरीरावर देखील चांगला परिणाम होतो. एखादे नवीन ठिकाण पाहायचे, या विचारानेच आपले मन आनंदी होते, शरीरात सकारात्मक ऊर्जा नांदू लागते. तसेच क्षेत्रभेटी दरम्यान शरीराची हालचाल वाढते, ज्यामुळे रक्तदाब सुरळीत राहणे, तणाव दूर होणे, मानसिक रित्या तंदुरुस्त होणे असे अनेक फायदे होतात, ज्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक अयोग्य निरोगी आणि सुदृढ होते.

क्षेत्रभेटी दरम्यान नवनवीन लोकांसोबत ओळख होते, ज्यामुळे अनुभव वाढतो, मैत्रीचे जाळे वाढते. नवीन ओळखीनमुळे क्षेत्रभेट ही अधिक उत्साहपूर्वक पार पडते.

क्षेत्रभेटीमुळे आपल्याला प्रदेशाचे अथवा ठिकाणचे प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त होते, जे आपला बौद्धिक विकास वाढविण्यास मदत करते.

Leave a Comment